Beer Animal Information In Marathi अस्वल हा प्राणी आपल्या सर्वांच्या ओळखीचा आहे. तसेच अस्वल प्राणी संग्रहालयामध्ये देखील आपण पाहिला असेलच. हा एक सस्तन प्राणी असून तो प्रामुख्याने उत्तर गोलार्धामध्ये आढळून येतो. अस्वलचे पंजे खूप मोठे असतात तसेच त्यांची जीभ सुद्धा लांब असते. अस्वल 64 प्रति किलोमीटर प्रतितास वेगाने धावू शकते. अस्वलची वास घेण्याची क्षमता खूपच सर्वाधिक असते. अस्वलचे हृदय गती चाळीस प्रति मिनिट असते. अस्वलच्या अनेक प्रजाती आहेत. त्यांचे वैशिष्ट्य हे त्यांच्या प्रजातींवरूनच लक्षात येते. तर चला मग जाणून घेऊया अस्वल या प्राण्याविषयी सविस्तर माहिती व त्याचे प्रकार
अस्वल प्राण्याची संपूर्ण माहिती Beer Animal Information In Marathi
नाव | अस्वल |
राज्य | प्राणी |
फिलम | चोरडाटा |
वर्ग | सस्तन प्राणी |
ऑर्डर | कार्निव्होरा |
इन्फ्राऑर्डर | आर्कटोइडिया |
कुटुंब | Ursidae |
अस्वल हा प्राणी कोठे राहतो?
अस्वल हा प्राणी आशिया युरोप, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका खंड येथे आढळून येतो. मुख्यतः हे उपोष्ण कटिबंधीय हवामानात आपले वास्तव्य करू शकतात. तसा अस्वल हा प्राणी शांत स्वभावाचा असून तो जंगलात राहणे पसंत करतो. हा प्राणी मासभक्षक आहे. अस्वलांना मासे खायला खूपच आवडतात. त्यामुळे ते नदीकाठी किंवा तलावाजवळ जास्त आपला सहवास घालवने पसंत करतात. जंगलांमधील मोठ्या झाडांवर अस्वल राहू शकतात. झाडांवरील मध खाणे त्यांना आवडते. अस्वली जंगलांमध्ये रात्री फिरतात व आपले भक्ष्य मिळवतात. संध्याकाळी हे बाहेर पडून फळ, फूल, कीटक, मध खातात. अस्वल हा प्राणी कळपात न राहता एकटा राहणे पसंत करतो. अमेरिका, उत्तर कॅनडा, आलास्का, फ्लोरिडा येथे ब्लॅक अस्वल आढळतात. तर ध्रुवीय अस्वल हे बर्फाळ प्रदेशात राहतात. आशियाटिक अस्वल हे अफगाणिस्तान, भूतान, बांगलादेश, भारत, कोलंबिया, चीन, मलेशिया, कोरिया, इराण, म्यानमार, रशिया, पाकिस्तान व तैवान या देशांमध्ये आढळतो तर स्लोथ अस्वल हे श्रीलंका, भूतान, नेपाळ आणि बांगलादेश येथे आढळून येतो.
अस्वल दिसायला कसा असतो?
अस्वलचे शरीर जाड मोठे असते. शरीराच्या मानाने त्याचे पाय छोटे असतात. अस्वलची डोक्यापासून शरीराची लांबी 1.4 ते 1.8 मीटर असून त्याचे शेपूट दहा ते बारा सेंटीमीटर असते. त्याच्या खांद्याची उंची 60 ते 90 सेंटीमीटर व वजन 90 ते 115 किलोग्रॅम पर्यंत असते. मागचे पाय आखूड जाड असतात. त्याचे पाऊल मोठे व पाच बोटांचे असते. प्रत्येक बोटांवर तीक्ष्ण नख्या असतात. त्या पुढच्या पावलांवर लांब असतात. त्यांच्या तोंडामध्ये खाण्यासाठी पसरट असा जबडा व दात सपाट असतात. अस्वलचे चार लांब दात असतात, त्याची त्वचा सैल असते तसेच त्याच्या अंगावर लांब व घनदाट असे काळे केस असतात. या रंगांमध्ये बऱ्याचदा तपकिरी रंग देखील असतो. अस्वलांची वास घेण्याची क्षमता अतिशय वेगवान असते. तसेच दृष्टी सुद्धा तीक्ष्ण असते त्यांना ऐकायला कमी येते.
