Yak Animal Information In Marathi आपण चित्रामध्ये याक या प्राण्याला पाहिले असेल किंवा बरसता बर्फाळ प्रदेशांमध्ये केसाळ शरीराने जाड लांब शिंगे असणारा प्राणी देखील पाहिला असेल तो प्राणी म्हणजे याक हा आहे. या प्राण्याचे शरीर लांब लांब केसांनी झाकलेले असते तसेच या प्राण्याला थंड प्रदेशांमध्ये राहण्यासाठी त्यांचे केस मदत करतात. याक हा प्राणी गायी प्रमाणे असतो. तसेच तो शाकाहारी प्राणी आहे गाईप्रमाणे चारा खातो. यात या प्राण्याच्या अनेक प्रजाती आहेत त्यातील काही जाती हा पाळीव सुद्धा आहेत.
याक प्राण्याची संपूर्ण माहिती Yak Animal Information In Marathi
प्राणी | याक |
जात | सस्तन प्राणी |
शास्त्रीय नाव | Bos grunniens |
आयुर्मान | 15-20 वर्षे |
भारतातील हिमालय पर्वतीय भागात आपल्याला या प्राण्यांची संख्या दिसते तेथे देखील या प्राण्यांचा उपयोग वाहतूक, दूध, मास आणि त्याच्या त्वचा तसेच केस मिळवण्यासाठी केला जातो. या प्राण्याचा रंग काळा पांढरा आणि जाड असतो तर चला मग आज आपण याक प्राण्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.
याक हा प्राणी कोठे आढळतो?
याक हा प्राणी थंड प्रदेशांमध्ये आढळून येतो. उदाहरणार्थ हिमालयाच्या पायथ्याशी किंवा बर्फाळ प्रदेशामध्ये या प्राण्याचा उपयोग केला जातो. याक हा प्राणी भारतामध्ये आढळतो तसेच नेपाळ, भूतान, अफगाणिस्तान व पाकिस्तान या देशांच्या हिमालयीन प्रदेशांमध्ये आढळून येतो. त्या व्यतिरिक्त तिबेट, मंगोलिया आणि रशिया या देशांमध्ये सुद्धा याक हा प्राणी आढळतो. याक प्राणी माणसाळलेला असून त्याला पाळीव प्राणी म्हणून देखील संबोधले जाते. या प्राण्याचे शास्त्रीय नाव बॉस ग्रेनीयन्स असे आहे.
याक हा प्राणी कसा दिसतो?
याक हा प्राणी गोवंश या उपकुळातील असून इतर प्राण्यांच्या तुलनेमध्ये हा प्राणी आकाराने मोठा असतो. तसेच त्याची खांद्यापर्यंतची उंची 160 ते 210 सेमी असते. या प्राण्याचे वजन 300 पासून 1000 किलो पर्यंत असू शकते. या प्राण्याची डोक्यापासून ते शेपटीपर्यंतची लांबी तीन ते साडेतीन मीटर असू असते.
याक हा प्राणी तपकिरी किंवा गडद काळ्या रंगाचा असतो. याक हा प्राणी पाळीव असतो तसेच या प्राण्याच्या शरीरामध्ये विविधता आढळून येते. शरीरावर तांबट व पिवळसर रंगाचे ठिपके देखील असतात. या प्राण्याचे कान लहान असून कपाळ रुंद असते तसेच या प्राण्याचे पाय व खूर गोलाकार असतात.
या प्राण्याच्या अंगावर पोटापर्यंत लोंबणारे असे केस असतात. या केसांमुळेच कडाक्याच्या थंडीपासून त्याचे संरक्षण होते. नर व मादी या दोघांमध्ये मान आखूड असून पुढे वाकलेली असते. खांद्यावर शिंगे असते व त्याची पाठ देखील सरळ असते. नरांचे वशिंड थोडे मोठे असते.
