Bull Animal Information In Marathi भारत हा कृषिप्रधान देश आहे येथे बैलांचा वापर शेती करता पूर्वी केल्या जायचा. बैल हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. आता मात्र शेती मशागतीसाठी वेगवेगळी यंत्र आली आहेत. बैल पाळणे सुद्धा लोकांना कठीण काम वाटते. परंतु पूर्वीच्या काळी प्रत्येक घरामध्ये बैलगाडी असायची त्यावर बसून शेतामध्ये जायचे, शेतातील कामे बैलांच्या मार्फत होत होते. पूर्वी बैलांचा वापर शेतामध्ये नांगर करण्यासाठी व शेतातील निघालेले पीक घरी नेण्यासाठी किंवा अवघळ काम करण्यासाठी केला जायचा. आता सुद्धा ग्रामीण भागामध्ये ही कामे होताना आपल्याला दिसतात. परंतु बैलांच्या संख्येमध्ये आता खूप मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
बैल प्राण्याची संपूर्ण माहिती Bull Animal Information In Marathi
प्राणी | बैल |
जाती | बैलाच्या खिल्लारी, व जरसी अशा विविध जाती |
वयोमर्यादा | १५ ते २० वर्षे |
वजन | २५० ते ३०० किलोग्रॅमपर्यंत |
अन्न | गवत, वाळलेला चारा (कडबा) |
बैल हा मानवी जीवनाशी अत्यंत निगडित व उपयोगी असा पशु आहे. बैल हा प्राणी शाकाहारी आहे. बैलांच्या शर्यती सुद्धा लावल्या जातात. बैल घोड्यांसारखा धावू शकतो. त्यासाठी बैलांना आधी प्रशिक्षण द्यावे लागते. शर्यतीमध्ये उतरण्यासाठी खिल्लारी या प्रजातींचे बैल अत्यंत महत्त्वाचे आहे.
हिंदू धर्मामध्ये बैल या प्राण्याला पूजले जाते. कारण बैल हा श्री कैलास पती महादेव यांचे वाहन आहे. त्यामुळे बैल नंदी स्वरूप आहे असे सुद्धा मानले जाते. बैलांचा सण भारतामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. भारतामध्ये दरवर्षी बैलांचा सण पोळा साजरा केला जातो. तर चला मग बैल या प्राण्याविषयी सविस्तर माहिती पाहूया.
बैल हा प्राणी कोठे राहतो?
बैल हा प्राणी सुरुवातिला जंगली अवस्थेत आढळून येत होते त्यानंतर उत्तर पूर्व अमेरिकेमध्ये तसेच युरोप आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये काळ प्राणी राहत असत. या बैलांचा प्रवास होत होत आता या प्रजाती पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. त्यांच्या काही प्रजाती पाळीव आहेत.
परिस्थितीनुसार त्यांच्या आकारमानामध्ये मात्र बदल झालेला आपल्याला दिसतो. बैल हा पाळीव प्राणी असून शेतकरी त्यांना आपल्या गोठ्यामध्ये ठेवतो. बैलांच्या काही प्रजाती अजूनही जंगली अवस्थेत आढळतात. त्या मात्र पाळीव नाहीत जंगलामध्ये बैल हा प्राणी कडपांमध्ये राहतो. ज्याप्रमाणे म्हशी व रेडे यांचा वेगळा कळप असतात. असेच गाई आणि बैलांचे वेगळे कळप जंगलांमध्ये असतात.
बैलाचे वर्णन :
भारत हा देश कृषीप्रधान देश असल्यामुळे बैल हा प्राणी सर्वांच्या परिचयाचा आहेत. तरीसुद्धा बैलाला चार पाय दोन शिंगे एक नाक, तोंड, लांबलचक शेपूट असतं. बैलाच्या शेपटीचा गोंडा हा काळ्या रंगाचा असून त्यांची केस जाड असतात. तसंच बैलाला उंच खांदा असतो.
बैलाच्या माने खालचा भाग लोंबतो, त्याला पोळी म्हटले जाते. बैल शरीराने धष्टपुष्ट असतो. बैलांची डोळे टपोरे असतात बैलांना अंधारात सुद्धा चांगलं दिसतं. बैल या प्राण्याचा रंग काळा, लाल, पांढरा व तपकिरी असू शकतो.
बैल काय खातो?
बैल हा प्राणी शाकाहारी प्राणी आहे. त्यामुळे तो मक्याची, ज्वारीचा कळबा, कुट्टी शेतातील हिरवा चारा ढेप, खातो. त्या व्यतिरिक्त बैलाच्या शरीरामध्ये ताकद निर्माण होण्यासाठी त्याला धान्याचे दान मानले जाते.
बैल प्राण्याचे जीवन :
बैल या प्राण्याची जीवन खूपच मेहनतीचे आहे. कारण या प्राण्यांना आयुष्यभर शेतीशी निगडित असे काम करावी लागतात. बैल नेहमीच त्याच्या कष्टासाठी प्रसिद्ध असतो. परंतु बैलांचा मालक सुद्धा बैलांना तेवढाच जीव लावतो जिव्हाळा लावतो. त्यामुळे शेतकरी आणि बैल यांच्यामध्ये असे एक अतूट नाते निर्माण होते.
मुक्या प्राण्यांबद्दल त्यांना प्रेम वाटते त्यामुळे दरवर्षी भारतामध्ये बैलांचा सण पोळा साजरा केला जातो. हा सण विशिष्ट बैलांचा असतो बैलांना वेगवेगळे पदार्थ करून खाऊ घातले जातात. बैलांना आंघोळ घातली जाते तसेच बैलांना छान सजवले जाते. रंगरंगोटी त्यांच्या शरीरावर केली जाते.
वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी पद्धत असून बैल पोळा साजरा केला जातो. हा सण श्रावण महिन्यामध्ये येत असतो. त्या दिवशी पिठोरी अमावस्या असते. या दिवशी बैलांचा थाट पाहण्यासारखा असतो. त्यांच्या गळ्यात फुलांचे हार पायामध्ये चांदीचे तोडे डोक्याला बाशिंग, पाठीवर नक्षीदार झुल टाकली जाते.
गावभर ढोल, ताशे वाजवत, मिरवणूक सुद्धा काढली जाते. या दिवशी बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच बैलांच्या सणाच्या दिवशी त्यांना कोणत्याही प्रकारे कष्ट दिले जात नाही. त्यादिवशी पूर्णपणे त्यांना आराम असतो.
बैलांचे प्रकार :
भारतामध्ये बैलांच्या वेगवेगळ्या प्रजाती आढळून येतात. तर चला मग त्याविषयी सविस्तर माहिती पाहूया.
खिल्लारी बैल : या बैलांची जात महाराष्ट्रामध्ये आढळून येते या बैलांची शिंगे लांब तसेच यांचा रंग राखाडी किंवा शुभ्र पांढरा असतो. हे बैल सीतापुर, पंढरपूर, औंध, आटपाटी व सोलापूर या महाराष्ट्रातील प्रदेशांमध्ये मिळतात. खिल्लारी बैल हे खूप ताकदवान वेगवान तसेच चपळ असतात. त्यामुळे यांना शर्यतीसाठी सुद्धा प्रशिक्षण दिले जाते.
हल्लीकर बैल : हल्लीकर या प्रजातींची बैल हे कर्नाटक राज्यातील विजयनगर मध्ये आढळून येतात. या बैलांची शिंगे अजून त्यांचा रंग राखाडी असतो. या बैलांचे कपाळ ठणक व पाय सुद्धा मजबूत असतात. या बैलांचा आकार मध्यम असतो.
कृष्णा बैल : कृष्णा बैल या प्रजाती कर्नाटक राज्यामध्ये आढळून येतात. कर्नाटक मधील कृष्णा नदीच्या भागांमध्ये आणि महाराष्ट्राच्या डोंगराळ भागांमध्ये या बैलांच्या प्रजाती दिसतात. या बैलांचा रंग पांढरा असून शरीराने जाडजुळ असून त्यांची शिंगे मध्यम आकाराची असतात. या बैलांचा उपयोग शेतीसाठी केला जातो.
पुलीकुलम : पुलिकुलम या प्रजाती तमिळनाडू मधील मदुराई जिल्ह्यामध्ये आढळून येतात. या बैलांचा रंग गळत राखाडी असतो. या बैलांचा वापर शेतीमध्ये नांगरणी करण्यासाठी केला जातो तसेच ही बैल जास्त वेगवान नसल्यामुळे यांना शर्यतीमध्ये उतरता येत नाही. या बैलांना जलीकट्टू मांडू किंवा किडाई माडु असे दिखे म्हटले जाते.
अमृतमहल : अमृत महल या प्रजातीचे बैल आकाराने मोठे असून त्यांचा चेहरा आखूड परंतु त्यांचे गाल मात्र फुगलेले असतात. त्यांच्या माने खालची पोळी लहान असून त्यांचा खांदा मोठा असतो. या बैलांचा रंग करडा असतो. या बैलांच्या प्रजाती कर्नाटक मध्ये आढळून येतात.
कांगायम बैल : या बैलांची प्रजाती ही कोयंबटूर या जिल्ह्यांमध्ये आढळून येते. हे बैल शरीराने मोठे असून त्यांचे शिंगे लांब आणि सरळ असतात.
पंढरपुरी बैल : पंढरपुरी बैल शरीराने सळपातळ असून त्यांची शिंग लांब सरळ असतात. तसेच त्यांचा रंग शुभ्र पांढरा असतो. या बैलांचा उपयोग शर्यतीसाठी सुद्धा केला जातो. हे बैल महाराष्ट्रातील काही प्रदेशांमध्येच पाहायला मिळतात.
FAQ
बैल किती वर्षे जगतो?
१५ ते २० वर्षांपर्यंत
बैल हा कोणत्या प्रकारचा प्राणी आहे?
बैल म्हणजे नर गाय . कुरणातील कोणता प्राणी बैल आहे हे तुम्ही त्याच्या मोठ्या आकाराने आणि शिंगांवरून सांगू शकता. नर गोवंश – किंवा गाय – एक बैल आहे आणि त्याचप्रमाणे नर व्हेल किंवा हत्ती आहे. योग्यरित्या, बुल हा शब्द काहीवेळा विशेषतः अवजड, मांसल माणसासाठी देखील वापरला जातो.
बैलांच्या झुंजीसाठी बैल कसे वाढवले जातात?
बैलांचे मानसिक आणि शारीरिक कल्याण हा त्यांच्या क्षमतेनुसार कामगिरी करतो की नाही हे ठरवते. हे प्रजननकर्त्यांना शक्य तितक्या “नैसर्गिकरित्या” वाढवण्यास प्रोत्साहित करते: कळपांमध्ये, विविध चर, जागा, सावली, धुळीचे आंघोळ, पाणी आणि लपलेले ठिकाणे ज्यावर ते मागे जाऊ शकतात
बैलांच्या झुंजीसाठी कोणत्या प्रकारचे बैल वापरले जातात?
स्पॅनिश फायटिंग बुल (टोरो ब्रावो)