Snow leopard Information In Marathi आज आपण जगामध्ये जागतिक दिन साजरा करत असतो, त्यामध्येच हिम बिबट्या जागतिक दिन साजरा करतो कारण त्यांच्या भागांमध्ये मानवी घुसखोरी आणि त्यांच्या कातडीसाठी हिम बिबट्याची केली जाणारी हत्या, यामुळे आता या प्राण्यांची संख्या खूपच कमी राहिली आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांना जगण्यासाठी मोहिमे राबवली जातात तसेच सरकारचे विशिष्ट प्रयत्न सुरू आहेत. हिम बिबट्याचे वास्तव हे हिमाचल प्रदेशामध्ये आढळून येते. त्या व्यतिरिक्त हे प्राणी बर्फाळ प्रदेशांमध्ये आढळून येतात; परंतु आता त्यांची संख्या खूप दुर्मिळ झाली आहे.
हिम बिबट्या प्राण्याची संपूर्ण माहिती Snow leopard Information In Marathi
हिम बिबट्या हा हिमाचल प्रदेशाचा राज्य प्राणी आहे. या प्राण्याला इंग्लिश मध्ये स्नो लेपर्ड असे म्हणतात. 23 ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय स्नो लेपर्ड दिवस साजरा केला जातो. हिम बिबट्याच्या संवर्धनासाठी जगभरात जागरूकता पसरणे हा त्या मागचा उद्देश आहे.
वंश | पृष्ठवंशी |
जात | सस्तन |
वर्ग | मांसभक्षक |
कुळ | फेलिडे |
उपकुळ | पँथेरिने |
जातकुळी | Uncia |
हिम बिबट्या हा मार्चार कुळातील अत्यंत दुर्मिळ असा एक प्राणी आहे. हा प्राणी मुख्यतः हिमालयातील उत्तुंग पर्वतरांगांमध्ये आढळून येतो. हा बिबट्या इतर बिबट्यांपेक्षा आकाराने लहान असतो. परंतु त्याची शेपटी त्या मनाने मोठी असते. साधारणतः लांबी 100 सेंटीमीटर असते. हे प्राणी समुद्रसपाटीपासून 12000 फुटापर्यंत आढळतात. तर चला मग या प्राण्यांची सविस्तर माहिती पाहूया.
हिम बिबट्या कुठे आढळून येतो?
हिम बिबट्या हा मध्य आणि दक्षिण आशियामधल्या अफगाणिस्तान, कजाकिस्तान, उसबेकिस्तान, भारत, रशिया, चीन, भूतान, नेपाळ, पाकिस्तान आणि मंगोलिया देशांमध्ये हिम बिबट्या आढळून येतो. हा प्राणी अत्यंत दुर्मिळ परिस्थितीत आढळतो. त्यामुळे या प्राण्यांची संख्या सुद्धा खूपच कमी झाली आहे. हिमालयात हे बिबटे साधारणता 12 ते 16 हजार फूट उंचीवर आढळून येतात. तर मंगोलिया मध्ये हे बिबटे तीन हजार ते चार हजार फुटांवर गवताळ प्रदेशात आढळून येतात.
हिम बिबट्या काय खातो?
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उंच कुरणांनमध्ये चरायला जेव्हा गुराख्यांकडून पाळीव बकऱ्या येतात तेव्हा त्यावर ताव मारण्यासाठी थंडीमध्ये ते सहा हजार फुटांपर्यंत खाली उतरतात व इतर मासभक्षी प्राण्यांप्रमाणे त्यांच्या हालचाली आणि भक्ष्याच्या हालचालींवर सुद्धा ते अवलंबून असतात.
त्यांच्या आहारामध्ये रानमेंढ्या, बकऱ्या, कृतक प्राणी, कस्तुरी मृग इत्यादी प्राण्यांचा समावेश असतो. हिम बिबटे हे मांसाहारी प्राणी असल्यामुळे ती हिमालयीन भागामध्ये आढळणारे माकडे, पक्षी, उंटांची पिल्लं, घोडे यांची सुद्धा शिकार करतात. हिम बिबटे हे त्यांच्या वजनाच्या दुप्पट किंवा त्याहून भिन्न असणारे चार पायी प्राणी खातात. त्या व्यतिरिक्त जंगली मांजरांची सुद्धा हे प्राणी शिकार करतात.
हिमा बिबट्या त्यांची शारीरिक वर्णन :
हिम बिबट्याच्या अंगावरील केस हे पांढऱ्या रंगाचे आणि राखाडी रंगाचे असतात. त्याच्या डोक्यावर आणि मानेवर कारड्या रंगाचे डाग असतात तसेच हिम बिबट्याची शेपटी ही झुबकेदार असते. त्याचे डोळे फिकट हिरव्या रंगाचे किंवा राखाडी रंगाचे असतात. त्याच्या शरीरावर केस ही जड आणि पाच ते बारा सेंटीमीटर लांब असतात. हिम बिबट्याचे शरीर हे पॅंथरा या जातीच्या इतर मांजरीन पेक्षाही लहान असते.
हिमबिबट्याची शेपटी 80 ते 105 सेंटिमीटर लांब असते. हिम बिबट्याचे वजन 22 ते 55 किलो पर्यंत असून त्याचे दात 2.6 मिमी लांबीचे असतात. तसेच हे पॅथेरा जातीच्या इतर प्रजातींपेक्षा मात्र पातळ असतात. त्यांच्या मोठ्या नासिक असतात, त्यांचा उपयोग जास्त प्रमाणात हवा आत घेण्याबरोबरच थंड असलेली हवा गरम करण्यासाठी होतो.
