हरीण प्राण्याची संपूर्ण माहिती Deer Information In Marathi

Deer Information In Marathi हरीण हा प्राणी अतिशय गरीब व देखना असतो. त्याला पाहता क्षणी आपल्याला त्याची जणू दया येते. एवढा निरागसपणा हरण या प्राण्यांमध्ये असतो. हरीण हा प्राणी करताना राहणारा आहे. हरणाचे अनेक प्रकार आहेत. परंतु हरीण या प्राण्याचे नाव घेताच आपल्या डोळ्यासमोर सोनेरी रंग व अंगावर पांढरे ठिपके असणारा असं नाजूक चित्र उभे राहते. तर हे हरीण कुठे राहते? त्यांचे जीवन पद्धती कशी असते तसेच हरणाचे प्रकार आज आपण या हरणाविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

Deer Information In Marathi

हरीण प्राण्याची संपूर्ण माहिती Deer Information In Marathi

आपण भारतीय हरणांविषयी माहिती पाहणार आहोत भारतीय हरीण हि जैविक साखळीमध्ये खूपच महत्त्वाचे आहे. तसेच या हरणाचे शास्त्रीय नाव अँटिलोप सर्व्हिकॅप्रा असे असून ते भारतीय हरीण म्हणूनही ओळखले जाते. ज्या प्राण्याला सर्वप्रथम युरोपिय लोकांनी हरीण हे नाव दिले होते. हरीण हे घनदाट जंगलात कारण यात दिसून येतात. तसेच हरिण जगातील सर्वच खंडात आढळून येत असतो.

मध्यम आयोजिन काळामध्ये प्राचीन हरणाचे जीवाश्म फ्रान्स या देशांमध्ये सापडले होते. हरिण हा प्रगत व समखुरी प्राणी आहे हा प्राणी खूपच चपळ व स्वभावाने भित्रा असतो. दिसायला जरा हा सुंदर आकर्षक असून हरणांच्या बऱ्याच कथा आपण लहानपणी ऐकल्या असतील कारण पुराणांमध्ये सारंग मृग अशा हरणांचा उल्लेख केलेला आहे.

नावहरिण
वेग६० – ८० किमी/ताशी
उंची८५ – १५० सेमी
गर्भधारणेचा कालावधी२२२ दिवस
उच्च वर्गीकरणपेकोरा
वैज्ञानिक नावसर्ववाडा
कुटुंबसर्व्हिडे; गोल्डफस, १८२०

हरीण कशी दिसते?

हरणांच्या अनेक जाती आहेत. जगातील विविध प्रांतातील वातावरणानुसार आणि हवामानानुसार हरणात विविध आकार आणि रंगसंगती आढळते. हरिण हे सहसा घनदाट अरण्य, वाळवंट, मैदानी जंगले व पर्वतरांगा वर दिसून येतात. त्यांच्या जातीनुसारच त्यांची रंग, रूप दिसायला वेगळेपणा असतो. आपण पाहिलेली हरीण आणि दुसरा प्रकारचे हरीण यामध्ये फरक असतो. हरणीच्या अंगावर सोनेरी पिवळ्या रंगाचे पांढरे ठिपके असतात तसेच हे हरीण शेळी पेक्षा थोडीच उंचीने मोठी असते. त्या हरणांचा रंग सोनेरी पिवळा लालसर असतो. हरणांचा रंग निसर्गाशी जोळते-मिळते असतात. हरणांना दोन कान, दोन डोळे, एक तोंड, चार पाय व शेपूट असतं. हरणाचे तोंड निमूळते असून कान उभे असतात व शेपूट मात्र छोटसं असतं. यामध्ये मादी हरणाला शिंगे नसतात तर नर हरणीला शिंगे असतात. पावसाळ्याच्या व हिवाळाच्या दिवसात हरणांचा रंग अधिक गडद तर उन्हाळ्यामध्ये तो फिका पडतो. हरणांच्या काही प्रकारांतील जाती दरवर्षी आपल्या शिंगांचा त्याग करतो. हरणाला जन्माच्या दोन वर्षानंतर शिंगे येऊ लागतात

Deer Information In Marathi

हरणांची जीवनमान ?

