मांजर प्राण्याची संपूर्ण माहिती Cat Animal Information In Marathi

Cat Animal Information In Marathi मांजर हा प्राणी सर्वांच्या परिचयाचा आहे. मांजर पाळीव प्राणी असून आजकाल मांजर प्रेमी त्यांना आपल्या घरामध्ये पाळतात. मांजरांचे अनेक प्रकार आहेत. मांजर हा बुद्धिमान व चपळ प्राणी आहे. मांजराचे त्याच्या प्रकारानुसार वेगवेगळे रंग आकार असू शकतात. मांजराच्या चेहऱ्यावर आणि शेपटाच्या भागात विशिष्ट प्रकारचे गंध सोडण्याच्या ग्रंथी असल्यामुळेच मांजर आपली जागा निश्चित करू शकते किंवा तिला तिची जागा ओळखता येऊ शकते.
आपल्या सर्वांना माहित आहे, मांजरच प्रिय भक्ष्य म्हणजे उंदीर.

Cat Animal Information In Marathi

मांजर प्राण्याची संपूर्ण माहिती Cat Animal Information In Marathi

बरेच लोक असे सुद्धा म्हणतात की मांजर ही वाघाची मावशी आहे. वाघाची मावशी आई मोठी हौशी उंदीर तोडून खाते एकादशीच्या दिवशी…! असे देखील तुम्ही ऐकले असेलच. मांजरीचे पोट दुखले तर मांजर गवत खाते. ते तिला भूक लागते म्हणून नाही तर पोटातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी. मांजर ही पालेभाज्या खाऊ शकत नाही कारण त्यांना त्या पचत नाही. मांजर हा प्राणी दिशा लक्षात ठेवून आपल्या घरी परत येतो.

वैज्ञानिक नावFelis catus
दररोज झोप१२-१६ तास
वस्तुमान४-५ किलो (घरगुती)
वेग४८ किमी/ता (जास्तीत जास्त)
आयुर्मान१२- १८ वर्षे (घरगुती)
उंची२३ – २५ सेमी

मांजर हा असा प्राणी आहे जो स्वच्छ राहतो. मांजर त्याची सर्व अंग जिभेने चाटून नेहमी स्वच्छ करत राहते. मांजर असा प्राणी आहे जो तिच्या विष्टेवर माती ओढतो. मांजरांना थंडी वाऱ्याचा त्रास होतो या ऋतू काळामध्ये मांजर घरांमध्ये किंवा जेथे गर्मी असेल त्या ठिकाणी जाऊन बसतात. भटकी मांजरी सात ते आठ वर्ष जगतात तर पाळलेली मांजरी 14 ते 15 वर्ष सुद्धा जगू शकतात. तर चला मग आज आपण मांजर या प्राण्याविषयी सविस्तर माहिती पाहूया.

मांजर कुठे राहते?

मांजर हा प्राणी मास व अन्न दोन्ही सुद्धा खाऊ शकतो. त्यामुळे तिला ज्या ठिकाणी पुरेशी अन्न मिळेल, त्या ठिकाणी आपले वास्तव्य करते किंवा मग मांजर मानवी वस्तीच्या भागात देखील राहू शकते. बऱ्याचदा ग्रामीण भागांमध्ये मांजरी घरांमध्ये देखील पाळलेल्या आपल्याला दिसतात. आजकाल शहरांमध्ये सुद्धा बऱ्याच मांजरी घरात पाळतात. त्यांना कुत्र्याप्रमाणे शिकवतात.

मांजरीचा खर्च देखील कुत्र्यापेक्षा कमी असतो, त्यामुळे आजकाल बरेच लोक मांजरी पाळणे योग्य समजतात. बऱ्याच मांजरी ह्या जंगली भागात सुद्धा राहतात. काही मांजरी पडक्या घरांमध्ये किंवा वस्तीमध्ये सुद्धा आपले वास्तव्य ठेवतात. भारताप्रमाणे इतर देशात सुद्धा मांजरीच्या अनेक प्रजाती आढळून येतात व त्या देखील तेथील जंगलात किंवा पाळीव असतील तर लोकांच्या घरांमध्ये राहतात.

मांजर हा प्राणी कसा दिसतो?

