Close Menu
    Facebook X (Twitter) Instagram
    • Home
    • उभयचर प्राणी
    • जलचर प्राणी
    • भूचर प्राणी
    • समुद्री प्राणी
    • आमच्याविषयी (About Us)
      • संपर्क (Contact Us)
      • Privacy Policy
      • Disclaimer
    प्राणी जगत
    • Home
    • उभयचर प्राणी
    • जलचर प्राणी
    • भूचर प्राणी
    • समुद्री प्राणी
    • आमच्याविषयी (About Us)
      • संपर्क (Contact Us)
      • Privacy Policy
      • Disclaimer
    प्राणी जगत
    Home » भूचर प्राणी » बोंगो प्राण्याची संपूर्ण माहिती Bongo Information In Marathi
    भूचर प्राणी

    बोंगो प्राण्याची संपूर्ण माहिती Bongo Information In Marathi

    By आकाश लोणारेफेब्रुवारी 20, 2024Updated:मार्च 28, 2024प्रतिक्रिया नाहीत5 Mins Read
    Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email
    Bongo Information In Marathi
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    Bongo Information In Marathi बोंगो हा एक हरणांच्या प्रजातीतील मोठा प्राणी असून तो काळवीट आहे. हा प्राणी पूर्व पश्चिम आणि मध्य आफ्रिकेच्या जंगलांमध्ये आढळतो. या प्राण्यांच्या सध्या मुख्यतः दोन पोटजाती उपलब्ध आहेत. हे प्राणी पर्वत किंवा पूर्व बोंगो तसेच सकल किंवा पश्चिम बोंगो असे म्हटले जाते.

    Bongo Information In Marathi

    बोंगो प्राण्याची संपूर्ण माहिती Bongo Information In Marathi

    वजनदार असून हे प्राणी रंगीत आफ्रिकन वन मृग आहेत. या प्राण्यांमध्ये नर आणि मादी दोघांनाही शिंगे असतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बोंगो हे चिखलांमध्ये भीजतात. त्यामुळे त्यांचे शरीर थंड राहते. हे प्राणी शाकाहारी असून ते पाने, फुले, झाडांची साल तसेच गवत यावर आपले जीवन जगतात. चला मग या प्राण्याविषयी आणखीन सविस्तर माहिती पाहूया.

    प्राणीबोंगो
    वैज्ञानिक नावTragelaphus eurycerus
    वस्तुमान२७० किलो
    लांबी२.३ मीटर
    गर्भधारणा कालावधी२८५ दिवस
    संवर्धन स्थितीधोक्याच्या जवळ (लोकसंख्या कमी होत आहे)

    बोंगो हा प्राणी कोठे राहतो?

    बोंगो हा एक संस्तन प्राणी असून तो पश्चिम पूर्व आणि मध्य आफ्रिका या प्रदेशांच्या जंगलांमध्ये आढळून येतो. आज अनेक राष्ट्रांमध्ये हा प्राणी अस्तित्वात आहे. या प्राण्यांची संख्या खूपच कमी होत चालली आहे. बऱ्याच भागांमध्ये बोंगो हे प्राणी नामशेष झाले आहेत.

    मध्य आफ्रिकेमध्ये अजूनही त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. हे प्राणी आफ्रिकेमधील मध्य व पश्चिम भागात घनदाट सखल जंगलांमध्ये आणि बांबूच्या झाडांमध्ये वास्तव्य करतात. विसाव्या शतकाच्या शेवटी युगांडामध्ये हे प्राणी नामशेष झाले आहे.

    त्या आधी केनिया आणि युगांडा यांच्या डोंगराळ भागांमध्ये हे प्राणी होते. परंतु तेथील मानवाने तसेच इतर प्राण्यांची शिकार केल्यामुळे किंवा जंगल तोड मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे या भागांमध्ये आता हे प्राणी संख्या खूपच कमी झाली आहे किंवा नामशेष झाल्याचे दिसून येते.

    बोंगो हा प्राणी काय खातो?

    बोंगो हा एक शाकाहारी आणि संस्तन प्राणी आहे. हा प्राणी वनस्पती आणि गवत खातो. हे प्राणी त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी मिळणाऱ्या वनस्पती खातो. इतर मांसाहारी प्राण्यांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी हे प्राणी रात्री चरतात. बोंगो प्राण्यांची जीभ लांब असून ती उंच झाडाच्या ताज्या पानांपर्यंत पोहोचते. त्यामुळे हे प्राणी आपल्या जिभेने झाडांची पाने खातात. त्यामुळे जमिनीतून बाहेर आलेली मुळे सुद्धा काढण्यास त्यांना मदत होते.