हिम बिबट्याच्या लहान मुलकारकरांमुळे शरीरातील उष्णतेचे नुकसान कमी होते. त्यांचे पसरत पंजे बर्फावर चालण्यास त्यांना मदत करतात तसेच त्यांची लांब शेपटी खळकाळ प्रदेशांमध्ये त्यांची संतुलन राखण्यासाठी उपयोगी पडते.
हिम बिबट्याचे जीवन प्रक्रिया :
हिमबिबटे हे दोन ते तीन वर्षांमध्ये परिपक्व होतात. तसेच हिवाळ्याच्या शेवटच्या काळामध्ये ते प्रजनन करतात. मादीचा गर्भधारणेचा कालावधी हा 90 ते 100 दिवसांचा असतो. या दिवसांच्या नंतर ती एक ते पाच पिल्लांना जन्म देते तसेच त्यांच्या अंगावर ठिपके असतात. हे पिल्ले मांजरीच्या पिल्लांप्रमाणे दिसतात. जन्मता या पिल्लांचे डोळे बंद असतात.
या पिल्लांचे संरक्षण मादी करते. दोन ते चार महिने मादी आपल्या पिल्लांना दूध पाजते तसेच त्यांना शिकार करणे व इतर सर्व काही गोष्टी शिकवते. ही पिल्ले 18 महिन्यांपर्यंत आईकडे राहतात. नंतर तरुण झाल्यावर हे पिल्ले आपापल्या पद्धतीने जीवन जगतात. हे प्राणी 15 ते 18 वर्षे जगतात परंतु हिमबिबटे बंदीवासामध्ये 25 वर्षापर्यंत जगू शकतो.
हिम बिबट्याचे संवर्धन :
हिमबिबट्या आता मात्र खूप कमी प्रमाणात दिसून येतो. त्यांच्या अस्तित्वाला खूप मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण झालेला आहे. मानव त्याच्या कातडी करिता तसेच त्याचे हाड मिळवण्यासाठी त्याची शिकार करतो. त्याचे फर आणि शरीराच्या अवयवांसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर हिम बिबट्यांची शिकार केली जाते. त्यामुळे हीम बिबट्या यांना संरक्षण देणे कायद्याने आवश्यक आहे. त्यामुळे या प्राण्यांची संख्या वाढेल व शिकार केली जाणार नाही.
हिम बिबट्या वाचवण्यासाठीची मोहीम :
हिम बिबट्या वाचवण्यासाठी जगामध्ये मोहीम राबविण्यात येत आहे. कारण जगामध्ये हिमा बिबट्यांची संख्या खूपच कमी आहे. त्यांच्या भागामध्ये मानवाने घुसखोरी करून त्यांच्या कातडीसाठी या प्राण्यांची हत्या केली आहे. भारतामध्ये सुद्धा हिम बिबट्यांना वाचवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. हिमालयीन राज्यांमध्ये सुरक्षित हिमालय प्रकल्प सुरू करण्यात आला.
हिमाचल प्रदेशा व्यतिरिक्त उत्तराखंड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, जम्मू-काश्मीरमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या राज्यांमध्ये हिम बिबट्या वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहे. हिमाचल प्रदेशमध्ये त्यांना वाचवण्यासाठी स्वयंसेवी संस्था जोडण्यात आल्या आहेत.
वन्यजीव विभागाच्या म्हणण्यानुसार सुरक्षित हिमालय प्रकल्प 2018-19 मध्ये सुरू झाला आणि जो 2024 पर्यंत सुरू राहणार आहे. यासाठी 130 कोटी रुपये देण्यात आले होते तसेच 21 कोटी रुपये अनुदान म्हणून या राज्यांना दिले जाणार आहे. तर 109 कोटी रुपये संयुक्त राष्ट्र विकास केंद्र आणि राज्य सरकार उचलणार आहे.
केंद्राच्या या प्रकल्पाच्या मदतीने सात ठिकाणी हिम बिबट्याचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. हा दुर्मिळ वन्य प्राणी लाहोरच्या अनेक भागांमध्ये पाहायला मिळतो. हिम बिबट्यांची संख्या कमी झाली आहे, त्यामुळे सध्याच्या पिढीतील बहुतांश लोकांसाठी हिम बिबट्या पाहणे हे स्वप्नवतच राहिले असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
हिमाचल प्रदेशमध्ये हिम बिबट्यांची सध्या 100 पेक्षा संख्या जास्त नाही. त्यामुळे या सुंदर प्रजातीला वाचवण्यासाठी बरेच सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.
FAQ
हिम बिबट्याचे आयुष्य किती असते?
10 ते 12 वर्षे
हिम बिबट्या मिठी मारतात का?
आमच्या हिम बिबट्यांना मिठी मारणे आवडते, हे असे आहे. ते एका संध्याकाळी उठतात!
हिम बिबट्या चांगला पाळीव प्राणी बनवेल का?
हिम बिबट्याला पाळीव प्राणी म्हणून ठेवणे खरोखरच अनुचित आहे . जरी तो लोकांप्रती आक्रमक नसला तरी, हिम बिबट्या पाळीव प्राणी म्हणून घराभोवती ठेवण्यासाठी खूप धोकादायक असावा. ते धोक्यात आहे, आणि एक ठेवण्याविरुद्ध कायदे आहेत.
किती हिम बिबट्या शिल्लक आहेत?
हिम तेंदुए मध्य आशियातील पर्वतांमध्ये राहतात. त्यांच्या अधिवासाची श्रेणी 2 दशलक्ष किमी 2 (अंदाजे ग्रीनलँड किंवा मेक्सिकोचा आकार) व्यापलेली असताना, जंगलात फक्त 3,920 ते 6,390 हिम बिबट्या शिल्लक आहेत.