Crab Information In Marathi खेकडा हा प्राणी सर्वांच्या परिचयाचा आहे. खेकडा दिसायला जरी विचित्र दिसत असला तरी तो विषारी नाही परंतु खेकड्याच्या समोरच्या दोन नांग्या असतात. त्या खूप तीक्ष्ण असतात, त्यांच्यामध्ये जर आपले बोट गेले तर ते कापू शकतात. खेकडा हा उभयचर प्राण्यांमध्ये येतो.
खेकडा प्राण्याची संपूर्ण माहिती Crab Information In Marathi
खेकड्याच्या अनेक प्रजाती आहेत. खेकडा हा प्राणी समुद्रापासून ते नद्यांमध्ये आढळून येतो. खेकड्यांच्या 4000 पेक्षा जास्त प्रजाती आढळून येतात. रंगीबिरंगी खेकड्यांच्या काही प्रजाती पहायला मिळतात. खेकडा हा प्राणी मांसाहारी तसेच शाकाहारी सुद्धा असतो.
खेकडा हा प्राणी त्याच्या कल्याण द्वारे श्वास घेतो म्हणून खेकडा पाण्याजवळ राहतो. खेकड्याचे डोळे गोगलगाई सारखे दिसतात. खेकडा हा वाकडा चालत असतो. खेकड्याचा उपयोग लोक खाण्यासाठी करतात. खेकडा या प्राण्याला बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते तर चला मग खेकडा या प्राण्याविषयी सविस्तर माहिती पाहूया
शास्त्रीय नाव | Brachyura |
वजन | 500 ग्रॅम पर्यंत |
रंग | काळपट राखाडी |
ठिकाण | तळे, तलाव, नदीकाठ |
अन्न | जमिनीतील किडे, कीटक |
डोमेन | युकेरियोटा |
खेकडा कोठे आढळतो ?
खेकडा हा प्राणी ओलाव्याच्या ठिकाणी, समुद्रामध्ये, नदी, तलावांमध्ये आढळून येतो. हे वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा आढळतात. जसे भारत, ब्रिटन, युरोप, अमेरिका येथे खेकडे मुख्यतः समुद्रकिनारी किंवा नद्यांमध्ये आढळतात. नद्यातील खेकडे बिळामध्ये राहणे पसंत करतात. चीन या देशात सुद्धा मोठ्या प्रमाणात खेकड्यांची शेती केल्या जाते. भारतात मोठ्या प्रमाणावर खेकड्यांची शेती केल्या जाते. खेकड्याचा उपयोग माणूस खाण्यासाठी करत असतो.
खेकडा कसा दिसतो?
खेकडा या प्राण्याचे संपूर्ण शरीर हे कठिण कवचाने झाकलेले असून त्याचे डोके व शरीर एकमेकांना जोडलेले असते. खेकड्याला मान नसते, खेकड्याचे सांधे जाड असून त्याला चार पाय जोडलेले असतात. तसेच खेकड्याला नांगी असते, जी तो स्वतःच्या संरक्षणासाठी वापरत असतो.
खेकड्याचे तोंड म्हणजे एक किचकट संरचना आहे. ज्यामध्ये अनेक हलणारे भाग दिसून येतात. खेकडा वाकडा चालतो. खेकडा या प्राण्याचे वजन जास्तीत जास्त 500 ग्रॅम पर्यंत असते किंवा त्यापेक्षाही जास्त वजन असलेल्या खेकड्यांना बाजारामध्ये खूप मोठी मागणी असते.
खेकडा काय खातो?
खेकडा हा प्राणी समुद्रांमध्ये आढळून येतो. त्या व्यतिरिक्त खेकडा प्राणी नदी, तलाव येथे सुद्धा मोठ्या प्रमाणात आढळून येतात. खेकडा पाण्यामध्ये फिरतो. बरेच लोक खेकड्यांची शेती सुद्धा करतात. खेकड्यांना मास, मासे, शिंपले किंवा कुक्कूटपालनातील कचरा तेथे उपलब्ध असणारे अन्न खेकडा खात असतो.
खेकडा पालन केल्यानंतर त्यांना मास खाऊ घातले जाते. खेकड्यांची शेती ही व्यवसायिक स्वरूपाची असून आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवर जास्त प्रमाणात दिसून येते.
खेकडा या प्राण्याची जीवन:.
