Giraffe Information In Marathi जिराफ हा प्राणी सर्वात लांब व उंच मानेचा प्राणी असून त्याच्या अंगावर पिवळा रंग यावर काळे ठिपके असतात. लांब मानेमुळे जिराफ सगळ्यांना आकर्षित करतो. जिराफिडी कुळातील प्राणी असून त्याचे जीवाश्मे अवशेष हे आशियाना, मायनर, चीन, भारत, दक्षिण आफ्रिका, ग्रीस व दक्षिण रशिया येथे आढळले आहेत. यावरूनच लक्षात येते की, हा प्राणी पुरातन काळी सुद्धा पृथ्वीवर होता.
जिराफ प्राण्याची संपूर्ण माहिती Giraffe Information In Marathi
आता मात्र त्यांच्या वस्ती फक्त आफ्रिकेतच पाहायला मिळतात. तसेच जिराफ हा खूप वेगाने चालणारा प्राणी आहे म्हणून झरापा या अरबी शब्दापासून जिराफ हा शब्द निर्माण झालेला आहे. जिराफ या प्राण्याची आता एकच जात अस्तित्वात असून तिचे नाव जिराफा कॅमेलोपारडॉलीस आहे. यामध्ये त्यांच्या अनेक उपप्रजाती पडतात. त्यामध्ये न्यूबीयन जिराफ केब जिराफ, सोमावली जिराफ इत्यादी. तर चला मग आज आपण जिराफ या प्राण्याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.
प्राण्याचे नाव | जिराफ |
उंची | 18 फूट (नर) ते 16 फूट (मादी) |
वजन | 1,800 ते 4,500 पाउंड |
आयु | 25 ते 30 वर्षे (जंगलात) ते 30 ते 35 वर्षे (कैद) |
आहार | पाने, अंकुर आणि फळे |
प्रजनन | एकावेळी एक पिल्लू |
धोक्याचे घटक | निवासस्थान नष्ट होणे, शिकार करणे आणि मानवांशी संघर्ष |
जिराफ कुठे राहतो?
जिराफ हा प्राणी आपण चित्रांमध्ये किंवा मोबाईल मध्ये झालेला असेल परंतु प्रत्यक्षात जिराफ प्राणी तुम्ही पाहिला आहात का? जिराफ हा प्राणी कोठे राहतो तर जिराफ हा प्राणी दक्षिण आफ्रिकेच्या जंगलांमध्ये आढळतो. त्या व्यतिरिक्त हा प्राणी संग्रहालयामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतो.
जिराफ हा प्राणी भित्रा, गरीब व अतिशय शांत आहे. याचे बारा ते पंधरा जणांचे कळप असते. बऱ्याचदा जिराफ या प्राण्यांना सत्तर प्राण्यांचा मोठ्या कडपामध्ये देखील पाहले गेले आहे. कळपामध्ये एक पुढारी म्हणजेच प्रौढ नर व माझ्या लहान पिल्ले मोठे पिल्ले आणि वेगवेगळ्या वयाचे जिराफ असतात.
जिराफ हा प्राणी कसा दिसतो?
चार पाय असणारा जगातील सर्वात उंच प्राणी म्हणजे जिराफ. डोक्यासहित त्याच्या पूर्ण शरीराची लांबी चार मीटर असून त्याची शक्ती 86 सेंटीमीटर असते. तसेच त्याच्या खांद्याजवळची उंची तीन ते चार मीटर असून वजन 550 ते 1800 किलो पर्यंत असू शकते. जिराफ या प्राण्याचा रंग हा पिवळा असून त्यावर काळसर आणि तांबूस रंगाचे विविध आकाराचे ठिपके असतात.
खालच्या बाजू फिकट रंगाच्या असून त्याच्यावर ठिपके नसतात. याची मान खूप लांब असून घराच्या मानेवर ताट व उभ्या केसांचा आयाळ असतो. नर व मादी यांच्या डोक्यावर आखूड शिंगाच्या एक किंवा दोन जोड्या आपल्याला दिसतात. शिंगावर जाड त्वचेचे आवरण असते यांची शिंगे दहा ते पंधरा सेंटीमीटर लांब असतात तसेच शेपूट हे झुपकेदार असते.
जिराफचे पाय लांब आणि मजबूत असतात, या व्यतिरिक्त त्याच्या पुढचे पाय व मागच्या पाया पेक्षा जास्त लांब असतात. जिराफच्या प्रत्येक पायाला दोन मोठे खरं असतात. जिराफची जीभ 45 सेंटीमीटर लांब असते. ती तोंडाच्या बाहेर त्याला काढता येऊ शकते. याचा उपयोग झाडांची पाने तोडण्याकरता करतो तसेच जिराफची वास घेण्याची क्षमता खूप जास्त आहे. तसेच त्याला दूरचे ऐकू येते त्याची दृष्टी देखील तीक्ष्ण असते. जिराफचे डोळे हे मोठे तपकिरी गळत रंगाचे व कान लांब असतात. जिराफला आवाज काढता येत नाही परंतु तो बेबे असा देखील आवाज काढू शकतो.
