Scorpion Information In Marathi विंचू हा प्राणी सर्वांच्या परिचयाचा आहे. विंचू हा एक विषारी प्राणी अजून तो मांसाहारी आहे आणि जर माणसाला त्याने दंश केला तर शरीराची आग होते. विंचू हे प्राणी पालापाचोळा, घराचे गवताचे छत, कौलारू घराचे छत, जुने पुराने कपडे यांच्यामध्ये बऱ्याचदा सापडतो.
कित्येक माणसांना विंचू दंश करतो. या काळामध्ये 120 प्रजाती आढळून येतात त्यातील काही प्रजाती खूप विषारी तर काही कमी विषारी आहेत. तुमच्या प्रजातीनुसार विंचवाचा आकार तसेच त्याचे विष कळते. सर्वात मोठ्या विंचूचा आकार हा 18 ते 20 सेंटीमीटर लांब असतो. महाराष्ट्रामध्ये मुख्यता काळा विंचू आणि लाल विंचू दोन्ही विंचू सापडतात. हे विंचू शेतामध्ये जंगलांमध्ये किंवा पावसाळा पावसाळा लागताच रस्त्यांवर फिरताना दिसतात.
लाल विंचू हा कोकण या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतात.
लाल विंचू हा खूपच विषारी असल्यामुळे त्याचे विष जर रक्त वाहिन्यांमध्ये गेले तर माणूस मरण पावतो.
तर चला मग जाणून घेऊया विंचू या प्राण्याविषयी सविस्तर माहिती.
विंचू प्राण्याची संपूर्ण माहिती Scorpion Information In Marathi
विंचू कुठे आढळून येतो?
विंचू हा प्राणी भारतातील जंगलांमध्ये सर्वत्र आढळून येतो. ग्रीनलँड किंवा अंटार्टिका हे खंड सोडले असता इतर जगामध्ये विंचू कमी जास्त प्रमाणात सर्व ठिकाणी आढळून येतात. विंचू हा प्राणी भिंतीच्या बिळामध्ये किंवा दगडाखाली किंवा जमिनीच्या खड्ड्यामध्ये लपून बसतो.
विंचवाचा आकार लहान असल्यामुळे व काळा रंग असल्यामुळे जवळ हालचाल असते आणि जो सहजासहजी दिसत नाही किंवा त्याला मारणे शक्य होत नाही. विंचू दोन ते तीन दिवस पाण्यामध्ये जिवंत राहू शकतो.
विंचू हे कवले, घराचे छते, जुने कपडे, काढून ठेवलेल्या चपला बूट यांच्यामध्ये लपून बसतात. बऱ्याचदा रात्रीच्या वेळी छतातून विंचू खाली पडतात. अंधारामध्ये स्वरक्षणाच्या प्रयत्नांमध्ये विंचू व्यक्तींना दर्श करतात.
विंचू हा प्राणी काय खातो?
विंचू हे प्राणी रात्री बाहेर पडतात. दिवसा ते बिळांमध्ये किंवा दगडाखाली लपून बसतात. विंचू आपले भक्ष पकडण्यासाठी खूपच वेळ घालवतात. भक्ष्य टप्प्या टप्प्याने त्याच्यापर्यंत येते, तोपर्यंत ते दबा धरून बसतात. हवेमध्ये होणाऱ्या भक्ष्यांची तसेच जमिनीवरून चालणाऱ्या भक्ष्यांचे कंपन त्यांना कळते.
विंचू आपल्या आहारामध्ये छोटे किडे, कोळी, लहान अष्टपाद यांचा समावेश करतात. बऱ्याचदा विंचू गोगलगायी सुद्धा खातात. जर भक्ष मोठे असेल तर विंचू त्याला दर्श करून बेशुद्ध करतात व नंतर त्यांच्या नखरीकांनी फाडून त्याला खातात.
विंचू हा कसा दिसतो ?
विंचू हा प्राणी जास्त मोठा नसतो, त्याची सरासरी लांबी दोन ते 20 सेंटीमीटर पर्यंत असते किंवा याच्यापेक्षा थोडी आणखी लांबी असू शकते. उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये हा सर्वात लांबलीचा आढळतो. त्या व्यक्तीचे वजन 60 ग्राम असते आणि सर्वात छोटा विंचू हा 12 मिलीमीटर लांब असतो.
