lion Animal Information In Marathi सिंह हा जंगलाचा राजा म्हणून ओळखला जातो. त्यातच सिंहाला सर्वच प्राणी घाबरतात. सिंह हा प्राण्यांची शिकार करतो व खातो. सिंहाचे दात व नखे मजबूत असून त्याचे पंजे देखील मजबूत असतात. सिंह हा मांसाहारी प्राणी असून तो एक शूर म्हणून ओळखला जातो. तसेच सिंहाची उपमा देखील शूर माणसाला दिली जाते. सिंह स्वतः शिकार मारून खातो. सिंह कधीही दुसऱ्याची शिकार खात नाही किंवा मेलेल्या प्राणी सिंह खात नाही. सिंह हा जंगलामध्ये आनंदाने व अभिमानाने राहत असतो. सिंह खूपच हिंस्र प्राणी आहे. हा प्राणी माणसांवर देखील हल्ला करू शकतो किंवा माणसाला ठार करू शकतो. तर चला मग आज आपण सिंह या प्राण्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.
सिंह प्राण्याची संपूर्ण माहिती lion Animal Information In Marathi
प्राणी | सिंह |
वैज्ञानिक नाव | पँथेरा लिओ |
सिंहाचे प्रकार | आशियाई, आफ्रिकन सिंह आणि सिंहीण, कटंगा सिंह, पांढरा सिंह, मसाई सिंह आणि अबिसिनिया सिंह |
जात | सस्तन प्राणी |
आयुर्मान | 20-25 वर्ष |
वंश | पृष्ठवंशीय प्राणी |
सिंह कोठे राहतो?
सिंह हा प्राणी घनदाट जंगलांमध्ये राहतो. सिंह हा प्राणी उष्णकटिबंधीय रेन फॉरेस्ट आणि सहारा वाळवंटाचा मध्यभाग सोडला असता, ते संपूर्ण आफ्रिकेत आढळतात. येथे सिंह सर्व प्रदेशात मोठ्या प्रमाणावर आढळतात. आफ्रिकेतील समुद्राच्या तळापासून ते माउंट किलो मांजरीपर्यंत 13,700 फूट उंच पर्वतांवर देखील राहू शकतात. भारतातील गीर राष्ट्रीय उद्यान आणि वन्यजीव अभयारण्य हे कोरडे पानझडी जंगल हे सिंहाचे अभयारण्य आहे. या अभयारण्याभोवती अनेक लोक राहतात. जे आपले पशुपालन व त्यांच्या जनावरांसोबत राहतात.
सिंह प्राणी कसा दिसतो ?
सिंह हा प्राणी एखाद्या राजाला शोभेल असा त्याचा साज असतो. सिंहाला दोन डोळे, एक तोंड असून त्याच्या तोंडाभोवती दाट केस असतात. दोन कान, चार पाय असून त्याला एक शेपटी असते. तोंडामध्ये मास खाण्यासाठी सुळे दात असतात. त्या व्यतिरिक्त त्याचे पंजे जबरदस्त असतात. वाघ जोरात गर्जना करतो. वाघाची गर्जना 4 किलोमीटर पर्यंत ऐकू जाते. सिंहाचे वजन 150 ते 250 किलोपर्यंत असते. सिंहाचे सरासरी आयुष्य हे 10 ते 14 वर्षे असे असते. सिंह लहान झुडपांच्या सवाना या जंगलांमध्ये राहतात. सिंहाला एकट्याने राहण्यापेक्षा दोन-तीन सिंहांच्या कळपात राहायला आवडते.
सिंह काय खातो?
हा प्राणी हिंसक प्राणी असून तो मांसाहारी आहे. हा प्राणी संस्तन प्राण्यांच्या गटात येतो. सिंह हे प्राणी सर्वच प्राण्यांना खाऊ शकतात. सर्वच प्राण्यांचा यांच्यामध्ये समावेश होतो. सिंह जंगली म्हैस, झेब्रा, जिराफ, काळवीट, हरण यांचे शिकार करून खातो. सिंह जेव्हा शिकार करण्यासाठी बाहेर पडतात तेव्हा ते जोरात ओरडतात. कधी कधी सिंहाची गर्जना पाच ते आठ किलोमीटरपर्यंत ऐकू येऊ शकते.
रात्री शिकार करणे सिंहाला आवडते किंवा पहाट होण्यापूर्वी सिंह गर्जना करतात व सिंह दिवसभर झाडाच्या छायेत विश्रांती घेतात. बऱ्याचदा सिंह दिवसा सुद्धा शिकार करतात. सिंह हा प्राणी हत्ती, गेंडे आणि पानघोडा यांच्यासारख्या प्राण्यांपासून दूर राहतात. सिंह दबा धरून शिकारची वाट पाहत असतात. सिंह या प्राण्याला आठवड्यातून एकदा जरी अन्न मिळाले तरी त्यांच्याकरिता ते पुष्कळ असतं. सिंह पाण्यामध्ये सुद्धा आपली शिकार करून खाऊ शकतात. पाण्यातील मगर, सुसर यांची सुद्धा शिकार करण्यास सिंह मागे सरत नाही.
सिंह या प्राण्याची जीवन पद्धती :
सिंह हे प्राणी एकटे न राहता कळप करून राहतात. त्यांच्या कळपामध्ये एक किंवा दोन प्रौढ नर सिंह कळपाची पुढारी कळपांमध्ये मार्गदर्शन करतात. कडपांमध्ये 6 ते 30 सदस्य देखील असू शकतात.
