गोगलगाय प्राण्याची संपूर्ण माहिती Snail Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Snail Information In Marathi गोगलगाय हा मृदूकाय आहे उदरपाद या वर्गामध्ये येणारा प्राणी असून त्याच्या शरीरावर कवच असते. यालाच आपण शंख असे सुद्धा म्हणतो. बिना शंखाच्या असलेल्या गोगलगाई सुद्धा आपल्याला दिसून येतील. गोगलगाईच्या 35 हजार प्रजाती आढळून येतात. हे प्राणी त्यांच्या राहण्याची ठिकाणे, आकार, वर्तन बाहेर असणारे व आंतर रचना यामध्ये विविध आढळून येते.

Snail Information In Marathi

गोगलगाय प्राण्याची संपूर्ण माहिती Snail Information In Marathi

त्यांच्या श्वसन संस्थेतील प्रकारानुसार सुद्धा दोन प्रकार गोगलगायींमध्ये पडतात. जमिनीवर राहणाऱ्या गोगलगायी ह्या फुफ्फुसांद्वारे श्वास घेतात तर गोड्या पाण्यामध्ये किंवा समुद्रामध्ये राहणाऱ्या गोगलगायी ह्या त्यांच्या कल्ल्या द्वारे श्वास घेतात. शंकातली गोगलगाय आपले शरीर शंकामध्ये आक्रोसून घेऊ शकते. गोगलगाय ह्या उभयलिंगी असतात. परंतु असा फलन होत नसल्यामुळे त्यांना प्रजननासाठी दुसऱ्या गोगलगायीवर संभोग करावा लागतो.

प्राणीगोगलगाय
गती०.००४८ किमी/ता
आयुर्मान२ ते १० वर्षे
क्लच आकार८०
वर्गगॅस्ट्रोपोडा

जमिनीवर किंवा गोड्या पाण्यामध्ये राहणाऱ्या बऱ्याच गोगलगायी ह्या अंडी घालतात व त्यातून डिंभ अवस्थेतून न जाता प्रौढ प्राणी निर्माण होतात. पाण्यातील गोगलगायी जल वनस्पती आणि काही बऱ्याच मृत प्राण्यांवर जगतात. शंकू सारख्या दिसणाऱ्या गोगलगायी ह्या विषारी असतात. त्यांच्या विषारी दंशाने ते मासे किंवा इतर लहान जीवांना आपले भक्ष बनवतात. तर चला मग गोगलगायी या प्राण्याविषयी आपण सविस्तर माहिती पाहूया.

गोगलगाय कुठे राहते ?

जवळजवळ गोगलगाय ह्या सर्वत्रच आढळून येतात. जसे नदी, तलाव, समुद्र, तळे किंवा जमीन. समुद्रामध्ये आढळणाऱ्या गोगलगायी या जमिनीवरील गोगलगायीच्या तुलनेने थोड्या वेगळ्या दिसतात. गोगलगायीच्या डोक्यावर स्पृश्या आणि डोळे असतात. ते आपल्या स्नायूपादातून श्लेष्म स्त्रवत घसरत पुढे सरकत असतात.

गोगलगाय हे कोरड्या वातावरणापेक्षा दमट वातावरणामध्ये राहणे पसंत करतात. हिवाळ्यामध्ये जमिनीवरील गोगलगाय वातावरण कोरडे झाल्यास स्वतःला त्याच्या शंखामध्ये आकसून घेतात व पाऊस पडेपर्यंत त्या निष्क्रिय राहतात. ही तिची शितकालीन समाधी असते.

गोगलगाय काय खाते ?

गोगलगाय तिच्या आहारामध्ये स्लग व स्नेक दोन्हीही प्राणी समाविष्ट करून घेते. त्या व्यतिरिक्त वनस्पती सुद्धा काही गोगलगायीच्या प्रजाती खातात. जमिनीवर राहणाऱ्या गोगलगायी ह्या कुजणाऱ्या वनस्पतींवर जगतात तर पाण्यातील गोगलगायी जल वनस्पती आणि काही वेळा मृत प्राण्यांवर सुद्धा जगतात. कोवळी पाने, अंकुर खाऊन जगणाऱ्या गोगलगायी आपल्याला बऱ्याचदा बागेमध्ये दिसतात. तर राक्षसी गोगलगायींनी द्राक्ष बागांमध्ये पाने कुरतळून खाऊन त्यांचा विध्वंस करतात.

प्राण्यांना खाणाऱ्या गोगलगायीचे दात मजबूत असतात. बऱ्याच गोगलगायी या मासे सुद्धा खातात. दंडपट्टीके वरील एका मोठ्या विषदंताने विष टोचून त्या माशांना विकलांग करतात व नंतर त्यांना खातात. वृक्षावर राहून झाडांची साल व पान तसेच दगडफुले खाऊन जगणाऱ्या गोगलगायी भडक रंगाच्या व अत्यंत सुंदर दिसतात.

