Close Menu
    Facebook X (Twitter) Instagram
    • Home
    • उभयचर प्राणी
    • जलचर प्राणी
    • भूचर प्राणी
    • About Us
      • Contact Us
      • Privacy Policy
      • Disclaimer
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
    प्राणी जगतप्राणी जगत
    • Home
    • उभयचर प्राणी
    • जलचर प्राणी
    • भूचर प्राणी
    • About Us
      • Contact Us
      • Privacy Policy
      • Disclaimer
    Subscribe
    प्राणी जगतप्राणी जगत
    Home » जलचर प्राणी » सील प्राण्याची संपूर्ण माहिती Seal Fish Information In Marathi
    जलचर प्राणी

    सील प्राण्याची संपूर्ण माहिती Seal Fish Information In Marathi

    By आकाश लोणारेAugust 30, 2023Updated:February 20, 2024No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email
    Seal Fish Information In Marathi
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    Seal Fish Information In Marathi सील प्राणी हा समुद्र महासागरांमध्ये आढळून येतो. हा मांसाहारी प्राणी असून तो पित्रीपीडिया या गणातील संस्थान प्राणी आहे. उष्णकटिबंधातील समुद्र सोडता हा प्राणी इतरत्र सर्व समुद्रांमध्ये किंवा समुद्रकिनाऱ्यावर आढळून येतो. थंड प्रदेशात ते अधिक मोठ्या संख्येने दिसून येतात.

    Seal Fish Information In Marathi

    सील प्राण्याची संपूर्ण माहिती Seal Fish Information In Marathi

    त्या व्यतिरिक्त काही प्रजाती गोळ्या पाण्याच्या तलावांमध्ये सुद्धा आढळून येतात. खाऱ्या पाण्यामध्ये राहणारे सील प्राण्यांचा समावेश फोसीडी या कुळामध्ये केला जातो. सील प्राणी पाण्यातील खेकडे, मासे, साप इत्यादी शिकार करत असतो. तर चला मग सील या प्राण्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

    लांबी १२५ ते ६५० सेंमी
    वजन ९० किग्रॅ. पासून ३·५ मे. टनापर्यंत
    दात२६ ते ३६
    सीलांचे मुख्य शत्रूहिंसक देवमासा व ध्रुवीय अस्वल
    आयुर्मान४० वर्षे 
    सीलांचे मुख्य अन्नमासे व सेफॅलोपॉड 

    सील हा प्राणी कोठे राहतो?

    सील हा प्राणी सामान्यतः 20 अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमानाच्या प्रदेशांमध्ये आढळतो. या प्राण्यांना थंड व पोषक असे पाण्याची आवश्यकता असते. हे प्राणी उष्ण किंवा उष्णकटिबंधीय हवामानात सुद्धा राहू शकतात. सील प्राणी नदीकिनारी, मोठा महासागर, खारेपाणी किंवा गोडे पाणी त्याला नद्यांसह विविध ठिकाणी आढळून येतो . बैकल सील ही एकमेव गोड्या पाण्यातील प्रजाती आहे. हे प्राणी समूहाने राहतात.

    • डॉल्फिन प्राण्याची संपूर्ण माहिती

    सील हा प्राणी कसा दिसतो?

    सील या प्राण्याचे पुढचे पाय बरेच पुढच्या बाजूला असतात. तसेच मागचे पाय हे बरेच मागे असतात. मागचे पाय मागच्या बाजूला वळलेले असून त्याचा उपयोग हे प्राणी पोहण्यासाठी करत करतात. मागचे पाय पुढच्या बाजूला वळू शकत नसल्यामुळे सील हा प्राणी जमिनीवर असताना, त्याचा उपयोग पुढे सरकण्यासाठी होत नाही. बऱ्याचदा हे प्राणी घसरत किंवा सरकत पुढे जातो. या प्राण्याच्या मादी व नर यांच्या जबड्यात मोठे व लांब असे सुळे असतात.

    सील या प्राण्याला दृष्टी व वासाचे सर्वोत्तम ज्ञान आहे. या प्राण्याला कमी ऐकू येते. तसेच या प्राण्याची लांबी 125 ते 650 सेमी पर्यंत असते. या प्राण्याचे वजन 90 किलो पासून 350 किलो असते. तर काही सील प्राण्याचे वजन 90 किलो पेक्षा कमी असते.

    • प्लॅटिपस प्राण्याची संपूर्ण माहिती

    यांच्यामध्ये वलयंकित सील हा सर्वात लहान प्राणी असून हत्ती सील हा सर्वात मोठा प्राणी आहे. या सील प्रजातीला छेदक दात असतात. या प्राण्याचे दात टोकदार असतात. त्यांच्या त्वचेखाली चरबीचे जाड आवरण असते, त्यामुळे त्यांना थंड प्रदेशातील पाण्यामध्ये देखील त्यांचे शरीर गरम ठेवले जाते.