अस्वल या प्राण्याचे जीवन प्रवास :
जंगलामध्ये अनेक प्राणी आपापले जीवन व्यतीत करत असतात. त्याचप्रमाणे अस्वल हे प्राणी एकटे राहणे पसंत करतात. ते कळपाने राहणे पसंत करत नाही, त्यांच्या संगमाचा काळ हा उन्हाळा असतो. अस्वल हा प्राणी सात ते नऊ महिन्यांचा गर्भवतीनंतर डिसेंबर ते जानेवारीमध्ये मादीला एक किंवा दोन फिरले होतात. तसेच दोन ते तीन महिन्यांची पिल्ले झाले की, ते त्यांच्या आईच्या पाठीवर बसून बाहेर फिरायला जातात. तीन वर्षांची किल्ले होईपर्यंत त्यांच्या आईबरोबरच राहतात तसेच आई आपल्या पिल्लांचे संरक्षण करते. या जातींमध्ये नर आणि मादी एकनिष्ठ राहतात. त्यांचे आयुष्य हे 25 ते 40 वर्षापर्यंत असते. सर्व अस्वले चटकन चिडतात व ते धोकादायक असू शकतात. पंजाच्या एका फटक्यात ते एखाद्या व्यक्तीला ठार करू शकतात. अशाप्रकारे अस्वल जंगलांमध्ये नदीकाठी किंवा तलावांच्या आसपास आयुष्य घालवत असतात.
अस्वल काय खातो?
अस्वल हा प्राणी निशाचर आहे तसेच आपले भक्ष मिळवण्यासाठी हा प्राणी संध्याकाळी बाहेर पडत असतो. वनातील कोणतेही निवाऱ्याची जागा अस्वलाला राहायला आवडते तसेच पहाटे निवासस्थानी हे अस्वल परतून आपल्या घरी जातात. रस्त्यामध्ये त्यांना जे दिसले ते खातात. त्या व्यतिरिक्त त्यांना फळ, फुलं, कीटक व मध, मासे इत्यादी खायला आवडते. भारतीय अस्वलांचे मध हे खाद्यपदार्थ अत्यंत आवडता आहे. हे झाडावर चढून मधाने भरलेले पोळी खाली पाडतात आणि मध खातात. वाळवीची वारुळे फोडून त्यातील वाळवी आवडीने खातात. अस्वल त्याच्या एका वेळी दहा हजार ते पंधरा हजार वाळव्या खाऊ शकते. अस्वला शिकार करताना समोर आलेल्या प्राण्याला आधी खूप गुदगुल्या करून हैराण करतो व मग आपल्या नखांनी फाडून खातो.
अस्वलांच्या प्रजाती :
अस्वलांचे 8 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात.
तर त्याविषयी पुढील प्रमाणे माहिती जाणून घेऊया:
ध्रुवीय अस्वल : ध्रुवीय अस्वल हे बर्फाळ प्रदेशांमध्ये राहतात. खास करून ते आर्टिक प्रदेशांमध्ये म्हणजेच महासागराच्या सभोवताली राहताना आपल्याला दिसून येतात. नर अस्वलांचे वजन यामध्ये 500 ते 550 किलो एवढे असते. तसेच मादीचे वजन 250 ते 300 किलो पर्यंत असते. हे अस्वल पाण्यामध्ये आठ फूट लांब झेप घेऊ शकतात.
अमेरिकन ब्लॅक अस्वल : अमेरिकन ब्लॅक अस्वल हे उत्तर कॅनडा, फ्लोरिडा व अलास्का या देशांमध्ये आढळून येतात. हे अस्वल कळ्या रंगाचे असून त्यांचे वजन 270 ते 280 किलो एवढे असते. हे अस्वल जगामध्ये 25 वर्ष जगू शकतात. अमेरिकन अस्वल देखील निशाचर प्राणी आहेत.
