डॉल्फिन प्राण्याची संपूर्ण माहिती Dolphin Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Dolphin Information In Marathi डॉल्फिन हा प्राणी सर्वांच्या परिचयाचा आहे. डॉल्फिनच्या वेगवेगळ्या प्रजाती आढळून येतात. त्यामध्ये काही डॉल्फिन ह्या 30 फूट तर काही 4 फुटांपर्यंत असतात. डॉल्फिन हा प्राणी पाण्यामध्ये राहतो. या प्राण्याला मासा संबोधले जाते; परंतु डॉल्फिन हे मासे नसून प्राणी आहेत. त्या व्यतिरिक्त डॉल्फिन हा बुद्धिमान प्राणी आहे. डॉल्फिन हा प्राणी सस्तन प्राणी म्हणून ओळखला जातो.

Dolphin Information In Marathi

डॉल्फिन प्राण्याची संपूर्ण माहिती Dolphin Information In Marathi

जगातील समुद्र आणि नद्यांमध्ये डॉल्फिन आढळून येतात. डॉल्फिन हे प्राणी एकटे कधीही राहत नाही त्यांचे कळप असते. त्यामध्ये दहा ते बारा डॉल्फिनचा गट असतो, भारतामध्ये गंगा नदीमध्ये डॉल्फिन हा प्राणी आढळून येतो. गंगा नदीतील डॉल्फिन यांची संख्या आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे सरकारने डॉल्फिनची शिकार करण्यावर आता बंदी आणली आहे. डॉल्फिन हा प्राणी कंपन करणारा आवाज काढतो. तो आवाज एखाद्या घटकाला आदळल्यानंतर त्याच्याकडे परत येतो. तर चला मग आज आपण डॉल्फिन या प्राण्याविषयी सविस्तर माहिती पाहूया.

डॉल्फिन कुठे राहतो ?

डॉल्फिन हे प्राणी गोड्या पाण्यात त्या व्यतिरिक्त मोठ्या समुद्रामध्ये देखील आढळून येतात. डॉल्फिन नेहमी एकटे न राहता दहा ते बारा प्राण्यांचा एक गट असतो. त्यांच्यामध्ये कंपनी सारखा आवाज तयार करण्याचे नैसर्गिक वैशिष्ट्य आहे. भारतामध्ये डॉल्फिन हे प्राणी गंगा नदी आढळून येतात.

नावडॉल्फिन
वर्गसस्तन प्राणी
राज्यप्राणी
वजन ४०० ग्रॅम ते दहा टन 
आकार४ ते ३० फूट
आयुष्य१०-४५ वर्षे

त्या व्यतिरिक्त डॉल्फिन हे प्राणी बंदर, खाडी, आखात, मोहाने तसेच समुद्रकिनाऱ्या जवळचे पाणी महाद्वीप मध्ये खोल पाण्यामध्ये राहतात. खुल्या महासागरात दूरच्या किनाऱ्यासह विविध प्रकारच्या प्रदेशांमध्ये डॉल्फिन हे प्राणी राहतात. डॉल्फिन हे प्राणी पाण्यामध्ये राहतात. ते पाण्याबाहेर जास्त दिवस जगू शकत नाही. डॉल्फिन हे प्राणी उष्ण व समशितोष्ण समुद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतात. उत्तरेकडील थंड समुद्रांमध्ये देखील ही प्राणी आढळून येतात.

डॉल्फिन काय खातो?

डॉल्फिन हे प्राणी समुद्राच्या तळाशी किंवा नदीच्या तळाशी असलेले छोटे प्राणी, मासे त्यांचे खाद्य हे चिखलामध्ये असलेले कवचधारी प्राणी असतात. डॉल्फिन हा प्राणी मांसाहारी प्राणी आहे. हे छोटे छोटे मासे आणि समुद्रातील प्राणी खातात.