    Bongo Information In Marathi

    बोंगो या प्राण्याची वर्णन :

    बोंगो हा जाडजूड शरीराचा प्राणी आहे. याच्या अंगावर एक प्रकारचा कोट दिसतो. जो नारंगी व चॉकलेट रंगाचा असतो तसेच त्याच्या खालच्या बाजूला गडद अशा रेषा असतात. बोंगोच्या शरीरावर दहा ते पंधरा उभ्या पांढऱ्या रेषा असतात. बोंगो हा प्राणी काळवीट या प्राण्याप्रमाणे असून त्याचा रंग मात्र वेगळा असतो.

    बोंगो या प्राण्याची जीभ खूप लांब असते तसेच ते झाडांची पाने सहजपणे पकडून खाऊ शकतात. त्यांना फांद्यांमधून पाने तोडून खाण्यात मोठा आनंद येतो. तसेच यांचे मोठे कान असतात. बोंगो या प्राण्याला लांब अशी शेपटी असते तसेच मादी व नर दोघांनाही सर्पिले आकाराची शिंगे असतात. ज्यांची शिंगे 30 ते 40 इंच लांब असतात. नरांमध्ये त्यांची शिंगे गुंडाळलेली असतात.

    बोंगो या प्राण्याचे शरीराचे वजन 200 ते 400 किलो पर्यंत असते तसेच त्यांची उंची एक पॉईंट दोन ते पाच मीटर पर्यंत असते. या प्राण्यांची शिंगे तीन ते चार महिन्यांच्या वयातच विकसित होतात. बोंगो या प्राण्यांच्या शरीरावर गुळगुळीत असा कोट दहा ते पंधरा उभ्या पांढऱ्या पिवळ्या पट्ट्यांसह चिन्हांकित केला जातो.

    मानेच्या पायथ्यापासून ते त्याच्या डोळ्यांच्या खड्ड्यापर्यंत या पट्ट्या पसरलेल्या असतात. दोन्ही बाजूला पट्ट्यांची संख्या समान असते त्यामध्ये खांद्यापासून ते दुव्यापर्यंत पृष्ठिय केसांचा एक लहान तपकिरी कड आहे. हे पांढरे पट्टे या कड्यावर येतात.

    गुळगुळीत कोट 10-15 उभ्या पांढर्‍या-पिवळ्या दोन्ही गालावर दोन मोठे पांढरे ठिपके असलेल्या डोळ्यांच्या दरम्यान एक पांढरा शेवरॉन दिसतो. तसेच एक पांढरा शेवरॉन आढळून येतो. मानेपासून छातीपर्यंत असतो बोंगो या प्राण्यांमध्ये विशेष ग्रंथी स्त्राव नसतात, त्यामुळे इतर मृगांपेक्षा एकमेकांना शोधण्यासाठी सुगंधावर त्यांना कमी अवलंबून राहावे लागते. बोंगो या प्राण्याचे ओठ पांढरे असतात. वर काळ्या थुथन असतात.

    बोंगो या प्राण्याची जीवन :

    बोंगो हे प्राणी रात्री चरतात त्यामुळे क्वचितच लोकांना हे प्राणी दिसतात. हे प्राणी खूप लाजाळू आहेत ते खूप गरीब स्वभावाचे प्राणी आहेत. या प्राण्यांना जेव्हा धोका वाटतो तेव्हा ताबडतोब जंगलात लपून राहतात. यांच्यामध्ये नर एकटे जीवन जगतात. फक्त विणीच्या हंगामामध्ये इतर मादीशी ते भेटतात.

    पन्नास मादी बोंगो आणि त्यांच्या लहान पिल्लांच्या कडपाच्या संरक्षणासाठी मादी बऱ्याचदा एकत्र येतात. बोंगो विविध प्रकारच्या आवाजाद्वारे संवाद साधू शकतात. या प्राण्यांचा विणीचा हंगाम साधारणपणे ऑक्टोबर ते जानेवारी या दरम्यान असते. नऊ महिन्यांचा गर्भधारणेचा काळ यांचा असतो.

    बोंगो हे प्राणी हरणांप्रमाणे डरपोक असतात. घाबरल्यानंतर हे प्राणी वेगाने दूर धावत जातात व झाडांमध्ये लपतात. एकदा त्यांना राहण्यासाठी सापडले की, ते सावध राहतात आणि अशा त्रासापासून दूर राहणे पसंत करतात. तसेच हे प्राणी खूप चपळ असतात. मादी एका वेळेला एकाच पिल्लाला जन्म देते.

