Snake Information In Marathi साप हा एक सरपटणारा प्राणी असून आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. साप या प्राण्याला पाय किंवा हात नसतात. जमिनीवर चालत असताना साप हे सरपटतात. सापांंबद्दल सर्वांच्या मनात भीती निर्माण होते कारण साप आणि त्याचे विष यामुळे सर्वांना भीती वाटते. भीतीपोटी बरेच लोक सापांना मारून टाकतात. हजारो साप दरवर्षी मारले जातात.
साप प्राण्याची संपूर्ण माहिती Snake Information In Marathi
साप चावल्यानंतर त्याचे विष भक्षामध्ये सोडतो व विषाच्या प्रभावाने भक्ष थोड्याच वेळात मरण पावते. त्यानंतर साप ते भक्ष गिळून घेतो. मानवी जीवनामध्ये हजारो माणसे दरवर्षी सपाच्या दंशामुळे मरतात. खरंतर विषारी साप खूपच घातक असतात. सापांच्या काही विषारी व बिनविषारी अशा दोन प्रजाती आहेत. साप त्याच्या जबड्यापेक्षा मोठे भक्ष देखील गिळू शकतात.
वैज्ञानिक नाव | सर्प |
आयुर्मान | अंदाजे ९-१० वर्षे |
गती | २९ किमी/ता |
उच्च वर्गीकरण | ओफिडिया |
राज्य | प्राणी |
ऑर्डर | स्क्वामाटा |
साप कुठे आढळतो ?
साप हे प्राणी बिळामध्ये राहतात; परंतु साप स्वतः बीळे निर्माण करत नाही. ते मुंग्यांच्या वारुळामध्ये किंवा उंदरांनी तयार केलेल्या बिळामध्ये राहतात. साप सर्व प्रकारच्या प्रदेशांमध्ये आढळून येतो. सापांच्या काही प्रजाती समुद्रात, गौताळ प्रदेशात दलदलीपाशी, वाळवंटामध्ये तसेच पर्वतांवर देखील सापडतात.
साप हे उष्णकटिबंधातील जंगलात मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. वाळवंटामध्ये आढळणाऱ्या प्रजातीच्या सापांच्या अंगावर खवल्यांचे बारीक बारीक उंचवटे असतात, यामुळे त्यांना सरकण्यास मदत होते. काही साप झाडांवर राहतात. झाडांच्या फांद्यांना किंवा झुडपांना गुंडाळलेले असतात. साप प्राणी नद्या तळे किंवा नाले, पानतडे येथेही राहतात.
साप काय खातो ?
साप हे प्राणी मासभक्षी आहे, सापांचे मुख्य अन्न हे पाली, सरडे, बेडूक, उंदीर हे आहे. साप मेलेले भक्ष खात नाही. पानसाप मात्र मासे व बेडूक खातात. काही साप झाडांवरील घरट्यांमध्ये असलेले पक्षांची छोटी छोटी पिल्ले किंवा अंडीसुद्धा खातात.
सापांच्या तोंडाची विशिष्ट रचना असते. साप त्याच्या तोंडापेक्षा मोठ्या आकाराचे प्राणी सुद्धा घेऊ शकतात. नाग व घोणस यांच्यासारखे विषारी साप हे पण पहिल्यांदा भक्षाला दर्शवतात व नंतर भक्ष मरण पावते. मरण पावल्या नंतर त्याला गिळून घेतात. जिवंत असताना गिळून टाकतात. सापांच्या अनेक प्रजाती आहेत त्यामध्ये काही साप बिना अन्न पाण्याशिवाय बरेच महिने जिवंत राहतात. नागराज व मन्यार हे इतर इतर सापांना सुद्धा खातात.
सापाची रचना :
सापांचे विविध प्रकार पडतात. यानुसार त्यांच्या आकारमानात बदल घडून येतो. साप वेगवेगळ्या रंगाचे देखील आहेत, सापांच्या सर्व शरीरावर शुष्क व खरबरीत असे खवल्यांचे आवरण असते. हे खवले केरोटीनापासून तयार झालेले असते.
सापाची त्वचा नियमित बदलत असते. साप कात टाकत असतो, कात टाकताना त्याच्या हालचाली मंद होतात. डोळ्याने त्यांना दिसत नाही, वरची त्वचा पूर्णपणे निघून जाते व आतमध्ये नवीन त्वचा तयार होते. कात टाकण्याची ही क्रिया विशिष्ट काळानंतर पुन्हा पुन्हा होत असते.
साप वर्षातून दोन ते तीन वेळा साप कात टाकत असतात. सापांचा रंग हा तेथील वातावरणाशी जुळता मिळता असतो. याचा उपयोग साप शत्रूपासून आपला बचाव करण्यासाठी करतात. रंगातील विविधता, शरीरावरील ठिपके व खुणा यावरून सापाची प्रजाती ओळखण्याता येते.
सापाचे शरीर हे लांबलचक असते. सापांचे शरीर हे डोके, धड व शेपटी यांच्यामध्ये विभागले असते. त्यांना कान नसतात. त्यांच्या डोळ्यांमध्ये खवले असतात, त्यामुळे सापांची जात ओळखले जाते. सापांची वाढ आयुष्यभर होत असते. शरीरात साठवलेल्या चरबीवर साप जिवंत राहतो.
सापाचे जीवन :
सापांच्या मिलन काळामध्ये दोघांमध्ये स्पर्धा होत असते. दोन नर बऱ्याच वेळा पर्यंत एकमेकांना विळखे घालतात. शेपटीवर उभे राहून दुसऱ्या सापाला हरवण्याचा प्रयत्न करतात. मादीच्या शरीरामध्ये अंड्याचे फलन होते. सापाची मादी फलणानंतर सुरक्षित ठिकाणी अंडी घालते. अजगर, धामण, नागराज हे साप अंडी घालतात. त्या व्यतिरिक्त समुद्री साप व घोणस, हरानाग हे साप पिल्लांना जन्म देतात.