या प्राण्यांमध्ये नर आणि मादी एकत्र आल्यानंतर त्यांचे मिलन होते. मादी अंडी टाकण्यास सुरुवात करते. खेकडा मादी एक ते तीन कोटीपर्यंत अंडी टाकतात. मादी ही अंडी अनेक दिवस तिच्या पोटामध्ये साठवून ठेवते. खेकड्याच्या वेगवेगळ्या प्रजातींमध्ये दोन आठवड्यापर्यंत मादी अंड्याचे पोषण करते.
अंड्याच्या पिवळ्या फुलक्यांचा रंग चॉकलेटी झाला की ही अंडे फुटायला सुरुवात होतात. अंड्यांची पूर्ण वाढ होते, त्यानंतर अंड्यामधून अळ्यांच्या स्वरूपात मादी त्यांना पाण्यामध्ये सोडते. ह्याना जिया अळ्या असे म्हणतात.
या प्राण्यांमध्ये वेगवेगळ्या जातीच्या जिया अळ्यांच्या स्वरूपाचा कालावधी मात्र वेगळा असतो. साधारणपणे ही अवस्था म्हणजेच 40 दिवसांचे असते. चार ते पाच वेळा ह्या अळ्या आपले कवच टाकतात व त्यांचे मोठ्या आड्यांमध्ये रूपांतर होत जाते. मोठ्या अळ्यांना मेंगा लोक असे म्हटले जाते. सर्वात शेवटी मेगॅलोपचे छोट्या खेकड्यामध्ये रूपांतर होते. छोटे खेकडे सुद्धा बऱ्याचदा त्यांचे कवच टाकतात.
जोपर्यंत कडक कवच त्यांना येत नाही, तोपर्यंत जुने कवच टाकून नवीन कवच येईपर्यंत खेकडाची त्वचा मुलायम असते. हा खेकडा कानाकोपऱ्यांमध्ये दगडाखाली लपून बसतो. त्यामुळे शिकारीपासून त्याचे संरक्षण होते. 12 ते 18 महिन्यांमध्ये खेकडा परिपूर्ण तयार होतो.
खेकडे हे समुद्रांमध्ये शंभर मीटर पर्यंत आढळून येतात. पॅसिफिक महासागरांमध्ये दोन प्रकारचे खेकडे आढळून येतात, त्यामध्ये निळा खेकडा व तपकिरी खेकडा. हे खेकडे मात्र स्वतःचे रक्षण करण्यासाठी रंग बदलतात. त्या व्यतिरिक्त इतर समुद्रामध्ये सुद्धा वेगवेगळ्या रंगाचे खेकडे आढळून येतात.
खेकड्यांचे प्रकार :
खेकड्यांचे मुख्यतः दोन प्रकार पडतात, त्यामध्ये मोठा खेकडा प्रजाती आणि लहान खेकडा प्रजाती मोठ्या प्रजातीला स्थानिक लोक हिरवा चिखल्या खेकडा असे म्हणतात. त्याची रुंदी 22 सेंटीमीटर असते. मोठ्या खेकड्यांच्या पायांवर किंवा नांगीवर नक्षी असते, त्यामुळे हे खेकडे ओळखण्यात मदत होते.
लहान लेकराच्या प्रजातींना लाल नांग्या असे म्हणतात. या खेकड्यांची रुंदी 12.7 सेमी असून त्यांचे वजन एक किलोपर्यंत असते. त्यांच्या अंगावर नक्षीही नसते. हे खेकडे बिळामध्ये राहणे पसंत करतात, यांच्यामध्ये देशी व परदेशी खेकड्यांना बाजारात मागणी असते.
गोड्या पाण्यातील खेकडे :
गोड्या पाण्यातील खेकड्यांचा खाण्यासाठी उपयोग केला जातो. खेकडा हा प्राणी लोक आवडीने खातात. खेकड्यांचा उपयोग मोठ्या प्रमाणात औषधांची निर्मिती करण्यासाठी सुद्धा केला जातो. या मार्केटमध्ये खेकड्यांना खूप जास्त मागणी असते. त्यामुळे बरेच लोक खेकड्याची शेती करतात. हिरव्या मातीचा खेकडा हा गोड पाण्यातील खेकडा असून त्याचा आकार मोठा असतो. जास्तीत जास्त 22 सेंटीमीटर पर्यंत या खेकड्याची वाढ होऊ शकते.