बरेच लोक गोगलगायी त्यांच्या आहारामध्ये समाविष्ट करतात. युरोपमधील सागरी गोगलगायीच्या जातीपासून चविष्ट पदार्थ तयार केला जातो. गोगलगायी कृमी वाहक असल्यामुळे माणसाला त्या अपायकारक सुद्धा ठरू शकतात.

गोगलगायीची रचना :

गोगलगायीचे शरीरिक रचना त्यांच्या असणाऱ्या पर्यावरणावर किंवा तेथील घटकांवर अवलंबून असते. हे प्राणी स्थलीय जीवनाकडे जात असल्यामुळे त्यांचे कवच खूप मजबूत असते. त्यांचे शारीरिक नुकसान आणि कोरडे होण्यापासून संरक्षण करते. शिकारीपासून सुद्धा त्यांची शेल त्यांना वाचवते.

निवासस्थानाच्या आधारावर त्यांचा किंवा त्यांच्या सेलचा रंग हा पांढरा किंवा तपकिरी ते पिवळा तपकिरी पर्यंत असतो. त्यांची उंची 50mm पर्यंत असते तर तिची रुंदी 45 mm पर्यंत असते. त्याचा आकार कुबेरवेडे असा आहे. त्यांची सपाट पृष्ठभाग असून कर्ल हे तोंडाच्या दिशेने विस्तारात असतात.

गोगलगायीच्या प्रजातींचे शरीर हे लवचिक स्नायू युक्त व सुरकुत्या असून ते दुमडण्यामध्ये विपुल असते. तसेच त्यांच्या शरीरामध्ये ओलावा टिकून ठेवणे हे त्यांचे मुख्य वैशिष्ट्य आहे. त्यांचा रंग सुद्धा एक विशेष त्यांचे वैशिष्ट्य आहे.

यूंच्या पायाची लांबी 35 ते 50 मिलिमीटर एवढी असते. त्यांची हालचाल खूपच सुष्म असून गती त्यांची 1.5 mm /सेकंद आहे. पायांच्या एकमेव वर श्लेष्म स्त्राव असतो. गोगलगायीचे आयुष्य दोन ते पाच वर्ष असते. बऱ्याच ठिकाणी गोगलगायीचे अंडी सुद्धा खाल्ली जातात.

गोगलगायींचा जीवनक्रम :

गोगलगायीचा जीवनक्रम हा सूक्ष्मदर्शकापासून ते विविध आकाराच्या शंकांमध्ये बदलतो. प्रौढ शंख्यांची लांबी 15 ते 17 सेंटीमीटर असते तसेच गोगलगायीचा जीवनक्रम साधारणतः तीन वर्षांपर्यंत असतो तसेच या कालावधीमध्ये ती 1000 अंडी सुद्धा घालते.

प्रत्येक मादी शंख ही पिकांच्या खोडा शेजारील मुळाजवळ किंवा बांधला माती भुसभुशीत बनवून तीन ते चार दिवसात शंभर ते 40 अंडी घालते. मिलनासाठी योग्य त्या साथीधाराची निवड करून एकमेकांशी सहा ते आठ दिवस मिलन करतात.

नंतर सर्वसाधारणपणे 17 दिवसांपर्यंत अंड्यातून ही पिल्लं बाहेर येतात. त्यांची वाढ पूर्ण होण्यासाठी आठ महिने एका वर्षाचा कालावधी लागतो. या काळात ही पिल्ले पिकांचे अतोनात नुकसान करतात. त्यांची कार्यक्षमता रात्रीच्या वेळी अधिक असते तसेच दिवसा सावलीमध्ये किंवा पानांच्या ओल्या जागी सुद्धा ते आढळून येतात.

Snail Information In Marathi

गोगलगायीचे प्रकार :

गोगलगायीचे अनेक प्रकार आहेत. काही प्रकार आपण जाणून घेऊया.

समुद्री गोगलगाय : समुद्री गोगलगाय हे मंद गतीने चालणाऱ्या सागरी गॅस्ट्रोपॉडचे सामान्य नाव आहे. समुद्री गोगलगाय ह्या विविध प्रकारच्या आढळून येतात तसेच खाऱ्या पाण्यात राहणाऱ्या गोगलगाय यांच्यामध्ये फरक दिसून येतो.

काही प्रजातींना असले तरी ते अंतर भरतीचे असतात जेव्हा ते हवेमध्ये फिरतात तेव्हा कमी भरतीच्या वेळी सक्रिय असतात. समुद्री गोगलगायीच्या प्रजातीविषयी बोलायचे झालं तर त्या कवचधारी असून सर्किटपणे गुंडाळलेल्या असतात. काहींच्या पाठीवर शंकूच्या आकाराचे कवच असते, तर काहीच पाठीवर कवच नसते.

जमिनीवरील गोगलगाय : जमिनीवर चालणाऱ्या गोगलगायी या पावसाळ्यामध्ये जमिनीवर येतात. या गोगलगायींच्या शरीरावर कवच असते. यालाच शंख सुद्धा आपण म्हणतो, या गोगलगायीचे श्वसन संस्थेतील फुफुसांद्वारे होते.