    जेव्हा भक्षकांकडून त्यांना असुरक्षितता वाटते तेव्हा पिल्लाचे संरक्षण करण्यासाठी ते घनदाट वनस्पतीमध्ये त्याला घेऊन जातात आणि तेथे एक आठवडाभर शांतपणे पडून असतात. मादी आपल्या पिल्लांना दूध पाजते जेव्हा ते चांगले होते तेव्हा आईच्या मागे फिरते. सहा महिने दूध आईचे पिते त्यानंतर ते कळपामध्ये आई सोबत राहतात.

    Bongo Information In Marathi

    बोंगो या प्राण्याचे प्रकार :

    बोंगोच्या मुख्यतः दोन उपप्रजाती आढळून येतात. प्राणी पर्वत किंवा पूर्व बोंगो तसेच सकल किंवा पश्चिम बोंगो असे म्हटले जाते. वजनदार असून हे प्राणी रंगीत आफ्रिकन वन मृग आहेत. या प्राण्यांमध्ये नर आणि मादी दोघांनाही शिंगे असतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बोंगो हे चिखलांमध्ये भीजतात. त्यामुळे त्यांचे शरीर थंड राहते. हे प्राणी शाकाहारी असून ते पाने, फुले, झाडांची साल तसेच गवत यावर आपले जीवन जगतात.

    माउंटन बोंगो : माऊंटन बोंगो बऱ्याचदा यांना पूर्व बोंगो म्हणून देखील ओळखले जाते. म्हणजेच हे आफ्रिकेच्या पूर्व भागांमध्ये आढळून येतात तसेच हे प्राणी सखल प्रदेशात कमी आढळून येतात. केनियाच्या पर्वत भागांमध्ये त्यांची वास्तव्य मोठ्या प्रमाणात दिसते. हे प्राणी जाड व मोठे देखील असतात.

    वेस्टन बोंगो : हे बोंगोची प्रजाती मध्य आफ्रिकेच्या वुडलॅड सखल प्रदेशांमध्ये मुख्यतः आढळून येतात. हे प्राणी तिथे मोठ्या प्रमाणात आढळतात. ते सर्व आफ्रिकन वुडलैंड मृग प्रजातींपैकी सर्वात मोठे आणि रंगीबेरंगी प्राणी आहेत.

    दोन्ही प्रजातींची शिकार मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे आता हे प्राणी प्रजाती धोक्यात आले आहेत. तरी या प्राण्यांचे वर्गीकरण दोन प्रजातींमध्ये केल्या गेले आहेत. या प्राण्यांच्या संवर्धनासाठी त्यांच्या शिकारीवर तेथील सरकारने बंदी आणली आहे.

    Was this article helpful?
    YesNo
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleसील प्राण्याची संपूर्ण माहिती Seal Fish Information In Marathi
    Next Article ताकीन प्राण्याची संपूर्ण माहिती Takin Animal Information In Marathi
    आकाश लोणारे

    माझे नाव आकाश लोणारे आहे आणि माझे शिक्षण Master of Science in Zoology झालेले आहे. मला प्राण्यांविषयी लिहिणे, माहिती वाचणे, तसेच प्राण्यांची सेवा करणे खूप आवडते.

    Related Posts

    भूचर प्राणी

    उदमांजर (Asian Palm Civet) माहिती मराठीत | Civet Information In Marathi

    ऑक्टोबर 24, 2026
    भूचर प्राणी

    बिबट्या-मानव संघर्ष: बिबट्या दिसल्यास काय करावे? सुरक्षा उपाय आणि माहिती

    ऑक्टोबर 24, 2026
    भूचर प्राणी

    शेकरू माहिती मराठी | महाराष्ट्राचा राज्य प्राणी (Indian Giant Squirrel)

    ऑक्टोबर 23, 2026
    Add A Comment
    Leave A Reply

    pranijagat.com

    This website brings you informative, educational, and engaging content about animals, pets, birds, wildlife, livestock, and animal care. Explore a wide range of topics, including pet health, animal behavior, breed information, wildlife awareness, farming practices, and animal welfare.

    Email: contact@pranijagat.com

    LEGAL

    • ABOUT US
    • CONTACT US
    • PRIVACY POLICY
    • TERMS AND CONDITIONS
    • DISCLAIMER
    • DMCA POLICY

    POLICY

    • Fact Check Policy
    • GDPR Policy
    • Ethics Policy
    • Editorial Policy
    • DMCA Policy
    • Cookie Privacy Policy
    • Corrections Policy
    • California Consumer Privacy Act (CCPA)

    © Pranijagat.com • All rights reserved | GST : 06FASPK2002M1ZJ