जिराफ काय खातो?
जिराफा शाकाहारी प्राणी आहे. त्यामुळे तो गवत खातो. त्यानंतर ते झुडपे आणि फळे खातात. जिराफला जंगलात राहणे खूप आवडतं. त्यामुळे त्यांना त्यांच्या सोयीनुसार जे शाकाहारी खायला मिळेल ते खातात. तसेच जिराफ आपले अन्न सहज आणि जलद शोधू शकतात. जिराफ पाने फळे व इतर वनस्पती तसेच कोरड्या झाडांची साल देखील खाऊ शकतात. पूर्ण वाढ झालेल्या जिराफ दररोज 34 किलो आहार खातो.
जिराफ हे प्राणी काटेरी झाडाचे पाने, जर्दाळू झाडांची पाने खातात. जिराफला पाणी मिळण्यासारखे असले तर पाणी पितात परंतु ते पाण्याशिवाय तीन आठवडे पर्यंत जगू शकतात. मात्र ते महिनाभर राहू शकत नाही. जिराफ उभा राहूनच झोप घेत असतो ते पाणी पिताना किंवा जमिनीवरील भक्ष खाताना मान जमिनीवर खाली त्यांना पोहोचावी लागते. जिराफला पुढचे पाय फेकावे लागतात. गुडघ्यामध्ये वाकवावे लागतात. सकाळ संध्याकाळ चरतात. दुपारी मात्र जिराफ विश्रांती घेतात.
जिराफची जीवन पद्धती :
जिराफ हे प्राणी शाकाहारी असून ते टोळ्यांमध्ये सहवास करतात. नर आणि मादी एकत्र येण्यासाठी त्यांच्या मानेचा वापर करतात. त्यांच्यामध्ये बऱ्याचदा लढाई देखील होते आणि ही लढाई हानिकारक असते. जिराफ मादीचा गर्भधारणेचा काळ हा 14 ते 15 महिने असतो. तसेच दीर्घ प्रतीक्षेनंतर मादा जिराफ केवळ एकाच पिल्लाला जन्म देते. जन्मणाऱ्या पिल्लाचे वजन जन्मतः 50-55 किलो एवढे असते. त्याची उंची दोन मीटर असते. जन्मानंतर काही तासांनी जिराफ धावू ऊ शकतो.
जिराफचे पिल्लू 18 महिन्याचा होईपर्यंत त्याची आई संगोपन करते व इतर प्राण्यांपासून त्याचे संरक्षण देखील करते. 18 महिन्याच्या नंतर हे पिल्ले त्याच्या आईचे दूध पिणे सोडतात. त्यांचे आयुष्य देखील खूपच कमी असते, कारण सर्व जिराफपैकी केवळ 25 ते 50 टक्के जिराफ त्यांच्या प्रौढ अवस्थेपर्यंत पोहोचतात. बहुसंख्य जिराफचा मृत्यू 20 ते 25 वर्ष दरम्यानच होतो. कारण जिराफ यांचा सर्वात मोठा शत्रू आहे सिंह.
बरेच हिंस्र प्राणी आहेत जे जिराफ ची शिकार करतात. त्यामध्ये बिबट्या, हायना, मगर यांचा समावेश आहे. हे सर्व हिंस्र प्राणी त्यांच्यावर हल्ला करून त्यांची शिकार करतात. जे आजारी जिराफ किंवा वृद्ध जिराफ आहे. यांची शक्ती कमी असते ते लवकर शिकार होतात. जिराफ हे इतर प्राण्यांना किंवा आपले संरक्षण करण्यासाठी त्यांच्या मागच्या दोन पायांचा उपयोग करून त्यांना लाथ मारतात. या प्राणी शिकाऱ्या व्यतिरिक्त मानवाने देखील जिराफची मोठ्या प्रमाणावर शिकार केली आहे. यामुळे सुद्धा जिराफची संख्या कमी झाली आहे.
जिराफ प्राण्याच्या प्रजाती :
जिराफ या प्राण्याच्या नऊ उपप्रजाती असून त्यांचा शोध शस्त्रज्ञांनी आकार रंग ठिपके आणि सापडलेल्या भागांच्या आधारे निश्चित केलेला आहे. जिराफच्या सात प्रजाती ह्या नष्ट झालेल्या आहेत. तर त्या कोणत्या प्रजाती आहेत ते जाणून घेऊया.
न्युबियन जिराफ : आफ्रिकेमध्ये न्यूबियन जिराफ 2015 मध्ये युगांडाच्या मर्चिसन फर्स्ट नॅशनल पार्क मध्ये पहिल्यांदा दिसला होता. त्याची उंची 9.4 फूट एवढी होती. तसेच या जिराफचे पाय लहान असल्यामुळे त्याला जास्त हालचाल करता येत नाही.