जमिनीवर राहणाऱ्या गोगलगायी या अंडी घालतात. त्यातून टिंब अवस्थेतून न जाता प्रौढ प्राणी निर्माण होतात जेव्हा या गोगलगायीना धोका किंवा संकट आल्यासारखे वाटते तेव्हा ते स्वतःचे संरक्षणासाठी त्यांच्या कवचामध्ये आक्रोचन पावतात.

गोगलगायीचा उपद्रव शेतामध्ये बऱ्याचदा आपण गोगलगायीचा प्रादुर्भाव झाला असल्यास दिसते. रात्रीच्या वेळी बाहेर पडलेल्या गोगलगायी रोपांची पाने खातात तसेच शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात. महाराष्ट्रातील गोगलगायी ह्या जून ते सप्टेंबर या काळामध्ये अत्यंत सक्रिय असतात व मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचे नुकसान करतात.

हा उपद्रव टाळण्यासाठी एकाच वेळेस सामूहिकरीत्या गोगलगायींची निर्मूलन करणे आवश्यक असते. कारण एकट्या शेतकऱ्याने उपद्रव झाला म्हणून उपाययोजना करणे त्यामुळे गोगलगायी पूर्णपणे नष्ट होऊ शकत नाही.

गोगलगायींबद्दल मनोरंजक तथ्ये:

  • जगातील सर्वात मोठा गोगलगाय हा विशाल आफ्रिकन लँड स्नेल आहे, जो 12 इंच लांब वाढू शकतो.
  • जगातील सर्वात लहान गोगलगाय एंगुस्टोपीला प्सॅमियन आहे, ज्याची लांबी फक्त 2 मिलीमीटर आहे.
  • काही गोगलगाय विषारी श्लेष्मा तयार करू शकतात जे भक्षकांसाठी हानिकारक असू शकतात.
  • गोगलगाय हर्माफ्रोडाइटिक असतात, याचा अर्थ असा की त्यांच्याकडे नर आणि मादी दोन्ही पुनरुत्पादक अवयव आहेत.
  • गोगलगाय एकावेळी शेकडो अंडी घालू शकतात.
  • गोगलगाय ३ वर्षांपर्यंत झोपू शकतात.

निष्कर्ष:

गोगलगाय हे लक्षावधी वर्षांपासून असलेले आकर्षक प्राणी आहेत. ते जंगलापासून ते वाळवंटापर्यंत महासागरापर्यंत विविध अधिवासांमध्ये आढळतात. गोगलगायींना कठोर कवच असते जे त्यांच्या मऊ शरीराचे संरक्षण करते आणि ते फिरण्यासाठी स्नायूंच्या पायाचा वापर करतात. त्यांच्याकडे रड्युला आहे, जी लहान दात असलेली रिबनसारखी जीभ आहे जी ते पृष्ठभागावरुन अन्न काढण्यासाठी वापरतात.

FAQ:

गोगलगाय म्हणजे काय?

गोगलगाय हा मंद गतीने चालणारा, मऊ शरीराचा, अपृष्ठवंशी प्राणी आहे ज्याला कवच असते. गोगलगाय विविध अधिवासांमध्ये आढळतात, ज्यात जमीन, गोडे पाणी आणि खारे पाणी समाविष्ट आहे.

गोगलगायांचे किती प्रकार आहेत?

जगात 40,000 हून अधिक विविध प्रकारच्या गोगलगायी आहेत. ते सर्व आकार आणि आकारात येतात, लहान परी गोगलगाय, जे फक्त काही मिलिमीटर लांब आहे, ते विशाल आफ्रिकन लँड गोगलगाय, जे 12 इंच लांब पर्यंत वाढू शकते.

गोगलगाय काय खातात?

गोगलगाय शाकाहारी आहेत आणि त्यांच्या आहारात वनस्पती, शैवाल आणि बुरशी असतात. काही गोगलगायी कीटक आणि कृमी यांसारखे लहान प्राणी देखील खातात.

गोगलगाय लोकसंख्येला काय धोका आहे?

गोगलगायींना टिकून राहण्यासाठी ओलसर, छायादार वातावरणाची गरज असल्याने निवासस्थान नष्ट होणे ही एक मोठी समस्या आहे. प्रदूषण ही देखील एक समस्या असू शकते, कारण गोगलगाय पाण्यात किंवा मातीमध्ये रसायनांमुळे विषारी होऊ शकतात.

गोगलगाय कसे महत्वाचे आहेत?

गोगलगाय वातावरणात महत्त्वाची भूमिका बजावतात. ते सेंद्रिय पदार्थांचे विघटन करण्यास आणि पोषक द्रव्यांचे पुनर्वापर करण्यास मदत करतात. गोगलगायी पक्षी, बेडूक आणि साप यांसारख्या इतर प्राण्यांना देखील अन्न पुरवतात.

Was this article helpful?
YesNo

Leave a Comment