Cow Information In Marathi गाय हा प्राणी आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. गाय या प्राण्याची हिंदू धर्मामध्ये पूजा केली जाते. तसेच गाईला हिंदू धर्मामध्ये उच्च स्थान आहे. गाईच्या पाडसाला वासूरू असे म्हणतात. गाईचा उल्लेख पुराणांमध्ये देखील आहे. श्रीकृष्ण यांना गाय अतिशय प्रिय होती. त्यामुळे गायीची पूजा हे अनंत कालापासून चालत आलेली आहे.
गाय प्राण्याची संपूर्ण माहिती Cow Information In Marathi
भारतीय गाईच्या संकरित जाती आहेत तसेच विदेशी गाई सुद्धा आहेत. भारतामध्ये गाईपासून दूध मिळवले जाते. त्या व्यतिरिक्त गाईपासून मिळते. जे आपण शेतामध्ये खत म्हणून उपयोगी आणू शकतो.
या खतामुळे शेतातील जमिनीतील पोषक मूलद्रव्य निर्माण होऊन पीक उत्पादनात वाढ होते. गाईचे गोमूत्र देखील हिंदू धर्मात पवित्र मानले जाते. गोमित्र मुळे शरीरशुद्धी केली जाते. गायीचे गोमूत्र, शेण, दूध, तूप, दही हे पंचामृत एक दिव्य औषधी आहे. अशी सुद्धा काही हिंदू लोकांची समज आहे.
नाव | गाय |
वेग | ४० वर्ग/ता (जास्तीत जास्त) |
वैज्ञानिक नाव | बॉस तौरस |
रोजची झोप | ४ तास (स्त्री, प्रौढ, गाय) |
वस्तुमान | १,१०० किलो (नर, प्रौढ, बैल), ७२० किलो (मादी, प्रौढ, गाय) |
गर्भधारणा | २८३ दिवस |
गाय आपल्या आयुष्यात हजारो लोकांचे पोषण करते. हिंदू धर्मामध्ये मात्र गोहत्या पाप आहे. गाईचे दूध दही ताक अत्यंत मौल्यवान आहे. जे मानवी शरीरासाठी उपयुक्त घटक आहेत. त्यामधून मानवी शरीराला पोषक घटक मिळतात. विदेशी किंवा संकरित गाईपेक्षा देशी गाय ही खूप महत्त्वाची असते. हिंदू धर्मात गाईचे मास खात नाही. तर चला मग गाय या प्राण्याविषयी आपण सविस्तर माहिती पाहूया.
गाय कोठे राहते?
गाय हा प्राणी भारतामध्ये सर्वत्र पाहायला मिळतो. शहर असो किंवा ग्रामीण भाग गाय हा प्राणी असतो. ग्रामीण भागामध्ये गाईला खूप महत्त्व दिले जाते. गाय जिथे राहते तिला गोठा असं म्हटलं जातं. गाईंना गोठ्यात बांधले जाते. त्यांना खाण्यासाठी नैवेद्य देखील दिला जातो, तिची पूजा केली जाते. गायीचा दुसरा प्रकार म्हणजे जंगली गाई ज्या जंगलांमध्ये राहतात. जंगली गुरांप्रमाणे या गाईस सुद्धा कळपामध्ये राहतात.
गाय काय खाते ?
गाय हा प्राणी शाकाहारी असून गवत, चारा, कडबा, कुट्टी, धान्याची भरड खाते. जंगलांमध्ये असणाऱ्या गवतांवर गाई आपले जीवन जगतात. गाईला पिण्यासाठी पाणी देखील लागते.
काय या प्राण्याचे वर्णन :
गाय या प्राण्याचे शरीर मजबूत वजनदार असते. गाईंची शिंगे त्यांच्या प्रजातीनुसार वेगवेगळी दिसून येतात. गायीच्या नाकपुड्या चेहऱ्याच्या दोन्ही बाजूंना असतात. गायीच्या वरच्या जबड्यात कृतक दात असतात, गायीचे शेपूट लांब असून टोकाला देखील केसांचा गोंडा असतो.
गाय हा प्राणी रवंत करणारा प्राणी आहे. त्यामुळे अन्न घटकावर सुद्धा गाय चांगल्या पद्धतीने जगू शकते. गाईचे आयुष्य पंधरा ते वीस वर्ष असते. गाईपासून मिळणारे गोमूत्र, दूध, दही, तूप सर्वच हिंदू धर्मामध्ये पवित्र मानले जाते. तसेच ते आरोग्यदायी देखील आहे.
गाय या प्राण्याची जीवन :
गाय या प्राण्याला हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचे स्थान तसेच पूजनीय स्थान आहे. भारतीय देसी गाय 24 ते 36 महिन्यात वयात येते. तेव्हा तिचे शारीरिक वजन मात्र 200 ते 300 पर्यंत असते. संकरित गायीचे वजन 12 ते 18 महिन्यातच 250 किलो पर्यंत होते.
देशी गाईंचा गर्भधारणेचा कालावधी 280 दिवसांचा असतो. जेव्हा गर्भधारणा करते तेव्हा तिची विशेष काळजी घेतली जाते. म्हणजेच गाईचा गाभण काळ हा नऊ महिने नऊ दिवस असतो. गर्भधारणा झाल्यापासून गर्भाशयात तिच्या पिल्लाची वाढ सहसा सहा महिने हळूहळू होते व त्यानंतर जसजसा आहारचा पुरवठा होत जाईल तसं तसं गर्भधारणा वाढत जाते. पिल्लांना जन्म दिल्यानंतर काही मिनिटांनी वासरू आपल्या पायावर उभे राहते आईचे दूध पिऊ लागते. पाच ते सहा महिन्यानंतर वासरू स्वतंत्र राहू शकतात.
