वाघ प्राण्याची संपूर्ण माहिती Tiger Information In Marathi

Tiger Information In Marathi वाघ आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. वाघाला जवळून जाऊन पहायचे धाडस मात्र कोणामध्ये होत नाही. वाघ हा मांजर कुळातील सर्वात मोठा प्राणी असून तो जंगलातील गुहेमध्ये राहतो, तसेच जगातील 70 टक्के वाघ भारतात आहेत. वाघ हा शौर्याचे प्रतीक म्हणून भारतात वावरले जाते. 2010 पासून जगभरात 29 जुलै हा जागतिक व्याघ्र दिन म्हणून देखील पाळला जातो. आता भारतात वाघ हा संरक्षित प्राणी झाला असून त्याची शिकार करणे दंडनीय अपराध देखील आहे. तर चला मग आज जाणून घेऊया वाघा विषयी सविस्तर माहिती.

Tiger Information In Marathi

वाघ प्राण्याची संपूर्ण माहिती Tiger Information In Marathi

वाघ कुठे राहतो?

तसे पाहिले तर वाघ हा जंगलांमध्ये राहतो परंतु वाघाचे माहेरघर हे भारत देश मानला जातो. आजही भारतातील जंगलांमध्ये कित्येक वाघांच्या प्रजाती पाहायला मिळतात. वाघांच्या बऱ्याच उपजाती वेगवेगळ्या देशातून भारतामध्ये आलेले आहेत.

वाघाची लांबी सर्वसाधारण ६ ते ७ फूट
वजन१०० ते २०० किलो
रंग नारंगी पिवळा किंवा पांढरा व अंगावर गडद काळ्या रंगाचे पट्टे 
वंशकणाधारी
जातसस्तन
वर्गमांसभक्षक
कुळमार्जार कुळ
जातकुळीपँथेरा

तसेच बऱ्याच लोकांनी शिकार व जंगलांमध्ये वस्ती केल्यामुळे त्यांच्या काही जाती नामशेष झाल्या आहेत. जंगली वाघ हा भारत, ब्रह्मदेश, थायलंड, चीन व रशिया इत्यादी देशांमध्ये आणि प्राणी संग्रहालयामध्ये आज आपल्याला पाहायला मिळतो. जंगली वाघांची संख्या इतर वाघापेक्षा सर्वात जास्त आहे.

वाघ कसा दिसतो ?

वाघ जरी हा मांजर कुळातील सर्वात मोठा प्राणी असला तरी सुद्धा वाघाचा आकार हा बरेच पैकी मोठा असतो. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची राहण्याची खाण्यापिण्याची सवय व वातावरणाचा परिणाम यामुळे त्यांच्या वजनामध्ये किंवा त्यांच्या प्रतिकृती वर परिणाम होत असतो.

आपण सायबेरियन वाघ पाहिला तर हा वाघ आकाराने खूपच मोठा असतो. त्या मानाने भारतीय वाघ लहान असतो. सायबेरियन वाघाची लांबी 3.5 मीटर असते तर त्याचे वजन 300 किलो पर्यंत असते. तर भारतीय वाघाचे वजन 100 ते 180 किलो पर्यंत भरते तसेच मादी नरापेक्षा लहान असते. सुमात्रा बेटामधील वाघ हा अजूनही लहानच आहे.

तुम्हाला जर वाघाला ओळखायचे असेल तर वाघाच्या अंगावरचे पट्टे तांबूस रंगाचे असतात. प्रत्येक वाघाच्या अंगावरील पट्टे हे वेगळे असतात. वाघाच्या अंगावरील या तांबूस रंगाच्या पट्ट्यांची संख्या 100 पर्यंत असू शकते. वाघ हा प्राणी मांसाहारी असून वाघाला दोन कान, चार पाय आणि एक शेपूट असतं. वाघाचा रंग पिवळा आणि तपकिरी यांचे मिश्रण असते.

वाघाचे दात अतिशय तीक्ष्ण व टोकदार असतात. वाघाचे पंजे खूपच मजबूत असतात. त्याच्या पंजावरून वाघाची गणना सुद्धा केली जाते. वाघाचा पंजा हा वाघाच्या आकारमानाने खूप मोठा व अतिशय ताकदवान असतो. त्याचा व्यास सहा ते आठ इंच एवढा भरतो. तुम्हाला जर जंगलामध्ये वाघ जरी दिसला नसेल तर तो फिरला असल्याचे तुम्हाला ठसे दिसू शकतात.

