चित्ता प्राण्याची संपूर्ण माहिती Cheetah Information In Marathi

Cheetah Information In Marathi चित्ता हा मांजर कुळातील प्राणी आहे. सर्व प्राण्यांमध्ये चित्त्याचा सर्वाधिक आहे. चित्ता हा प्राणी जलद वेगाने धावणारा प्राणी म्हणून ओळखला जातो. बऱ्याचदा तुम्हाला चित्ता आणि बिबट्या यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. चित्त्याचा वेग हा ताशी 90 ते 110 किलोमीटर असू शकतो.

Cheetah Information In Marathi

चित्ता प्राण्याची संपूर्ण माहिती Cheetah Information In Marathi

चित्ता हा प्राणी प्राचीन काळापासूनच पृथ्वीवर वास्तव्याला आहे. चित्ता आणि बिबट्या यातील फरक जाणून घेऊया. बऱ्याचदा चित्ता आणि बिबट्या यातील आपल्याला फरक पडत नाही आपल्याला असे वाटते एकच आहे; परंतु त्यामध्ये फरक आहे दोन्ही प्राणी पाहिल्यानंतर सारखेच वाटतात.

चित्ता हा बिबट्यापेक्षा सळपातळ असतो. तसेच चित्त्याच्या अंगावर भरीव आणि छोटे काळे ठिपके असतात. बिबट्यांची ठिपके पुंजक्यात असून ते पोकळ असतात. बिबट्यांची शरीररचना ही मांजरासारखी तसेच गुडगुडीत असते. तर चित्त्याची शरीर रचना कुत्र्याप्रमाणे लांब सडक जोरात पळण्यास सक्षम अशी असते.

प्राणीचित्ता
शास्त्रीय नावॲकिनोनिक्स जुबेटस
जातसस्तन प्राणी
कुळमांजर कुळ
आयुर्मान14-20 वर्षे

चित्ता दिवसा शिकार करतो तर बिबट्या रात्री शिकार करीत असतो. तसेच बिबट्या आपली शिकार झाडावर घेऊन जाऊ शकतो. चित्त्याला आपल्या नख्यात ओढून घेता येत नाही. मात्र बिबट्याच्या नख्या तीक्ष्ण व बागदार असतात. तुम्हाला चित्ता या प्राण्याची ओळख असेलच तर जाणून घेऊया चिंता या प्राण्याविषयी सविस्तर माहिती.

चित्ता दिसायला कसा असतो ?

या प्राण्याला मांजर प्रमाणे चार पाय, दोन डोळे, दोन कान, एक शेपटी असून त्याचा डोकं लहान असतं. चिता अतिशय चपळ असून दिसायला सडपातळ असतो. हा प्राणी साधारणपणे सहा ते सात फुट लांबीचा असू शकतो. त्याचा रंग पिवळसर लाल असतो. तसेच त्याच्या अंगावर काळे भरीव ठिपके असतात. चित्त्याचे डोळे मोठे असून त्यांच्या डोळ्यांच्या बाहुल्या वर्तुळाकार असतात.

चित्ताची त्वचा खळबडीत असली तरीसुद्धा रंगाने पिंगळे असते. त्याच्या शरीरावर काळे ठिपके दिसतात मात्र त्याच्या पोटावर व पायावर काळी ठिपके दिसत नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावर डोळ्यांच्या खाली अश्रुधारा सारख्या दिसणाऱ्या रेषा असतात. त्याचे शरीर लांबसटक असते.

चित्त्याची छाती रुंद असून त्याची कंबर बारीक असते. त्याच्या पोटाकडील भाग फिकट रंगाचा असतो. तर त्याची नखे थोडीशी वाकडे असतात. यामुळेच चित्ता आपल्या भक्षाचा पाठलाग करताना आपली दिशा बदलण्यासाठी उड्या आणि नखांचा उपयोग करत असतो. पाय लवचिक आणि त्याची डोके लहान तसेच वाटोळे दिसते.

Cheetah Information In Marathi

चित्ता कोठे राहतो :

चित्ताचे वास्तव्य हे आफ्रिका, भारत युरेशिया या भूभागावर मोठ्या प्रमाणात दिसून येत होते; परंतु आज चित्त्याचे वास्तव्य फक्त आफ्रिकेच्या गवताळ देशापूरतेच मर्यादित राहिले आहे. यालाच मुख्य कारण आहे चित्त्याचे नष्ट झालेले वस्तीस्थान. चित्ता हा प्राणी गवताळ प्रदेशांमध्ये राहतो आणि गवताळ प्रदेश मोठ्या प्रमाणावर कमी झाल्यामुळे चित्त्याचे प्रमाण किंवा त्यांच्या संख्येमध्ये देखील मोठ्या प्रमाणात घट झाल्याची आपल्याला दिसून येते.

