Camel Information In Marathi उंट हा प्राणी आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. त्याची उंच मान तसेच लांब पाय त्याच्या पाठीवर एक कुबड अंगाने धिपळ व स्वभावाने गरीब असा देखना प्राणी आहे. उंट 400 किलो पर्यंत वजनाची चार ते पाच दिवस सहज 50 ते 80 किलोमीटर असा प्रवास करू शकतो. उंटाचा इतिहास खूप जुना आहे.
उंट प्राण्याची संपूर्ण माहिती Camel Information In Marathi
उंट हे आशिया खंडामध्ये वाशिंडी उंट म्हणून अमेरिकेतून आलास्का मार्गे आले असे मानले जाते. परंतु वाशिंडाचे उंट हे तुर्कस्तानच्या वाळवंटी प्रदेशातून आशिया खंडात पसरले असे मानले जाते. पूर्वी तुर्कस्तानला बॅक्टेरिया असे नाव होते. त्यावरूनच या उंटाला बॅक्टेरियन उंट असे नाव पडले. तर चला मगउंट या प्राण्याविषयी सविस्तर माहिती पाहूया.
नाव | उंट |
उंची | ड्रॉमेडरी: १.८ – २ मी |
वैज्ञानिक नाव | Camelus |
आयुर्मान | ड्रॉमेडरी: ४० वर्षे |
वेग | ६५ किमी/ता |
गर्भधारणेचा कालावधी | ड्रॉमेडरी: १५ महिने, बॅक्ट्रियन उंट: १३ महिने |
उंट कोठे राहतो?
उंट हा प्राणी वाळवंटामध्ये आढळतो. उंट आफ्रिका खंडातील सोमालिया सुदान या देशांमध्ये आढळतात.
आशिया खंडाचा विचार केला तर चीन, इराक, अफगाणिस्तान, मंगोलिया या भागातही उंट संख्या मोठ्या प्रमाणात आढळते. भारतामध्ये उंट हा राजस्थानमध्ये आढळतो. उंट हा पाळीव प्राणी असल्यामुळे त्याची वास्तव्य रानटी भागात कमी आहे; परंतु ऑस्ट्रेलिया खंडाच्या मध्यभागात काही रानटी उंट आहेत. यांची संख्या सात लाख एवढी असू शकते.
उंट दिसायला कसा असतो ?
उंट हा प्राणी वाळवंटात म्हणजेच वालुकामय मैदानावर राहणारा असतो. त्यामुळे हे वाळू खूपच गरम असते. तेथील वातावरणामुळे उंट या प्राण्याची तशी रचना निर्माण झाली आहे. उंटाचे पाय लांब असून त्याची मान देखील लांब असते. तसेच उंटाच्या पाठीवर एक कुबड असते. उंटाचे डोळे तीक्ष्ण असून दूरदृष्टी त्यांच्याकडे आहे. त्यांचे डोके व डोळे उंच असतात. त्यामुळे तापलेल्या वाळूच्या उष्णतेचा त्यांना त्रास होत नाही. डोळ्यांची विशेष रचना असल्यामुळे सूर्यकिरणांचा देखील त्यांच्या डोळ्यांवर काहीच परिणाम होत नाही.
विश्रांती घेताना तो आपले पाय मूडवून अंगाखाली घेतो. त्यामुळे छातीवर गुडघ्यावर व मागील झोपरावर त्याच्या शरीराची कातडी जाड व रठ असते. त्याच्या मानेवर तसेच गळ्याखाली भरपूर लांब केस असतात. उंटाच्या पोटात एक मोठी थैली असते. ज्यामध्ये तो भरपूर पाणी आणि अन्न साठवून ठेवतो. त्यामुळे काही दिवस पाण्याच्या व अन्नाशिवाय उंच जगू शकतो. उंटाच्या तोंडात 34 दात असतात.
उंटाचे सरासरी आयुष्य हे चाळीस ते पन्नास वर्ष असते. वाळवंटामधील वाऱ्याचा उंटावर कोणताही प्रकारे परिणाम होत नाही. त्यांच्या कानामध्ये असलेल्या केसांमुळे आतमध्ये वाळू शिरत नाही व त्यांच्या पायांमुळे त्यांना वाळूमध्ये चालणे सहज शक्य होते. उंटाचे वजन 680 किलोपर्यंत असते तसेच त्यांची लांबी सात फूट असते.
उंट काय खातो?
उंट हे शाकाहारी प्राणी असल्यामुळे ते केवळ झाडांचा पाला, कोवळी शेंडे, हिरवे गवत, काटेरी झुडप, बाबुळ खातात. उंट त्याच्या विशेष रचने करिता ओळखला जातो. त्यांच्यामध्ये उग्र व काटेदार अन्न खाण्याची क्षमता असते. त्यामुळे त्याच्या त्वचेला वेदना जाणवत नाही. उंटाला कळपात राहायला आवडते. उंट या प्राण्याला वाळवंटातील जहाज असे देखील म्हटले जाते. एका दिवसात 36 लिटर पाणी पितो आणि त्याला जर दररोज झाडाची ताजी पाणी खायला मिळाली तर तो 30 ते 32 लिटर पाणी देखील पिऊ शकतो.
