Buffalo Animal Information In Marathi म्हैस हा प्राणी आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. म्हैस हा प्राणी शाकाहारी असून लोक दुग्ध व्यवसायासाठी म्हशी पालन हा व्यवसाय करतात. म्हैस ही जंगली तसेच पाळीव सुद्धा असते. जंगलांमध्ये म्हशीचे कळप आपण पाहिले असेलच. ज्यामध्ये म्हशी व काही रेडे एकत्रितपणे आपल्या पिल्लांचे रक्षण करतात. म्हैस या प्राण्याला चिखलात बसणे किंवा पाण्यात बसणे आवडते. या प्राण्यांमध्ये नर या प्राण्याला रेडा असे म्हणतात तर मादीला म्हैस म्हटले जाते. म्हैस या प्राण्यांमध्ये काळा किंवा राखाडी रंग शक्यतो आढळून येतो. तर चला मग म्हैस या प्राण्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.
म्हैस प्राण्याची संपूर्ण माहिती Buffalo Animal Information In Marathi
प्राणी | म्हैस (Buffalo) |
श्रेणी | पृष्ठवंशी |
शास्त्रीय नाव | बुबालस बुबालिस |
वंश | बुबलास |
आयुष्मान | 15-20 वर्षे |
म्हैस कुठे राहते?
म्हैस हा प्राणी सर्व देशांमध्ये आढळतो मुख्यतः आफ्रिका दक्षिण आशिया आग्नेय आशियांमध्ये म्हशी ह्या जंगलांमध्ये आढळतात. त्या व्यतिरिक्त घरगुती स्वरूपात त्यांना दुधासाठी पाळले जाते. जंगली म्हशींचा सर्वात मोठा वावर हा अमेरिका, युरोप व ऑस्ट्रेलियामध्ये आढळून येतो.
भारतामध्ये म्हशीचा मुख्यतः दूध देण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. दुग्ध व्यवसायात भारताचा देशाचा बाबतीत पहिला क्रमांक लागतो. म्हशींच्या वेगवेगळ्या जाती आढळून येतात. म्हशीना गोठ्यात बांधतात. म्हशी व्यवसाय करणे पूर्वीच तिची राहण्याची व्यवस्था करावी लागते म्हशीच्या राहण्यासाठी तिचे वातावरण देखील अनुकूल असले पाहिजे.
म्हैस जिथे राहील त्या जागेला गोठा असे म्हटले जाते. म्हैस ज्या गोठ्यात बांधली जाईल ते गोठा गवत किंवा सिमेंट पासून तयार करतात त्यानंतर म्हशीला बांधायला दोरी व एक खुंट लागतो. म्हैस ज्या ठिकाणी बांधतात, त्या ठिकाणी तिच्या चाऱ्या पाण्याची व्यवस्था करावी लागते.
म्हशीची जागा तयार झाल्यानंतर तिथे नेहमी स्वच्छता ठेवली पाहिजे. अन्यथा घाणीमुळे म्हशीला वेगवेगळ्या प्रकारचे रोग होऊ शकतात किंवा डासांसाठी त्रास होऊ शकतो.
म्हैस कशी दिसते?
म्हैस सर्वांच्या परिचयाचे आहे. म्हशीचा रंग हा काळा किंवा राखाडी असतो. म्हशीला दोन शिंगे असतात तसेच एक शेपूट असते. दोन डोळे, नाक लांब कान असून तिच्या सर्व शरीरावर काळे केस असतात. त्या व्यतिरिक्त म्हशीचे कातडी खूपच जाडी असते. म्हशीची उंची ही सहा ते सात फुटापर्यंत असते तसेच एका म्हशीचे वजन हे 400 ते 800 किलो पर्यंत असते. म्हशीचे दूध हे गाईच्या दुधापेक्षा जाड असून त्याचा उपयोग दही, लोणी व तूप काढण्याकरिता केला जातो.
म्हैस काय खाते?
म्हैस हा एक शाकाहारी प्राणी आहे. झाडांचा पाला वगैरे काही खात नाही. म्हशीला केवळ शेतातील गवत, कडबा, कुट्टी, भुसा, ढेप अशा प्रकारचे चारा दिला जातो. दुधाळ म्हशीला जास्तीत जास्त ढेप व हिरवा पाला तसेच आपट्याचा पाला देखील दिला जातो. यामुळे दुधामध्ये जास्त चरबी, प्रथिने तयार होतात तसेच दूध घट्ट आणि कॅल्शियम चे प्रमाण देखील वाढते.
म्हशीचे जीवन :
म्हशीचे जीवन दोन प्रकारचे असते. एक पाळीव दुसरे जंगली पाळीव मशीन चा विचार केला तर पाळीव म्हशीला नियमित गवत, पाणी वेळेवर दिले जाते. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे आजार देखील कमी प्रमाणात होतात. जंगली म्हशीचा विचार केला तर त्यांना जंगलांमध्ये मिळालेले गवत, चारा, पाणी यावर आपले जीवन जगावे लागते. त्याव्यतिरिक्त जंगलांमध्ये सिंह, वाघ असे प्राणी त्यांची शिकार देखील मोठ्या प्रमाणात करतात. येथे त्यांचे आयुष्य धोक्यात असते.
