Dog Animal Information In Marathi कुत्रा हा प्राणी आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. कुत्रा हा प्राणी पाळीव तसेच रानटी स्थितीत आढळून येतो. बरेच लोक घराचे, शेताचे किंवा इतर वस्तूंचे रक्षण करण्यासाठी कुत्रा पाळतात. कुत्रा हा प्राणी खूपच इमानदार प्राणी म्हणून ओळखला जातो. तो आपल्या मालकासोबत नेहमी इमानदारीने वागतो कुत्रा त्याच्या इमानदारीसाठी प्रसिद्ध आहे. हिंदू धर्मामध्ये कुत्र्याला पुजले जाते. लहानपणी तर आपण कुत्र्यांविषयी बऱ्याच गोष्टी ऐकल्या आहेत तसेच लहान मुलांना कुत्र्या विषयी माहिती शाळेत देखील अभ्यासाला असतात. तर चला मग आज आपण कुत्रा या प्राण्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.
कुत्रा प्राण्याची संपूर्ण माहिती Dog Animal Information In Marathi
दररोज झोप | १२-१४ तास |
वेग | जर्मन शेफर्ड: ४८ किमी/ता |
वैज्ञानिक नाव | Canis lupus familiaris |
आयुर्मान | १०-१३ वर्षे |
गर्भधारणा कालावधी | ५८-६८ दिवस |
उच्च वर्गीकरण | लांडगा |
कुत्रा हा प्राणी कोठे राहतो?
कुत्रा हा प्राणी ग्रामीण, शहरी तसेच जंगलांमध्ये देखील आढळून येतो. आपले वास्तव्य स्वतः ठरवतात तसेच कुत्रा हा प्राणी कळपामध्ये किंवा गटामध्ये एकत्रित राहतो. जंगली कुत्रे हे माणसांवर देखील हल्ला करू शकतात भारताच्या भौगोलिक विविधतेमुळे येथील हवामान त्यांचे राहणे, खाणे व पिणे यामुळे ही भारतातील कुत्र्यांची प्रजाती सर्व देशभरात पसरलेले आहे. भारतीय कुत्र्यांची प्रतिकारशक्ती हे इतर कुत्र्यांच्या तुलनेने खूपच जास्त असते. त्यामुळे कुत्रा हा प्राणी पाळीव असेल तर एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये सुद्धा त्याचे पालन पोषण होते. इतर कुत्रे हे गावातील गल्ल्यामध्ये आपले वास्तव्य करतात. तसेच शहरातील कुत्रे हे देखील त्यांच्या एरियामध्ये राहतात.
कुत्रा काय खातो?
कुत्रा हा प्राणी शाकाहारी व मांसाहारी आहे. कुत्रा दूध, मास, अन्न इत्यादी पदार्थ त्याच्या आहारामध्ये समाविष्ट करू शकतो. आजच्या युगामध्ये कुत्र्यांंकरिता अनेक प्रकारचे खाद्य तयार केले जाते. पाळीव कुत्र्याला हे खाद्य दिले जाते. जुन्या काळामध्ये जेवत असताना कुत्रा आला म्हणजे त्याला ताटातील पोळी भाकरी जे असेल ते टाकले जात होते. परंतु आज काल कुत्र्यांचे लाड पुरविले जात आहेत. कुत्र्यांना विविध प्रकारचे अन्नपदार्थ कंपन्या तयार करत आहे. पाळीव कुत्र्यांची ही सुविधा खूप छान आहे. जंगली कुत्रे आपली शिकार स्वतः करतात किंवा मेलेल्या जनावराचे मास देखील कुत्रे खातात.
कुत्रा हा प्राणी कसा दिसतो?
सर्वच कुत्र्याच्या प्रजाती ह्या सारख्या आकाराच्या नसतात. यांच्यामध्ये सुद्धा प्रजातीनुसार तसेच त्यांच्या खाण्यापिण्यानुसार आपल्याला त्यांच्यामध्ये फरक दिसून येतो. कुत्र्याला चार पाय, दोन डोळे, दोन कान व तीक्ष्ण वास घेण्याची क्षमता, त्यांची ऐकण्याची क्षमता देखील अतिशय चांगली असते. तसेच कुत्र्याला धारदार असे दात असतात.
कुत्र्याचे दात विषारी असून कुत्रा जर चावला तर त्यापासून मानवाला रेबीज हा रोग होऊ शकतो. कुत्र्याला शेपटी असते. कुत्र्याच्या पायाला पास व मागील पायाला चार नखे असतात. कुत्र्यांच्या प्रजातींमध्ये कुत्र्याचा रंग त्याची उंची तसेच त्याचा बांधा व उपयोग यावरून भिन्नता दिसून येते.
जवळजवळ कुत्र्याच्या 400 जाती पाहायला मिळतात. यामध्ये वेगवेगळ्या जातीच्या कुत्र्यांचे वजन देखील वेगवेगळ्या असते. बऱ्याच कुत्र्यांची उंची आठ इंचापासून ते चार फुटांपर्यंत असते. यांच्या जाती आपल्याला वेगवेगळ्या देशांमध्ये देखील पाहायला मिळतात.