Dolphin Information In Marathi

डॉल्फिन प्राण्याचे वर्णन :

डॉल्फिन या प्राण्याचे शरीर हे सळपातळ असून डोक्यापासून शरीराची लांबी ही दीड मीटर किंवा अडीच मीटर असते. त्यांची चोच 15 सेंटीमीटर लांब असते तसेच ही चोच अनुचित धार असते. एका खोल खोपणीने ती कपाळापासून स्पष्टपणे वेगळी झालेली दिसते. जबड्यांमध्ये दात असून बऱ्याचदा प्रत्येक जबड्यावर 60 ते 100 दात असतात. डॉल्फिनची शेपटी रुंद, वजनदार असते. डॉल्फिनच्या डोळ्याभोवती काळे वलय असतात. त्यामुळे चष्मा घातल्यासारखा आपल्याला ते दिसतात.

डोळ्या भोवतालच्या वलयापासून एक काळा पट्टा निघून तोंडापर्यंत गेलेला असतो. पाठीचा रंग हा तपकिरी व काळा असतो तसेच त्याच्या पोटाचा रंग पांढरा असतो. दोन्ही बाजूंवर करड्या रंगाच्या पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाचे पट्टे असतात. हिंदी महासागर किंवा मलेशिया या समुद्रांमध्ये डॉल्फिनची पाठ ही काळसर करड्या रंगाची असते आणि खालची बाजू फिकट करड्या रंगाचे असते. त्यांच्या बाजूवर पट्टे मात्र नसतात.

डॉल्फिनचे श्रवण इंद्रिय खूपच तीक्ष्ण असतात. त्यांच्यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे ऐकू शकतात व ते आवाज सुद्धा काढू शकतात. एकमेकांशी संवाद साधण्याकरता यांचा ते उपयोग करतात. डॉल्फिन शिट्टी वाजवून सुद्धा एकमेकांशी संवाद करतात. डॉल्फिन हे प्राणी एका तासात 3 ते 4 मिनिटांनी पाण्यावर येऊन श्वासोच्छवास घेतात व पाण्यात खोलवर उडी मारतात.

डॉल्फिन या प्राण्यांचे जीवन :

डॉल्फिन या प्राण्यांना हिवाळ्याच्या मध्यापासून ते उन्हाळ्यापर्यंत पिल्ल होतात. यांचा गर्भधरणेचा कालावधी हा नऊ महिन्याचा असतो. मादी प्रत्येक वेळेला एकाच पिल्लाला जन्म देते. पिल्लाला जन्म दिल्या बरोबर श्वसनाकरिता पिल्लाला पाण्याच्या पृष्ठभागावर जावे लागते.

मादी त्याला मदत करते व पाण्याच्या पृष्ठभागावर घेऊन जाते. मादी एक तासांच्या अंतराने पिल्लाला पाण्याखालीच दूध पाजते. हे पिल्लू चोकून दूध पीत नाही. मादीच ते त्याच्या तोंडात सोडते. डॉल्फिन हा प्राणी कुत्रा पेक्षाही बुद्धिमान प्राणी मानला गेला आहे. डॉल्फिनला जर शिकवले तर तो खूप गोष्टी शिकतो. हा प्राणी उपयोगी असून मानवाशी मित्रत्व निर्माण करतात.

हे प्राणी बंदिवासात वीस ते पंचवीस वर्षे जगतात तर समुद्रामध्ये 30 वर्षाहून अधिक काळ जगण्याचे सुद्धा आढळून आले आहेत. डॉल्फिनचे आयुष्य हे जास्त असते. माद्या ह्या 45 वर्षे जगतात, कधीकधी 75 ते 80 पर्यंत सुद्धा माद्यांचे जीवन असते. डॉल्फिन हे प्राणी त्यांच्या मेंदूच्या गोलार्धापैकी एकासह एका विशिष्ट क्षणी गाठ झोप घेतात. श्वास घेण्यासाठी थोडेफार जागरूक राहतात. इतर शिकाऱ्यांपासून किंवा धोक्यांपासून ते सावध राहतात. डॉल्फिन यांना शिकवल्यास ते आनंद, दुःख व खेळकरपणा दर्शवू शकतात.

