Frog Information In Marathi बेडूक हा प्राणी आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. बेडूक हा प्राणी उभयचर आहे. म्हणजेच तो जमिनीवर व पाण्यामध्ये सुद्धा जगू शकतो. बेडूक त्याची श्वषण क्रिया ही फुफ्फुसावद्वारे व त्वचे मार्फत करतो, हा त्याचा नैसर्गिक गुण आहे. बेडूक हा प्राणी अन्न साखळीमध्ये सुद्धा महत्त्वाचा घटक आहे.
बेडूक प्राण्याची संपूर्ण माहिती Frog Information In Marathi
बेडूक हे शीत रक्ताचे प्राणी असल्यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान सभोवतालच्या तापमानानुसार बदलते असे म्हटले जाते. तसेच बेडूक हा उन्हाळ्यात सुद्धा स्वतःला मातीतून गाळून घेतात. बेडकच्या अनेक प्रजाती आहेत. प्रजातीनुसार त्यांचा आकार तसेच त्यांच्या शरीराचा रंग सुद्धा वेगवेगळा असतो.
प्राणी | बेडूक |
वैज्ञानिक नाव | Anura |
वर्ग | उभयचर |
कुटुंब | कॉर्डेटा |
आयुर्मान | 10 ते 12 वर्षे |
बेडूक हा प्राणी कोठे राहतो?
बेडूक हा प्राणी असा आहे. जो गावामध्ये शहरांमध्ये जंगलांमध्ये किंवा गटारा नाल्यांमध्ये आढळून येतो. हा प्राणी उभयचर वर्गात असल्यामुळे तो जमिनीवर किंवा पाण्यामध्ये सुद्धा राहतो. बेडूक हा प्राणी केवळ अंटार्टिका खंड वगळला असता. इतरत्र पृथ्वीवर सगळीकडे आढळून येतो. बेडूक फक्त गोड्या पाण्यात राहतात.
बेडूक हा प्राणी कसा दिसतो?
तर बेडकाच्या शरीराची लांबी 12 ते 18 सेंटीमीटर असून त्याचा मध्यभाग सर्वात रुंद असतो. म्हणजेच त्याची लांबी पाच ते सात सेमी असते. शरीराचे डोके आणि धड असे दोन भाग पडतात. बेडूक या प्राण्याचे डोके त्याच्या धडाला जोडलेले असते. तसेच ते चपटे रुंद व त्रिकोणाकृती असते.
डोके व धड यांना जोडणारी मान त्यांना नसते. डोक्याच्या निमुळत्या भागाला मुस्कट असे म्हटले जाते. डोक्याच्या दोन्ही बाजूला त्याचे दोन टपोरे डोळे दिसतात. त्याच्या काना मागचा पातळ पडदा असतो. तसेच त्याचे डोळे व कानांचा पडदा एकाच रेषेत असतो. दोन्ही डोळ्यांच्या मध्यभागी मात्र एक पांढरा ठिपका असतो.
बेडकाचे पुढचे पाय आखूड असून त्याला चार बोटे असतात. तर मागचे पाय लांब असून त्याला पाच पाच व एक अविकसित बोट असं सहा बोटे असतात. बेडूक हा प्राणी उड्या मारत चालतो. बेडकाचा रंग हिरवा किंवा तपकिरी रंग सुद्धा असतो. बरेच काळे तपकिरी पट्टी सुद्धा असणाऱ्या प्रजाती आहेत. त्याच्या पोटावरील त्वचेचा रंग पिवळा असून त्यावर ठिपके नसतात. बेडकाची जीभ खालच्या जबड्याच्या अग्र टोकाला चिटकलेली असते. त्याच्या जिभेच्या पृष्ठभाग हा गुळगुळीत असतो. कीटकांसारखे भक्ष पकडताना जीभ बाहेर टाकली जाते व त्याच्या जिभेला भक्ष चिटकून तोंडात जाते.
बेडूक हा प्राणी काय खातो?
बेडूक हा प्राणी गांडूळ, लहान मोठे किडे, गोगलगायी, कोळी अशा प्रकारचे छोटे छोटे कीटक खातो. एकदा एखादा कीटक बेडकाच्या नजरेस पडला तर बेडूक आपली जीभ अतिशय वेगाने त्याच्याकडे फेकतो, त्याची जीभ गुळगुळीत असल्यामुळे त्याच्या स्त्रवणाऱ्या ग्रंथीला तो कीटक चिटकून येतो. कीटक जिभेला चीटकतो व लगेच बेडूक आपली जीभ आत ओढून घेतो. ह्या क्रिया अतिशय वेगाने होतात.
भक्ष तोंडात आल्यावर बेडूक ते न चावता गिळून टाकतो. बेडकाच्या तोंडात असलेल्या दातांचा उपयोग भक्ष चावण्यासाठी नसून तोंडात घेतलेले फक्त निसटून जाऊ नये त्याकरिता असतात. बेडूक तोंडाने पाणी पीत नाही, तहान लागल्यावर ते पाण्यात उड्या मारतात व त्यांच्या त्वचेतून पाणी त्यांच्या पोटात शिरते.
बेडूक या प्राण्याचे जीवन :
बेडूक या प्राण्यांचे जीवनचक्र म्हणजे अंडे, डिंभ, बेडूकमासा आणि बेडूक अशा चार अवस्था असतात.
बेडूक या प्राण्याला या अवस्थांमध्ये कल्ले, फुफ्फुस, पाय, त्वचा इत्यादी अवयव तयार होतात. बेडकांची मादी मिलन काळात अंडपुंजाच्या स्वरूपात अंडी पाण्यामध्ये सोडते. नंतर या अंडपुंजावर नर शुक्रपेशी सोडतो.