मानवी वस्ती वाढल्यामुळे तसेच मोठ्या प्रमाणावर शेतीसाठी जंगल तोड केल्यामुळे चित्त्याची प्रगती होऊ शकली नाही. गवताळ प्रदेश कमी झाल्यामुळे तो आपल्या पिल्लांचे इतर भक्षकांपासून संरक्षण देखील करू शकत नाही किंवा त्याने पकडलेल्या भक्ष्याचे देखील तो रक्षण करू शकत नाही. भुकेपोटी देखील चित्त्यांची संख्या कमी होत आहे.

भारतातील चित्त्याला आशियाई चित्ता म्हणून ओळखले जाते. चित्त्याची जात भारतातून नामशेष झाली आहे.
आता मात्र चित्ता केवळ इरान, बलुचिस्तान, आफ्रिका या देशातील गवताळ प्रदेशात आढळतो. त्या व्यतिरिक्त केनिया, झिंबाब्वे, दक्षिण आफ्रिका, युगांडा इत्यादी देशांमध्ये देखील चित्ता आढळतो.

चित्याची जीवन पद्धती :

चित्ता या प्राण्याची जीवन पद्धतीची त्याच्या तेथील भूभाग किंवा परिसरावर अवलंबून आहे. तसेच त्या भागांमध्ये आढळणारे वातावरण तिथे आढळणारे प्राणी प्रदेशानुसार बदलतात. चित्ता हा प्राणी मासमक्षक आहे, त्यामुळे तो लहान हरणांची शिकार करतो. आफ्रिकेतील चित्ता त्याच्या शिकारमध्ये इम्पाला व विविध प्रकारचे छोटे मोठे प्राणीव पक्षी त्याचे खाद्य बनवतो. बऱ्याचदा चित्ता झेब्रा किंवा वाईल्ड बिस्ट अशा मोठ्या प्राण्यांची शिकार देखील करू शकतो.

चिता अतिशय वेगवान होतो कारण त्याला भक्ष पकडण्यासाठी जोराने धावावे लागते तसेच हरणे देखील खूप जोराने धावतात. त्यांना पकडण्यासाठी चिपक्याला आपला वेग अधिक वाढवावा लागतो. चित्ता सहसा दिवसा शिकार करतो. सकाळी लवकर अथवा संध्याकाळी शिकार करू शकतो. दुपारच्या उन्हात तापमानामुळे तो स्वीकार करणे टाळतो. दुरून शिकार दिसतास भक्षाच्या जास्तीत जास्त जवळ जाऊन दबा धरून बसतो व भक्ष त्याच्या दहा ते वीस मीटर जवळ आल्यानंतर जोरदार वेग धरून भक्षावर तुटून पडतो.

चित्त्याची चाल पाहणे अतिशय रमनीय आहे. बरेचदा तुम्ही व्हिडिओमध्ये चित्त्याने आपले भक्ष पकडतानाचा व्हिडिओ पाहिला असेलच. चित्ता कधी लांबवर शिकार करण्यासाठी त्याचा पाठलाग करत नाही. त्याला वेग असला तरी लांब वरचा प्रवास करण्याची क्षमता त्याची नाही.

चित्त केवळ येथील दीड मिनिटच पाठलाग करून आपली शिकार पकडतो फाटला करताना चित्ता आपल्या पक्षाला सरळ सरळ गळा पकडून ठार मारत नाही तर पाठ लागा दरम्यान सुरुवातीला भक्षाला पकडायचं त्याचा डाव असतो व नंतर त्याला जखमी करून मारतो. शिकार पकडल्यानंतर चित्ता थोडा वेळ आराम करतो. कारण त्याच्या शरीराचे तापमान शिकार पकडण्या दरम्यान खूपच वाढलेले असते. तसेच ते कमी करण्यात त्याचा खूप वेळ जातो.

Cheetah Information In Marathi

चित्त्याचा प्रजनन काळ :

चित्त्याच्या जातींमध्ये नर हा त्यांच्या मादी पेक्षा मोठा असतो. माद्यांचा गर्भकाळ हा 84 ते 90 दिवसाचा असतो मादीला एका वेळेस दोन ते चार पिल्लं होतात.
पिल्ले मोठे होऊन स्वतः एकटी राहण्यास सक्षम होईपर्यंत ते त्याच्या आईसोबत राहतात. चित्त्याचे आयुष्य हे दहा ते बारा वर्षाचे असते. चित्ता हा प्राणी संग्रहालयामध्ये वीस वर्षे देखील जगण्याची नोंद आहे.

