बारशिंगा प्राण्याची संपूर्ण माहिती Reindeer Animal Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Reindeer Animal Information In Marathi बारशिंगा हा प्राणी सर्वांच्या परिचयाचा आहे किंवा बऱ्याच लोकांना हरणांच्या प्रजातींमध्ये फरक अजूनही कळलेला नाही, त्यामुळे आपल्याला हरणांच्या प्रजाती ओळखण्यासाठी अडचण होते. बारशिंगा हा प्राणी हरणांची एक प्रजाती आहे.1 यांची वर्गवारी हरणांच्या सारंग कुळात केली जाते. 2

Reindeer Animal Information In Marathi

बारशिंगा प्राण्याची संपूर्ण माहिती Reindeer Animal Information In Marathi

या हरणांची शिंगे हेच यांचे वैशिष्ट्य आहेत. यांना बारशिंगा किंवा त्यापेक्षा जास्त त्यांच्या शिंगांना फाटे असतात. म्हणून या हरणांना बाराशिंगा असे नाव पडले त्यांच्या शिंगांच्या वैशिष्ट्यामुळे त्यांना बाराशिंग असे म्हणतात. बाराशिंगा हे एक मोठी हरणांची प्रजाती आहे. त्यांची खांद्यापासूनची उंची दीड मीटर पर्यंत असते तर यांच्यामध्ये नराचे वजन हे 150 किलो पेक्षा जास्त असू शकते.

या प्राण्यांच्या शिंगाचा आकर्षक असा डोलारा हा 75 सेंटीमीटर पर्यंत वाढलेला असतो.3 बाराशिंगा या प्राण्यांचा रंग हा फिकट तपकिरी ते पिवळसर असतो. पोटाचा व शेपटी खालचा भाग हा पांढरा असतो. या प्राण्यांच्या नराला आयाळीसारखे लांब असे केस असतात व त्यांचा रंग हा मादीपेक्षा गडद असतो.

 शास्त्रीय नावसर्व्हस ड्यूव्हाउसेली 
 उंचीसु. 70-135 सेंमी. 
वजनसु. 180 किग्रॅ. 
शिंगाला शाखा 10-14
प्रौढ नराची शिंगे सु. 75 सेंमी. लांब असतात
बाराशिंगा या प्राण्यांचा रंग फिकट तपकिरी ते पिवळसर असतो

उन्हाळ्यामध्ये नर आणि मादी या दोघांचीही रंग फिक्कट होतो. पिल्ले जन्मता त्यांच्या अंगावर अस्पष्ट ठिपके दिसतात. नरांच्या डोक्यावर मृगशृंगी असतात व या शिंगागाच्या रचनेमध्ये व आकारात बऱ्याचदा फरक आपल्याला दिसतो. सर्वसाधारणपणे शिंगाचे दोन प्रकार असतात.

बारशिंगा प्राण्याचा आवाज (Reindeer Animal Sound)

बारशिंगा प्राण्याचे फोटो (Reindeer Animal Images)

बाराशिंगा हा प्राणी कोठे आढळतो?

हे प्राणी नेपाळ भारत-बांगलादेश येथे आढळून येतात. तसेच यांचा मुख्यता वावर हा मध्य भारतामधील कान्हा अभयारण्यामध्ये आहे. यांच्या प्रजाती ह्या नामशेष होण्याच्या मार्गावर होत्या. 1970 मध्ये कान्हा या अभयारण्यामध्ये या प्रजातीच्या हरणांची 66 एवढी संख्या बाकी होती. वन्यजीव संरक्षण कायद्याने या प्राण्यांच्या शिकारीवर बंदी आणलेली असून कान्हा अभयारण्यामध्ये यांच्या संवर्धनावर विशेष प्रयत्न करण्यात आले होते. त्यामुळे आज या प्राण्यांची संख्या 1000 पेक्षा जास्त आहेत.