शपटी मात्र घोड्याच्या शेपटी सारखी असते. या प्राण्याची शिंगे डोक्याच्या दोन्ही बाजूंना टाकलेली असतात व नंतर पुढच्या बाजूला आवडलेली असून त्यांची लांबी 50 ते 90 सेंटीमीटर पर्यंत असते. मादीची शिंगे हे सरळ व लांब असतात तसेच त्यांची लांबी 30 ते 60 सेंटिमीटर असते. ही शिंगे भरीव असून त्याच्या सहाय्याने बर्फा खालील दबलेल्या वनस्पतीच उकरून काढतात व आपल्या शिंगाचा उपयोग संरक्षणासाठी देखील करतात.
याक हा प्राणी काय खातो?
क हे प्राणी बर्फाळ किंवा थंड प्रदेशात राहतात. त्यामुळे हे प्राणी कळप करून राहतात. या प्राण्यांमध्ये माद्यांची संख्या जास्त व नरांची संख्या कमी असते. हे प्राणी बर्फाखाली दबलेले गवत, वनस्पती, शेवाळ, रानटी, फुलं इत्यादी खातात तसेच हे प्राणी शाकाहारी आहेत.
सरण्याकरता ते हिवाळ्यामध्ये दोन हजार ते तीन हजार मीटर उंचीपर्यंत जाऊ शकतात तर उन्हाळ्यामध्ये पाच हजार मीटर उंचीच्या प्रदेशात आपला प्रवास चाऱ्यासाठी गाठतात. हे प्राणी कमी ऑक्सिजनच्या वातावरणात सुद्धा राहू शकतात किंवा सूर्याच्या अति उष्ण किरणांना देखील तोंड देण्यासाठी त्यांच्या त्यांच्या शरीरावर घनदाट असे केस प्रकृतीने दिलेले असतात. त्यांच्यामध्ये थंडी व ऊन सहन करण्याची अशी क्षमता जास्त असते.
याक या प्राण्यांची जीवन :
याक हा प्राणी समूहामध्ये राहणारा प्राणी आहे तसेच या प्राण्याला सहज शिकविता येऊ शकते. मनुष्यावर हल्ला केल्याच्या घटना कमी प्रमाणात दिसून येतात. मात्र या प्राण्याला पाळीव प्राणी बनवले जाऊ शकते. बऱ्याच प्रमाणात याक हा प्राणी पाळीव प्राणी असल्याचे देखील आपण पाहिले असेलच.
याक या प्राण्याच्या अंगावर थंडीपासून संरक्षण होण्याकरिता घनदाट असे केस असतात तसेच या प्राण्यांच्या फुफ्फुसांची क्षमता इतर प्राण्यांच्या क्षमतेपेक्षा तिप्पट असते. त्यांच्या रक्तातील तांबड्या पेशींचा आकार लहान असून पेशींची संख्या देखील जास्त असते. यामुळेच त्यांच्या रक्ताची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता वाढते तसेच थंडीपासून संरक्षण होण्यासाठी यांच्या शरीराच्या त्वचेखाली मेदाचा थर असून धर्मग्रंथीत खूपच कमी असतात.
या प्राण्यांमध्ये जुलै ते सप्टेंबर हा कालावधी गर्भधारणाचा आहे. या काळातच मादी माजावर येते. यांचा गर्भधारणेचा कालावधी हा 250 ते 270 दिवसांचा असतो तसेच एप्रिल ते जून या कालावधीमध्ये मादी एका वासराला देखील जन्म देते. या वासराचा रंग जन्मतः तपकिरी असतो व एका वर्षानंतर हे वासरू स्वतंत्र होऊन कळपामध्ये राहते.
याक हा प्राणी गाई गुराप्रमाणे गवत खातो, रवंत करतो परंतु हा प्राणी हंबरत नाही. यामध्ये मादी आपल्या पिल्लाचे संरक्षण करते. याक या प्राण्याच्या पिल्लांना मनुष्य, अस्वल आणि लांडगा यांच्यापासून धोका असतो. मादीला असुरक्षितता जाणवल्यास ती आक्रमक होते व आपले पिल्लाचे रक्षण करते. याक या प्राण्याचे आयुष्य 20 वर्ष असते तर पाळीव याचे आयुष्य त्यापेक्षा थोडे जास्त असते. याक प्राणी बैलासारखा दिसतो, त्याच्या पाठीवर लांब केस व त्याचे पाय आखूड असतात.