चित्त्याचे प्रकार :

एशियाटिक चित्ता : या चित्त्याची जात ही भारत इराण पाकिस्तान मध्ये आढळून येते. सध्या हे चित्ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. याविषयी भारत सरकारने प्राणी संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या जातीचा चित्ता हा पिवळसर आणि बदामी रंगाचा असून त्याच्या अंगावर काळे ठिपके असतात.
या चित्त्याचे वजन 143 किलो पर्यंत असते त्यांची उंची 31 ते 32 इंच असून त्यांची लांबी 52 इंच असू शकते तसेच त्यांची शेपटी ही 30 इंचाचे आहेत.

टांझानियन  चित्ता : या चित्त्याच्या जातीला केनिया चित्ता असे देखील म्हटले जाते. तसेच हे चित्ते टांझीनिया, सुमालिया आणि केनिया या देशांमध्ये आढळून येतात. हे गवताळ प्रदेशात राहणे पसंत करत असल्यामुळे गवताळ प्रदेशात वास्तव्याला आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या चित्त्याची संख्या चित्त्यापेक्षा खूप कमी आहे.

वायव्य आफ्रिकन चित्ता : या चित्त्याची प्रजाती ही केवळ वायव्य आफ्रिकेमध्येच आढळते सध्याही प्रवर्गातील सर्वात धोकादायक आहे. या चित्त्याचा रंग पांढरा असून त्याच्या अंगावर काळ्या रंगाची ठिपके असतात. तर त्याच्या पायावर तपकिरी रंगाचे ठिपके असतात.

सुदान चित्ता : या चित्त्याला मध्य आफ्रिकन चित्ता किंवा सोनाली चित्ता असे देखील म्हटले जाते. हा चित्ता आफ्रिकेमधील गवताळ प्रदेशात किंवा वाळवंटामध्ये आढळून येतो. सुदान चित्ते हे टांझानिया चित्त्यासारखेच दिसतात.

किंग चित्ता : किंचित त्याची प्रसाद ही केवळ आफ्रिकेमध्येच आहे. या प्राण्याची संख्या सुद्धा बऱ्याच प्रमाणावर कमी झालेली आहे. या प्राण्यांच्या अंगावर देखील काळे ठिपके आणि पट्टे असतात. ते इतरांपेक्षा जरा दिसायला वेगळेच असतात. त्यांचे वजन 88 ते 90 किलोपर्यंत असते. तसेच हे प्राणी सर्व मांसाहारी असल्यामुळे त्यांना दिवसातून आठ ते दहा किलो मास लागते. या प्रजातीच्या चित्त्यांचा आकार सर्वसामान्य चित्त्याच्या आकाराने मोठा असतो.

पांढरा चित्ता : पांढरा चित्ता हा नामशेष झालेला आहे. तो 1608 मध्ये सापडला होता. तसेच हा चित्ता सर्वात वेगवान होता असे मानले जाते.

FAQ


भारतात चित्ते कुठे आढळतात?

हे आठ चित्ते (Cheetah) मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये (Kuno National Park) ठेवण्यात आले आहेत. चित्ते नामिबियाहून सुमारे आठ हजार किलोमीटरचा प्रवास करुन भारतात दाखल झाले आहेत. 1952 साली भारतातून चित्ते नामशेष झाले होते. सर्वोच्च न्यायालयानं 2020 साली भारतात चित्ते आणण्याची परवानगी दिली.


भारतात चित्ते किती आहेत?

हे 12 चित्ते आज भारतात पोहोचतील. 12 चित्त्यांपैकी सात नर आणि पाच मादी आहेत.


चित्त्याची किती पिल्ले जगतात?

चित्ताच्या शावकांमध्ये वरवर पाहता उच्च मृत्यू दर असतो, जो अनुवांशिक विविधतेशी संबंधित असू शकतो. बंदिवासात जन्मलेल्या चित्त्यांच्या एका अभ्यासात, 29% शावक सहा महिन्यांच्या आत मरण पावले आणि केवळ अर्धेच प्रौढत्व गाठले – बालमृत्यूचे प्रमाण इतर प्राण्यांच्या प्रजातींपेक्षा कितीतरी जास्त आहे.


चित्ताचे निवासस्थान काय आहे?

गवताळ प्रदेश, सवाना, दाट वनस्पती आणि डोंगराळ प्रदेशासह 

Was this article helpful?
YesNo

Leave a Comment