Dolphin Information In Marathi

डॉल्फिन या प्राण्याची प्रकार :

डॉल्फिन या प्राण्याचे अनेक प्रकार आढळतात. डॉल्फिन जगातील सर्वच महासागरांमध्ये तसेच प्रमुख नद्या आणि गोड्या पाण्यामध्ये आढळून येतात. काही प्रजाती जगभर प्रसिद्ध आहे. त्यामध्ये बॉटलनोज डॉल्फिन खूपच बुद्धिमान मानला गेला आहे. तर चला मग डॉल्फिनचे काही प्रकार जाणून घेऊया

बॉटलनोज डॉल्फिन : डॉल्फिन हे महासागरांमध्ये आढळतात सामान्यतः ते कुटुंबाने एकत्र राहणे पसंत करतात. बॉटलनोज डॉल्फिन बुद्धिमत्तेमध्ये आहेत. त्यांना नक्कल करणे किंवा कृत्रिम भाषांचा वापर, वस्तूंची ओळख होते. हे डॉल्फिन सांस्कृतिक ज्ञानपीठ प्रसारित करू शकतात आणि त्यांच्या महत्त्वपूर्ण बुद्धिमत्तेमुळे मानवांशी देखील संवाद साधू शकतात. दूरदर्शन सारख्या कार्यक्रमांमधून लोकप्रियता मिळालेली आहे. त्यांना सागरी खाणी शोधण्याचे प्रशिक्षण सुद्धा लष्करांकडून देण्यात आले होते. शत्रूंच्या गोतखोरांना शोधून चिन्हांकित करण्यासाठी देखील त्यांना शिकवले गेले होते.

गंगा डॉल्फिन : गोड्या पाण्यातील डॉल्फिन असून गंगा नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येतात; परंतु त्यांच्या संख्येमध्ये मात्र आता घट झाली आहे. ही डॉल्फिनची प्रजाती दक्षिण आशियामध्ये तसेच दक्षिण अमेरिकेमध्ये नद्यांमध्ये आढळून येतात. या भारतामध्ये गंगा व ब्रह्मपुत्र नद्यांमध्ये व त्यांच्या उपनद्या आढळून येतात. या डॉल्फिनला लोक सुसू या नावाने ओळखतात. यांचे शरीर सळपातळ असून डोक्यापासून त्यांची लांबी 4 मीटर असते. यांच्यामध्ये मादी ही नरांपेक्षा मोठी असते. त्यांच्या जबड्यात 54 ते 64 दात असतात. हे प्राणी दर दोन ते तीन मिनिटांनी श्वषणाकरता पाण्याच्या पृष्ठभागावर येतात व नदीच्या तळाशी असलेल्या चिखलातील कवलदारी प्राणी व मासे खातात.

गुलाबी डॉल्फिन : गुलाबी डॉल्फिन हे ॲमेझॉन नदी मध्ये आढळून येतात. त्यांना ॲमेझॉन नदी डॉल्फिन किंवा फोटो या नावाने संबोधले जाते. हे डॉल्फिन समुद्रामध्ये किंवा महासागरात आढळून येत नाहीत. हे दक्षिण अमेरिकेतील गोड्या पाण्याच्या नद्या आणि उपनद्यांमध्ये राहतात. यांची विशेषता म्हणजे यांचा रंग गुलाबी असतो, गुलाबी डॉल्फिन जगातील रिव्हर डॉल्फिनच्या काही प्रजातींपैकी एक आहे. या प्रजाती सुद्धा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत कारण होणारी शिकार व वाढते प्रदूषण यामुळे यांना धोका निर्माण झाला आहे. गुलाबी डॉल्फिन आणि त्यांच्या राहण्याचे संरक्षण करण्यासाठी संवर्धनाचे प्रयत्न केले जात आहे.

