Elephant Animal Information In Marathi हत्ती हा सर्वात मोठा प्राणी मानला जातो, तसेच हत्ती हे अस्तित्वात असलेले सर्वात मोठे भूमी प्राणी आहेत. सध्या जगात हत्तीच्या तीन प्रजाती जिवंत आहेत. बाकी सर्व प्रजाती नष्ट झाल्या आहेत. हत्ती हे मोठ्या व घनदाट जंगलात आढळून येतात. भारतात संपूर्ण जगापैकी 55% हत्ती प्राणी हे भारतात आढळून येतात. सुमारे 27 हजार 300 हत्ती हे भारतात आहेत. हत्तींबद्दल जागरूकता आणि संवर्धन करणे यासाठी 12 ऑगस्ट 2012 पासून जागतीक हत्ती दिन म्हणून साजरा केला जातो.
हत्ती प्राण्याची संपूर्ण माहिती Elephant Animal Information In Marathi
हत्ती कुठे राहतात?
हत्ती हे घनदाट जंगले व अभयारण्यात जास्त पाहायला मिळतात. भारतात आशियन हत्ती जास्त प्रमाणात आढळून येतात. पूर्वी हत्तीच्या विविध प्रजाती आढळून येत असत. परंतु जंगलतोड व शिकारीमुळे हत्तीच्या अनेक प्रजाती नामशेष झाल्या आहेत. हत्ती हे भारत, चीन, ऑस्ट्रेलिया, रशिया, दक्षिण आफ्रिका, येथे मोठ्या संख्येने आढळून येतात.
नाव | हत्ती |
वस्तुमान | ४,००० किलो |
आयुर्मान | ४८ वर्षे |
गर्भधारणा कालावधी | १८-२२ महिने |
लांबी | ५.५- ६.५ मी |
उंची | २.८ मी |
वेग | ४० किमी/ता |
हत्ती कशे दिसतात ?
हत्ती हा आकाराने सर्वात मोठे प्राणी आहे. हत्ती हे भारतातील तसेच जगात वेग-वेगळ्या ठिकाणी व वातावरणात राहतात. त्यामुळे त्याचे वजन आणि वाढीत बराच फरक दिसून येतो. हत्तीची सोंड लांब असते, सोंडीतून हत्ती श्वास, स्पर्श, आवाज काढणे व आकलन असे विविध कार्य करू शकतात. आपण आशियन हत्ती पाहिले असतील त्याची वाढ ही साधारणपणे 9-10 फूट पर्यत होते आणि शरीराचे वजन 5 ते 7 टन एवढे असते. या तुलनेने मादीचे वजन आणि उंची कमीच असते. हत्तीची सर्वात जास्त ताकद ही त्याच्या सोंडित असते.
हत्तीचा रंग हा राखाडी असतो, तसेच भारतीय हत्तीच्या अंगावर काही प्रमाणात पांढरे डाग पडलेले असतात. तसेच आफ्रिकन हत्ती हे लालसर व तपकिरी असतात. हत्ती हा एक शाकाहारी प्राणी आहे. जो गवत, झाडांच्या फांद्या, तोडून खातो. हत्तीला 2 कान, 2 मोठे दात, 4 पाय, 1 शेपूट, आणि 1 लांब सोंड अशी शरीर रचना आहे. हत्तीची सोंड ही 8 ते 9 फूट लांब असते आणि दात हे 2 ते 3 फूट येवढे लांब असतात. हत्ती आपले स्वसंरक्षण त्याचा सोंडीने आणि दाताने करतात. हत्ती आपल्या सोंडीत 8 लिटर पाणी ठेवण्याची क्षमता असते आणि सोंडीने 350 किलो पर्यत वजन उचलू शकतात. हत्तीचे पायाचे पंजे खूप मोठे असतात. त्यावरून त्यांची गणना आणि आकारमानाचा अंदाज घेतला जाऊ शकतो.
हत्ती काय खातो :
हत्ती गवत, लहान झाडे, झुडपे, फळे, डहाळ्या, झाडाची साल आणि मुळे खातात. हत्ती दररोज 16 ते 18 तास किंवा हत्तीच्या दिवसातील जवळपास 80% वेळ खाण्यात घालवला जातो. हत्ती दररोज 149 ते 169 किलो वनस्पती खातात. झाडाची साल हा हत्तींचे आवडते खाद्य मानले जाते. त्यात कॅल्शियम असते. जे पचनासाठी मदत करते. हत्तींना दररोज सुमारे 68 ते 90 लीटर पाणी लागते, परंतु ते 152 लिटर पर्यत वापरु शकते. एक नर हत्ती पाच मिनिटांपेक्षा कमी वेळात 212 लिटर पाणी पिऊ शकतो.