सोमाली जिराफ : सोमाली जिराफला जाळीदार जिराफ या नावाने देखील ओळखला जातो. हा जिराफ उत्तर केनिया आणि दक्षिण इथेओपीया येथे मोठ्या प्रमाणात दिसून येतात. या जिराफची संख्या बंदी वासात किंवा जंगलांमध्ये खूपच कमी आहे.
दक्षिण आफ्रिकन जिराफ : दक्षिण आफ्रिकन जिराफ हा केप जिराफ म्हणून देखील ओळखला जातो. त्यांचा वावर दक्षिण आफ्रिका, नामिबिया, बोत्सवाना, झिम्बाब्वे आणि मोझांबिकमध्ये आढळतो. ही जिराफची एक प्रजाती किंवा उपप्रजाती आहे. त्यांच्या अंगावर गोलाकार डाग पडलेले असतात.
रोथचाइल्ड जिराफ : या जिराफची संख्या धोक्यात आली आहे. हा जिराफ युगांडा जिराफ म्हणून देखील ओळखला जातो. केनियातील नॅशनल पार्क आणि उत्तर युगांडातील मर्चिसन फॉल्स नॅशनल पार्क याव्यतिरिक्त काही जिराफ जंगलात दिसून येतात.
जिराफच्या पश्चिम आफ्रिकन जिराफ, मसाई किंवा किलीमांजारो जिराफ, अंगोलन किंवा नामिबियन जिराफ, थॉर्निकॉफ्ट किंवा रोडेशियन जिराफ, कॉर्डोफन जिराफ या उपजाती आढळून येतात.
जिराफ बद्दल मनोरंजक तथ्ये:
- जिराफ हे जगातील सर्वात उंच जमीनी प्राणी आहेत. प्रौढ नर जिराफ 18 फूट उंच आणि मादी 16 फूट उंच वाढू शकतात.
- जिराफांना खूप लांब मान असतात. त्यांची मान 6 फूट लांब असू शकते, ज्यामुळे ते उंच झाडांच्या पानांवर आणि कळ्यापर्यंत पोहोचू शकतात.
- जिराफला जीभ लांब असते. त्यांची जीभ 2 फूट लांब असू शकते, ज्यामुळे त्यांना उंच झाडांची पाने आणि कळ्यापर्यंत पोहोचण्यास मदत होते.
- जिराफांना खूप चांगली वासाची जाणीव असते. त्यांना 6 मैल दूरवरून पाण्याचा वास येऊ शकतो.
- जिराफ खूप सामाजिक प्राणी आहेत. ते 50 पर्यंत प्राण्यांच्या कळपात राहतात.
- जिराफ हे सभ्य प्राणी आहेत. ते मानवांबद्दल आक्रमक म्हणून ओळखले जात नाहीत.
निष्कर्ष:
जिराफ हे जगातील सर्वात उंच जमीनीचे प्राणी आहेत, ज्यात नर 19 फूट उंचीपर्यंत आणि मादी 15 फूट उंचीपर्यंत पोहोचतात. ते मूळ आफ्रिकेतील सवाना आणि जंगलातील आहेत, जेथे ते चाड, नायजर आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या देशांमध्ये आढळतात.
FAQ:
जगातील सर्वात उंच जमिनीवर राहणारा प्राणी कोणता आहे?
जिराफ हा जगातील सर्वात उंच भूमी प्राणी आहे. प्रौढ नर जिराफ 18 फूट उंच आणि मादी 16 फूट उंच वाढू शकतात.
जिराफ एवढे उंच का असतात?
जिराफ इतके उंच असतात कारण त्यांना उंच झाडांच्या पानांपर्यंत पोहोचणे आवश्यक असते. त्यांची लांब मान त्यांना त्या पानांपर्यंत पोहोचू देते ज्यावर इतर प्राणी पोहोचू शकत नाहीत.
जिराफ पाणी कसे पितात ?
जिराफांना पाणी पिण्यासाठी जमिनीवर जाण्यासाठी त्यांचे पुढचे पाय पसरावे लागतात. ते मद्यपान करण्यासाठी मान खाली वाकवू शकतात, परंतु ही त्यांची प्राधान्य पद्धत नाही.
जिराफ काय खातात?
जिराफ हे शाकाहारी आहेत आणि त्यांच्या आहारात मुख्यतः पाने, कोंब आणि फळे असतात. ते दररोज 75 पाउंड पर्यंत अन्न खाऊ शकतात.
जिराफांना किती मुलं असतात?
जिराफ साधारणपणे एका वेळी एका बाळाला जन्म देतात. बाळ जिराफ, ज्याला बछडा म्हणतात, ते सुमारे 6 फूट उंच असते आणि जन्माच्या वेळी त्याचे वजन सुमारे 150 पौंड असते.