Close Menu
    Facebook X (Twitter) Instagram
    • Home
    • उभयचर प्राणी
    • जलचर प्राणी
    • भूचर प्राणी
    • About Us
      • Contact Us
      • Privacy Policy
      • Disclaimer
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
    प्राणी जगतप्राणी जगत
    • Home
    • उभयचर प्राणी
    • जलचर प्राणी
    • भूचर प्राणी
    • About Us
      • Contact Us
      • Privacy Policy
      • Disclaimer
    Subscribe
    प्राणी जगतप्राणी जगत
    Home » भूचर प्राणी » लांडगा प्राण्याची संपूर्ण माहिती Wolf animal Information In Marathi
    भूचर प्राणी

    लांडगा प्राण्याची संपूर्ण माहिती Wolf animal Information In Marathi

    By आकाश लोणारेFebruary 21, 2024Updated:March 24, 2024No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email
    Wolf animal Information In Marathi
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    Wolf animal Information In Marathi लांडगा हा एक सस्तन प्राणी असून तो मांसाहारी प्राणी आहे. त्याचा समावेश त्यांनी वर्गाच्या कॅनिडी कुळामध्ये होतो. याचे शास्त्रीय नाव कॅनिस ल्युपस असे आहे. या प्राण्यांच्या वर्गामध्ये लांडगा, कुत्रा, खोकड व कोल्हा या सर्व प्राण्यांचा समावेश होतो. हे प्राणी ओसाड जागेमध्ये किंवा जंगलांमध्ये राहतात. लांडग्याच्या 40 उपप्रजाती आढळून येतात. त्यापैकी करड्या रंगाचा लांडगा हा सर्वात मोठा लांडगा मानला जातो. तसेच भारतीय लांडगा देखील याच प्रजातीमध्ये येतो.

    Wolf animal Information In Marathi

    लांडगा प्राण्याची संपूर्ण माहिती Wolf animal Information In Marathi

    लांडगा हा पाळीव कुत्र्यांचा पूर्वज आहे असे मानले जातात. यांच्यामध्ये खूप मोठी सामाजिक संरचना आढळून येते. हे एक दुसऱ्यासाठी स्वतःचा जीव सुद्धा देऊ शकतात. लांडगे खूप हुशार व बुद्धिमान असतात. तर चला मग या प्राण्यांविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

    प्राणीलांडगा
    वैज्ञानिक नावCanis lupus
    उंची८०-८५ सेमी
    वस्तुमान३०-८० किलो (पुरुष), २३-५५ किलो (महिला)
    लांबी१-१.६ मीटर (प्रौढ)
    संरक्षण स्थितीकिमान चिंता (लोकसंख्या स्थिर)
    अन्नहरीण, हरे, मूस, आर्क्टिक कोल्हा, एल्क, बायसन, अनगुलेट, बीव्हर, उंदीर

    लांडगा हा प्राणी कुठे राहतो?

    लांडगा या प्राण्याला मुख्यतः गटांमध्ये राहायला खूप आवडते. कुत्र्यांप्रमाणे एकत्रित गट करून हे प्राणी राहतात. लांडगा जंगलांमध्ये आढळून येतो. जंगलांमध्ये त्याचा एक प्रदेश ठरलेला असतो. बऱ्याचदा ते गुहेमध्ये सुद्धा आपले वास्तव्य करतात.

    वाळवंटी प्रदेश सोडला असता लांडगे इतर सर्वत्र आढळून येतात. तसेच दक्षिण पश्चिम आशियातील हिमालयाच्या दक्षिण भागापासून ते पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, संयुक्त अरब अमिराती, ओमान, सीरिया, इराक, टर्की येथे सुद्धा हे लांडगे आढळून येतात.

    लांडगा काय खातो?

    लाडगा हा प्राणी मांसाहारी प्राणी आहे. शेळी, घोडा, बैल, बकरी, उंदीर, घूस, मांजर, हरिण, ससे तसेच कोवडे मास खातो. लांडगा हा कळपाने राहतो, रात्रीच्या वेळी शिकारीला बाहेर पडतो. बऱ्याचदा शेळी व मेंढी यांचे कळप त्याना दिसले की, त्यामध्ये घुसून त्यांची शिकार करतो. लांडगा हा चपळ व खादाड प्राणी आहे.

    हा लोकवस्तीमध्ये जाऊन लहान मुलांना सुद्धा पळवून नेऊ शकतो. बऱ्याचदा भूकेपोटी लांडगे एकमेकांचा जीव सुद्धा घेतात. भुकेला लांडगा वाटेल त्या प्राण्यांवर पूर्णपणे हल्ला करतो व तो मरण्याची वाट न पाहता त्याचे लचके तोडून खातो.

    Wolf animal Information In Marathi

    लांडगा प्राणी कसा दिसतो?

    लांडगा या प्राण्याचे वर्णन कुत्र्यासारखे असते तसेच कुत्र्यासारखे हे प्राणी दिसायला असतात. झूबकेदार असे शेपूट असते. त्यांच्या तोंडाचा आकार निमुळता असतो. लांडग्याचे शरीर हे लांब पल्ल्याचे असते. भारतीय लांडगा आकाराने लहान असतो.