हत्तीची जीवन पद्धती :
हत्तीमध्ये नर आणि मादी अशे दोन प्रकार आहेत, यापासून त्याची प्रजाती आणि संख्येत वाढ होत असते. हत्ती हे वातावरणा नुसार पलायन करत राहतात, त्याची कोणती सीमा नसते. मादी हत्ती एका वेळी एकच नवजातला जन्म देते. हे पिल्लू अगदी लहान गेंड्या सारखे दिसते. हत्ती हा एक शाकाहारी प्राणी आहे, जो गवत, झाडांच्या फांद्या, पाला पाचोळा खाऊन आपले आनंदमय जीवन जगतो.
हत्ती आपल्या लहान पिल्लाना जंगलात कशे राहायचे, आपले स्वसंरक्षण कशे करायचे शिकवत असतात. कारण जंगलात शिकारी, आणि शिकार करणारे अनेक प्राणी आढळून येतात. हत्ती हे झुंडमध्ये राहणे पसंद करतात. कारण ते एकटे राहले तर त्याची शिकार होऊ शकते. हत्तीमध्ये संपूर्ण झुंडचा एक नर हत्ती मुख्य सदस्य असतो. जो अन्य वनजीव पासून सर्वाचे रक्षण करतो. दोन नर हत्तीची लढाई ही भयानक आणि जीवघेणी होऊ शकते. हत्ती हे शांत आणि हिरव्या वातावरणात राहणे पसंद करतात. त्यामुळे त्याचे पलायन सुरूच असते.
भारतीय संस्कृतीत हत्तीचे महत्त्व :
भारतीय संस्कृतीत हत्तीचे खूप महत्त्व आहे, असे म्हटले जाते की, शिवशंकर आणि पार्वती देवीचा मुलगा श्रीगणेशाचे शिश कापले असता. त्यांना हत्तीचे शिश बसवण्यात आले होते. तेव्हा पासून हत्तीला गणराज म्हणून देवस्थान मिळाले आहे. हिंदू धर्मात हत्तीची पूजा केली जाते व अनेक ठिकाणी देवाची पालखी सोहळ्यात हत्तीचा उपयोग केला जातो. तसेच इंद्राचे वाहन म्हणून सुध्दा हत्तीची ओळख होते.
भारतामध्ये हत्तींचा उपयोग कामकरी प्राणी म्हणून केला जातो. पूर्वी ते युद्धात वापरले जायचे. आज ते अनेकदा वादग्रस्तपणे प्राणी संग्रहालयात प्रदर्शित केले जातात किंवा सर्कसमध्ये मनोरंजनासाठी शोषण करतात. हत्ती अतिशय ओळखण्यायोग्य आहेत आणि ते कला, लोककथा, धर्म, साहित्य आणि लोकप्रिय संस्कृतीमध्ये वैशिष्ट आहेत.
हत्तीचे महत्त्व :
हत्ती हा एक महत्वाचा आणि सर्वात मोठा प्राणी आहे, निसर्गचक्राचा हत्ती हा एक भाग आहे. सिंधू संस्कृती पासून हत्ती काम करणारे प्राणी आहेत आणि आधुनिक काळातही त्यांचा वापर सुरूच आहे. आशियन प्रजातींच्या व्यक्तींना अनेकदा कार्यरत प्राणी म्हणून प्रशिक्षित केले गेले आहे. आशियन हत्ती हा दुर्गम भागात भार टाकणे, नद्या आणि रस्त्यांवर लॉग हलवणे, राष्ट्रीय उद्यानांभोवती पर्यटकांची वाहतूक करणे, वॅगन ओढणे आणि धार्मिक मिरवणुकांचे नेतृत्व करणे यासारखी कामे करतात. अनेक देशांत अजूनही विविध प्रकारच्या कामासाठी हत्तीचा उपयोग करतात.