कुत्रा या प्राण्याचे जीवन :
कुत्रा हा प्राणी एक सामान्य प्राणी असून या प्राण्याचे जीवन 14 ते 15 वर्ष असते. जर कुत्र्यांना चांगला आहार मिळाला तर त्यांचे जीवनमान आणखीन वाढू शकते. पाळीव कुत्र्यांपेक्षा वन्य कुत्रे अन्न आणि पाण्याच्या शोधात असतात. त्यांना योग्य वेळी अन्न मिळत नाही, त्यामुळे त्यांचे आयुष्य खूपच कमी असते. मात्र पाळीव कुत्र्यांना नेहमी मास व इतर खाद्यअन्न मिळत असते. त्यामुळे हे निरोगी असतात व त्यांचे शरीराची वाढ चांगली होते तसेच त्यांचे वय देखील वाढते.
कुत्राचे प्रकार :
कुत्रा या प्राण्याच्या भारतात विविध जाती पाहायला मिळतात. त्या व्यतिरिक्त इतर देशांमध्ये सुद्धा कुत्र्याच्या अनेक प्रजाती आढळून येतात. त्यातील काही प्रजातींविषयी माहिती पाहूया
बुलडॉग कुत्रा : बुलडॉग कुत्रा हा खूपच शक्ती शाली मानला जातो. त्या व्यतिरिक्त हा कुत्रा दयाळू, विनम्र देखील असतो. बुलडॉग या कुत्र्याचा वापर बुलबाडिंग नावाच्या रक्त रणजीत खेळामध्ये केला जातो. या कुत्र्याचे आयुष्य हे दहा ते तेरा वर्ष असते.
लॅब्रेडोर : हा कुत्रा अतिशय प्रेमळ शांत कार्यक्षम असून बुद्धिमान असतो. या कुत्र्याचा आकार इतर कुत्र्याच्या तुलनेने मोठा असतो. तसेच या कुत्र्याचे आयुष्य हे 14 ते 15 वर्षे असते. लॅब्रेडोर हा कुत्रा थेरपी डॉग म्हणून देखील ओळखला जातो. या कुत्र्याचा वापर खेळण्यासाठी व शिकारीसाठी केला जातो.
इंडियन माउंटन डॉग : हा कुत्रा भारतातील हिमालयाच्या परिसरात आढळतो. तेथील हवामानानुसार या कुत्र्याच्या अंगावर भरपूर केस असून हा कुत्रा शक्तिशाली असतो. हा कुत्रा हिमाचल प्रदेश, उत्तरखंड, कश्मीर या भागांमध्ये संरक्षणासाठी पाळला जातो. या कुत्र्याला गड्डी कुत्ता असे देखील म्हटले जाते.
कन्नी डॉग : या कुत्र्याच्या प्रजाती मूळ तमिळनाडूच्या असून त्यांच्या मालकाशी खूपच इमानदार राहतात. हा कुत्रा पाळीव प्राणी म्हणून घरात सर्व सदस्यांसोबत पटकन मिसळून जातो. हे कुत्रे सर्व काळ्या रंगाचे असतात.
इंडियन परिहा : या प्रजातीची कुत्रे केवळ भारतात पाहायला मिळतात. भारतामध्ये या कुत्र्याची प्रजाती सर्वत्र पाहायला मिळते. हे एक भटक्या कुत्र्या प्रमाणे असतात तसेच ही प्रजाती पूर्णपणे वेगळी आहे.
राजपलयम : ही प्रजाती दक्षिण भारतामध्ये आढळून येते. या कुत्र्याचा रंग शुभ्र पांढरा, गुलाबी नाक उंच व या कुत्र्याचे पाय देखील लांब असतात. हे कुत्रे सुरुवातीला राजघराण्यामध्ये पाळले जात होते. अस्वलांच्या शिकारीसाठी या कुत्र्यांचा पूर्वी उपयोग केला जात होता.
डॉबरमॅन : डॉबरमॅन ही एक जर्मन कुत्र्याची जात असून ही घराची राखण करण्यासाठी अत्यंत उपयोगी पडते. तेथे पाळीव कुत्रा म्हणून पाळला जातो. हा कुत्रा खूपच हुशार, बुद्धिमान तसेच आज्ञाधारक आहे. या कुत्र्याची वाढ कमी वेगाने होत असते. हे कुत्रे पहिले तीन ते चार वर्ष छोट्या पिल्लांसारखे दिसतात. या कुत्र्यांना प्रशिक्षण देणे खूपच सोपे असते, त्यामुळे हे कुत्रे पटकन शिकतात. या कुत्र्यांच्या आयुष्य बारा ते तेरा वर्ष असते.
FAQ
कुत्रा किती वर्षे जगते?
कुत्रे सरासरी १२.५ वर्षे जगतात
कुत्रा कोणत्या जातीचे सर्वात जास्त काळ जगतो?
कुत्र्यांच्या लहान जाती सर्वात जास्त काळ जगतात. यॉर्कशायर टेरियर्स, चिहुआहुआस, डचशंड्स, टॉय पूडल्स आणि ल्हासा अप्सोस या जाती आहेत ज्या सामान्यत: 20 वर्षांपर्यंत सरासरी आयुष्यासह सर्वात जास्त काळ जगतात
कुत्र्याची सर्वात जुनी जात कोणती आहे?
साळुकी
कुत्रे पहिल्यांदा कधी दिसले?
20,000 ते 40,000 वर्षांपूर्वी