Crocodile Information In Marathi मगर हा प्राणी भूचर असून तो पाण्यामध्ये आणि जमिनीवर सुद्धा राहू शकतो किंवा चालू शकतो. त्याला आपण इंग्लिशमध्ये क्रोकोडाइल असे म्हणतो. हे प्राणी खाऱ्या व गोड्या पाण्यामध्ये सुद्धा राहू शकतात. मगर हा प्राणी डायनासोरच्या काळापासून पृथ्वीवर अस्तित्वात आहे असे मानले जाते.

मगर प्राण्याची संपूर्ण माहिती Crocodile Information In Marathi
मगर हा एक मासाहारी प्राणी आहे. मगर शिकार केल्यानंतर शिकार न चावता गिळून घेतात. त्यांची पचन क्रिया खूपच मजबूत असते. मगराचे डोळे देखील तिक्ष्ण असतात. त्यांना दिवसापेक्षा रात्री चांगले दिसते. मगर हे पाण्यामध्ये 25 मैल प्रतितास वेगाने धावू शकतात.
| नाव | मगर |
| वजन | ६ किलो ते ९०० किलो |
| आयुष्य | ५० ते ७५ वर्षे |
| आहार | मासे, पक्षी, बेडूक |
मगराच्या तोंडात 24 दात असतात आणि हे दात अतिशय तीक्ष्ण असतात. मगर या प्राण्याच्या भारतामध्ये दोन प्रजाती आणि तीन जाती आढळून येतात. बाकी इतर मगरांच्या जाती ह्या इतर खंडांमध्ये पाहायला मिळतात. तर चला मग जाणून घेऊया मगर या प्राण्याविषयी सविस्तर माहिती.
प्राणी कोठे राहतो?
मगर हा प्राणी मुख्यतः आशिया खंड, अमेरिका खंड आणि ऑस्ट्रेलिया खंडामधील उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये पाहायला मिळतो. बऱ्याचदा यांच्या काही प्रजाती ऑस्ट्रेलिया, आग्नेय आशिया आणि पॅसिफिक महासागर यांच्या बेटाजवळ देखील राहतात कारण पाण्यातील मगर किनारपट्टीच्या भागात जास्त वास्तव्य करतात. तर मगर हे पाण्यामध्ये लपवून भक्ष्याच्या शोधात असतात.
मगरांना समुद्र तलाव तळे यांच्या काठावर राहणे आवडते त्या व्यतिरिक्त मगर हे तळे तलाव किंवा समुद्राच्या काठावरील झुडपांमध्ये घरटी बांधून आपली अंडी सुद्धा घालू शकतात. मगर या प्राण्याचे शरीर खूपच कडक असते. त्याची त्वचा खूप कठीण असते, त्यावर बंदूकची गोळी सुद्धा चालवली तर त्याला काहीच होणार नाही. मगर यांना ओलसर दलदलीची जागा आवडते त्या ठिकाणी सुद्धा मगर राहतात.
मगर कसा दिसतो?
मगर या प्राण्याला चार पाय, दोन डोळे व एक लांब शेपूट असतं. त्याच्या शेपटीला लहान-लहान काटे असतात, यांच्या शेपटीची लांबी दहा फुटापर्यंत असते. मगरीची शेपूट लांब सपाट आणि मजबूत असते. मगराच्या शेपटीमध्ये खूपच शक्ती असते, मगर त्याच्या शेपटाचा वापर एका शस्त्राप्रमाणे करतो. किनाऱ्यावरील प्राण्यांना जोरात पाण्यात बुडवून नेण्यासाठी याचा जबडा खूपच जबरदस्त व मजबूत असतो.
मगर या प्राण्याची डोके त्रिकोणी तसेच चपटे असते. त्याच्या तोंडाच्या वरच्या बाजूला दोन नाकपुड्या असतात. या प्राण्याच्या तोंडामध्ये दात वरच्या व खालच्या बाजूसही असतात. तसेच त्याचे दात खूपच मजबूत असतात.
मगर या प्राण्यांची शेपटी पासून ते डोक्यापर्यंतची लांबी 7 ते 10 फुटापर्यंत असते. काही मगरांच्या प्रजाती यांची लांबी 7 ते 8 फूटापर्यंत असते. मगरांचा रंग हा राखाडी काळपट किंवा हिरवळ देखील असतो. सर्वात लहान मगर 5.8 फूट असतो. त्या मगराचे वजन 13 ते 15 किलो असते. खाऱ्या पाण्यामध्ये राहणारी मगर सर्वात मोठी लांबी व वजनाला देखील जास्त असते.
पण खाऱ्या पाण्यात राहणाऱ्या मगरीचे वजन 900 किलो पर्यंत असते तर तिची लांबी वीस फुटापर्यंत असते. प्रौढ अवस्थेतील मघुराचे वजन 200 ते 1000 किलोपर्यंत असू शकते. मगराला श्वास घेण्यासाठी पाण्याच्या वर यावे लागते. मगर श्वास घेतल्यानंतर पाच ते सहा तास पाण्यामध्ये बुडून राहू शकतो.
मगर काय खातो?
मगर हा प्राणी मांसाहारी आहे. हा प्राणी केवळ मास खात असतो, त्यामुळे त्याच्या शिकारीमध्ये जे प्राणी अडकतात, त्यांची शिकार करून आपला पोट भरत असतो. सहसा मगर हे मासे, पक्षी, बेडूक, उंदीर, अशा प्रकारचे अन्न खातात. त्या व्यतिरिक्त मगर पाण्यामध्ये दबा धरून बसतात व पाणी पिण्यासाठी येणाऱ्या सर्वच प्राण्यांवर हल्ला करतो. त्यामध्ये हरीण, झेब्रा, डुक्कर, जिराफ, छोटे प्राणी व मोठे प्राणी देखील याची शिकार होतात. मगराच्या तोंडात एकदा शिकार लागली म्हणजे मगर त्याला पाण्यात खेचून नेतो व पाण्यामध्ये गोल फिरवून प्राण्याचा पाय मोडतो व खातो.