इरावडी डॉल्फिन : ही डॉल्फिनची प्रजाती बंगालच्या उपसागरामध्ये आणि आग्नेय आशियाच्या काही भागांमध्ये नद्यांमध्ये आढळून येते. या डॉल्फिनचा रंग राखाडी ते गडत स्लेट निळा असतो. या माशांचे पंख लहान आणि पाठीच्या मध्यभागी गोलाकार असतात. कपाळ उंच व गोलाकार असते तसेच यांची पूछ छोटीशी असते. या प्राण्यांची लांबी सात फुटांपर्यंत असते.

डॉल्फिन बद्दल मनोरंजक तथ्ये:

  • डॉल्फिन अतिशय सामाजिक प्राणी आहेत आणि शेंगा नावाच्या गटांमध्ये राहतात. शेंगा काही व्यक्तींपासून 100 पेक्षा जास्त डॉल्फिनच्या आकारात असू शकतात.
  • डॉल्फिन हे अतिशय हुशार प्राणी आहेत आणि त्यांना शिकार करण्यास मदत करण्यासाठी स्पंज सारखी साधने वापरण्यासाठी ओळखले जाते. ते खूप खेळकर प्राणी देखील आहेत आणि पोहणे, उडी मारणे आणि एकमेकांशी समाजात मिसळण्याचा आनंद घेतात.
  • डॉल्फिन इकोलोकेशनमध्ये खूप चांगले असतात, जे नेव्हिगेट करण्यासाठी आणि अन्न शोधण्यासाठी ध्वनी लहरींचा वापर करण्याचा एक मार्ग आहे. ते उंच-उंच आवाज उत्सर्जित करतात जे वस्तूंवरून उडतात आणि प्रतिध्वनी म्हणून त्यांच्याकडे परत जातात.
  • डॉल्फिन हे अतिशय बोलका प्राणी आहेत आणि क्लिक्स, शिट्ट्या आणि किंकाळ्यांसह विविध आवाजांचा वापर करून एकमेकांशी संवाद साधतात. हे ध्वनी एकमेकांना ओळखण्यासाठी, धोक्याचा इशारा देण्यासाठी आणि शिकार क्रियाकलापांमध्ये समन्वय साधण्यासाठी वापरतात.
  • डॉल्फिन हे अतिशय काळजी घेणारे प्राणी आहेत आणि अनेकदा एकमेकांना गरज पडल्यास मदत करतात.
  • डॉल्फिन प्रत्यक्षात मासे नसून सस्तन प्राणी आहेत. ते फुफ्फुसांद्वारे हवा श्वास घेतात आणि जिवंत तरुणांना जन्म देतात.

निष्कर्ष:

डॉल्फिन हे आकर्षक प्राणी आहेत जे जगातील सर्व महासागरात आढळतात. ते हुशार, खेळकर आणि सामाजिक प्राणी आहेत जे सागरी परिसंस्थांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.

FAQ:

डॉल्फिन्स काय आहेत?

डॉल्फिन हे सागरी सस्तन प्राणी आहेत जे व्हेल आणि पोर्पोईज यांच्याशी जवळचे संबंध आहेत.

डॉल्फिनच्या किती प्रजाती आहेत?

डॉल्फिनच्या 40 पेक्षा जास्त प्रजाती आहेत. काही सामान्य प्रजातींमध्ये बॉटलनोज डॉल्फिन, सामान्य डॉल्फिन आणि स्पिनर डॉल्फिन यांचा समावेश होतो.

डॉल्फिन काय खातात?

डॉल्फिन हे मांसाहारी आहेत आणि विविध प्रकारचे मासे, स्क्विड आणि इतर सागरी प्राणी खातात.

डॉल्फिन कसे संवाद साधतात?

क्लिक, शिट्ट्या आणि चीक यांसह विविध आवाजांचा वापर करून डॉल्फिन एकमेकांशी संवाद साधतात.

डॉल्फिन बुद्धिमान आहेत का?

डॉल्फिन हे अतिशय बुद्धिमान प्राणी आहेत. त्यांना शिकार करण्यास मदत करण्यासाठी स्पंज सारखी साधने वापरण्यासाठी ओळखले जाते.

Was this article helpful?
YesNo

Leave a Comment