Goat Animal Information In Marathi शेळी हा प्राणी आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. हा प्राणी गरीबाची गाय म्हणून देखील ओळखला जातो. कारण या प्राण्याला चारा तसेच राहण्यासाठी जागा सुद्धा कमी लागते. शेळी हा प्राणी दूध देणारा एक सस्तन प्राणी असून तो समखुरी गणाच्या बोव्हिडि या कुळामध्ये पोकळ शिंगाचा व रवंथ करणारा प्राणी आहे. शेळी हा प्राणी पाळीव प्राणी आहे. हे प्राणी आशिया खंडामध्ये आढळून येतात. त्या व्यतिरिक्त इतर देशांमध्ये सुद्धा त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येते.
शेळी प्राण्याची संपूर्ण माहिती Goat Animal Information In Marathi
राज्य | प्राणी |
फिलम | चोरडाटा |
वर्ग | सस्तन प्राणी |
ऑर्डर | आर्टिओडॅक्टिला |
कुटुंब | बोविडे |
उपकुटुंब | Caprinae |
टोळी | कॅप्रिनी |
वंश | काप्रा |
शेळी हा प्राणी गरीब असून या प्राण्याचा उपयोग दूध व मास मिळवण्यासाठी केला जातो. या व्यतिरिक्त त्याच्यापासून फायबर, लेदर, खत आणि केस सुद्धा मिळतात बऱ्याच ठिकाणी शेळ्या ह्या घरगुती स्वरूपामध्ये वापरल्या जातात. शेळ्यांच्या जगात तीनशे जाती आढळतात. त्याच्या 20 प्रजाती भारतात आढळून येतात. तर चला मग शेळी या प्राण्याविषयी सविस्तर माहिती पाहूया.
शेळी हा प्राणी कोठे राहतो ?
शेळी हा प्राणी भारताप्रमाणे इतर देशात सुद्धा आढळून येतो. शेळी हा प्राणी घरामध्ये किंवा शीळ तयार करून त्यामध्ये सुद्धा राहू शकतो. या प्राण्यांना खाण्यासाठी खूपच कमी चारा लागतो. त्याचप्रमाणे त्यापासून दूध, खत व मास इत्यादी उपयोगी घटक मिळतात. शेळ्यांना नेहमी कोरड्या स्वच्छ जागेमध्ये ठेवले पाहिजे. त्यामुळे शेळ्यांचे आयुष्य वाढते व त्यांना इतर रोगांची लागण सुद्धा होत नाही.
शेळी हा प्राणी काय खातो ?
शेळी या प्राण्याला खायला कमी गवत चारा लागतो तसेच शेळी हा प्राणी कोणत्याही वनस्पती खाऊ शकतो. जसे की कोणत्याही प्रकारचे गवत धान्य, झाडाची साल अशा प्रकारचे चारा शेळी हा प्राणी खातो म्हणून शेळीला गरीबाची गाय सुद्धा म्हटले जाते.
शेळी जो चारा खातो, त्याचा आयुर्वेदामध्ये उपयोग केला जातो. त्यामुळे शेळीचे दूध खूपच पौष्टिक मानले जाते. एका गाईला वर्षभर जेवढा चारा लागतो तेवढ्या चाऱ्यामध्ये दहा शेळ्यांचे पालन केले जाऊ शकते. शेळ्यांना पिण्यासाठी पाणी सुद्धा इतर जनावरांच्या तुलनेने खूपच कमी लागते.
शेळी या प्राण्याचे वर्णन :
शेळी हा प्राणी चार पायाचा असून त्याला एक शेपूट असते. या प्राण्याची शेपटी थोडीशी उंचवलेली असते तसेच शेळीला दोन लांब असे कान व दोन डोळे असतात. शेळ्यांना दोन शिंदे सुद्धा असतात. बऱ्याच प्रगतीच्या शेळ्यांना शिंगे नसतात.