अंड्यांचे फलन बाह्य पाण्यात होते. त्यानंतर 14 दिवसानंतर डिंभ तयार होतात, हे डिभाच्या आवरणातून बाहेर पडतात आणि पान वनस्पतींना चिटकून राहतात. नंतर डिंबांचे डोके, धळ एकत्र होते. माशाप्रमाणे त्यांना शेपूट असते, डिंभाचे दात मात्र तीक्ष्ण असतात, त्यामुळे ते वनस्पती व पाने खातात. 21 दिवसानंतर त्याचे रूपांतर बेडूक माशांमध्ये तयार होते.
सुरुवातीला बेडूक मासे आपल्या कल्याणद्वारे शोषण करतात. नंतर आंतरकल्ल्याद्वारे व त्याच्यानंतर फुफ्फुसंद्वारे श्वसन करतात. बेडूक माशाला पाच ते सहा आठवड्यानंतर पाय फुटतात. चार पाय तयार झाल्यानंतर अन्नग्रहण थांबते. नंतर शेपटीमध्ये साठवलेल्या अन्नावरच त्याचे पोषण होते.
बेडूक माशाचे रूपांतर भूजरात होते. अंडी घातल्यापासून प्रजननक्षम बेडूक तयार होण्यास अकरा आठवडे लागतात. बेडकाच्या शरीर रचनेमध्ये विविधता आढळून येते. पश्चिम आफ्रिकेतील कॅमेरूनच्या वनात आढळणारा गोलियात फ्रॉग आकाराने सर्वात मोठा आहे.
बेडूक या प्राण्याचे पर्यावरणीय महत्त्व :
बेडूक हा प्राणी मानवांसाठी खूपच फायदेशीर ठरतो. कारण हा प्राणी कीटक भक्षी असल्याने उपद्रवी कीटकांची संख्या बऱ्याच प्रमाणात कमी होते. नव्या औषधांची चाचणी घेण्यासाठी वैद्यकीय शास्त्रामध्ये बेडूक या प्राण्याचा वापर केला जातो. मात्र प्रदूषण आम्लवर्षा, जंगलांचा ऱ्हास या कारणांमुळे बेडकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. ज्या परिसरामध्ये बेडकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. तो परिसर निरोगी मानला जातो.
बेडूक या प्राण्याचे प्रकार :
बेडकांच्या अनेक प्रजाती असून त्यांच्या सभोवतालच्या वातावरणात मिसळण्यासाठी बेडूक हा प्राणी आपला रंग बदलू शकतो. त्यांना कीटक आवडतात. दुसऱ्याकडून शिकार होणे टाळण्यासाठी बेंडूक आपल्या त्वचेचा रंग बदलतो. बेंडूक हा प्राणी मांसाहारी प्राणी आहे.
अमेरिकन बुल फ्रॉग : अमेरिकन बुल फ्रॉग हा सर्वात मोठा बेंडूक आहे. विशेष हा उत्तर अमेरिकेमध्ये आढळतो. हा प्राणी दल दल तलाव आणि जल कुंभामध्ये राहतो. हा प्रकरणाच्या वेळेस वेगवेगळ्या आवाज काढतो. हा प्राणी दक्षिण अमेरिका, चीन युरोप, जपान आलेले आशियामध्ये सुद्धा आढळून येतो. याच्या वरच्या त्वचेचा रंग हिरवा असून डोळे तपकिरी असतात. या प्रजातीतील बेडकाची लांबी तीन ते सहा इंच असते तसेच या बेडकाचे वजन 500 ग्रॅम असते.
ट्रू टोड : या प्रजातीचे बेडूक हे दक्षिण अमेरिकेमध्ये मुळ मानले जातात. त्यांच्या प्रजातींना दात नसतात. तसेच चामखीळ दिसायला लागतात. त्यांच्या डोक्याच्या मागच्या बाजूला प्यारोटाइड ग्रंथी असतात. या ग्रंथींमध्ये अल्कलॉइड हे विष असते. प्रजातींच्या वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये भिन्नता आपल्याला दिसून येते.
भारतीय बुल फ्रॉग : भारतीय गुल फ्रॉग हा सामान्यतः दक्षिण आग्नेय आशियामध्ये आढळून येतो. काटेरी जीभ असलेली ही एक मोठ्या प्रजातीचा बेंडूक आहे. हा बेडूक आकाराने मोठा असून त्याचा रंग हिरवा असतो. नर आणि मादी यांच्यामध्ये लैंगिकता अस्तित्वात आहे. भारतीय बुल फ्रॉगची लांबी 6.7 इंच एवढी असू शकते.
त्याचे वजन 500 ग्रॅम पर्यंत असते. त्याचे डोके रुंद असून लांब असते. त्याच्या शरीरावर पाठीवर ठिपके असतात. त्याचे रूपांतर हिरव्या किंवा तपकिरी रंगात होतो. पाठीच्या मणक्याच्या भागात पिवळी उभी रेष निर्माण होते. हे बेडूक भारत, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश, चीन, भूटान, अंदमान निकोबार बेट येथे सुद्धा आंदोलन येतो.
FAQ:-
बेडकाच्या शरीराची लांबी किती असते?
बेडकाच्या शरीराची लांबी 12 ते 18 सेंटीमीटर असते.
बेडूक हा प्राणी कोणत्या प्रकारात मोडतो?
बेडूक हा प्राणी उभयचर प्रकारात येतात.
बेडूक कुठे राहतात?
अंटार्क्टिका वगळता जगातील सर्व परिसंस्थांमध्ये बेडूक आढळतात. ते फक्त गोड्या पाण्यात राहतात.
बेडूक कोणत्या प्रकारचा प्राणी आहे?
उभयचर प्राणी