बाराशिंगा हा प्राणी दिसायला अतिशय आकर्षक व सुंदर असा प्राणी दिसतो. महाराष्ट्रात पूर्वी बाराशिंगा विदर्भाच्या जंगलांमध्ये आढळून येत होता; परंतु आता मात्र तेथे आढळत नाही, त्या व्यतिरिक्त हे प्राणी आसाम, नैऋत्य भारतात आढळून येतात व सुंदरबन, काझीरंगा या अभयारण्यामध्ये सुद्धा हे प्राणी मोठ्या संख्येने आढळून येतात. या प्राण्यांना इंग्लिश मध्ये रेनडियर असे म्हणतात.

बारशिंगा हा प्राणी काय खातो ?

बाराशिंगा हे प्राणी शाकाहारी आहेत. त्यामुळे हे प्राणी सकाळी किंवा संध्याकाळ होण्यापूर्वी चरण्यास बाहेर पडतात व दुपारी हे प्राणी विश्रांती घेतात. हे प्राणी त्यांच्या आहारामध्ये झाडांचा कोवळा पाला आणि गवत खाऊन आपली उपजीविका भागवतात. हे प्राणी सहसा पाण्याशिवाय राहू शकत नाही, त्यामुळे हे पाण्याच्या सानिध्यात नेहमी राहतात.

Reindeer Animal Information In Marathi

शिंगा या प्राण्याची शरीरिक रचना :

बाराशिंगा या प्राण्यांचा रंग हा फिकट तपकिरी ते पिवळसर असतो. पोटाचा व शेपटी खालचा भाग हा पांढरा असतो. या प्राण्यांच्या नराला आयाळीसारखे लांब असे केस असतात व त्यांचा रंग हा मादीपेक्षा गडद असतो. उन्हाळ्यामध्ये नर आणि मादी या दोघांचीही रंग फिक्कट होतो. पिल्ले जन्मता त्यांच्या अंगावर अस्पष्ट ठिपके दिसतात. नरांच्या डोक्यावर मृगशृंगी असतात व या शिंगागाच्या रचनेमध्ये व आकारात बऱ्याचदा फरक आपल्याला दिसतो. सर्वसाधारणपणे शिंगाचे दोन प्रकार असतात.

पहिल्या प्रकारात शिंगे हे प्रथम पाठीकडे झुकतात व नंतर त्यांची वाढ झाल्यावर डोक्यावर येतात. शिंगाला बाजूस शाखा फुटतात आणि दुसऱ्या प्रकारात शिंगास प्रथम काटकोन करणारी शाखा फुटते. यामुळे पुढे या शाखेला व मूळ शींगास फुटणाऱ्या शाखांना अडथळा निर्माण होत नाही.

दुसऱ्या प्रकारच्या शिंगामुळे हे प्राणी जास्त आकर्षित दिसून येते तसेच या शिंगांना 10 ते 14 शाखा फूटतात.4 बऱ्याच वेळा या शिंगांची संख्या ही 20 फाटेपर्यंत सुद्धा जाते. ही शिंगे मात्र फक्त नरांनाच असतात. मृगशिंगांचा उगम संयोगी उत्कांपासून झालेला असतो. यांची पूर्ण वाढ होण्यापूर्वी यावर एक मखमली सारख्या कातडीचे आवरण असते.

Reindeer Animal Information In Marathi

शिंगांची वाढ झाली की, ते शिंगे हाडाप्रमाणे कठीण होतात व वरचे कातडे हे वाळून जाते. या हरणांच्या काही कालावधीनंतर ही शिंगे गळून पडतात व त्यांच्या जागी नवीन शिंगे निर्माण होतात. नराची पूर्ण वाढ झालेली असेल तर त्याची खांद्यापासूनची उंची हे 135 सेंटीमीटर व वजन हे 170 ते 180 किलोमीटर असते.5 तसेच या प्राण्यांमध्ये मादी थोडी लहान असते. या प्राण्यांची श्रवण शक्ती ही सर्वसाधारण प्रतीची असते.

