काळवीट प्राण्याची संपूर्ण माहिती Blackbuck Animal Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Blackbuck Animal Information In Marathi काळवीट हा एक सुंदर आणि हुशार जंगली प्राणी आहे, जो हिरण प्रजातीतील मानला जातो, काळवीट प्राण्याच्या अनेक प्रजाती आणि काही उपप्रजती आहेत. काळवीट ज्याला भारतीय काईट म्हणूनही ओळखले जाते, हे भारत आणि नेपाळमधील मूळचे मृग आहे.

Blackbuck Animal Information In Marathi

काळवीट प्राण्याची संपूर्ण माहिती Blackbuck Animal Information In Marathi

हे प्राणी गवताळ मैदाने आणि बारमाही पाण्याचे स्त्रोत असलेल्या हलक्या जंगली भागात राहतात. काळवीट हा शाकाहारी प्राणी आहे, कमी गवतावर चरणारा प्राणी आहे. हे प्राणी अतिशय वेगाने धावतात, तासी 80 किलोमिटर वेगाने हे प्राणी धावू शकतात, यांना जंगलातील नरभक्षी प्राण्यापासून खूप मोठा धोका असतो.

प्राणीकाळवीट
वैज्ञानिक नावAntilope cervicapra
कुटुंबबोविडे
गर्भधारणा कालावधी१६७ दिवस
लांबी१.२ मीटर (प्रौढ)
वस्तुमान३६ किलो (प्रौढ)

काळवीट कुठे राहतात ?

काळवीट हे प्राणी आपल्याला दाट जंगलात किंवा मोठ्या अभयारण्यात पाहायला मिळतात. तसे हे प्राणी मूळचे भारतीय उपखंडातील आहेत, परंतु पाकिस्तान आणि बांगलादेशात स्थानिक पातळीवर काळवीट प्राणी नामशेष झाले आहेत.

काळवीट गवताळ मैदाने आणि बारमाही जंगली भागात राहतात, जिथे त्याच्या दररोज गरजेसाठी बारमाही पाण्याचे स्रोत उपलब्ध असतो. कळप पाणी मिळविण्यासाठी लांबचा प्रवास करतात. हे वातावरणानुसार पलायन करणारे प्राणी आहेत.

काळवीट कसा दिसतो :

काळवीट हा एक हुशार प्राणी आहे, हे प्राणी दिसायला हिरण सारखे असतात, परंतु काळवीट प्राण्याला मोठे शिंगे असतात, आणि हे प्राणी रंगाने सुध्दा भिन्न असतात. काळवीटचे शरीर गडद तपकिरी ते काळे असते, त्यांच्या डोळ्याभोवती पांढरी वर्तुळे, कान आणि शेपटी पांढरे असतात, आणि पोट खालचा जबडा आणि आतील पाय देखील पांढरे असतात. मादी आणि किशोर पिवळसर-पिवळ्या रंगाचे असतात. यांना दोन कान, दोन डोळे, चार पाय, दोन शिंगे, आणि एक लहान शेपूट असते.

यांचे मागचे पाय खूप शक्तिशाली असतात, हे प्राणी काही सेकंदात 80 किलोमिटर वेगाने धावू शकतात. काळवीटमध्ये नराचे वजन हे 25 ते 50 किलो पर्यत असते, तर मादीचे वजन हे थोडे कमी असते, आणि शारीरिक लांबी 4 ते 5 फूट असते. तसेच यांचे शिगे हे 1 ते 1.5 फुटा पर्यत वाढतात, हे शिंगे टोकदार असतात. ज्यांनी ते आपले रक्षण करतात. काळवीट मादी कधी-कधी शिंगे सुध्दा विकसित करते, हे प्राणी 10 ते 12 वर्षा पर्यत जगतात.

काळवीट काय खातात :

काळवीट हा एक शाकाहारी प्राणी आहे, जो जंगलातील लहान मोठे गवत आणि झाडांचा पाला पाचोळा खाऊन आपले जीवन जगतो. विशेषतः क्रूड प्रथिने, उन्हाळ्यात खराब होतात, परंतु पावसाळी आणि हिवाळ्यात अधिक कार्यक्षम होते.

उन्हाळ्यात क्रूड प्रोटीनचे सेवन शिफारस केलेल्या मूल्यापेक्षाही कमी होते. काळवीट हिवाळ्याच्या तुलनेत उन्हाळ्यात कमी अन्न खातात, आणि प्रॉसोपिस ज्युलिफ्लोराच्या फळांवर अनेकदा चारा खातात. गवत कमी असल्यास प्रॉसोपिस हा एक महत्त्वाचा खाद्यपदार्थ बनतो. पाणी ही काळवीटाची रोजची गरज आहे, अन्न शोधण्यासाठी हे प्राणी लांबचा प्रवास करतात.