तपकिरी अस्वल : तपकिरी अस्वल हे आलास्का, युरोप, वॉशिंग्टन, रशिया व भारत या देशांमध्ये आढळून येतो. हा अस्वल तपकिरी व कळ्या रंगाची असतात. यांचे खाणे हे तेथील वातावरण व आढळणाऱ्या घटकांवर अवलंबून असते तसेच त्यांचे शरीर सुद्धा बनते.
आशियाटिक ब्लॅक अस्वल : या अस्वलला कळ्या रंगाचा लांब असा फर असतो आणि या अस्वलच्या छातीवर पांढऱ्या रंगाची V आकाराची छटा असते. ही अस्वल हे अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, कोलंबिया, चीन, भारत, इराण व कोरिया, मलेशिया रशिया, मॅनमार, तालिबान व पाकिस्तान इत्यादी देशांमध्ये आढळून येतात.
सूर्य अस्वल : सूर्य अस्वलांचे पायाचे पंजे दुसऱ्या जातीच्या अस्वलापेक्षा थोडे मोठे असतात आणि त्यांची जीभ सुद्धा लांब असते. हे अस्वल आकाराने दुसऱ्या जातींच्या अस्वलापेक्षा लहान असतात. या अस्वलांचा रंग काळा किंवा गडद तपकिरी असू शकतो. हे अस्वल म्यानमार, भारत, कोलंबिया, मलेशिया, चीन, इंडोनेशिया आणि थायलंड देशांमध्ये आढळतात. या अस्वलांना मध खूप आवडतं. त्यामुळे या अस्वलांना हनी बियर असे देखील म्हटले जाते.
पांडा अस्वल : पांडा अस्वल हे बांबू खातात. त्यांना रोज 20 किलो आहार लागतो. या अस्वलांची लांबी 1.5 मीटर असते तर नर अस्वलांचे वजन 110 ते 115 किलो असते आणि मादी अस्वलांचे वजन 95 ते 100 असते. पांडा अस्वल हे काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे असते. त्यांचा चेहरा आणि उरलेला भाग पांढऱ्या रंगाचा असतो तर त्यांच्या डोळ्याभोवती पाण्या रंगाचा गोल आकार असतो.
स्लोथ अस्वल : या अस्वलाचे वैज्ञानिक नाव मेलुरुस युरेनस असे असून याच्या दोन उपप्रजाती आहेत. त्यामध्ये इंडियन स्लोथ अस्वल आणि श्रीलंका स्लोथ यांच्या शरीराची लांबी 140 ते 190 सेंटिमीटर असते. मादी अस्वलाचे वजन 50 ते 90 किलो तर नर अस्वलाचे वजन 75 ते 135 किलो असते. या अस्वलांना लांब झटकेदार काळे केस असतात व छातीवर पांढऱ्या रंगाची U आकाराची छटा असते. ही अस्वले श्रीलंका, भूतान, भारत, नेपाळ आणि बांगलादेशमध्ये आढळून येतात.
हे अस्वल केवळ अमेरिकेमध्ये आढळून येतात. अमेरिकेतील पर्वतीय भागांमध्ये यांचा वावर असतो. हे अस्वल काळ्या रंगाचे असते. तेथील अस्वलांचा रंग हा गडद तपकिरी, लालसर किंवा काळा सुद्धा असू शकतो. या अस्वलांचा चेहरा तुलनेने लहान आणि रुंद असतो.
FAQ
अस्वल किती उंचीवर पोहोचू शकते?
7 फूटांपर्यंत
अस्वलाला मित्र असतात का?
जरी अस्वल विस्तारित कौटुंबिक गटात राहत नाहीत किंवा शिकारीत सामील होत नाहीत, ते एकमेकांच्या अगदी जवळ राहून सह-अस्तित्वात राहू शकतात आणि खरेतर युती आणि मैत्री बनवतात – काही प्रौढ अस्वल तरूण असंबंधित अस्वलांना मार्गदर्शन करण्यासाठी देखील ओळखले जातात
अस्वल कोणत्या प्रकारचे प्राणी आहेत?
सस्तन प्राणी
सर्वात मोठे अस्वल कोणते आहे?
कोडियाक अस्वल
अस्वलाच्या घराला काय म्हणतात?
डेन