मांजर या प्राण्याची शरीरचना ही इतर प्राण्यांप्रमाणे असून तिला सुद्धा चार पाय, दोन डोळे, छोटसं नाक, एक तोंड व एक शपटी असते. मांजर हे वेगवेगळ्या रंगांमध्ये आपल्याला दिसते. जसे की काळ्या तपकिरी किंवा पांढरा रंग असतो. मांजरचे डोळे खूपच तेजस्वी असतात.

मांजरीचा चेहरा हा वाघाप्रमाणे दिसतो. काही मांजरी तर बिबट्यासारख्या दिसतात. मांजरीचे डोळे खूपच तीक्ष्ण असतात. तिला रात्री देखील स्पष्ट दिसू शकते. मोठ्या मांजरांना 29 दात असून छोट्या पिल्लांना 26 दात असतात. हे दात थोडेफार विषारी असतात.

मांजरीचे पणजी देखील खूपच तीक्ष्ण असतात. आपल्या पंजामध्ये ते उंदराला पकडून धरतात. मांजरी ह्या सहसा मानवांवर हल्ला करत नाहीत परंतु तिने जर हल्ला केला तर मानवाला सुद्धा ठार करू शकते. मांजरीचे कान देखील खूप तीष्ण असतात. तिला खूपच कमी आवाज देखील ऐकून घेतो. मांजरीच्या तोंडाच्या दोन्ही बाजूंना उभे दोन काम असतात मांजरीच्या शरीरावर छोटे छोटे मऊ असे केस असतात. तिला राग आल्यास अंगावरील केस पूर्ण उभे राहतात.

मांजर शिकार करण्यासाठी दबा धरून बसते शिकार दिसतात त्यावर पुढच्या दोन पंचांनी हल्ला करते. मांजरीचा जबडा डाव्या आणि उजव्या बाजूला फिरू शकत नाही, त्यामुळे मांजरीला अन्नाचा मोठा तुकडा खाता येत नाही. मांजर त्याचे छोटे छोटे तुकडे करून खाते मांजरच्या पाठीमागच्या पायामध्ये 4 पंजे असतात. मांजरीचे कान चारही बाजूला फिरतात. मांजर हे ती 30 मैलापर्यंत प्रति तास धावू शकते. मांजर आपल्या तीन पट उंच उडी मारू शकते. तिला कितीही वरून टाकले तरी ती सरळच होते. मांजरीची वजन अडीच किलो ते पाच किलो पर्यंत असते.

मांजर काय खाते?

मांजर हा प्राणी शाकाहारी व मांसाहारी दोन्ही प्रकारचे अन्न खाऊन आपले पोट भरू शकतो. यामुळेच मांजरला सर्व पक्षी प्राणी देखील म्हटले जाते. मांजर तिच्या आहारामध्ये छोटे पक्षी, छोटे सरपटणारे प्राणी, बेंडूक, उंदीर, दूध, दही, पनीर, मासे, कोंबडीचे मटण इ यांसारखे पदार्थ मांजरीला प्रिय आहे. मांजरीला सर्वात जास्त उंदीर खायला आवडतो.

Cat Animal Information In Marathi

मांजर या प्राण्यांची जीवन :

मांजरीची वाट पूर्णपणे होण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागतो. यामध्ये नर मांजराला बोक्या असे म्हटले जातो तर मादीला मांजर असे म्हटले जाते. एक मांजर 8 ते 12 महिन्यानंतर प्रजननक्षम होते. या काळामध्ये जेव्हा मादी माजावर येते तेव्हा तिचे वेगवेगळ्या नराशी संयोग होतो, तेव्हा मादी अंडमोचन होते व फलन निरनिराळ्या वेळी होते, त्यामुळे ही मादी चार ते पाच पिल्लांना जन्म देऊ शकते. जेव्हा पिल्लू जन्माला येते. तेव्हा त्याचे डोळे मिटलेले असतात.

जन्म दिल्यानंतर 5-10 दिवसांनी डोळे उघडतात. पिल्ले चार ते सहा आठवडे आपल्या आईची दूध पितात. याच काळात तिचे अनुकरण करून बऱ्याच गोष्टी देखील पिल्ले शिकून घेतात. मांजर देखील त्यांना शिकार कशी करायची, गुरगावणे, ओरडणे दबा धरून बसणे सर्व खेळवते.