Blackbuck Animal Information In Marathi

काळवीट प्राण्याची जीवन पद्धती :

काळवीट हा एक हुशार आणि स्तनन प्राणी आहे. हे प्राणी वातावरणानुसार पलायन करणारे प्राणी आहेत. काळवीट प्राण्याला जंगलात राहत असताना एकदम हुशार बनून राहावे लागते, कारण इतर मोठे प्राणी वाघ, सिंह, बिबट्या, लांडगा, कोल्हा, मगर अशे अनेक प्राणी यांची शिकार करण्यासाठी फिरत असतात.

काळवीट हे प्राणी स्वतःचे रक्षण करण्यासाठी 80 किलोमिटर वेगाने धावतात. हे प्राणी एका कळपात राहत. कळपात राहल्याने इतर प्राण्याचा धोका खूप कमी असतो, यांना थोडा धोका जाणवला की हे प्राणी दुसऱ्यांना प्राण्याला सतर्क करतात.

काळवीट प्राण्याचा वीण हंगाम ऑगस्ट ते ऑक्टोबर आणि मार्च ते एप्रिल पर्यत असतो. मादी वर्षातून दोनदा पिल्लांना जन्म देऊ शकतात. जंगलात राहताना एका कळपात एक नर काळवीट मुख्य असतो. मादी पिल्लांना धावणे, लपून राहणे आणि स्वतःचे रक्षण करणे शिकवते. पिल्ले थोडे मोठे होइपर्यत आईचे दूध पितात. पृथ्वीवरील सर्वात वेगाने धावणारे प्राणी काळवीट मानले जातात.

भारतीय संस्कृतीत काळवीट प्राण्याचे महत्व :

भारतीय संस्कृतीत काळवीट प्राण्याच्या खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. काळवीट हे सिंधू संस्कृती मध्ये अन्नाचे स्रोत असावेत, धोलाविरा आणि मेहरगढ सारख्या ठिकाणी हाडांचे अवशेष सापडले आहेत. संस्कृत ग्रंथात काळवीट प्राण्याचा उल्लेख कृष्ण मृग असा आहे.

हिंदू पौराणिक कथेनुसार काळवीट भगवान श्रीकृष्णाचा रथ काढतो, काळवीट हे वायू देवता, सोम आणि चंद्र देव यांचे वाहन मानले जाते. तामिळनाडूमध्ये काळवीट हे हिंदू देवी कोररावईचे वाहन मानले जाते. राजस्थानमध्ये देवी करणी माता काळवीटाचे रक्षण करते असे मानले जाते. हिंदू धर्मात काही ठिकाणी या प्राण्याची पूजा सुध्दा केली जाते.

Blackbuck Animal Information In Marathi

काळवीट प्राण्याचे महत्व :

काळवीट हा एक सुंदर प्राणी आहे, जो कोणालाही पाहायला आवडतो. विशेष म्हणजे हे प्राणी कधीची कोणत्या व्यक्तीवर हल्ले करत नाही, हा एक गरीब प्राणी आहे. या प्राण्याचे खूप महत्व आहे, काही जंगलात मोठ्या प्राण्याची शिकार बनण्यासाठी काळवीट प्राणी सोडले जातात.

या प्राण्यावर अनेक मोठ्या जनावराचे जीवन अवलंबून असते. नाहीतर जंगलातील वाघ, सिंह, चित्ता हे प्राणी कमी होतील, त्यामुळे हे प्राणी खूप महत्वाचे आहेत. जंगलातील वातावरण स्वच्छ ठेवण्यात या प्राण्याची मदत होते.

काळवीट प्राण्याचे प्रकार :

काळवीट प्राण्याच्या अनेक प्रजाती आहेत, त्यापैकी बऱ्याच प्रजाती नष्ट झाल्या आहेत.

गेझल काळवीट : गेझल काळवीट हे चीनपासून अरबी द्वीपकल्पापर्यत ते उत्तर आफ्रिका सहारा वाळवंटापासून टांझानिया पर्यत रखरखीत प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळून येतात. या प्राण्यांना गवताळ प्रदेश उप-वाळवंट आणि अगदी वाळवंटात राहण्यास अनुकूल आहे.

कोब काळवीट : कोब काळवीट हे प्राणी आफ्रिका, रशिया, दक्षिण आफ्रिका या भागात मोठ्या प्रमाणात आढळून येतात. कोब काळवीट इतर प्राण्याच्या तुलनेत खूप कमजोर असतात, यांना सपाट मैदानात राहणे पसंद आहे.

गेरेनुक काळवीट : गेरेनुक काळवीट ज्याला वॉलर गझेल देखील म्हणतात. गझेल टोळीचा सर्वात लांब मानेचा सदस्य मानला जातो. हे प्राणी आफ्रिकेतील सखल प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळून येतात.

