Panmanjar Animal Information In Marathi पाण मांजर मुस्टीलीडी कुळातील स्तनी वर्गाचा मासाहारी प्राणी आहे. हा प्राणी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड अशा सागरांनी वेढलेले देश सोडून जगात इतर सर्वत्र आढळून येतो. या प्राण्याच्या 13 जाती असून भारतामध्ये तीन जाती आढळतात. पान मांजरे आपले भक्षक प्रामुख्या नदीतील मासे खेकडे पकडून खातात. यांची बिळांमध्ये राहण्याची व्यवस्था स्वतः करतात. या मांजरी बऱ्याचदा किनाऱ्यावरील दगडांच्या मोठ्या खाचांमध्ये सुद्धा आपले घर बनवतात.
पाणमांजर प्राण्याची संपूर्ण माहिती Panmanjar Animal Information In Marathi
या मांजरा मोठ्या विस्तारलेल्या झाडांच्या छायेत सुद्धा राहतात. पाणमांजरी तसं पाहता मासे, खेकड्यांच्या व्यतिरिक्त बेंडूक नदीतील साप सरडे कासव तसेच नदी काठावरील पक्षी सुद्धा खातात. या मांजरांचे मोठे कळप असते. नदीमध्ये किंवा तलावामध्ये मोठ्या चपळतेने माशांचा पाठलाग करतात व त्यांची शिकार करतात. पाण मांजर सहसा कोणाच्याही हाती लागत नाही. बऱ्याचदा या मांजरी खूपच हुशार असतात. पाणमांजर सामाजिक प्राणी असल्यामुळे तो टोळीमध्ये फिरतो. पाणमांजर देखील नदी परिसंस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे.
ओटरचे प्रजाती | युरोशियन ओटर |
वैज्ञानिक नाव | लूट्रा लूट्रा |
वासस्थान | नद्या, तलाव, तटबंदी |
विस्तार | युरोप, अशांतर एशिया |
आहार | मासे, मेंढ़ी, जंगली भाकरी, छोटे प्राणी, पक्षी |
पाणमांजर कुठे आढळते?
पाण मांजरी या नद्या, सरोवरे, तलाव, कालवे किंवा दलदलीच्या ठिकाणी, जेथे लपण्यासाठी जागा असेल, खारफुटीची वने व दगडांच्या ढिगारे असतील अशा नदीकिनारी आपले वास्तव्य करतात. यांच्यामध्ये नर, मादी व पिल्ले एकत्रपणे राहतात. शेपटीच्या बुडाशी असलेल्या ग्रंथीतून विशिष्ट गंध सोडून ते त्यांच्या राहण्याची जागा निश्चित करतात.
पाणमांजर कशी दिसते?
पाण मांजर सामान्यपणे भारतामध्ये आढळते. तिची कातडी गुळगुळीत असते तसेच ही पाण मांजर हे सर्वात मोठे असून तिचे वजन सात ते अकरा किलोग्रॅम असते. या मांजरीची लांबी एक ते दीड मीटर असते तसेच तिची शेपटी 45 सेमी लांब असते. तिच्या पाठीवर केस असून ते मऊ असतात. तसेच या पान मांजरीचा रंग पिवळट तपकिरी असतो. पोटाकडे तो फिकट करडा असतो.
तिच्या तोंडावर केस नसतात, शरीर लांब व निमुळत्या आकाराचे असते; पण मांजरीचे पाय व पणजी मजबूत असतात आणि बोटांना नखे असतात. त्यांच्या पायाचा उपयोग पोहण्यासाठी करतात. विशिष्ट स्नायूंच्या साहाय्याने नाक व कान बंद करून ते पाण्यामध्ये उडी मारून भक्ष पकडतात.
पाण मांजरी या पाण्यामध्ये उडी मारल्यानंतर तीन ते चार मिनिटे पाण्यामध्ये राहू शकतात. हे प्राणी शिट्टी मारल्यासारखा आवाज काढतात. भारतामध्ये युरेशियन पाण मांजरे आढळतात. तसेच छोटी पानमांजरी सुद्धा आढळतात. युरेशियन पान मांजरांचा पाठीकडचा रंग तपकिरी असतो.
तसेच त्यांच्या पोटाकडे करडे रंगाचे छोटे छोटे बारीक केस असतात. त्यांच्या अंगावरील केस दाट असतात. त्यांची तोंडही रुंद असून मान आखूड असते. नाकांवर मात्र केस नसतात युरेशियन मांजर ओळखता येते. तिच्या शरीराची लांबी 50 ते 90 सेमी असते. तिचे शेपूट 30 ते 40 सेमी लांब असते. या मांजरीचे वजन नऊ ते दहा किलो असते.
पाणमांजर काय खाते?