सापांचा अंडी उगवण्याचा काळ हा 70-80 दिवसांचा असतो. भृणाची वाढ होण्यासाठी अंड्यांना उष्णता मिळणे खूपच गरजेचे असते. त्यामुळे सापाची मादी स्वतःच्या अंगातील उष्णतेने अंडी उबवते. सापांच्या काही प्रजातींमध्ये म्हणजेच पिल्लांना जन्म देणाऱ्या सापांच्या प्रजाती पिल्लांचे काही दिवस रक्षण करतात. नंतर मादी सोडून जाते व पिल्ले हे एकत्रितपणे राहतात. काही दिवसानंतर पिल्ले सुद्धा वेगवेगळ्या मार्गाने निघून जातात.
सापाचे प्रकार :
भारतामध्ये सापांचे अनेक प्रकार आहेत. त्या व्यतिरिक्त इतर देशांमध्ये सुद्धा सापाचे बरेच प्रकार आढळून येतात. त्यामध्ये काही बिनविषारी साप तर काही भयानक विषारी साप आढळून येतात. तर चला मग सापांच्या प्रकारांविषयी थोडीफार माहिती जाणून घेऊया.
ब्लॅक मांबा : ब्लॅक मांबा ही सापाची प्रजाती आफ्रिकेमध्ये आढळून येते. ही आफ्रिकेतील सर्वात घातक ही प्रजाती आहे. या सापाच्या विषामुळे मानवाच्या मज्जा संस्था आणि स्नायू निष्क्रिय होऊन त्याला अर्धांगवायू होतो. वीस मिनिटांच्या आत उपचार न झाल्यास व्यक्तीचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो.
किंग कोब्रा : किंग कोब्रा सापाची ही प्रजात जगातील सर्वात लांब व विषारी आहे. यांची लांबी 18 फुटापर्यंत असते. हा साप आपल्या शरीराचा एक तृतीयांश भाग उंच करू शकतो. या सापाचे शास्त्रीय नाव ओफीफॅगस हॅना आहे. या सापांनी जर दंश केला तर त्यांच्या सात मिलिमीटर विष मानवाच्या शरीरात सोडते. हा साप चावल्यावर केवळ पंधरा मिनिटात एक हत्ती सुद्धा मरण पावतो. या सापांच्या विषाने मनुष्य तर काही मिनिटातच आपला जीव सोडून देऊ शकतो.
रसेल वायपर : ही प्रजाती भारतामध्ये आढळते या सापामुळे दरवर्षी 50 हजार पेक्षा जास्त लोक मरण पावतात. रसेल वायपरचे वैज्ञानिक नाव डबोईया रसेली असे असून ही प्रजाती दक्षिण भारतात व श्रीलंकेमध्ये आढळून येते. बऱ्याचदा भातांच्या शेतामध्ये शेतकऱ्यांना चावतात या सापांच्या दंशामुळे किडनी निकामी होते.
फेर-डी-लॉन्स : हे साप सुद्धा खूपच विषारी असतात या सापांच्या विषामुळे मानवाचे शरीर हे काळ-निळं पडतं. हा साप दक्षिण अमेरिकेमध्ये आढळून येतो. दक्षिण अमेरिका किंवा मध्य अमेरिकेमध्ये साप चावण्याच्या सर्व प्रकरणांपैकी अर्ध्या प्रकरणात याच सापाचा चावण्याचा रेकॉर्ड आहे.
इन्स्टर्न टायगर : सापाचे ही प्रगती दक्षिण पूर्व ऑस्ट्रेलियामध्ये आढळते. ही प्रजाती ऑस्ट्रेलियाच्या पर्वत व गवताळ प्रदेशांमध्ये आढळून येते. टायगर साप हे नाव त्यांच्या शरीरावरील पिवळे आणि काळ्या पट्ट्यांमुळे दिले गेले आहे. या सापाचे विष पंधरा मिनिटात एका व्यक्तीला ठार करू शकतो.
FAQ
साप काय खाते?
उंदीर, घुशी, सरडे, पाली, बेडूक इ. सापांचे अन्न आहे. पाणसाप बेडूक व मासे खातात.
सापाचे वय किती असते?
Reptilekingdoms.com च्या अहवालानुसार, बंदिवासात राहणाऱ्या सापांचे सरासरी वय 13 ते 18 वर्षे असते, तर जंगलात राहणाऱ्या सापांचे सरासरी वय केवळ 10 ते 15 वर्षे असते. अहवालानुसार, इतर सापांच्या तुलनेत बॉल पायथन प्रजातीचे साप सर्वात जास्त आयुष्य जगतात. बॉल पायथन प्रजातीचे साप कैदेत असताना 25 ते 30 वर्षे जगू शकतात.
साप त्यांचे अन्न कसे पचवतात?
पोट हा j-आकाराचा अवयव आहे ज्यामध्ये बहुतेक पचन सापांमध्ये होते. पोटाच्या पेशी पाचक एंझाइम आणि जठरासंबंधी रस स्राव करतात जे प्रथिने खंडित करतात. अन्न नंतर पायलोरिक वाल्वमधून आणि लहान आतड्यांमध्ये जाते .
साप कधी विकसित झाले?
मध्य प्रारंभिक क्रेटेशियस काळात (सुमारे 128.5 दशलक्ष वर्षांपूर्वी)
सापाचे हृदय कोठे असते?
डोक्याच्या पुच्छाच्या एक तृतीयांश ते एक चतुर्थांश बिंदूवर