म्हशीला जास्तीत जास्त खुरांमध्ये कीड लागणे किंवा पोटदुखीचा आजार होतो. म्हशीचे तोंड खुरी येण्याचा देखील एक रोग आहे. म्हैस आजारी असेल तर त्याचा परिणाम म्हशीच्या दुधावर होतो. म्हशीचे दूध उत्पादन क्षमता कमी होते. अशा प्रकारचे रोप म्हशीला झाले असता, तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे अन्यथा म्हैस मरू शकते.
म्हशीला तासून तास पाण्यामध्ये बसणे खूपच आवडते. हिरवा चारा खाने देखील म्हशीला आवडतो म्हैस या प्राण्याचा गर्भधारणाचा कालावधी एका वर्षाचा असतो म्हशीच्या पिल्लाला रेडकू असं म्हटलं जातं हे रेडू म्हशीचं दूध पितो.
म्हशीचे प्रकार :
भारतामध्ये म्हशीचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. या प्रजातीमध्ये म्हशीचे दूध उत्पादन क्षमता कमी जास्त असू शकते. तर चला मग जाणून घेऊया म्हशीचे प्रकार.
सुरती म्हैस : या म्हशीचा विचार केला असता ही म्हैस मध्यम स्वरूपाची असून या म्हशीचे कान देखील मध्यम स्वरूपाची लांबट रुंद व शिंगांनी झाकलेले असतात. या म्हशीचे डोळे मोठे असून तिच्या भुया पांढऱ्या असतात. या म्हशीच्या शरीराचा रंग हा भुरा असून मानेवर पांढरे आडवे पट्टे असतात. दर महिन्याला ही म्हैस 2200 ते 2500 लि. पर्यंत दूध देते. या म्हशीचे दूध इतर म्हशींच्या तुलनेत घट्ट असते.
मुऱ्हा म्हैस : या म्हशीच्या अनेक जाती आपल्याला पाहायला मिळतात ही म्हैस पंजाब व हरियाणा या राज्यांमध्ये आढळून येतात. यास म्हशीला हरियाणामध्ये ब्लॅकबोर्ड या नावाने देखील ओळखतात. या म्हशीचा गर्भधारणेचा कालावधी हा 310 दिवसांचा असतो. ही म्हैस दररोज 18 ते 20 लिटर दूध देते. ही म्हैस दिसायला जाड व चरबी युक्त असते. यावरच म्हशीचे दूध उत्पादन क्षमता अवलंबून असते.
निलीरवी म्हैस : या म्हशीच्या शरीराचा रंग हा काळा असतो. डोळे हे काळे व मांजरी सारखे असतात. तसेच खालचे शेपूट पांढरी व गुडघे पांढरे मध्यम आकाराचे असतात या म्हशीचे शिंग भारी असतात.
हे माहित मोडता पाकिस्तान मधील आहे. ही म्हैस 1800 लिटर पर्यंत दर महिन्याला दूध देते. या दुधातील चरबीचे प्रमाण हे 60% असते.
पंढरपुरी म्हैस : पंढरपुरी म्हैस महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पाहायला मिळतात. ही प्रजाती धारवाडी म्हैस या नावाने देखील ओळखली जाते. या प्रजातीच्या म्हशी पंढरपूर या गावांमध्ये जास्तीत जास्त आहेत, त्यामुळे या म्हशीला पंढरपूर म्हैस देखील म्हटले जाते.
या म्हशीची शिंगे लांब असतात जवळजवळ 40 ते 50 सेंटीमीटर एवढी त्या शिंगांची लांबी असते. या म्हशीची ही प्रजाती खूप प्रसिद्ध आहे. डोक्यावर पांढरे निशाण असून या म्हशीचे वजन 500 किलो पर्यंत असते. ही म्हैस दररोज 7 लिटर दूध देते. या म्हशीला जर चांगले खाद्य दिले तर ही म्हैस 15 लिटर पर्यंत दूध देऊ शकते. या म्हशींच्या प्रजाती ह्या प्रजननासाठी खूपच प्रसिद्ध आहे. या म्हशी बारा महिन्यात एका पिल्लाला जन्म देतात.
जंगली म्हैस : जंगली म्हैस या आपल्या जंगलांमध्ये देखील पाहायला मिळतात. या म्हशी जंगलांमध्ये एखाद्या तळ्यात मध्ये किंवा चिखलामध्ये बसलेल्या आपल्याला दिसतात. या म्हशीला आशियाई म्हैस देखील म्हटले जाते. ह्या भारतामध्ये आणि दक्षिण आशियामध्ये देखील आढळतात.
आशियाच्या जंगलामध्ये 4000 पेक्षा जंगली म्हशीची संख्या कमी झाली आहे. मात्र आसामच्या जंगलांमध्ये यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. जंगली म्हशी पासूनच म्हशीचे उत्पत्ती झालेली आहे. जंगली म्हशींना वाघ बिबट्या, सिंह अशा शिकाऱ्यांपासून धोका असतो.
FAQ
म्हशीचे शास्त्रीय नाव काय?
ब्यूबॅलस ब्यूबॅलिस
म्हैस किती वर्षे जगू शकते?
७ ते ११ वर्षे
म्हशी काय खातात?
गवत, शेंगा आणि पेंढा
म्हैस किती महिने दूध देते?
गाय / म्हैस गाभण राहते, व्यायल्यानंतर चीक देते व पाच-सहा दिवसांनी दूध देणे सुरू करते. एक वेत म्हणजे चांगल्या दूध देणाऱ्या गायींमध्ये ३०५ ते ३१० दिवस तसेच म्हशींमध्ये २७० ते २८० दिवस