जंगली हत्ती वनात असल्याने जंगलतोड कमी होते, ज्यामुळे वातावरण नियंत्रित राहते. तापमान वाढत नाही. तसेच हत्तीची शिकार करणारे काही प्राणी मारल्यासुध्दा जातात. यामुळे वाघ, सिंह, बिबट्या हे प्राणी आणि अनेक इतर गोष्टी नियंत्रणात राहतात. यामुळे निसर्गसाखळीत हत्ती हा एक महत्वाचा प्राणी आहे.
हत्तीचे प्रकार : हत्तीच्या अनेक प्रजाती नामशेष झाल्या आहेत. आता संपूर्ण जगात हत्तीच्या फक्त तीन प्रजाती जिवंत आहेत.
आफ्रिकन बुश हत्ती : आफ्रिकन बुश हत्ती आफ्रिकेतील कोरड्या सवाना वाळवंट दलदल आणि सरोवराच्या किनाऱ्यांसारख्या अधिवासांमध्ये आणि समुद्र सपाटीपासून बर्फाच्या रेषेच्या वरच्या पर्वतांपर्यतच्या उंचीवर आढळतात. ही सर्वात मोठी प्रजाती म्हणून ओळखली जाते.
आशियन हत्ती : आशियन हे हत्ती वंशातील एकमेव जिवंत प्रजाती आहे, आणि ती संपूर्ण भारतीय उपखंडात आणि आग्नेय आशियामध्ये वितरीत केली जाते. पश्चिमेला भारत, उत्तरेला नेपाळ, दक्षिणेला सुमात्रा आणि पूर्वेला बोर्नियोला तीन उपप्रजाती म्हणून ओळखल्या जातात.
आफ्रिकन वन हत्ती : आफ्रिकन वन हत्ती ही दोन जिवंत आफ्रिकन हत्ती प्रजातींपैकी एक आहे. आफ्रिकन हत्ती पश्चिम आफ्रिका आणि काँगो बेसिनमधील आर्द्र जंगलात आढळून येतात. हे तीन जिवंत हत्ती प्रजातींपैकी हा सर्वात लहान आहे.
हत्तीची संख्या कमी होण्यामागची कारणे :
हत्तीच्या अनेक प्रजाती जिवंत होत्या, परंतु जंगलतोड, अवैध शिकार, वाढते शहरीकरण, अशा अनेक कारणांमुळे आता हत्तीच्या फक्त तीन प्रजाती जिवंत राहील्या आहेत. ह्या तीन प्रजातीची संख्या सुध्दा दिवसाने दिवस कमी होत आहे. हत्तीच्या हस्तिदंतची मागणी दिवसाने दिवस वाढत आहे. त्यामुळे हत्तीची अवैध शिकार पण वाढत आहे. यासाठी आपण जनजागृती करून हत्तीचे रक्षण केले पाहिजे, नाहीतर काही वर्षांत संपूर्ण प्रजाती नष्ट होतील.
हत्तीची संपूर्ण प्रजाती नष्ट झाली तर हत्ती हे फक्त पुस्तके आणि फोटोमध्येच पाहायला मिळतील. आफ्रिकन बुश हत्ती आणि आशियन हत्ती धोक्यात आले आहेत. हत्तींच्या लोकसंख्येला सर्वात मोठा धोका म्हणजे हस्तिदंताचा व्यापार, कारण प्राणी त्यांच्या हस्तिदंताच्या दांड्यासाठी शिकार करतात.
FAQ
हत्ती काय काय खातो?
गवत, जलवनस्पती, वृक्षांची पाने, मुळे, साली, फांद्या वफळे, झुडपे इ. हत्तीचे खाद्य आहे
हत्तीच्या तोंडात किती दात असतात?
दाढीसाठी, हत्तींना त्यांच्या आयुष्यात सहा संच असतात, प्रत्येक संचामध्ये चार दात असतात
हत्ती किती खातात?
दररोज 150 किलो पर्यंत अन्न
हत्तीच्या सोंडेचा उपयोग काय?
वास घेणे, श्वास घेणे, कर्णे वाजवणे, पिणे आणि वस्तू पकडणे यासाठी वापरले जाणारे लांब नाक असते—विशेषतः संभाव्य जेवण
हत्ती शाकाहारी आहेत का?
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हत्ती खरोखर शाकाहारी आहेत – म्हणजे ते इतर कोणतेही प्राणी खात नाहीत. त्याऐवजी ते वनस्पती खाण्यावर भर देतात. हत्ती इंधनासाठी आणि त्यांचे मोठे शरीर राखण्यासाठी नेमके काय खातात ते येथे आहे.