वाघ शिकारीसाठी त्याच्या जबड्याचा व पंजाचा उपयोग करत असतो. जबड्याची ताकद भक्षांमध्ये सुळे रुतवण्यासाठी तसेच पक्षाला पकडून ठेवण्यासाठी करतो. तसे पाहिले तर वाघाची सर्वात जास्त ताकद त्याच्या जबड्यात असते.

वाघाची जीवन पद्धती :

वाघाच्या मादीला वाघीण असे म्हटले जाते तर वाघाच्या पिल्लांना बछडे म्हणतात. वाघाचे जीवन पद्धती ही त्यांच्या क्षेत्रफळात सीमित असते. त्याच्या हद्दीमध्ये वाघ दुसऱ्या वाघांना येऊ देत नाही. वाजलेला एका वेळी दोन ते तीन बछडे होऊ शकतात, ती अगदी लहान मांजरीच्या पिल्लांसारखी दिसतात.

वाघ हा पूर्णपणे मांसाहारी प्राणी असल्यामुळे तो हरीण, पक्षी, रान डुक्कर, वानर, सांबर, ससा यांसारखे प्राण्यांची शिकार करतो आणि त्याला आपले खाद्य बनवतो.

Tiger Information In Marathi

वाघीण आपल्या बछड्यांना शिकार कशी शोधायची, कशी पकडायची, दबा कसा धरायचा, हल्ला कसा करायचा इ. सर्व गोष्टी शिकवते. वाघ आपली शिकार खाण्या अगोदर त्याचे पोट चिरून त्याचे आतडे बाहेर काढतो व सुरुवातीला त्यातील मसल्स खातो व नंतर शिकार खाणे पसंत करतो. तसेच वाघ एकटा राहणारा प्राणी असून तो त्याच्या क्षेत्रफळात अनेक मागील ना सामावून घेतो.

वाघांची भांडण हे जीवघेणी असू शकते. बऱ्याचदा वाघ त्याच्या पिल्लांची देखील अतिक्रमण सहन करत नाही आणि त्यांना देखील मारतो परंतु बऱ्याचदा नर वाघाने आपल्या बछड्यांचे संरक्षण देखील केल्याचे दिसून येते.

भारतीय संस्कृती वाघाचे महत्त्व :

भारतीय संस्कृतीत वाघाचे बरेच महत्व आहे. वाघ भीतीदायक असला तरी सुद्धा लहान मुलांना जंगलाचा राजा म्हणून वाघाची ओळख करून देतात.

वाघ हा शौर्य आणि राजबिंडेपणाचे तसेच सौंदर्याचे व क्रूरतेचे प्रतीक आहे. भारतीय संस्कृतीत माता- पार्वतीचा अवतार असलेली देवी महिषासुर मर्दिनी व तिच्या अनेक रूपांचे वाहन वाघ बनला आहे. आदिवासी जमातीमध्ये वाघाचा खूप होऊ नये म्हणून वाघालास ते देव मानतात व त्याची पूजा करतात. वाघ असलेल्या जंगलांमध्ये वाघांना समर्पित एखाद छोटीशी देऊळ बांधतात व त्याची पूजा करतात. तसेच वाघ महाराष्ट्राचे राजकीय पक्षांचे प्रतिकात्मक चिन्ह देखील आहे.

वाघाचे महत्त्व :

निसर्गसाकळीमध्ये वाघाचे महत्त्व सर्वात मोठे आहे.वाघ हे अन्नसाखळीतील सर्वात महत्त्वाचा प्राणी आहे. बरेच प्राणी शिकार करून जगतात. तर काही प्राणी गवत खाऊन आपला उदरनिर्वाह करतात. परंतु तृणभक्षक प्राण्यांची संख्या जर भराभर वाढली तर त्याचा परिणाम थेट निसर्गावर होतो. वाघांचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे प्राण्याची संख्या नियंत्रणात ठेवणे आहे.

जर निसर्गसृष्टीतील प्राण्यांची संख्या अनियंत्रित झाली तर निसर्गचक्र बिघडून जाईल व जंगल कमी होईल. जे मानवाच्या दृष्टीने देखील फायद्याची नाही. जंगलात वाघ असणे हे जंगलाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण वाघाची भीती सर्वांमध्ये राहते. त्यामुळे जंगलात लाकड तोडण्यासाठी सुद्धा नको जात नाही व दंगल सुरक्षित राहते. आज आपण पाहतो बऱ्याच ठिकाणी वृक्षतोडीमुळे जंगले नष्ट झाले आहेत. त्याचा परिणाम म्हणजे तापमान वाढ झाली आहे.