उंटाची जीवनपद्धती :
उंटाची जीवन पद्धती हे एखाद्या पाळीव प्राण्या प्रमाणेच आहे. उंटाचा गर्भधारणेचा काळ हा 315-400 दिवसांचा असतो तर मादी एका वेळेस एकाच किल्ल्याला जन्म देते. बऱ्याचदा मादींना दोन पिल्ले देखील होतात. नवजात पिल्लू 30 मिनिटात चालायला तयार होते. कळपांमध्ये सामील होण्यासाठी त्यांना दोन आठवडे एवढा कालावधी लागतो. उंट जेव्हा सात वर्षाचा होतो तेव्हा त्याची पूर्ण वाढ होते.
उंट जेव्हा माजावर येतो तेव्हा तो बेफाम होऊन सैरा वैरा पळू लागतो. इतर उंट नरांवर हल्ला करतो व त्यांना चावतो. तसेच तोंडाच्या वरच्या पोकळ टाळ्यातून गडगड असा आवाज देखील करतो. संयोगानंतर मादी 315 दिवसांनी एका पिल्लाला जन्म देते व नंतर ती वर्षभर दूध देते. दुधात कॅरोटीनचे प्रमाण जास्त असल्यामुळे दूध पिवळे परंतु हे दूध पौष्टिक असते. साधारणता उंट 50 ते 60 वर्ष जगू शकतो.
उंट पाण्याशिवाय देखील बरेच दिवस राहू शकतो. त्याची मान लांब असल्यामुळे तो उंच झाडांचा पाला देखील सहज खाऊ शकतो. उंटाच्या जठराचे तीन कप्पे असतात व तिसऱ्या कप्पा अवशेषीय असतो. वाळवंटात जेव्हा पिण्यासाठी पाणी मिळत नाही तेव्हा तो वाळवंटातील वनस्पतींपासून मिळालेले पाणी त्याच्या शरीरासाठी उपयोगात आणतो.
त्यांच्या शरीरांतर्गत रचनेमुळे रक्तातील पाण्याची पातळी कायम राखली जाते. याच रचनेमुळे उंट प्राणी एकाच वेळी 30 ते 36 लिटर पर्यंत पाणी पिऊ शकतो. त्याच्या चरबीयुक्त उतीपासून त्याला ऊर्जा मिळते. म्हणून थकलेल्या किंवा अशक्त उंटाची मदार आकुंचित होऊन पडलेली दिसते.
ऊंटांचे प्रकार :
उंटावर बसण्याची मजाच अनोखी आहे. जर तुम्ही राजस्थानमध्ये गेला असाल तर तिथे उंटावर बसून बघा खूपच मजा वाटते. तर चला मग जाणून घेऊया उंटाचे प्रकार :
उंट हा प्राणी आर्टिओडॅक्टिला गणामधील कॅमेलिडी कुळातील सस्तन प्राणी आहे. उंटाच्या मुख्यतः दोन जाती आहेत. एक मदारीचा कॅमेलस ड्रोमेडेरियस नावाचा गतिमान अरबी उंट दुसरा प्रकार म्हणजे मदारींचा कॅमेलस बॅक्ट्रिअॅनस नावाचा बॅक्ट्रियन उंट होय. उंट हा प्राणी अरबस्थानमध्ये पूर्वी रानटी अवस्थेत होता परंतु पाच हजार वर्षांपूर्वी त्याला माणसाळलेला आहे.
तेव्हापासून उंट हा पाळीव प्राणी गणला जातो. आता मात्र रानटी अवस्थेत उंट सहसा आढळत नाहीत किंवा खूपच कमी प्रमाणात आढळतात. भारतामध्ये जो उंट आढळतो, तो अरबी उंट आहे. जगाच्या पाठीवर दोन प्रकारचे उंट वेगवेगळ्या भागात आढळतात.
उंट दक्षिण आफ्रिका आणि मध्य व पर्व भागात अरबी उंट आढळतो तर सहारा वाळवंटात डेअरी किंवा स्टेप मध्ये आढळतो. हे उंट केवळ उष्ण हवामानातच राहू शकतात असं नाही, त्यांच्या अंगावरील दाट केसांचा कोट हा त्यांना उष्णतेपासून बचाव करतो. तसेच थंड हवेमध्ये त्यांना त्यापासून संरक्षण मिळते. 2010 मध्ये एक दशलक्ष उंट जिवंत होते. उंटाची सर्वात मोठी संख्या ही हॉर्न या प्रदेशात आहे.