    त्याच्या शरीराची लांबी 90 ते 100 सेंटीमीटर असून त्याचे शेपूट चाळीस सेंटीमीटर लांब असते तसेच त्याच्या खांद्यापाशी उंची 75 सेंटीमीटर पर्यंत असते. भारताच्या मैदानी प्रदेशातील लांडगा भुरकट तांबूस व फिकट रंगाचा असून त्याच्या छातीचा व पोटाचा रंग पांढरा किंवा फिकट पांढरा असतो. त्याच्या अंगावर लहान मोठे काळे ठिपके दिसतात.

    खांद्यावर गळत रंगाचे व्ही आकाराची खून दिसते. त्याचा जबडा लांब असून त्याचे दात अतिशय तीक्ष्ण असतात. शरीरापेक्षा पाय फिकट रंगाचे असून पोटाकडचा भाग पूर्णपणे पांढरा असतो. लांडग्याच्या सवयी सर्वच सारख्या असतात. हे प्राणी टोळीने राहतात व टोळीने शिकार करतात.

    लांडगा या प्राण्याची जीवनपद्धती :

    लांडगा या प्राण्यांमध्ये नर आणि मादी हे आयुष्यभर सोबत राहतात तसेच त्यांच्या प्रजननाचा काळ हा पावसाळा संपत असताना सुरू होतो. मादीचा गर्भधारणेचा काळ 60 दिवसाचा असतो. पिल्ले डिसेंबर या महिन्यात जन्माला येतात. एकावेळी लांडगा मादीला तीन ते नऊ पिल्ले जन्माला येतात. जन्माच्या वेळी पिल्लांचे डोळे बंद असतात. ते 14 दिवसानंतर उघडतात.

    नर आणि मादी दोघे मिळून पिल्लांची देखभाल करतात. तीन वर्षात पिल्लांची पूर्ण वाढ होते. नैसर्गिक रित्या लांडगा हा 12 ते 15 वर्ष आयुष्य जगतो. भारतामध्ये लांडग्याच्या प्रजाती दिवसेंदिवस कमी होत होत्या.

    त्यामुळे 1972 सालच्या वन्यजीवांची संरक्षण या कायद्यानुसार भारतामध्ये लांडगे यांना पूर्णपणे संरक्षण देण्यात आलेले आहे तसेच त्याच्या शिकारीवर पूर्णपणे बंदी आलेली आहे.

    Wolf animal Information In Marathi

    लांडग्याचे प्रकार : लांडग्यांचे बरेच प्रकार पडतात. झूबकेदार असे शेपूट असते. त्यांच्या तोंडाचा आकार निमुळता असतो. लांडग्याचे शरीर हे लांब पल्ल्याचे असते. भारतीय लांडगा आकाराने लहान असतो. त्याच्या शरीराची लांबी 90 ते 100 सेंटीमीटर असून त्याचे शेपूट चाळीस सेंटीमीटर लांब असते तसेच त्याच्या खांद्यापाशी उंची 75 सेंटीमीटर पर्यंत असते. प्रजातीनुसार त्याच्या रंगांमध्ये विविधता पाहायला मिळते.

    लाल लांडगा : लाल लांडग्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे किंवा लाल लांडगा प्रजाती ही लुप्त होण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे या लांडग्यांना सुद्धा वन्यजीव संरक्षण कायद्याने संरक्षण दिले आहे. या लांडग्यांची उंची 53 ते 65 इंच असते तसेच त्याची शेपटी 37 सेंटीमीटर लांब असते.

    या लांडग्याचे वजन 20 ते 40 किलो पर्यंत असते. मादीपेक्षा नर थोडे जास्त जाड असतात. त्यांचे शरीर राखाडी, लालसर या रंगांमध्ये असते. हे लांडगे आग्नेय व दक्षिणमध्ये युनायटेड स्टेट मधील अटलांटिक महासागरापासून वितरित केले गेले होते.

    हे लांडगे त्यांच्या आहारामध्ये उंदीर, ससे, हरिण व इतर मांसधारी प्राणी खातात. लाल लांडग्याच्या शेवटच्या जंगली आश्रयापासून पांढऱ्या शेपटीचे हरणे मोठ्या प्रमाणात कमी झाले. ही लांडगे सुद्धा कळप करून राहतात. त्यांच्या कळपांमध्ये 4 ते 6 लांडग्यांचा एक गट असतो.

    आर्टिक लांडगा : ही एक लांडग्याची उत्तर अमेरिकेमध्ये आणि ग्रीनलँडच्या बर्फाळ प्रदेशामध्ये आढळणारी प्रजाती आहे. यांचा रंग पांढरा असतो तसेच त्यांच्या बर्फाच्छादित वातावरणात मिसळण्यास मदत करते. यांच्या अंगावर दाट केस असतात. जे थंडीपासून त्यांचे संरक्षण करते.