गायीचे प्रकार :
मुख्यता गाईचे दोन प्रकार आढळून येतात एक म्हणजे देशी गाय व दुसरी विदेशी गाय.
गीर गाय : गिर गाईची प्रजाती गुजरात या राज्यातील दक्षिण भागांमध्ये आढळते. ही प्रजाती टेकड्या जंगल येथे आढळून येते. या गाईचा दूध देण्याचा कालावधी 300 दिवस असते. तसेच ही गाई 2100 लिटर दूध देत असते व या गाईचे आयुष्य पंधरा वर्षापर्यंत असते.
सिंधी गाय : सिंधी गाय ही पाकिस्तान मधील कराची व हैदराबाद या प्रदेशांमध्ये आढळून येतात. ह्या गाई आकाराने लहान व बदलत्या हवामानाशी एकरूप होऊ शकतात. या गाईचा दूध देण्याचा कालावधी 300 दिवस असतो. या गाईपासून सरासरी दोन हजार तीनशे लिटर दूध मिळते व त्यांचे आयुष्य पंधरा वर्षे जगते.
गौळाऊ : महाराष्ट्र व मध्य प्रदेशामध्ये या गाईच्या प्रजाती आढळून येतात. ही गाय मध्यम उंचीची असून तिचा बांधा हलका तसेच शरीर हे रुंद व लांबट असते. तिचे डोके अरुंद व खाली निमुळते असते. या गाईचे कपाळ मात्र सपाट असून डोळे बदामी आकाराचे असतात.
तसेच या गाईच्या प्रजातींचे शिंग आखूड असून मागे झुकलेली असतात. पाय मजबूत व सरळ असतात. या गायांचे माननेखालच्या भाग म्हणजेच पोळ ही लोंबती असते. अंगावर कातडी मात्र सैल स्वरूपाचे असते. या गाईचा रंग पांढरा असतो.
देवणी गाय : देवणी गाय आंध्रप्रदेश महाराष्ट्राचा उत्तर भाग तसेच पश्चिम भागामध्ये आढळून येते. या प्रजाती जवळजवळ गिरजातीच्या गाययीप्रमाणे दिसतात. यांच्या अंगावर काळे पांढरे ठिपके असतात. कपाळ फुगीर व कान मात्र लांब असतात. तसेच त्यांची शिंगे वळणदार असतात. ही गाय 300 दिवस अकराशे लिटर दूध देते.
जर्सी गाय : जर्सी गाय ही विदेशी गाय आहे. या गाईचा रंग लालसर पिवळा असून या रंगाच्या वेगवेगळ्या गाई दिसतात. काही गायीच्या अंगावर पांढरे ठिपके असतात. विदेशी गुराच्या मनाने हवामान देखील सहन करू शकतात. गायीने पिल्लाना जन्म दिल्यापासून 300 दिवस देऊ शकते. तसेच या प्रजातीच्या गायीचे दूधउत्पन्न हे 4000 लि. असते. या गाईचे आयुष्य मात्र बारा वर्षापर्यंत असते.
हॉलंड गाई : हॉलन्ड या गाई युरोपामध्ये आढळून येतात. या गाईचा रंग पूर्ण पांढरा तसेच काळा पांढरा असतो. गाईच्या अंगावर काळे किंवा पांडरे डाग देखील असतात. या गाईच्या पायाचा खालचा भाग व शेपटीच्या खालचा गोंडा हा पांढऱ्या रंगाचा असतो.
या गाईपासून 600 लिटर दूध उत्पन्न होते. या गाईचे आयुष्य 12 ते 13 वर्ष असते. या गाई दूध उत्पादनाकरिता अत्यंत महत्त्वाच्या असून ह्या जगभर प्रसिद्ध आहेत.
ब्राऊन स्विस : या गाई स्विझर्लंड तसेच युरोप या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतात. या गाईंचा रंग तपकिरी असून त्यांच्या अंगावर विविध रंगाच्या छटा असतात. काही गायींचा रंग काळसर तर काही फिक्या रंगाच्या गाई आढळून येतात. काही गायीचा पोटाखालील भाग पांढरा असतो. गाईचा दूध देण्याचा कालावधीत 300 दिवसांचा असून ही गाय 5000 लिटरपर्यंत दूध देते. ही गाय सुद्धा बारा ते तेरा वर्ष जगते.
FAQ
गाय किती वर्षे जगते?
सरासरी आयुष्य १२ वर्षे
गाई किती दूध देते?
ही गाय दररोज सरासरी 10 ते 15 लिटर दूध देते. मात्र या गायीची योग्य काळजी घेतल्यास ती दररोज 30 ते 40 लिटर दूध देऊ शकते.
गायींचा उगम कोठे झाला?
दक्षिण-पश्चिम आशियामध्ये
गायी नैसर्गिकरित्या गाभण कशा होतात?
गाई फक्त उष्णतेमध्ये असतानाच गर्भवती होऊ शकते जी 15 महिन्यांची झाल्यानंतर दर 3 आठवड्यांनी होते. जेव्हा ते उष्णतेमध्ये असतात तेव्हा ते 6-12 तास टिकते