तसेच त्यांचे घाणेंद्रिय मात्र तीक्ष्ण असतात. कान मोठे असतात, या जातीतील काही प्राण्यांच्या डोळ्याखाली गंध ग्रंथी असतात. नरांच्या या ग्रंथी मधून एक वासाचा द्रव्य वाहत असतो या ग्रंथी अश्रू ग्रंथी पेक्षा थोड्यावेगळे असतात. धोक्याची सूचना मिळाल्याबरोबर सर्व कळप जोराने धावतात व हे प्राणी माजावर येण्याचा काळ हा वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळा असतो.

बाराशिंगा या प्राण्यांची जीवन पद्धती :

बाशिंगला या प्राण्यांचा विनीचा हंगाम हा सप्टेंबर ते एप्रिल या महिन्यांमध्ये असतो तसेच मादी एका वेळेस एकाच हरणाच्या पिल्लांना जन्म देते. नर व माद्या हे कळप करून राहतात त्यांच्या कडपांमध्ये आठ ते वीस प्राण्यांची संख्या असते. या प्राण्यांच्या मादीचा गर्भधारणेचा काळ हा 228 ते 234 दिवसांचा असतो.

प्राण्यांचा गर्भधारणेचा काळ हा सहा महिन्यांचा असतो. गर्भधारणेनंतर ऑगस्ट ते नोव्हेंबर या महिन्यांमध्ये पिल्ले जन्माला येतात. त्यांना नॅशनल पार्कमध्ये सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये सर्वाधिक पाळी जन्माला येतात. हे पाडस जन्माला आल्यानंतर संध्याकाळपर्यंत दूध प्यायला लागते तसेच फिरायला लागते.

हे प्राणी निशाचर नाहीत हे प्राणी घाबरल्यावर कर्कश आवाजात ओरडतात. या प्राण्यांची श्रवण शक्ती ही सर्वसाधारण प्रतीची असते. तसेच त्यांचे घाणेंद्रिय मात्र तीक्ष्ण असतात. कान मोठे असतात, या जातीतील काही प्राण्यांच्या डोळ्याखाली गंध ग्रंथी असतात.

नरांच्या या ग्रंथी मधून एक वासाचा द्रव्य वाहत असतो या ग्रंथी अश्रू ग्रंथी पेक्षा थोड्यावेगळे असतात. शिंगांची वाढ झाली की, ते शिंगे हाडाप्रमाणे कठीण होतात व वरचे कातडे हे वाळून जाते.

काही कालावधीनंतर ही शिंगे गळून पडतात व त्यांच्या जागी नवीन शिंगे निर्माण होतात. माद्याना शिंगे नसतात तसेच या प्राण्यांमध्ये मादी थोडी लहान असते. धोक्याची सूचना मिळाल्याबरोबर सर्व कळप जोराने धावतात व हे प्राणी माजावर येण्याचा काळ हा वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळा असतो.

या प्राण्यांचे आयुष्य हे 23 वर्षापर्यंत जगतात. तर बंदीवासामध्ये हे प्राणी आणखीन चार-पाच वर्ष जास्त जगतात. या प्राण्यांच्या शिकारीवर बंदी आलेली आहे, त्यामुळे आता या प्राण्यांची शिकार सुद्धा कमी प्रमाणात होती.

FAQ


बारासिंग का म्हणतात?

दलदलीचे हरीण इतर सर्व भारतीय हरणांच्या प्रजातींपेक्षा वेगळे आहे कारण शिंगे तीनपेक्षा जास्त टायन्स वाहून नेतात. या विशिष्ट वर्णामुळे त्याला बारह-सिंगा असे नाव देण्यात आले आहे, याचा अर्थ हिंदीमध्ये “बारा-शिंगे” असा होतो . प्रौढ स्टॅग्समध्ये सामान्यतः 10 ते 14 टायन्स असतात आणि काहींना 20 पर्यंत ओळखले जाते.

बाराशिंगा या प्राण्यांचा रंग कोणता असतो

फिकट तपकिरी ते पिवळसर असतो

संदर्भ:

  1. Eng.Wikipedia ↩︎
  2. Britannica ↩︎
  3. Vikaspedia ↩︎
  4. Marathivishwakosh ↩︎
  5. Marathivishwakosh ↩︎
Was this article helpful?
YesNo

Leave a Comment