    ही प्रजाती नैऋत्य युनायटेड स्टेट्स आणि मेस्को येथे सुद्धा आढळून येते. हे लांडगे -40°c तापमानामध्ये देखील खुल्या भागात त्यांचे चेहरे शेपटीने झाकून आराम करतात. हे लांडगे त्यांच्या शरीरातील उष्णता वाचवण्यासाठी त्वचेजवळील रक्तप्रवाह कमी करतात व पायाच्या उष्णता शरीराच्या इतर भागांपासून स्वतंत्रपणे नियंत्रित केली जाऊ शकते.

    आयाळवाला लांडगा : हे लांडगे तिबेट, लडाख आणि कश्मीर यांच्या भागांमध्ये आढळून येतात तसेच भारतात सुद्धा ह्या लांडग्यांच्या प्रजाती आढळून येतात. हे लांडगे वसाड, कोरड्या, उघड्या मैदानी प्रदेशांमध्ये राहतात. हे लांडगे अरण्यात सुद्धा आढळून येतात. या लांडग्यांची लांबी 90 ते 105 cm असते तसेच त्याचे शेपूट 35 ते 40 सेंटीमीटर लांब असते.

    खांद्यापाशी त्यांची उंची 65-75 सेंटीमीटर लांब असते. सर्वात मोठे लांडग्यांची प्रगती कॅनडा आलास का येथे आढळून येते. हे लांडगे 32 किलोमीटर प्रतितास वेगाने धावू शकतात तसेच 56 किलोमीटर प्रतितास वेगाने सुद्धा त्यांना गरज पडल्यास जाऊ शकतात. हे लांडगे समूहाने राहतात त्यांच्या समूहाला गट असे म्हटले जाते.

    FAQ


    लांडग्याचे गुण काय आहेत?

    लांडगे जटिल, अत्यंत हुशार प्राणी आहेत जे काळजी घेणारे, खेळकर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुटुंबासाठी समर्पित आहेत 


    लांडगा हा कोणत्या प्रकारचा प्राणी आहे?

    राखाडी लांडगे कुत्र्यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत, ज्यात कुत्रे, कोल्हे, कोल्हे आणि कोयोट्स देखील समाविष्ट आहेत. राखाडी लांडगे कुत्र्यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत, ज्यात कुत्रे, कोल्हे, कोल्हे आणि कोयोट्स देखील समाविष्ट आहेत.

    लांडगा कुठे राहतो?

    राखाडी लांडगे उत्तर अमेरिका, युरोप आणि आशियासह परिवर्ती श्रेणी आहेत. अधिवासांची विस्तृत श्रेणी ज्यामध्ये लांडगे वाढू शकतात त्यांची प्रजाती म्हणून अनुकूलता दर्शवते आणि त्यात समशीतोष्ण जंगले, पर्वत, टुंड्रा, तैगा, गवताळ प्रदेश आणि वाळवंट यांचा समावेश होतो.


    लांडगे मैत्रीपूर्ण असू शकतात?

    सर्वसाधारणपणे, त्यांच्या अनुभवाच्या आधारावर, पाळीव लांडगे काटेकोरपणे “एक-पुरुष कुत्रे” असतात . ज्या माणसाने त्यांना वाढवले ​​आहे त्या माणसाशी किंवा अगदी त्याच्या संपूर्ण कुटुंबासह, जर त्यांना खायला दिले असेल आणि त्यांची काळजी घेतली असेल तर ते विश्वासू आणि खेळकर असू शकतात, परंतु ते अनोळखी लोकांच्या उपस्थितीत संशयास्पद आणि डरपोक असतात.


    सर्वात जास्त लांडगे कुठे राहतात?

     अमेरिका, युरोप आणि आशियाचे काही भाग ज्यात लांडग्यांची मोठी लोकसंख्या आहे ते मुख्यतः पूर्व युरोप, उत्तर आशिया, अलास्का आणि कॅनडाच्या काही भागांपुरतेच मर्यादित आहेत.

    Was this article helpful?
    YesNo
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleहिम बिबट्या प्राण्याची संपूर्ण माहिती Snow leopard Information In Marathi
    Next Article ध्रुवीय अस्वल प्राण्याची संपूर्ण माहिती Polar bear Animal Information In Marathi
    आकाश लोणारे
    • Website

    माझे नाव आकाश लोणारे आहे आणि माझे शिक्षण Master of Science in Zoology झालेले आहे. मला प्राण्यांविषयी लिहिणे, माहिती वाचणे, तसेच प्राण्यांची सेवा करणे खूप आवडते.

    Related Posts

    भूचर प्राणी

    बारशिंगा प्राण्याची संपूर्ण माहिती Reindeer Animal Information In Marathi

    February 24, 2024
    भूचर प्राणी

    मुंगूस प्राण्याची संपूर्ण माहिती Mongoose Animal Information In Marathi

    February 21, 2024
    भूचर प्राणी

    सायाळ प्राण्याची संपूर्ण माहिती Sayal Information In Marathi

    February 21, 2024
    Add A Comment
    Leave A Reply

    pranijagat.com

    LEGAL

    • PRIVACY POLICY
    • TERMS AND CONDITIONS
    • DISCLAIMER
    • DMCA POLICY

    © 2025 ALL RIGHTS RESERVED PRANIJAGAT