अजगर प्राण्याची संपूर्ण माहिती Python Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Python Information In Marathi अजगर हा प्राणी सर्वांच्या परिचयाचा आहे. या प्राण्यांच्या प्रजाती भारता व्यतिरिक्त इतर देशांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतात. अजगर हा सर्वात मोठा सरपटणारा बिनविषारी सापाचा प्रकार आहे. साप आणि अजगर यांच्यामध्ये फरक आहे. अजगर हा प्राणी बोर्डी या कुळामध्ये पायथॉनिनी या उपकुळात येतो. जगामध्ये अजगराच्या विविध प्रजाती आढळून येतात.

Python Information In Marathi

अजगर प्राण्याची संपूर्ण माहिती Python Information In Marathi

अजगर हा भारतामध्ये घनदाट जंगलांमध्ये आढळून येतो. भारतामध्ये पायथॉन मूलुरस या प्रजातीचे अजगर पूर्ण भारतात आढळतात. या प्रजातींना इंडियन रॉक पायथॉन असे देखील म्हटले जाते. हे अजगर घनदाट जंगल, झाडांवर किंवा खडकाळ जमिनीमध्ये राहतात. मध्य व दक्षिण अमेरिकेमध्ये आढळणारे अजगर पिल्लांना जन्म देणारे, पान अजगर हे अँनाकोंडा म्हणून ओळखले जातात.

वैज्ञानिक नावPython
आकारसरासरी १३ फूट (४ मीटर) लांब
वजनसरासरी वजन 113 किलो 
आहारमांसाहारी, पक्ष्यांचा, मामल्यांचा आणि सरीसृपांचा
वर्तनशीलताएकटा, मुख्यत: रात्री वेळेत सक्रीय

अजगर हे प्राणी कोठे आढळून?

येतात अजगर हे प्राणी घनदाट जंगलांमध्ये किंवा झाडांना विळखा घालून झाडांवर दिसतात. खडकाळ जमिनीवर सुद्धा हे प्राणी राहतात. भारतामध्ये तसेच इतर देशांमध्ये सुद्धा अजगरांच्या विभिन्न प्रजाती आढळून येतात. त्या सुद्धा जंगलांमध्ये किंवा मग झाडांवर विळखा घातलेली दिसतात.

अजगर हे प्राणी काय खातात?

अजगर हे प्राणी मासभक्षी आहे, मासभक्षी असून हे प्राणी सर्वप्रथम भक्षाला विळखा घालून त्यांचा जीव गुदमरून त्यांना मारून टाकतात व नंतर त्याला जिवंत गिळून देतात. भक्षाची हालचाल करणे बंद होते. अजगर हे प्राणी हरिण, बकरी, झेब्रा, ससे, गाय यांना सुद्धा विळखा घालून त्यांना मारतात व नंतर आपल्या जबड्या मधून तोंडाकडून गिळून घेतात. अजगर भक्षस सगळेच गिळंकृत करतो, तरीसुद्धा त्याच्या पोटामध्ये हाडे सुद्धा पचविली जातात.

अजगराच्या विष्ट्येमध्ये फक्त केस आणि शिंगे किंवा पक्षांची पिसे न पचलेल्या स्थितीत आढळतात. एका हरणी सारखी भक्ष्य खाल्ल्यानंतर अजगराला सहा महिन्यापर्यंत पुन्हा शिखर करण्याची गरज भासत नाही. अजगर खूप दिवस उपाशी राहू शकतो.

Python Information In Marathi

अजगर प्राण्याचे वर्णन :

सर्वात मोठ्या अजगराची लांबी हे 10 मीटर पर्यंत असते तसेच त्याचा घेर 25-30 सेंटीमीटर एवढा असतो. अजगराच्या पाठीवर फिकट मातकट रंगाचे गर्द ठिपके असतात. त्या ठिपक्यांचा रंग तपकिरी असतो तसेच हे पट्टे वेडेवाकडे स्थितीत दिसतात. पोटाच्या बाजूला खवल्यांची रुंद असे पट्टे असतात.