काळवीट प्राण्याची संख्या कमी होण्यामागची कारणे :

काळवीट हा एक हुशार प्राणी आहे, भारतात हे प्राणी मोठ्या संख्येने आढळून येतात. परंतु दिवसाने दिवस होत असलेली जंगलात तोड, अवैध शिकार यामुळे काळवीट प्राण्याची संख्या कमी होत आहे. या प्राण्याची शिकार करून काही लोक तसकरी सुध्दा करतात.

यांची कातळी, शिंगे, हाड खूप मौलवान आहेत. देशात आणि विदेशात यांना मोठी मागणी आहे, त्यामुळे या प्राण्याची काही आर्थिक लाभासाठी शिकार केली जाते. तसेच दरवर्षी वाढत असलेले तापमान, पाणी आणि वादळी वारे यामुळे सुध्दा हे प्राणी मरण पावतात. या प्राण्यांना शिकार होण्यापासून वाचवले नाहीतर, एकदिवस हे प्राणी पूर्ण नष्ट होऊन जातील.

काळवीट बद्दल तथ्य:

  • ते भारतातील सर्वात वेगवान काळवीट आहेत, त्यांचा वेग 50 mph आहे.
  • ते हवेत 10 फूट उंच उडी मारू शकतात.
  • ते अतिशय बोलके प्राणी आहेत आणि त्यांच्याकडे विविध प्रकारचे कॉल आहेत, ज्यामध्ये मोठ्या आवाजातील अलार्म कॉलचा वापर केला जातो ज्याचा उपयोग इतर काळवीटांना धोक्याची सूचना देण्यासाठी केला जातो.
  • काळवीट हा भारतीय परिसंस्थेचा महत्त्वाचा भाग आहे. ते वनस्पतींवर चरून गवताळ प्रदेश निरोगी ठेवण्यास मदत करतात आणि त्यांना अतिवृद्ध होण्यापासून रोखतात.
  • काळे हरण हे भारतातील पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण आहे. ते गीर राष्ट्रीय उद्यान, केवलादेव राष्ट्रीय उद्यान आणि रणथंबोर राष्ट्रीय उद्यानासह अनेक राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्यांमध्ये दिसू शकतात.

निष्कर्ष:

ब्लॅकबक्स हे सामाजिक प्राणी आहेत आणि 50 व्यक्तींच्या कळपात राहतात. हे कळप एकच नर, अनेक मादी आणि त्यांची पिल्ले मिळून बनलेले असतात. काळवीट दिवसा सक्रिय असतात आणि बहुतेक वेळा पहाटे आणि उशिरा दुपारी दिसतात. ते शाकाहारी आहेत आणि गवत, पाने आणि फळे खातात.

FAQ:

काळवीट काय आहे?

काळवीट हा मध्यम आकाराचा हरीण आहे जो मूळचा भारत आणि पाकिस्तानचा आहे. त्याचा काळा कोट, पांढरा अंडरबेली, आणि लांब, आवर्त शिंगे यांद्वारे त्याचे वैशिष्ट्य आहे. ब्लॅकबक्स हे वेगवान धावपटू आहेत आणि ते 60 किमी/तास पर्यंत वेग गाठू शकतात.

काळवीट कुठे राहतात?

भारत आणि पाकिस्तानमधील मोकळ्या गवताळ प्रदेशात आणि झाडीझुडपाच्या जंगलात काळे हरण आढळतात. ते नेपाळ आणि बांगलादेशच्या काही भागांमध्ये देखील आढळतात.

काळवीट काय खातात?

काळवीट हे शाकाहारी प्राणी आहेत आणि त्यांच्या आहारात गवत, पाने, फळे आणि बिया असतात. ते किडे आणि इतर लहान प्राणीही खातात.

काळवीटच्या लोकसंख्येला काय धोका आहे?

काळवीटांच्या लोकसंख्येला मुख्य धोके म्हणजे निवासस्थान नष्ट होणे, शिकार करणे आणि मानवांशी संघर्ष. निवासस्थान नष्ट होणे ही एक मोठी समस्या आहे कारण काळवीटांना जगण्यासाठी खुल्या गवताळ प्रदेशांची आणि झाडी जंगलांची गरज असते.

काळवीटचे संरक्षण कसे केले जाते?

1972 च्या भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत काळवीटांचे संरक्षण केले जाते. हा कायदा काळवीटांच्या शिकारीवर बंदी घालतो आणि त्यांचा अधिवास नष्ट करणे बेकायदेशीर बनवतो. भारतामध्ये अनेक संरक्षित क्षेत्रे आहेत जिथे काळवीट आढळतात.

Was this article helpful?
YesNo

1 thought on “काळवीट प्राण्याची संपूर्ण माहिती Blackbuck Animal Information In Marathi”

  1. काळविटाविषयी दिलेली सविस्तर माहिती सामान्य माणसासाठी रंजक आणि प्राणीशास्त्र अभ्यासकांना उपयुक्त आहे.

Leave a Comment