वाळवंटामध्ये ओसाड जाग्यामध्ये बऱ्याचदा पिवळसर किंवा फिकट तपकिरी रंगांचा विंचू आढळून येतो. हे सुद्धा पहाडी प्रदेशांमध्ये राहतात. तपकिरी किंवा काळ्या रंगाच्या मोठ्या विंचवांना इंगळी असे म्हटले जाते.
विंचवाचे वर्णन करायचे म्हटले तर विंचवाच्या पायांच्या चार जोड्या असतात. त्याच्या पहिल्या जोडीतील पाय लहान असून त्यांना नखरीका म्हणतात. यांचा उपयोग विंचू भक्ष्य फाडण्यासाठी करतात. दुसऱ्या पायांच्या जोडीला स्पर्शपाद असे म्हटले जाते. हे थोडेसे मोठे असून टोकाशी बळकट नख्यांसारखे चिमटे असतात. हे चिमटे पुढच्या बाजूला समांतर असतात आणि भक्ष्य पकडण्यासाठी किंवा स्पर्श करण्यासाठी यांचा उपयोग त्यांना होतो.
पायाच्या शेवटच्या चार जोड्यांना टोकाशी छोटे चिमटे असतात. त्यांचा उपयोग चालण्यासाठी करतात. विंचवाच्या शिरोवक्षावर डोके, छाती एकत्रित झालेल्या भागावर दोन ते पाच छोटे डोळे असतात. विंचवाची दृष्टी अधू असून त्याला ऐकू येत नाही. विंचवाच्या पाठीवर टोकादार नांगी असलेले खंड युक्त त्याची शेपूट असते.
शेवटीच्या टोकावरील भाग फुगीर असतो. त्यामध्ये मोठ्या विष ग्रंथी असतात, दोन सूक्ष्म नलिकांनी नांगीच्या टोकावर असलेल्या छिद्राला त्या जोडलेल्या असतात. विंचवाचे शेपूट कमाणीसारखे त्याच्या पाठीवर वाढवून विंचू नांगीने दंश करतो.
विंचू प्राण्याचे जीवन :
विंचवाचे आयुष्य त्यांच्या मनाने खूप मोठे आहे. विंचवाचे शरीर त्यांना पूर्णपणे साथ देते. विंचवाच्या हजारो वर्षापासून त्याच्या शरीरामध्ये कोणतेही बदल झालेले नाही. विंचू हे प्राणी खूप जुन्या काळापासून पृथ्वीवर अस्तित्वात आहे. विंचवाची मादी अंडी तिच्या शरीरातील पिशवीमध्येच उबवते. ही माझी एका वेळेला अनेक पिल्लांना जन्म देते. अंड्यातून बाहेर आलेली पिल्ले तिच्या आईच्या पाठीवर जाऊन बसतात. विंचवाची बिऱ्हाड पाठीवर अशी एक म्हण सुद्धा रूढ झालेली आहे.
वेगवेगळ्या विंचवाच्या प्रजातीमध्ये पिल्लांची संख्या कमी जास्त असू शकते. सर्वात जास्त संख्या असणारी 105 पिल्लांची बिऱ्हाड आपल्या पाठीवर घेऊन चालते. विंचवाची मादी तिच्या पिल्लांना त्याच्या वासावरून ओळखते तिच्या पाठीवरून पिल्लू उतरले तरी मादी परत पाठीवर आणून त्या पिल्लाला बसवते.
विंचवाचे प्रकार :
महाराष्ट्रामध्ये विंचवाचे सहसा दोन प्रकार आढळून येतात. एक काळा विंचू आणि लाल विंचू तर चला मग जाणून घेऊया विंचवाच्या प्रकराविषयी माहिती.
काळा विंचू : काळा आणि लाल विंचू महाराष्ट्र मध्ये आढळून येतात. काळा विंचू महाराष्ट्र मध्ये सर्वत्र पाहायला मिळतो परंतु लाल विंचू हा केवळ कोकणामध्ये पाहायला मिळतो. लाल विंचू हा काळ्या विंचूपेक्षा खूपच विषारी असतो. लाल विंचू जर एखाद्या माणसाला चावला तर तो मनुष्य दगावू शकतो.