मातीचा विनीचा हंगाम हा ठराविक नसतो परंतु गिर या जंगलातील माद्यांना जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात पिल्ले होतात. माद्यांचा गर्भधारणेचा कालावधी हा 116 दिवसांचा असतो. मादीच्या दोन विणीमध्ये दोन वर्षांचे अंतर असते. तिला एका वेळेस दोन किंवा तीन पिल्ले होतात, बऱ्याचदा काही सिंहणीला पाच पिल्ले देखील होतात.
जन्मानंतर पिल्ल्यांचे डोळे सहा ते नऊ दिवसांपर्यंत मिटलेले असतात. पिल्लांच्या शरीरावर काळे ठिपके असतात. दहा महिन्यानंतर पिल्लांच्या अंगावर हे ठिपके नाहीसे होतात. सिंहांची पिल्ले 11 महिन्याची झाले की, ते शिकार करणे शिकतात तसेच त्यांची आई त्यांना शिकार करण्यास शिकवते. अडीच ते तीन वर्षाची पिल्ले झाल्यानंतर ते जननक्षम होतात. सिंह हा पाच वर्षाच्या झाला की तो वयात येतो. जंगलातील सिंह 15 ते 18 वर्षाचा तर प्राणी संग्रहालय किंवा पाळलेले सीमा 30 वर्षापर्यंत जगू शकतात. सिंहाचे आवडते शिकार म्हणजे रानडुक्कर त्याची पिल्ले, काळवीट, हरीण, झेब्रा इत्यादी आहेत. सिंह हा दिवसातील वीस तास झोप घेतो.
सिंहाचे प्रकार :
सिंह हे पृथ्वीवर दहा हजार वर्षापासून जुना प्राणी आहे. सिंहाचे अस्तित्व पृथ्वीवर खूप जुने असल्याचे अवशेष देखील सापडले आहेत. हे अवशेष आशिया व आफ्रिकेमध्ये आढळतात. सिंहाचे मुख्य दोन प्रकार पडतात. त्यामध्ये आफ्रिकी सिंह आणि आशियाई सिंह. पूर्वी अस्तित्वात असलेले बरेच प्रजाती आता नामशेष झालेल्या आहेत. त्यातील बरीज सिन्हा ही एक प्रजाती आता नामशेष झालेली आहेत.
मसाई सिंह : ही सिंहाची प्रजाती आफ्रिकन असून पूर्व आफ्रिकेमध्ये पाहायला मिळतो. हा सिंह इतर प्रजाती पेक्षा कमी वक्र तसेच याचे पाय लांब असतात. या सिंहाची उंची 9.7 फूट असते. युगांडा, केनिया, मोझॅम्बिक आणि टांझानिया या देशांमध्ये आढळून येतो.
इथिओपियन सिंह : ही प्रजाती एक पूर्व आफ्रिकन सिंह प्रजाती आहे. याला ऑडिस बाबा सिंह अबिसियन सिंह या नावाने देखील ओळखले जाते.
मोहरावल सिंह : ही प्रजाती दक्षिण पूर्व आफ्रिकेमध्ये आढळून येते. या सिंहाला कलहरी सिंह देखील म्हटले जाते. आफ्रिकेतील कलहरी या प्रदेशात ही प्रजाती आढळून येते. या सिंहाची उंची दहा पॉईंट पाच फूट असते तर सिंहणीची उंची ही 9 फूटापर्यंत असते. सिंहाचे वजन 250 तर सिंहांचे वजन 185 किलो पर्यंत असते.
बारबरी सिंह : या सिंहाला उत्तर आफ्रिकन सिंह म्हणून ओळखले जाते. या सिंहाच्या उपप्रजाती पूर्वी इजिप्त मोरोक्को आणि अल्जेरियांमध्ये आढळत होत्या. परंतु आता या सिंहाची शिकार झाल्यामुळे जंगलातील सिंह हे नामशेष झाले आहे. या जातीतील सिंहाचे वजन 200 किलो पेक्षा जास्त असते.
आशियाटिक सिंह : आशियाटिक सिंह आफ्रिकन सिंहाची उपजाती आहे. ते फक्त भारतातील गुजरातमधील गीर वनक्षेत्रात आढळून येतात. हे क्षेत्र त्यांच्याकरिता राखीव आहे. यामधील नरसिंहाचे वजन 190 किलो आणि सिंहनीचे वजन 165 किलो असते. या सिंहाची प्रजाती जंगलामध्ये 15 वर्ष जगू शकते तर पाळलेली सिंहाची प्रजाती ही तीस वर्षांपर्यंत जगू शकते.
पांढरा सिंह : पांढरे सिंह हे क्रूगेरी पक्षाचे सिंह असून ही प्रजाती अत्यंत दुर्मिळ आहे. ही प्रजाती केवळ प्राणी संग्रहालयात, अभयारण्यात किंवा वन्यजीव सह विभागांमध्ये पाहायला मिळतात.
आफ्रिकन सिंह : आफ्रिकन सिंह ही एक मुख्य सिंहाची प्रजाती असून नर सिंहाचे वजन 250 किलो तर सिंहाचे वजन 165 किलो एवढे असते.
FAQ
सिंहाचे आयुष्य किती असते?
त्याचे सरासरी आयुष्य १० ते १४ वर्ष असते
सिंह किती वेळ झोपतो?
दिवसात 20 तासापर्यंत झोपतो
सिंहाच्या मानेवरील केसांना काय म्हणतात?
सिंहाच्या मानेवरील केसांना आयाळ म्हणतात
सिंहाची पूर्ण वाढ होण्यासाठी किती वेळ लागतो?
प्रौढ सिंह 3 ते 8 वर्षांचे