याक या प्राण्याचा उपयोग :
याक या प्राण्याचा उपयोग 5000 वर्षांपूर्वीपासून होत आहे. या प्राण्याचा उपयोग ओझे वाहून नेण्यासाठी तसेच त्यांच्यापासून दूध, लोकर व मास मिळवण्यासाठी केला जातो. याक या प्राण्याचे दूध पिण्यासाठी, लोणी किंवा दुधाची भुकटी तयार करण्यासाठी वापरली जाते.
याक या प्राण्याचे मास देखील खाण्यासाठी वापरले जाते. याक प्राण्याच्या केसांपासून शाली किंवा ब्लॅंकेट तयार केले जाते. तसेच या प्राण्याच्या कातळीचा उपयोग जोडी, अंगरखे व जॅकेट बनवण्यासाठी केला जातो.
याक या प्राण्याचे प्रकार : यात या प्राण्याचे प्रदेशानुसार प्रकार पडतात. चला मग जाणून घेऊया याक या प्राण्यांचे काही प्रकार.
पांढऱ्या रंगाचा याक : पांढऱ्या रंगाचा याक हा प्राणी चीन या देशांमध्ये आढळतो तसेच चीनच्या आजूबाजूला असणाऱ्या बर्फाळ प्रदेशात आढळतो. हा एक प्रकारचा वेगळा व मौल्यवान प्राणी असून त्याचा उपयोग मुख्यतः शेतीसाठी केला जातो. या प्राण्यांचे तीन उपप्रकार तियानाझ , मेन्युआन आणि हुजू पडतात. यांच्यामध्ये अनुवंशिक भिन्नता दिसून येते. ही प्रजाती चीनमध्ये दिसून येतात तसेच त्याच्या शेजारील पर्वतय भागात देखील दिसते. तेथील हवामान खूपच थंड असते तरीसुद्धा पांढऱ्या याक हा एक दुर्मिळ असा पर्यावरणीय प्राणी आहे. जो अति थंड हवामान देखील सहन करू शकतो.
अरुणाचलि याक : अरुणाचल प्रदेशामध्ये ईशान्यकडील पश्चिम भागामध्ये अरुणाचली याचे ठिकाण आहे. हे प्राणी – 40 ते 10°सेंट्री ग्रेट या तापमानावर स्वतःला टिकवून ठेवतात. अरुणाचलिया हे शुद्ध अरुण या लोकसंख्येपैकी आहेत. हा एक पाळीव प्राणी असून त्या प्रदेशातील तवांग आणि पश्चिम चौकीतील दुर्गम डोंगराळ प्रदेशांमध्ये राहतात. तेथे सुद्धा याक प्राणी पाळला गेला आहे. तसेच त्याचा उपयोग शेतीसाठी केला जातो. तेथील याक हा प्राणी ग्रामीण भागातील लोकांची संपत्ती मानली जाते. या प्राण्याचा तेथील लोकांशी किंवा सामाजिक धर्माशी संबंध आहे.
FAQ
याक कशासाठी वापरला जातो?
याकांचा वापर नांगरणी आणि मळणीसाठी तसेच मांस, लपंडाव आणि फर यासाठी केला जातो.
याक कशासाठी चांगले आहे?
दूध, केस आणि डाउन, ड्राफ्ट पॉवर आणि इंधनासाठी शेण
याक किती काळ जगतो?
बंदिवासात 28 वर्षे, जंगलात 25 वर्षे
याक किती फायदेशीर आहेत?
सरासरी याक दर वर्षी सुमारे 1-2 एलबीएस (500-1000 ग्रॅम) फायबर देईल. जर तुम्ही फायबर साफ करून कातले असेल किंवा WHYC फायबर को-ऑपमध्ये भाग घेतला असेल, तर एक याक सुमारे 5-10 स्किन (प्रत्येकी 100 ग्रॅम) बनवेल. म्हणून, $25-35/skein वर, प्रत्येक याक खूप छान पूरक उत्पन्न मिळवू शकतो (दर वर्षी सरासरी $300) .