काळा विंचू हा कमी घातक असतो. काळा विंचू जर तुम्हाला चावला तर खूप वेदना होतात. या वेदनादंशाच्या जागेपासून वरवर चढत जातात दोन ते तीन तास या वेदनात जाणवतात. तरुण व्यक्तीमध्ये वेदनेचा जास्त परिणाम जास्त होत नाही. जेथे विंचू दंश करतो तेथे घाम येतो व स्नायूंची थरथर जाणवते. रक्तदाब थोडा वाढतो तसेच नाडीचा वेग मंदावतो.
पिवळा विंचू : पिवळा विंचू हा ब्राझील या देशांमध्ये आढळून येतो. ब्राझीलच्या विविध प्रवेशांच्या भागांमध्ये हे विंचू आढळून येतात. परंतु आता लोकसंख्या वाढीमुळे ही विंचू कमी झाले आहे. या विंचवाचे शरीर काळे परंतु त्याच्या नांग्या पिवळ्या व शेपटी सुद्धा पिवळ्या रंगाची असते. या विंचवाच्या प्रजाती अतिशय घातक असतात. जर याने मानवाला दर्श केल्या तर माणूस दगावू शकतो. . दंश केल्यावर व्यक्तीच्या मज्जासंस्थेवर हल्ला होतो, त्यामुळे लगेच श्वसनक्रिया बंद होते.
लाल विंचू : लाल विंचू हा 7 मिलिमीटर एवढा लांब असतो तसेच त्या विंचाचे शरीर लालसर असते. या विंचवाची शेपटी काळी व हलक्या रंगाची असते. हे केवळ व्हेनेझुऐलामध्येच आढळतात. हे विंचू तेथील झाडांच्या सालांमध्ये किंवा वनस्पतीच्या मध्यभागी राहतात. या विंचवाने दंश केल्यास वेळीच उपचार करायला पाहिजे, अन्यथा तो घातक ठरू शकतो. मुलांसाठी खूपच धोकादायक आहे म्हणून देशातील सर्वात धोकादायक विंचवाचा हा प्रकार आहे.
विंचवाने दंश केल्यास मानवी शरीरावर काय परिणाम होतो?
महाराष्ट्राच्या भागांमध्ये विंचू आढळतात. प्रदेशानुसार विंचवामध्ये लहान मोठा आकार आढळून येतो. विंचू चावल्यामुळे किंवा दर्श केल्यामुळे फुफ्फुसांवर सूज येते, व्यक्तीला उलटी, घाम येणे, दम लागणे, हातपाय थंड पडणे या व्यतिरिक्त खोकल्यामध्ये रक्त येणे अशा प्रकारचे लक्षण दिसून येतात. यापूर्वी विंचू दर्श केल्यामुळे बरेच लोक मरण पावत होते. परंतु त्यावर आता उपाय निघाल्यामुळे वेळीच उपचार केल्यास आराम नक्की पडतो.
FAQ
विंचू काय खातो?
कधीकधी आयसोपॉड, गोगलगाई इत्यादींचाही त्यात समावेश होतो. स्पर्शपादांनी ते भक्ष्य पकडतात. भक्ष्य मोठे असेल, तर त्याला दंश करून बेशुद्ध करतात व नखरिकांनी फाडून त्याचे तुकडे करतात. विंचू भक्ष्य सावकाश खातात
विंचू प्रजनन कसे करतात?
नाही, विंचू अंडी घालत नाहीत. इतर अर्कनिड्सच्या विपरीत, विंचू लैंगिकरित्या पुनरुत्पादन करतात आणि गर्भधारणेच्या तीन ते बारा महिन्यांनंतर, मादी विंचू मुलांना जन्म देतात ज्याला स्कॉर्पलिंग म्हणतात
एकाच वेळी किती विंचू जन्माला येतात?
20 ते 47 अप्सरांना जन्म देते
विंचू कोणते रंग आहेत?
गडद राखाडी ते हलका तपकिरी किंवा सोनेरी