    सील प्राणी काय खातो?

    सील या प्राण्याचे मुख्य अन्न म्हणजे मासे आहेत. त्या व्यतिरिक्त लहान पक्षी व लहान तीन सुद्धा मोठे सील खाऊ शकतात. हे प्राणी अंधार असलेल्या ठिकाणी सुद्धा शिकार करू शकतात. आंधळे सील सुद्धा शिकार करतात . सील हा प्राणी बराच काळ उपाशी राहू शकतो. जर या प्राण्याला शिकार मिळाली नाही तर हा प्राणी 100 दिवसांपर्यंत उपाशी राहू शकतो. सील प्राणी मंद गतीने चालणारे समुद्र जीव सुद्धा खातो.

    Seal Fish Information In Marathi

    सील या प्राण्याची जीवन :

    सील हे प्राणी एकट्याने राहून सुद्धा शिकार करू शकतात; परंतु ते कुटुंबाने राहतात, एकजुटीने राहतात. एकत्रितपणे सील प्राणी माशांच्या मोठ्या कळपाच्या मागे लागून त्यांची शिकार करतात. सील मासे कमी गतीने चालणाऱ्या मासांची सुद्धा शिकार करतात. त्या व्यतिरिक्त हे प्राणी खेकडे, कासव, साप इत्यादी प्राणी सुद्धा खातात.

    • खेकडा प्राण्याची संपूर्ण माहिती

    सील दहा ते वीस माद्या बरोबर आपला संयोग घडवून आणतो. त्यांच्या आयुष्याचा जास्तीत जास्त वेळ हे प्राणी पाण्यातच घालवतात. हत्ती सील हा प्राणी आठ ते दहा महिने समुद्रामध्ये राहतो आणि प्रजनन तसेच बर्फ वितळण्याच्या ठिकाणी स्थलांतर करतात. उत्तरेकडे हत्ती सील हा प्राणी सर्वात जास्त आयुष्य जगतो. याचे आयुष्य 25 ते 30 वर्ष असते. माद्या या प्राण्यांमध्ये जास्त जगतात कारण नरामध्ये भांडणे होतात व बऱ्याचदा मरण पावतात. कित्येक नर सील हे परिपक्व होण्याच्या आधीच मरतात, यांची मादी 43 वर्ष आयुष्य जगते.

    सील या प्राण्याचा उपयोग :

    सील या प्राण्यांची शिकार करून त्यांचा उपयोग खाण्यासाठी तसेच उबदार कातडी पासून वेगवेगळ्या वस्तू तयार करण्यासाठी केला जातो. तसेच त्यांच्या हाडांपासून हत्यारे सुद्धा बनवले जातात. या प्राण्याच्या चरबीपासून तेल काढले जाते. सील या प्राण्यांच्या संख्येमध्ये खूपच घट झाली आहे. त्यामुळे आता त्यांच्या शिकारीवर बंदी आली आहे.

    Seal Fish Information In Marathi

    सील या प्राण्याचे प्रकार

    सील या प्राण्याचे प्रकार : सील हा प्राणी समुद्रामध्ये तलावांमध्ये राहणारा प्राणी असून त्याच्या काही प्रजाती पृथ्वीवर वेगवेगळे ठिकाणी आढळतात. तर चला मग या प्राण्याच्या प्रजातींविषयी माहिती पाहूया.

    करडा सील : करडा सील या प्राण्याची त्वचा चंदेरी तसेच राखाडी रंगाची असते. त्याच्या शरीरावर काळसर रंगाची ठिपके सुद्धा असतात. या प्राण्याची लांबी 3 ते 4 मीटर असून नोव्हा स्कोशा ते ग्रीनलँड या भागांमध्ये ही प्रजाती आढळून येते.

    हर्प सील : या प्रजातीच्या सील प्राण्यांमध्ये नराची त्वचा पिवळसर रंगाची असून या प्राण्यांच्या खांद्याजवळ तपकिरी रंगाचे पट्टे दिसतात. हा प्राणी दिसायला आकर्षक दिसतो. समुद्रामध्ये खोलवर हा प्राणी आपली भक्ष्य शोधतो व खातो. या प्राण्यांची लांबी दोन मीटर असते. तसेच हे प्राणी ध्रुवीय समुद्राच्या प्रदेशांमध्ये आढळून येतात.

    वलयांकित सील : या प्रजातींमध्ये त्यांची त्वचा गडद तपकिरी रंगाची असून त्यांच्या अंगावर पिवळसर रंगाची वलय असतात. वलयंकित सील हे प्राणी ध्रुवीय समुद्राजवळ आढळून येतात.