अजगराचे डोळे पिवळे असून त्याच्या डोळ्यांच्या बाहुल्या आडव्या असतात. प्रौढ अजगरांच्या गुद्वारा जवळ दोन पायांच्या अवशेषांची दोन नखे स्पष्ट दिसतात. आतल्या बाजूला या नखांना लागून पायाची घटलेली हाडे सुद्धा दिसतात. अजगराच्या वरच्या ओठावरील खाच्याना उष्णतेची संवेदनशीलता जास्त असते. त्यामुळे या खाचांद्वारे अजगराला रात्रीच्या अंधारात गारवा असताना उष्ण रक्ताच्या भक्षाची जाणीव होते.

अजगर या प्राण्याचा जीवन काल :

अजगर यांचा मिलन काळ हा जानेवारी ते मार्च असतो. त्यानंतर तीन महिन्यांनी अजगरांची मादी आठ ते शंभर पर्यंत अंडी घालू शकते. पिल्ले बाहेर येईपर्यंत मादी त्याच्या सोबत राहते. अंड्याचे रक्षण सुद्धा करते, शरीराचे आकुंचन प्रसरण करून ती आवश्यकतेनुसार अंड्यांना उष्णता देते. काही दिवसांनी अंड्यातील पिल्ले बाहेर येतात. मादी काही दिवसांनी पिल्लांना सोडून जाते व नंतर पिल्ले एका ठिकाणी राहून ते सुद्धा आठ ते दहा दिवसांनी आपल्या मार्गाने निघतात.

आज घरी या प्राण्याचा उपयोग :

अजगर या प्राण्याची शिकार मानव करतो. मानव अजगरांचा सर्वात मोठा शत्रू आहे. आदिवासी भागांमध्ये खाण्यासाठी अजगराची शिकार केल्या जाते. बऱ्याचदा भीतीपोटी सुद्धा अजगर मारले जातात. अजगरांच्या कातडीपासून पर्स, पट्टे अशा प्रकारच्या वस्तू तयार केल्या जातात. ज्यांना आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये त्यांना मोठा भाव मिळतो.

अजगराची चोरटी शिकार आणि त्यांच्या कातड्याची तस्करी मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे शिकार झालेल्या अजगरांपैकी भारतामध्ये खूपच कमी अजगर आढळून येतात. आता मात्र सरकारने अजगराच्या कातडी जवळ वागवणे तसेच अजगर पाळणे मारणे यावर कायद्याने बंदी घातली आहे.

Python Information In Marathi

भारतीय अजगर : अजगर या प्राण्याचे भारतात व इतर प्रदेशात अनेक प्रजाती आढळून येतात. भारतीय अजगर याची लांबी 2.5 ते 5 मीटर पर्यंत असते. 7-8 मीटर लांबीचे अजगर सुद्धा भारतामध्ये आढळणाले आहेत. त्यांचे शरीर भारी असते तसेच रंग सुद्धा फिकट पिवळा व तपकिरी रंगाचे गर्द ठिपके असतात. त्याच्या अंगावरील ठिपके हे वेळे वाकडे असतात. डोक्यावर बाणाच्या आकाराचा एक मोठा डाग असतो.

युननेक्टेस अजगर : या प्रजातीचे अजगर हे उष्णकटिबंधीय प्रदेशात म्हणजे दक्षिण अमेरिकेमध्ये आढळून येतात. या प्रजातीला ॲनाकोंडा या नावाने देखील ओळखले जाते. हे साप अर्ध जलीय प्रदेशात राहतात. त्यात जगातील सर्वात मोठ्या सापांपैकी मोरीनस म्हणजेच हिरवा ॲनाकोंडा या प्रजाती समाविष्ट आहेत.

हिरवा अजगर : जगातील सर्वात लांब व वजनदार असणारे अजगरांपैकी ही एक प्रजाती आहे या प्रजातीच्या अजगरांची लांबी पाच मीटर किंवा त्यापेक्षा जास्त असते. तसेच ॲनाकोंडा चे वजन हे 40 ते 80 किलो पर्यंत असते. मादीपेक्षा नर अजगर खूप मोठे असतात. यांचा रंग हिरवा असतो त्यांच्या नावावरून त्याला हिरवा ॲनाकोंडा असे नाव पडले.