खेळत असताना आपल्या शेपटीचा उपयोग मांजर करते. दोन महिन्यांच्या नंतर पिल्ले स्वतंत्रपणे फिरू लागतात तसेच पिल्लांना स्वतंत्रपणे शिकार करणे देखील अवगत होते. जर तुम्ही मांजर पाळली असेल तर तिला अंडे, कच्चे मास, शिजवलेले मासे, पनीर, चीज, कोंबडीचे मास इत्यादी देखील खाऊ घालू शकता.

Cat Animal Information In Marathi

मांजरीचे प्रकार : मांजरीचे प्रकार त्यांच्या जातीनुसार आढळून येतात. तर चला मग जाणून घेऊया मांजर या प्राण्यांचे प्रकार.

बंगाल मांजर : ही एक पाळीव मांजरीची जात आहे. ही मांजर चपळ व हुशार असते. ही आशियाई बिबट्या या मांजराच्या संकरापासून तयार झालेली आहे. ही मांजर मैत्रीपूर्ण व्यवहार करते. या मांजरीच्या अंगावर बिबट्यासारखे ठिपके असतात.

ब्रिटीश शॉर्टहेअर : ही एक ब्रिटिश कालीन घरगुती मांजरीची वंशावळ जात आहे. यांच्या शरीरावर दाट केसांचा जणू काही कोटच घातल्याचा दिसतो. तसेच या मांजरांचा चेहरा देखील रुंद असतो. या मांजरांचे डोळे नारंगी असतात तसेच त्यांची शेपटी मध्यम आकाराची असते.

सयामी मांजर : ही मांजर आशियाई मांजरीच्या पहिल्या जातील एक आहे. ही मांजर 19 व्या शतकामध्ये युरोप आणि उत्तर अमेरिकेत सर्वात लोकप्रिय होती. या मांजरचे डोके त्रिकोणी असून त्यांचा शरीर बांधा सळपातळ असतो. ही मांजर देखील पाळीव आहे. ही सुद्धा अतिशय चपळ असते.

एबिनियन मांजर : ही मांजर सरपातळ असून त्यांची हाडे बारीक असतात. या मांजर चा आकार मध्यम स्वरूपाचा असतो. डोक छोटे असून तिच्या हनुटीपर्यंत काळ्या रंगाच्या उभ्या रेषा असतात. या मांजरीचे कान टोकदार असून डोळे बदामाचे आकाराचे असतात. शरीरावर सोनेरी रंगाचे केस असतात. शेपटी लांब व निमुळती असते.

FAQ

मांजर चे वय किती असते?

पाळीव मांजर साधारण २० वर्षापर्यंत जगते. सर्वसाधारणपणे १५ वर्ष आयुष्य धरायला हरकत नसावी. सध्याच्या आधुनिक वैद्यकीय सोयी पाहता पाळीव मांजराची आयुर्मर्यादा १५ ते २० वर्ष यामधे येईल.


मांजर काय काय खाते?

मांजर ही पाळीव प्राणी म्हणून खूप प्रसिद्ध आहे. मांजरीचे अनेक प्रकार आहेत. मांजर ही प्राणी अनेक रंगामध्ये असते. मांजरीचे मुख्य भक्ष्य उंदीर, विविध पक्षी, इतर छोटे प्राणी व दूध आहे.


मांजरींना कोणते पदार्थ आवडतात?

शिजवलेले गोमांस, चिकन, टर्की आणि कमी प्रमाणात दुबळे डेली मांस


मांजरींमध्ये विशेष काय आहे?

कुत्र्यांपेक्षा मांजरींच्या सेरेब्रल कॉर्टेक्समध्ये न्यूरॉन्सचे प्रमाण जवळपास दुप्पट असते . मांजरींचे डोळे कोणत्याही सस्तन प्राण्यांच्या डोकेच्या तुलनेत सर्वात मोठे असतात. मांजरी आजूबाजूला फिरताना फार कमी आवाज करतात

Was this article helpful?
YesNo

Leave a Comment