Tiger Information In Marathi

वाघांचे प्रकार :

वाघांचे प्रकार व उपकार आपल्याला पाहायला मिळतात. वाघांच्या बऱ्याच जाती नामशेष झालेल्या आहेत.

बंगाल वाघ : हा वाघ रॉयल बंगाल बाग किंवा इंडियन वाघ या नावाने ओळखला जातो. तसेच ही वाघ भारत, भूतान, नेपाळ आणि बांगलादेशमध्ये सुद्धा आढळतात.

मल्यान वाघ : हे वाघ मलेशिया आणि थायलंड देशांमध्ये असून त्यांची संख्या दरवर्षी कमी होत चाललेली आहे.

सुमात्रन वाघ : हे वाक केवळ इंडोनेशियन सुमित्रा येथेच आढळतात हे इतर जातीतील वाघापेक्षा आकाराने लहान असून बंगाल किंवा सायबेरियन वाघाच्या अर्धा भाग एवढाच त्यांचा आकार असतो.

सायबेरियन वाघ : या वाघाला बरीच नाव आहे जसे अमर वाघ मंचुरियन वाघ कोरियन वाघ आणि असुरियन वाघ. हे वाघ केवळ रशिया, कोरिया व चीन या देशांमध्येच आढळतात.

दक्षिण चीन वाघ : या जातीचे वाघ मध्य आणि पूर्वचीन मध्ये आढळतात तसेच दक्षिण चीन वाघ अत्यंत दुर्मिळ प्रजाती आहे तसेच हे नामशेष झाल्याची नोंद आहे. या जातींचे 30 ते 40 वा केवळ प्राणी संग्रहालयांमध्ये पाहायला मिळतात.

बाली वाघ : बाली वाघाच्या प्रजाती पूर्णपणे नामशेष झाल्या आहेत. हा वाघ इंडोनेशिया या बेटावर आढळत होता.

चायनीज वाघ : हे वाघ थायलंड व चीन या देशांमध्ये आढळतात. या वाघांना कार्बेटचे वाघ म्हणून देखील ओळखले जाते.

वाघांची संख्या कमी होण्या मागची कारणे :

वाघ कमी होण्यामागचे कारण आपण पाहिली तर तशी खूप कारणे आहेत. जसे जंगल तोड, अवैध शिकार, मानवी वस्ती तसेच वाढत्या शहरीकरण, जंगले कमी झाल्यामुळे, जंगलांमध्ये वणवे, महापूर इत्यादी विचार वाघांना नामशेष होण्यापासून वाचवायचे असेल तर आपल्याला समाज प्रबोधन करणे गरजेचे आहे. लोकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. नाहीतर आपल्या पुढच्या पिढ्यांना वाघ केवळ फोटोमध्येच पाहायला मिळेल.

FAQ:


वाघाचे वजन किती असते?

१०० ते २०० किलो

वाघाचे नैसर्गिक आयुष्य किती असते?

वाघांचे नैसर्गिक आयुष्य वीस वर्षांपर्यंत असते

सर्वात जास्त वाघ कुठे आहे?

देशात सर्वाधिक वाघ कर्नाटकमध्ये असून, त्यापाठोपाठ मध्य प्रदेशचा क्रमांक लागतो. मध्य प्रदेश, कर्नाटक आणि उत्तराखंड या तीन राज्यांत मिळून १४९२ वाघ आहेत, अशी माहिती या अहवालात देण्यात आली आहे.


वाघांची जीवनशैली काय आहे?

वाघ एकटे राहतात आणि मुख्यतः रात्री फिरतात . खाण्यासाठी मोठे प्राणी असल्यास ते आठवड्यातून दोनदा मारतात, परंतु लहान प्राणी उपलब्ध असल्यास त्यांना अधिक वेळा मारावे लागते. ते हरीण, जंगली डुक्कर आणि जंगली बैल पसंत करतात, परंतु सर्व प्रकारचे सस्तन प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी आणि मासे देखील खातात.

Was this article helpful?
YesNo

Leave a Comment