मगर या प्राण्याची जीवन :
मगर हा प्राणी पाण्यामध्ये राहणारा आहे. त्या व्यतिरिक्त तो जमिनीवरही राहू शकतो. मगरांचा विनीचा हंगाम हा जानेवारी ते मे यांच्या दरम्यान असतो. याच हंगामात नर-मादींना पाण्यात थाप मारून नाकातून पाणी उडवून विविध प्रकारचे आवाज करतो तसेच मादीला तो त्यामुळेच आकर्षित करतो.
मगर तलाव, समुद्राच्या काठावर गड्डा करुन त्यामध्ये सुमारे 40 ते 60 अंडी घालतात व त्यावर मादी पाला पाचोरा टाकून ही अंडी झाकून ठेवते. या अंड्यातून तीन महिन्यांमध्ये पिल्ले बाहेर येतात. अंड्यातून पिल्लू बाहेर येताना त्यातील आवाज येतो. तेव्हा मादी तिथे जाऊन पालापाचोळा बाजुला करते.
व पिल्लांना पाण्यात घेऊन जाते. परंतु त्यातील काहीच अंडे फलित होतात व त्यातील काहीच मगरांची पिल्ल जगतात. इतर पक्षी मगर यांची अंडी खातात किंवा त्यातून छोटे पिल्ले निघाल्यानंतर ते पक्षांची शिकार होतात. मगर हा प्राणी 70 ते 80 वर्षापर्यंत जगतो. मगर त्याचे डोळे उघडे ठेवून सुद्धा झोप घेतो.

मगरीचा उपयोग :
मगर या प्राण्याच्या कातड्याचा वापर बरेच ठिकाणी केला जातो. मगराच्या कातडी पासून विविध वस्तू तयार केल्या जातात. जसे की बेल्ट, पर्स, जॅकेट, पिशव्या यांची निर्मिती या कातळीपासून केली जाते. तसेच मगरीच्या शिकारीमध्ये बऱ्याच प्रमाणात वाढ झालेली आहे. मगर हा प्राणी देखील पर्यावरणामध्ये महत्त्वाचा आहे.
मगर या प्राण्याची प्रकार :
बटू मगर : या मगराची लांबी पाच फुटापर्यंत असते तसेच या मगराचे वजन हे 32 किलो पर्यंत असते. तसेच त्याची लांबी पाच फूट पर्यंत असते. हा मगर सुद्धा इतर मगरांच्या जाती प्रमाणेच असतो.
अमेरिकन मगर : अमेरिकन मगर हा खाऱ्या व गोड्या पाण्यामध्ये राहू शकतात. यांची पोहण्याची क्षमता इतर मगरांच्या तुलनेत जास्त असते.
गोड्या पाण्यातील मगर : या मगरींचे पाय लहान असून त्यांच्या पंजामध्ये बोटे असतात आणि अनेक शंकूच्या आकाराचे त्यांच्या तोंडामध्ये दात असतात. त्यांचे जबडे अतिशय शक्तिशाली व मजबूत असतात. हे प्राणी पाण्यात असताना, या प्राण्याची डोळे कान व नाकपुड्या पाण्याच्या पृष्ठभागावर दिसू शकतात. यांचे शरीर अर्ध शरीर पाण्यात बुडलेले असते. यांची त्वचा जाड असून शेपटी लांब असते.
खाऱ्या पाण्यातील मगर : खऱ्या पाण्यात राहणारे मगर असल्यामुळे त्याला खाऱ्या पाण्यातील मगर असे नाव पडले. हा मगर सर्वात मोठा असून त्याची लांबी सात फूट आणि त्याचे वजन बाराशे किलो पर्यंत असते. याव्यतिरिक्त मगरीचे बरेच प्रकार आढळतात.
FAQ
मगर कुठे राहतो?
मगर उभयचर (जमिनीवर व पाण्यात राहणारा) प्राणी आहे. शेपटीचा उपयोग त्याला पोहण्याच्या कामी होतो. शेपूट दोन्ही बाजूंनी चपटे असते.
मगर हा सस्तन प्राणी आहे का?
मगरीचा समावेश सरीसृप वर्गाच्या क्रोकोडिलिया गणात होतो. आशिया, आफ्रिका, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया खंडांत मगरी आढळून येतात. क्रोकोडिलिया गणात ॲलिगेटर, केमन व घडियाल या सरीसृप प्राण्यांचा समावेश करतात
मगर कोणत्या वेळी सर्वाधिक सक्रिय असतात?
संध्याकाळ आणि पहाटे दरम्यान
मगरची गर्भधारणा काय असते?
63-68 दिवस
मगरची अंडी किती मोठी आहेत?
सुमारे 3 इंच लांब
