खार प्राण्याची संपूर्ण माहिती Squirrel Animal Information In Marathi

Squirrel Animal Information In Marathi खार हा प्राणी सर्वांच्या परिचयाचा आहे. बऱ्याचदा आपण तिला खारुताई असं देखील म्हणतो. या प्राण्याचा वर्ग हा कृतक म्हणजेच कुरतडून खाणाऱ्या प्राण्यांच्या गणांमध्ये येतो. या कुळामध्ये दोन उपकुळ आढळतात. त्यामध्ये सायुरीनी उपकळामध्ये भूचर आणि झाडावरील खारींचा समावेश होतो. या खारींच्या 200 पेक्षा जास्त प्रजाती आढळून येतात. त्या व्यतिरिक्त पेटारिस्टीनी या कुळामध्ये उडणाऱ्या खारींचा समावेश होतो.

Squirrel Animal Information In Marathi

खार प्राण्याची संपूर्ण माहिती Squirrel Animal Information In Marathi

नावखारुताई
शास्त्रीय नावSciuridae
वर्गसस्तन प्राणी
कुटुंबस्क्युरिडे
आयुर्मान6 ते 20 वर्षे

उडणाऱ्या खारींच्या प्रजातींमध्ये 35 प्रजाती आहेत. खार ही खूपच चपळ आहे. तसेच खारीचा इतिहास खूप जुना आहे. रामायणामध्ये सुद्धा खार या प्राण्यांचा उल्लेख केलेला आहे. भारतामध्ये खार या प्राण्यांच्या दोन प्रजाती आढळून येतात. ही खार म्हणजे सामान्य माणसांच्या सहवासात राहते ती सामान्य खार तसेच उत्तर भारतामध्ये जी खार आढळते. ती शेतामध्ये किंवा माळरानावर राहते, त्या व्यतिरिक्त ती जंगलात सुद्धा राहते. तर चला मग जाणून घेऊया खार या प्राण्याविषयी सविस्तर माहिती.

खार हा प्राणी कोठे राहतो?

खार हा प्राणी जंगलांमध्ये तसेच झाडांवर राहणारा प्राणी आहे. सामान्य वस्तींमध्ये सुद्धा यांच्या प्रजाती आपल्याला दिसून येतात. हा प्राणी ऑस्ट्रेलिया, अंटार्टिका खंड व उत्तर सहारा वाळवंट सोडले तर पृथ्वीवर सर्वत्र आढळतो. हा प्राणी झाडावर तसेच जमिनीवर सुद्धा फिरतो.

खार हा प्राणी सामान्य माणसांच्या वस्तीमध्ये सुद्धा राहतो. खार हा प्राणी जंगलामध्ये राहतो. त्या व्यतिरिक्त तो दक्षिण पूर्व पश्चिम भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात आढळतो. खार प्राण्याचे घर एखाद्या चिमणी प्रमाणे घरटं तयार करून त्यामध्ये आपल्या पिल्लांना ठेवते. दाट वस्तीची शहरे, खेडे यांमध्ये सुद्धा खारी आढळून येतात. त्या व्यतिरिक्त मानवी वस्तूच्या आजूबाजूला शेतामध्ये किंवा माळरानावर सुद्धा खारी मोठ्या प्रमाणात आढळून येतात.

हा प्राणी कसा दिसतो?

खार दिसायला कशी असते तर खारीच्या पाठीवर पाच पट्टे असतात. या खायला पाच पट्ट्यांची खार देखील म्हटले जाते किंवा पांडव खार देखील म्हटले जाते ही जात जंगलांमध्ये आढळून येते किंवा खेडेगावात आपल्याला खार दिसून येतात किंवा याच खारीला ‘रामाची खार’ असे देखील म्हटले जाते.

सामान्य खारीची लांबी ही 13 ते 15 सेंटीमीटर असून या खारीचे शेपूट लांब असते तसेच तिच्या शरीराचा रंग हा तपकिरी असतो. खारीच्या अंगावर छोटे छोटे मऊ व दाट केस असतात.

तसेच तिच्या पाठीवर पाच फिक्कट पट्टे असतात या पट्ट्यांमध्ये तीन मध्य भागावर आणि दोन्ही बाजूला प्रत्येकी एक पट्टा आपल्याला दिसतो. खार सारखी झाडावरून जमिनीवर व जमिनीवरून झाडावर चढ-उतर करत असताना आपण पाहिली असेलच. फार खूपच चित्त वेधक असतात. त्यांच्या हालचाली सूक्ष्म असतात.

हा प्राणी मध्यम आकाराचा असतो तसेच या खारीचे पाय देखील छोटे छोटे असतात. मागचे पाय थोडे मजबूत असतात खालच्या पायांना प्रत्येकी मागील पायांना पाच बोटे असतात. खारीचे शेपूट लांब व झुबकेदार असते. त्याचा उपयोग धावताना तोल सांभाळण्यासाठी त्या करतात तसेच हिवाळ्यामध्ये स्वतःचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी देखील शेपटीचा उपयोग करतात. खारीच्या तोंडामध्ये अन्न तात्पुरते साठवून ठेवण्याची एक पिशवी असते. खारीचे पुढचे दात तीक्ष्ण असतात. त्यांचा जबडा देखील मजबूत असतो. या सहाय्याने ते कठीण कवचाची फळे सुद्धा सहज तोडून खाऊ शकतात.