बऱ्याच प्रमाणे शरीराच्या तोंडाचा आकार हा गायी प्रमाणेच असतो. शेळीचा रंग पांढरा, तपकिरी, लाल सुद्धा असतो. या प्राण्यांमध्ये शेळी पेक्षा बोकड हा वजनाने जास्त मोठा असतो. शेळी या प्राण्यांचे जीवन 15 ते 18 वर्षे असते. शेळीच्या अंगावर छोटे छोटे बारीक केस असतात.
शेळी या प्राण्याची जीवन :
शेळी या प्राण्याचे जीवन मनोरंजक असते. लहान पिल्लांना जन्म दिल्यानंतर ते काही मिनिटात चालायला लागतात व आईचे दूध पिते. तीन ते चार महिन्याच्या कालावधीनंतर हे पिल्ल त्यांच्या आईप्रमाणे चारा, गवत खातात. शिडी या प्राण्याचा गर्भधारणेचा कालावधी हा 150 दिवसांचा असतो.
यामध्ये पाळीव प्राण्याचे आयुष्य ही 15 ते 18 वर्षे असते तर जंगली शेळीचे आयुष्य हे नऊ ते बारा वर्षे असते. शेळ्यांचे वजन हे त्यांच्या प्रजातीनुसार ठरते. शेळीचे वजन 30 किलो पासून ते 150 किलो पर्यंत असते. शेळी पेक्षा नर शेळीचे वजन जास्त असते. शेळीच्या नराला बोकड असे म्हटले जाते.
शेळी पालन व्यवसाय :
शेळीपालन हा व्यवसाय शेती पूरक व्यवसाय असल्यामुळे तुम्ही सुद्धा हा व्यवसाय करू शकता. यापासून दूध, खत व मांस इत्यादी घटक मिळू शकते. शेळीपालन व्यवसाय करण्याकरता अत्यंत कमी भांडवल तसेच जागा सुद्धा कमी लागते.
या प्राण्यांना खाद्य सुद्धा खूपच कमी प्रमाणावर लागते, त्यामुळे हा व्यवसाय करणे फायद्याचे ठरते. एक गाय पालनासाठी जेवढा वर्षाचा खर्च येतो, तेवढ्या खर्चामध्ये दहा शेळ्याचे पालन होते. हा व्यवसाय अल्पभूधारकांसाठी अतिशय फायद्याचा आहे. तसेच या व्यवसायामध्ये भांडवल गुंतवणूक केल्यानंतर सरकारकडून सबसिडी देखील देण्यात येते.
शेळीचे प्रकार :
भारतामध्ये शेळ्यांची 20 प्रकार आढळून येतात. या व्यतिरिक्त शेळ्यांचे अनेक प्रकार विदेशामध्ये आहेत. काही जंगलांमध्ये जंगली शेळ्या सुद्धा दिसून येतात. तर काही शेळ्यांच्या प्रजाती ह्या पाळल्या जातात.
शिरोही : शिरोही या प्रकारच्या शेळी ह्या मुद्दा राजस्थानमध्ये आढळून येतात. या शेळ्यांचा उपयोग उत्तर प्रदेशांमध्ये सुद्धा त्यांच्या माणसासाठी केला जातो. याविषयी उष्णतेसाठी खूपच प्रतिरोधक असतात या जातीच्या शेळ्यांना वर्षातून दोन पिल्लांना जन्म देतात
सुरती शेळी : या शेळ्यांच्या प्रजाती भारतामध्ये दुधासाठी खूपच प्रसिद्ध आहेत. या जातीच्या शेळ्या जास्त प्रमाणात चांगल्या प्रतीचे दूध देतात. त्यामुळे या जातीचे पालन करणाऱ्या लोकांना चांगलाच फायदा होतो हे शेळ्यांची जात गुजरात मधील आहे.