उंट हा ड्रामेबाज डेरिंग स्थानिक भटक्या लोकांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. तसेच त्या लोकांना उंटापासून बरेच फायदे आहेत. भटक्या लोकांना दूध अन्न आणि वाहतूक पुरवण्यास उंट फायदेशीर ठरतो. ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये सात लाख उंटाची संख्या आहे.
उंटाचा उपयोग :
उंट या प्राण्याचा उपयोग शेतीसाठी केला जातो. त्या व्यतिरिक्त लष्करांमध्ये देखील उंट या प्राण्याचा उपयोग केला जातो. उंटाचे दूध पिण्यासाठी वापरले जाते. कारण त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅरोटीनचे प्रमाण असते. उंटाचे दूध पौष्टिक असते. त्या व्यतिरिक्त उंटाचा उपयोग वाळवंटामध्ये वाहन म्हणून केला जातो. कारण उंट पाणी न पिता बरेच दिवस जीवन जगू शकतो. उंटाचे मास खाण्यासाठी सुद्धा वापरले जाते. उंटाच्या चामडीपासून पादंत्राने बनवली जातात. तसेच त्याच्या केसांपासून काही विशिष्ट प्रकारची औद्योगिक वस्त्रे देखील बनवली जातात.
उंटांबद्दल मनोरंजक तथ्ये:
- उंटांना दोन कुबड्या असतात (ड्रोमेडरी उंट) किंवा एक कुबडा (बॅक्ट्रियन उंट). कुबड्या हे खरं तर चरबीचे साठे आहेत, जे अन्नाची कमतरता असताना उंट ऊर्जेसाठी वापरू शकतो.
- उंट पाण्याशिवाय अनेक आठवडे जगू शकतात. ते त्यांच्या शरीरात पाणी साठवून आणि पॅंटिंग नावाच्या प्रक्रियेत त्यांच्या नाकातून पाणी बाष्पीभवन करून हे करतात.
- उंटांना जाड फर असते जे त्यांना थंडी आणि उष्णतेपासून सुरक्षित ठेवण्यास मदत करते. फर देखील खूप दाट आहे, ज्यामुळे वाळू आणि धुळीच्या वादळांपासून उंटाचे संरक्षण होते.
- उंटांना लांबलचक पापण्या असतात ज्या त्यांच्या डोळ्यांना वाळूपासून वाचवण्यास मदत करतात. त्यांच्याकडे तिसरी पापणी देखील आहे जी त्यांच्या डोळ्यांना धूळ आणि ढिगाऱ्यापासून वाचवण्यास मदत करते.
- उंट हे खूप मजबूत प्राणी आहेत. ते त्यांच्या पाठीवर 1,000 पौंडांपर्यंत वाहून नेऊ शकतात. ते ताशी 40 मैल वेगाने धावू शकतात.
- उंट अत्यंत सामाजिक प्राणी आहेत. ते सुमारे 20 प्राण्यांच्या कळपांमध्ये राहतात.
- उंट सभ्य प्राणी आहेत. ते मानवांबद्दल आक्रमक म्हणून ओळखले जात नाहीत.
निष्कर्ष:
उंट हे आकर्षक प्राणी आहेत जे अनेक लोकांच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावतात. ते वाळवंटातील जीवनाशी चांगले जुळवून घेतात आणि त्यांच्याकडे अनेक भौतिक वैशिष्ट्ये आहेत जी त्यांना कठोर परिस्थितीत टिकून राहण्यास मदत करतात. उंट देखील सौम्य प्राणी आहेत जे मानवांबद्दल आक्रमक असल्याचे ज्ञात नाही.
FAQ:
उंटांचे विविध प्रकार कोणते आहेत?
उंटाचे दोन मुख्य प्रकार आहेत: ड्रॉमेडरी उंट आणि बॅक्ट्रियन उंट. ड्रोमेडरी उंटांना एक कुबडा असतो, तर बॅक्ट्रियन उंटांना दोन कुबडे असतात.
उंटांना कुबडे का असतात?
उंटाच्या कुबड्या हे खरं तर चरबीचे साठे आहेत. जेव्हा अन्नाची कमतरता असते, तेव्हा उंट आपल्या कुबड्यांमधील चरबीचा ऊर्जेसाठी वापर करू शकतो.
उंट पाण्याशिवाय किती काळ जगू शकतात?
उंट पाण्याशिवाय अनेक आठवडे जगू शकतात. ते त्यांच्या शरीरात पाणी साठवून आणि पॅंटिंग नावाच्या प्रक्रियेत त्यांच्या नाकातून पाणी बाष्पीभवन करून हे करतात.
उंट काय खातात?
उंट शाकाहारी आहेत. ते गवत, झुडुपे आणि पानांसह विविध प्रकारच्या वनस्पती खातात.
उंट धोकादायक आहेत का?
उंट हे सामान्यत: मानवांसाठी धोकादायक नसतात. तथापि, जर त्यांना धोका वाटत असेल किंवा ते त्यांच्या लहान मुलांचे रक्षण करत असतील तर ते असू शकतात.
Very good and helpful info on the topic