हरीण हा प्राणी अतिशय निरागस आणि भित्रा प्राणी आहे. हरीण हा प्राणी शाकाहारी असल्यामुळे तो आपला उदरनिर्वाह गवत, झुडपांच्या फांद्या, शेंडे खाऊन करत असतो. हरणाचा प्रजनन काळ हा त्यांच्या प्रजातींवर ठरतो. बऱ्याच जणांचा प्रजनन काळ हा 168 ते 270 दिवसांचा असून एका वेळेस एकच पिल्लू जन्माला येते. हरणाचा प्रजनन काळ हा फेब्रुवारी ते मार्च हा असतो. हरणांना दोन पिल्ले सुद्धा होऊ शकतात. हरणाची पिल्लू छोटे असल्यामुळे ते जास्त चालू शकत नाही. जेव्हा ते जन्माला येते. तेव्हा त्याची आई त्याला चाटून स्वच्छ करते. अशा काळात बऱ्याचदा हरीण वाघ, चित्ता, सिंह यांची शिकार बनते व त्यांचे जीवनमान तसेच संपते. तसे पाहता हरणांचे आयुर्मान 15 वर्ष असू शकते.

Deer Information In Marathi

राहण्याचे ठिकाण :

पृथ्वीवर अंटार्टिका खंड सोडले तर सर्वच ठिकाणी हरीण प्राणी दिसून येतो. हरणांची सर्वात मोठी प्रजाती ही आयरिश विशालकाय या नावाने ओळखले जाते. दक्षिणेकडील भागात ही हरणांची सर्वात लहान प्रजाती आहे. हरीण या प्राण्याची केवळ एक प्रजाती रेनडियर जी पाळीव प्राणी आहे. सर्वप्रथम हरीण हे युरोपमधील दक्षिण भागामध्ये आढळले आणि नंतर पूर्व आशियातील आफ्रिकेमध्ये दक्षिण भागात पसरले. हरीण हा प्राणी कडपाणी राहणारा असून हरीण पर्वतीय क्षेत्रापासून उष्ण आणि बर्फाळ प्रदेशात सुद्धा वास्तव्य करू शकते. हरीण बर्फाळ प्रदेशामध्ये जीवन जगू शकतात तसेच कुरणे, खुरटी जंगले, गवताळ प्रदेश, माळरान किंवा मोठ्या झाडाखाली देखील हरणांची कळप मोठ्या संख्येने राहतात. त्या व्यतिरिक्त हरणे अरण्य जंगल वाळवंटी प्रदेश दलदरीचा प्रदेश मैदानी प्रदेश व पर्वतरांगांच्या उतरणीवर दिसून येतात. हरणाची सर्वात मोठी संख्या आफ्रिका येथे आहे तसेच दक्षिण आशियामध्ये सर्वत्र मोठ्या प्रमाणात हरणांचा प्रसार झालेला आहे.

हरीणाचे प्रकार :

हरणांचे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये सारंग हरीण व कुरंग हरीण ह्या मुख्य जाती आहेत. महाराष्ट्रात आढळणाऱ्या बऱ्याच सर्वांच्या प्रजाती आपल्या ओळखीचे असू शकतात.

सारंग हरीण :

सारंग हरणांच्या कुळामध्ये सांबर, चितळ, कस्तुरी मृग, रेनडियर भेकर, कस्तुरी मृग, बाराशिंगा, थामिन, मूस, काश्मिरी हंगूल, भुंकरे सारंग, पारा हरीण व पिसोरी इत्यादी हरणांच्या प्रजाती दिसून येतात. त्यांच्यामध्ये जवळपास सर्वच हरणांची जुने शिंगे गळून जातात व त्या ठिकाणी नवीन शिंगे उगवतात.
हे हरी मोठ्या प्रमाणावर अमेरिका आशिया खंड व युरोप खंडात आढळून येतात. आफ्रिका खंडात प्राण्यांचे मोठ्या प्रमाणावर संख्या असली तरी तेथे सारंग हरणे नाहीत. सारंग हरणे प्रामुख्याने दाट व घनदाट जंगलातच राहतात शुष्क व वाळवंटी प्रदेशात त्यांचा वावर आता मात्र दिसत नाही. सारंग हा हरीण सस्तन कुळातील प्राणी आहे. या कुळातील प्राण्यांच्या पायांना विभाजीत खूर असते. म्हणजे दोन टाचा असतात हरणांची यामध्ये दोन उपकुळे आहेत. जसे सारंग व कुरंग ही दोन्ही हरणे जरी दिसायला सारखे असली तरी या दोघांमध्ये बरीच तफावत आपल्याला पाहायला मिळते. ही फरक म्हणजे त्यांच्या शिंगामध्ये असते.