जाळीदार अजगर : जाळीदार आज क्रांती प्रजाती ही दक्षिण आशिया खंडामध्ये त्या व्यतिरिक्त निकोबार बेटे, कंबोडिया, थायलंड, मॅनमार, बांगलादेश, मलेशिया, इंडोनेशिया, इंडो-ऑस्ट्रेलियन द्वीप समूह, व्हिएतनामा इत्यादी देशांमध्ये आढळून येतो. हे अजगर जंगलांमध्ये सतत पाऊस पडत असतो जंगल तसेच गवताळ प्रदेशामध्ये आरामदायी जीवन जगतात धबधबे आणि तलावाजवळ राहणी त्यांना पसंत असते.

युनेक्टस म्युरिनस : या प्रजातीच्या अजगरांची लांबी 9 मीटर लांब असते तसेच त्यांचे वजन हे 250 किलो किंवा त्यापेक्षा जास्त सुद्धा असते. या प्रगतीचे अजगर यांचा रंग हा तपकिरी पिवळा किंवा हिरवा असतो. तसेच त्याच्या पाठीवर मोठे काळे अंडाकृती असे ठिपके दिसतात. पोटाकडचा भाग पांडुरक्या आकारा रंगाचा असून पोटावर लहान काळी वलय असतात.

या प्रजातीच्या अजगरांचे डोके चा लांबट चपटे आणि मानेपासून स्पष्टपणे वेगळे दिसते. हे अजगर मासे खाण्यात पटाईत आहे. त्या व्यतिरिक्त लहान सरपटणारे प्राणी, पक्षी लहान संस्तन प्राणी यांची शिकार करतो. भक्ष दिसतास त्याच्याभोवती विळखा घालतो व आपल्या शरीराची घट्ट वेटोळी करून त्याला गुदमरून मारतो व नंतर भक्षक जुळवून घेतो. शत्रूपासून बचाव करण्यासाठी तो निसटून जाण्याचा प्रयत्न करतो. या अजगरांची प्रजाती शत्रूंवर चावा घेतो. हे अजगर विषारी नाहीत परंतु त्याच्या चाव्यामुळे खोल जखमा होतात.

बर्मी अजगर : बर्मी अजगर ही जगातील सर्वात मोठ्या अजगरांच्या प्रजातीतील आहे. त्यांची लांबी 20 फूट किंवा त्यापेक्षा जास्त असते. ही प्रजाती दक्षिण फ्लॉरिडातील सबट्रॅपीकल वातावरणामुळे बर्मी अजगर जास्त जीवन जगतात. त्यामानाने इतर अजगरांचे आयुष्य कमी असते. यांचे कुटुंब जलद गतीने वाढते. हे आजगर नॅशनल पार्क सारख्या संवेदनशील ठिकाणी घुसकुरी करतात. यामुळे जंगली प्राण्यांसाठी हा धोका निर्माण होतो.

FAQ

अजगर साप विषारी आहे का?

अजगर विषारी नसतो, पण तो माणसाभोवती गुंडाळतो आणि त्यांना गिळतो. विषारी साप चावल्यावर त्याच्या फॅन्गची खूण तयार होते, तर विषारी नसलेल्या सापाच्या चाव्यावर फॅन्गचे कोणतेही चिन्ह तयार होत नाही आणि दातांच्या खुणा लहान व एकसारख्या दिसतात.

अजगर अन्न काय आहे?

साप बेडूक, सरडे, पक्षी, उंदीर आणि इतर साप खातो. हे कधीकधी मोठ्या प्राण्यांनाही गिळते.

अजगर किती धोकादायक आहेत?

सापाप्रमाणे अजगरही कमी धोकादायक नसतो.अजगराच्या तावडीत सापडल्यानंतर व्यक्तीचे जगणे चमत्कारापेक्षा कमी नसते.

अजगर कुठे राहतो?

प्रजातींवर अवलंबून, अजगर पावसाची जंगले, गवताळ प्रदेश, दलदल, जंगले, खडकाळ प्रदेश, वाळवंटातील वाळूच्या डोंगरावर किंवा आफ्रिका, आशिया आणि ऑस्ट्रेलियाच्या स्क्रब जमिनीत राहू शकतात.

Was this article helpful?
YesNo

Leave a Comment