या प्रकारांमध्ये माझ्या शेळ्या आणि नरसळ्यापेक्षा आकाराने थोड्या मोठ्या असून सुरती शेळ्या शक्यतोवर पांढऱ्या रंगाच्या असतात, त्यांचे शरीर जाड असते. त्याचे नाक लहान व उंच असते, या शेळ्यांचे कान वाढलेले असतात. शेपूट कुरळे असून शेपटीचे केस जाडसर असतात आणि रठ असतात. त्यांच्या शरीरावरचे केस सुद्धा जाड आणि लहान लहान असतात.
जमनापरी शिडी : जमनापुरी शेळी ही मुख्यतः भारतामध्ये लोकप्रिय आहे. या शेळींचे मोठ्या प्रमाणात पालन केले जाते. या प्रकारच्या शेळ्या दिसायला खूप सुंदर असतात आणि या शेळीचा उपयोग दूध मिळवण्यासाठी तसेच मास मिळवण्यासाठी केला जातो.
मलाबरी शेळी : या प्रकारच्या शेळीची जात ही वेगवेगळ्या देशांमध्ये विकसित झाली आहे. या प्रकारच्या शेळ्यांच्या प्रजाती लवकर परिपक्व होतात. व आठ ते दहा महिन्यांमध्येच गर्भवती होतात. त्यामुळे यांची संख्या दुपटीने वाढते.
बीटल शेळ्या : या प्रकारच्या शेळ्या मुख्यतः पंजाब या प्रांतामध्ये दिसून येतात. बटाल उपविभागात आढळून येत असल्यामुळे त्यांना बीटल असे नाव पडले. या शेळ्या पंजाबला लागून असलेल्या पाकिस्तानच्या भागात सुद्धा आढळून येतात. या शेळ्यांच्या अंगावर तपकिरी रंगाचे पांढरे डाग किंवा काळ्या रंगाचे पांढरे डाग असतात.
विदेशी शेळ्यांच्या प्रमुख जाती :
अल्पाइन : ही प्रजाती स्विझर्लंड मध्ये आढळून येते. तिचा मुख्य उपयोग दूध उत्पादनासाठी केला जातो. या जातीच्या शेळ्या तीन ते चार लिटरपर्यंत दूध देतात.
टोगेनबर्ग : टोगेनबर्ग ही शेळी सुद्धा स्विझरलँड मध्येच आढळून येते. यांच्यामध्ये नर आणि मादीला शिंगे नसून हे सुद्धा दुधासाठी वापरली जाते. या प्राण्यांपासून दररोज तीन लिटर दूध मिळते. यांच्या संकरित जाती सुद्धा आहेत.
सान : सान ही स्विझर्लंड येथे आढळून येते. यांची उत्पादन क्षमता इतर जातीच्या शेळ्यांपेक्षा खूपच जास्त आहे. हे त्यांच्या घरांमध्ये दररोज सरासरी तीन ते चार लिटर दूध देतात.
FAQ
शेळ्यांची वैशिष्ट्ये काय आहेत?
मेंढ्याशी संबंधित, शेळी बांधणीपेक्षा हलकी असते, त्याला मागे कमान असलेली शिंगे, लहान शेपटी आणि केस सरळ असतात
शेळ्या कशासाठी प्रसिद्ध आहेत?
शेळ्या हे मांस, दूध आणि फायबरसाठी ठेवलेले बहुमुखी पाळीव प्राणी आहेत. ते हुशार, सामाजिक आणि कळपासाठी कठीण आहेत.
शेळी किती महिन्यांची गर्भधारणा करते?
पाच महिने
शेळ्यांमध्ये कोणती विशेष क्षमता असते?
शेळ्यांच्या सर्व पाळीव जाती पर्वतीय शेळ्यांपासून वंशज असल्यामुळे त्या उत्कृष्ट गिर्यारोहक बनतात. पर्वतीय शेळ्या एकाच बांधात 12 फूट किंवा 3.5 मीटर पर्यंत उडी मारू शकतात. काही शेळ्या झाडांवर चढतानाही आढळून आल्या आहेत.