    फणाधारी सील : फणादारी सील या प्राण्यांची त्वचा ही काळसर रंगाची असते. तसेच त्यांच्या शरीरावर पांढऱ्या रंगाचे ठिपके असतात. नराच्या डोक्याचा भाग थोडा उंच असतो. नर चिडल्यावर नसापटाचा त्याचा भाग फुगवतो व त्यामुळे त्याला फणाधारी सील असे म्हटले जाते.

    बिरडेड सील : या प्रजातींमध्ये या प्राण्याची त्वचा राखाडी व पिवळसर रंगाची असते. नसा पटावर या प्राण्यांचे लांब केस असतात. तसेच या प्राण्याची लांबी 3 ते 4 मीटर असते. या प्रजाती ध्रुवीय समुद्रापासून ते न्यू फाऊंडलंड या भागांपर्यंत आढळतात.

    हत्ती सील : हत्ती सील या प्राण्यांची त्वचा तपकिरी व काळसर रंगाची असते. या प्राण्यांची लांबी 6 ते 7 मीटर असून सर्वात मोठा सील प्रजातींमधील हा प्राणी आहे. हत्ती सिंह प्राणी 8 ते 10 महिने समुद्रामध्ये राहतात. प्रजनन काळ येतो तेव्हा ते बाहेर येतात. यांचे आयुष्य पंधरा ते वीस वर्षे असते. यांची मादी सर्वात जास्त आयुष्य जगते. या प्रजातीतील मादीचे वय 43 वर्ष पर्यंत असते. हत्ती सील या प्राण्यांमध्ये नरामध्ये भांडण होतात. बरेच सील हे तरुणपणातच मरण पावतात.

    सील फिश बद्दल मनोरंजक तथ्ये:

    • त्यांच्या त्वचेखाली ब्लबरचा जाड थर असतो ज्यामुळे ते थंड पाण्यात उबदार राहतात.
    • त्यांना पंखांऐवजी फ्लिपर्स असतात.
    • ते पिलांना जन्म देतात.
    • ते फुफ्फुसांद्वारे हवा श्वास घेतात.

    निष्कर्ष:

    शेवटी, सील मासे असे काही नाही. “सील” हा शब्द सागरी सस्तन प्राण्याला सूचित करतो, तर “मासे” म्हणजे गिल आणि पंख असलेल्या जलीय पृष्ठवंशी. तर, सील फिश हा अटींमध्ये एक विरोधाभास आहे.

    FAQ:

    सील फिश म्हणजे काय?

    सील मासा असे काही नाही. “सील” हा शब्द सागरी सस्तन प्राण्याला सूचित करतो, तर “मासे” म्हणजे गिल आणि पंख असलेल्या जलचर कशेरुकाचा संदर्भ आहे. तर, सील फिश हा अटींमध्ये एक विरोधाभास आहे.

    कोणते प्राणी अनेकदा सीलसाठी चुकले जातात?

    फर सील, समुद्र सिंह आणि वॉलरस यांसारख्या अनेक माशांच्या प्रजाती आहेत ज्यांना सील म्हणून चुकीचे समजले जाते.

    सील मासे खाण्यायोग्य आहेत का?

    काही सील मासे, जसे की फर सील, खाद्य आहेत. तथापि, हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की सील माशांची शिकार त्यांच्या फरसाठी केली जाते, मांस नव्हे.

    सील आणि मासे यातील फरक कसा सांगू शकतो?

    जर तुम्हाला समुद्रात एखादा प्राणी दिसला जो सीलसारखा दिसतो, परंतु त्याला फ्लिपर्सऐवजी पंख आहेत, तर तो सील नसावा. तो मासा असण्याची शक्यता अधिक आहे.

    Was this article helpful?
    YesNo
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleप्लॅटिपस प्राण्याची संपूर्ण माहिती Platypus Information In Marathi
    Next Article बोंगो प्राण्याची संपूर्ण माहिती Bongo Information In Marathi
    आकाश लोणारे
    • Website

    माझे नाव आकाश लोणारे आहे आणि माझे शिक्षण Master of Science in Zoology झालेले आहे. मला प्राण्यांविषयी लिहिणे, माहिती वाचणे, तसेच प्राण्यांची सेवा करणे खूप आवडते.

    Related Posts

    जलचर प्राणी

    शार्क प्राण्याची संपूर्ण माहिती Shark Information In Marathi

    February 21, 2024
    जलचर प्राणी

    ऑक्टोपस प्राण्याची संपूर्ण माहिती Octopus Information In Marathi

    February 21, 2024
    जलचर प्राणी

    जलसिंह प्राण्याची संपूर्ण माहिती Whale fish Information In Marathi

    February 20, 2024
    Add A Comment
    Leave A Reply

    pranijagat.com

    LEGAL

    • PRIVACY POLICY
    • TERMS AND CONDITIONS
    • DISCLAIMER
    • DMCA POLICY

    © 2025 ALL RIGHTS RESERVED PRANIJAGAT