खार काय खाते?

खार प्राणी अतिशय गरीब आहे. खार हा त्याच्या आहारामध्ये फळ कोवळे, कोंब, झाडांची कोवळी पाने, बऱ्याचदा खारी ह्या किडे आणि पक्षांची अंडी सुद्धा खातात. त्यांना जंगलातून मिळणारे फळ, भुईमुंग त्यांच्या प्रदेशात आढळणारे फळ आहारामध्ये समाविष्ट करतात.

Squirrel Animal Information In Marathi

खार प्राण्याची जीवन :

खार प्राण्याची जीवन हे मर्यादित असते. यांच्यामध्ये नर व मादी दोन ते तीन दिवसांपूर्वीच समागमासाठी एकत्र येतात. याच काळात खारिची गर्भधारणा होते. खार या प्राण्यांचा गर्भधारणेचा कालावधी हा सात ते आठ आठवड्यांचा असतो. त्यानंतर पिल्लांना जन्म देण्याच्या आधीच मादी गवत, पाने, धागे, कापूस इत्यादी अवघडधोबड सामग्री जमा करून घरटे बांधते.

खार आपले घरटे छोट्या ढोलीत किंवा मग भिंतीच्या एखाद्या बिळामध्ये देखील घरटे बांधते. घरटी एकापेक्षा जास्त असतात आणि संकटकाळी गरजेनुसार या घरट्यांचा खारी वापर करत असतात. खार ही एका वेळी दोन ते तीन पिल्लांना जन्म दतात. जन्म दिल्यानंतर खारीच्या पिल्लांचे डोळे बंद असतात. खार स्वतःचे अन्न स्वतः शोधून खाण्या इतपत मोठी होईपर्यंत भरट्यातच राहतात. खार त्यांचे आयुष्य 12 वर्षापर्यंत जगू शकतात.

Squirrel Animal Information In Marathi

खार या प्राण्याचे प्रकार :

खार या प्राण्याचे अनेक प्रकार उपप्रकार आहेत त्यामध्ये सामान्य खार, शेकरू खार, लाजरू शेकरू, उडती खार इ. तर चला मग जाणून घेऊया या प्राण्याविषयी माहिती.

शेकरू : ही एक खारीची प्रजाती आहे. यालाच इंग्लिशमध्ये इंडियन जॉइंट स्क्वीरल असे म्हणतात.
हा महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी देखील आहे. शेकरू हा प्राणी भीमाशंकर या भागामध्ये सर्वात जास्त आढळून येतो. शेकरू हा प्राणी दोन ते अडीच किलो वजनाचा असून त्याची लांबी तीन फूट पर्यंत असते. त्याचे गुंजे सारखे लाल भडक डोळे असतात. अंगभर तपकिरी रंगाचे केस असून त्याच्या डोळ्यावर पोटावर पिवळसर पट्टा असतो तसेच त्याची शेपूट हे झुबकेदार व लांबलचक असते. ज्याचा उपयोग थंडीपासून बचाव करण्यासाठी व झाडावरील तोल सांभाळण्याकरिता करतात.

उडणारी खार : उडणारी खार ही एक मोठी फार आहे. पेटॉरिस्टा असे आहे. यांच्यामध्ये दोन प्रकार पडतात एक उडणारी तपकिरी खार व दुसरी उडणारी तांबडी खार. तपकिरी खार ही गंगा नदीच्या दक्षिण भागात सर्वच मोठ्या आरण्यांमध्ये आढळते.

तांबडी खार ही गंगा नदीच्या उत्तरेस व पश्चिमेस हिमालयीन पर्वतीय भागात सापडते. या खारीच्या प्रजाती दाट अरण्यात राहणाऱ्या असून त्या झाडांवरच राहतात. जेव्हा त्यांना गरज पडते तेव्हा जमिनीवर उतरतात. यांची घरे सुद्धा झाडांच्या ढोलीत किंवा बिळात असतात.

यांच्या प्रजाती ह्या केव्हाही बाहेर पडतात. ह्या खारी जोडप्याने किंवा कुटुंबाने राहणे पसंत करतात. या खारी त्यांच्या आहारामध्ये कठीण कवचाची फळे, कोवळ्या डहाळ्या, कोंब पाने व कीटक समाविष्ट असतात. मादीला एका वेळेस एक किंवा दोन पिल्ले होतात.

सामान्य खार : सामान्य खार ही करड्या तपकिरी रंगाची असून तिची लांबी 13 ते 15 सेंटीमीटर असते तसेच शेपटी सुद्धा लांब असते. या खारीच्या अंगावर देखील दाट व मऊ असे केस असतात. या खारीच्या पाठीवर पाच फिकट पट्टे असतात. त्यापैकी तीन मध्यभागावर आणि एक प्रत्येक बाजूला असतो. या खारीचा इतिहास खूप जुना आहे कारण या खारीचा उल्लेख रामायणामध्ये देखील केलेला आहे.

FAQ

खारुताई च्या घराला काय म्हणतात?

 ड्राय 


खार काय काय खाते?

 फळे, बिया व पालेभाज्या

Was this article helpful?
YesNo

Leave a Comment