कुरंग हरीण :

या हरणांची गवयाद्य ही उपकुळ आहे. यामध्ये नीलगाय, चिंकारा, काळवीट, चौशिंगा, पिसूरी हरीण, इंफाळा हरीण तसेच ग्रेऱ्हिबॉक हरीण इत्यादी प्रकार मोडतात. या प्रजातीमध्ये शिंगे एकदा उगवली की ते पुन्हा गळत नाहीत. हरणांच्या प्रत्येक पायाला सम संख्येत खुर असतात. त्यामुळे हरणांचा समावेश युग्मखुरी या गणात झाला आहे. यामध्ये सर्वच नर हरणांना शिंगे असतात. यातील काही अपवादात्मक माद्यांना देखील शिंगी असतात; परंतु माद्याची शिंगे ही नरांच्या शिंगांपेक्षा खूपच लहान आणि नाजूक असतात. या जातीचे हरणे सुद्धा कळपाने राहणे पसंत करतात. नर व माद्यांचे कळप वेगळे असून मिलन काळात ते एकत्र येतात. कुरंग हरणांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यांची शिंगे आहेत. ही शिंगे मात्र सारंग या हरणांच्या शिंगांपेक्षा बऱ्याच प्रमाणात वेगळी असतात. ही शिंगे पोकळ असून हाडांच्या सांगड्याचा एक भाग असतात. हे शिंगे कधीही गळून पडत नाही. या शिंगाला एकच टोक असते. शिंगाचे आकारमान सारंग या हरणाच्या शिंगा पेक्षाही लहान असते.

महाराष्ट्रात आढळणारे हरीण :

फळांच्या प्रजातीमधील काळवीट हे हरीण प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येते. म्हणजेच हे हरीण कुरंग या कुळातील आहे. हा काळवीट नर असेल तर तो काळ्या रंगाचा असतो आणि मादी ही भुऱ्या रंगाचे असते. यांच्यामध्ये नरांना शिंगे असतात. तर माद्यांना शिंगे नसतात. काळविटांची वस्ती केवळ शुष्क प्रदेशातील ओसाड माळरानांवर आहे. महाराष्ट्रामधील पर्जन्यछायेच्या प्रदेशातच हरणाची वास्तव्य मोठ्या प्रमाणावर दिसून येते. अहमदनगर जिल्ह्यामधील कर्जत तालुक्यात रेहकुरी येथे काढवितांचे अभयारण्य आहे तसेच पुणे जिल्ह्यातील दुष्काळी दौंड, इंदापूर, बारामती, शिरूर तालुक्यात व अहमदनगर सोलापूर जिल्ह्यामध्ये हरणांचे कळप पाहायला मिळतात.

FAQ

 
हरीण काय खातो?

झुडपांचे शेंडे, फांद्या आणि गवत खातात

हरीण कोणत्या प्रकारचे प्राणी आहे?

रुमिनंट सस्तन प्राणी 


हरणाचे वैशिष्ट्य काय आहे?

लांबलचक, कमी शेपटी, मजबूत पाय आणि लांब कान ही हरणाची वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्ये आहेत


हरणांना पोषक तत्वे कोठून मिळतात?

पोटातील सूक्ष्मजीव संश्लेषण करून त्यांच्या पौष्टिक गरजा पूर्ण करतात


हिरण कशाचे प्रतीक आहे?

आध्यात्मिक अधिकाराचे 

Was this article helpful?
YesNo

1 thought on “हरीण प्राण्याची संपूर्ण माहिती Deer Information In Marathi”

Leave a Comment