समुद्री खेकडे : समुद्रामध्ये आढळणारे खेकडे त्यांना समुद्र खेकडे असे म्हटले जाते. समुद्री खेकडे हे जाळ्यामध्ये पकडले जातात. मच्छीमार जेव्हा समुद्रामध्ये मासे पकडण्यासाठी जातात तेव्हा हे खेकडे सुद्धा पकडले जातात. समुद्री खेकड्यांच्या नांग्या खूप मजबूत असतात. तसेच हे सर्व भक्षी आहेत समुद्री खेकडे सेंद्रिय पदार्थ तसेच भाजीपाला देखील खातात. या खेकड्यांच्या नांग्या जोरदार तीक्ष्ण असतात.
हा खेकडा जितका मोठा असेल तेवढा शक्तीशाली असतो तसेच त्यांच्या नांग्यांमध्ये छोटे मासे छोटे प्राणी किंवा वनस्पती पकडून हे खातात. त्यांचा रंग मात्र तपकिरी असतो. खेकडा हा प्राणी समुद्राचे वातावरण स्वच्छ ठेवतो. बऱ्याचदा समुद्रकिनाऱ्यावर हे खेकडेवर येतात. जोपर्यंत त्यांना समुद्रामध्ये जाणे शक्य होत नाही तोपर्यंत हे खेकडे जमिनीशी जुळवून घेतात, बरेच खेकडे पक्षांची शिकार बनतात.
चिंबोरी : हा खेकडा चिखलामध्ये सापडते, मात्र ही प्रजाती नाश होण्याच्या मार्गावर आहे. हा खेकडा खाण्यासाठी अतिशय उत्तम लागतो. याच्यामध्ये सेलेनियम, तांबे असे धातू असतात तसेच विटामिन बी12 हे असते. त्यामुळे या खेकड्यांच्या प्रजाती क्वचितच आढळून येतात.
निळा खेकडा : ही खेकड्याची एक प्रजाती आहे, या खेकड्याचा नैसर्गिक रंग निळा आहे. त्यामुळे निळा खेकडा म्हणून याला संबोधले जाते. मानव आपल्या खाण्यासाठी तसेच नद्यांच्या प्रदूषणामुळे हे खेकडे मरण पावत आहेत. या खेकड्यांची लांबी 25 ते 30 सेमी लांब असते तसेच या खेकड्याचे वजन एक पाव किलो असते.
या खेकड्यांनाही इतर खेकड्याप्रमाणे नांगी असतात. यांच्यामध्ये नर आणि मादी यांचा फरक आपल्याला स्पष्ट जाणवतो. हे खेकडे जमिनीच्या अंदर एक ते दोन फूट खड्डा खालून त्यामध्ये बसतात. हे खेकडे त्यांच्या आहारामध्ये शिंपले, गोगलगायी, मासे, बेडूक, झाड इत्यादी खातात तसेच इतर खेकडे सुद्धा हे खातात.
FAQ
खेकडा काय काय खातो?
समुद्रातील खेकडे बहुतेक मांसाहारी असतात. ते पाण्यात आणि जमिनीवर पण राहतात म्हणून उभयचर. छोटे किडे, छोटे मासे, मेलेले मासे, प्राणी हे त्यांचे खाद्य.
खेकडा किती काळ जगतो?
मादी निळ्या खेकड्याचे आयुष्य 1-2 वर्षे आणि नर 1-3 वर्षे असते
खेकड्याला जगण्यासाठी काय आवश्यक आहे?
तुम्ही वापरत असलेले निवासस्थान, पाण्याची गुणवत्ता आणि सब्सट्रेट खेकड्याच्या विशिष्ट प्रजातींवर अवलंबून असते, त्यामुळे जुने नळाचे पाणी खडकाळ वस्तीत टाकू नका. खेकड्यांना विशिष्ट तापमान (सामान्यत: सुमारे 75–77 °F (24-25 °C)) आवश्यक असते, त्यामुळे तुम्ही तुमचे खेकडे कोठे ठेवत आहात त्यानुसार तुम्हाला उष्मा दिवा किंवा वार्मिंग पॅडची आवश्यकता असू शकते.
खेकड्याचा कोणता भाग तुम्ही खाऊ शकत नाही?
फुफ्फुस
खेकड्याच्या मांसाचे विविध प्रकार कोणते आहेत?
जंबो लंप क्रॅबमीट