पान मांजर त्यांच्या आहारामध्ये मुख्यतः मासे खातात. याशिवाय हे मांजरे उंदीर, पानसाप, बेंडूक, छोटे पक्षी सुद्धा खातात. पान मांजरे एकत्रितपणे राहुन माशांच्या थव्याचा पाठलाग करून त्यांना पकडतात व खातात.
पाणमांजरीचे जीवन :
पाणमांजर सामाजिक प्राणी असल्यामुळे तो टोळीमध्ये फिरतो. पाणमांजर देखील नदी परिसंस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. पान मांजर जास्तीत जास्त कालावधी त्यांचा पाण्यामध्ये जातो. त्यांच्या विनीचा हंगाम हा सप्टेंबर ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत असतो.
या महिन्यांमध्ये मादी हे एका ठिकाणी स्थायिक होतात व तात्पूरे त्यांची घरे करतात. या मांजरीचा गर्भधारणेचा कालावधी हा 60- 65 दिवसांचा असतो. मादी एका वेळेस 2 ते 5 पिल्लांना जन्म देते. त्यानंतर नर आयुष्यभर मादीशी एकनिष्ठ राहतो, दोघेही आयुष्यभर सोबत राहतात.
पिल्ले दोन महिन्यानंतर स्वतंत्रपणे होऊ शकतात तसेच एका वर्षानंतर पिल्ले स्वतंत्र राहू लागतात. पाणमांजरीचे आयुष्य हे चार ते दहा वर्ष असते. पाण मांजरांचा सर्वात मोठा शत्रू मगर हा आहे. मगर पाण मांजरांची शिकार करतो.
पान मांजर त्यांच्या आहारामध्ये मुख्यतः मासे खातात. याशिवाय हे मांजरे उंदीर, पानसाप, बेंडूक, छोटे पक्षी सुद्धा खातात. पान मांजरे एकत्रितपणे राहुन माशांच्या थव्याचा पाठलाग करून त्यांना पकडतात व खातात. पाणमांजरी हे प्राणी धोक्यात आहे.
मानवाने त्यांची मोठ्या प्रमाणात स्वीकार केले आहे. भारतामध्ये 1972 च्या वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार पाणमांजरांना पूर्णपणे संरक्षण दिले आहे. पान मांजरांची संख्या वाढावी यासाठी त्यांना बंदिस्त अधिवासात ठेवून पैदास करणे यशस्वीरित्या पूर्ण प्रयत्न झाले आहेत.
या व्यतिरिक्त पाकिस्तान व बांगलादेश येथे पाण मांजरीचा उपयोग करून माशाचे कळप जाळ्याकडे नेण्याचे कार्य पाणमांजरी करतात. यांचे आधी पाण मांजरांना प्रशिक्षण दिले जाते त्यानुसारच ते कार्य करतात.
पाणमांजरीचे प्रकार :
पाण मांजरीचे विविध प्रजाती आहे. त्यांच्या प्रजातीनुसार त्यांच्यामध्ये विविधता पाहायला मिळते. तर चला मग जाणून घेऊया पान मांजरीचे काही प्रकार.
युरेशियन पाणमांजर : युरेशियन पाणमांजर ही प्रजाती भारतामध्ये आढळताते. तसेच छोटी पानमांजरी सुद्धा आढळतात. युरेशियन पाण मांजरांचा पाठीकडचा रंग तपकिरी असतो. तसेच त्यांच्या पोटाकडे करडे रंगाचे छोटे छोटे बारीक केस असतात.
त्यांच्या अंगावरील केस दाट असतात. त्यांची तोंडही रुंद असून मान आखूड असते. नाकांवर मात्र केस नसतात. युरेशियन पाण मांजर सहज ओळखता येते. तिच्या शरीराची लांबी 50 ते 90 सेमी असते. तिचे शेपूट 30 ते 40 सेमी लांब असते. या मांजरीचे वजन नऊ ते दहा किलो असते.
लहान नखीचे पाणमांजर : लहान नकीचे पान मांजर हे भारतात उत्तरेकडे तसेच हिमालयीन प्रदेशात आढळते. त्यांच्या शरीराची एकूण लांबी ही 75 ते 100 cm असून त्यांची शेवटची सेंटीमीटर पर्यंत लांब असते. या प्रजातीच्या पाण मांजरीचे वजन एक ते पाच किलो पर्यंत असते.
डोके चपटे असून त्याची मान आखूड व जाड असते. त्यांचा रंग तपकिरी करडा असते. त्यांच्या पायांच्या बोटांची नखे जाड असून त्यांचा उपयोग पोहण्यासाठी करतात. बोटांमधील पडदे पेरापर्यंत असतात. नाकावर केस नसतात, त्या व्यतिरिक्त बारा प्रकारचे वेगवेगळे आवाज काढून एकमेकांना इशारा देऊ शकता.