Pig Animal Information In Marathi डुक्कर हे पाळीव व गरीब प्राणी म्हणून ओळखले जातात. या प्राण्याच्या अनेक प्रजाती अस्तित्वात आहे. विविध ठिकाणी डुक्करे हे सहज आढळून येतात. जास्त प्रमाणात पाळीव डूक्करांचा उपयोग हा मास व्यवसायासाठी केला जातो. डुक्कर ज्याला बहुतेकदा स्वाइन हॉग किंवा घरगुती डुक्कर असे सुध्दा म्हणतात. या प्राण्याच्या प्रजाती वरून त्यांचे शारीरिक आकार व वजन बदलत असते.
डुक्कर प्राण्याची संपूर्ण माहिती Pig Animal Information In Marathi
प्राणी | डुक्कर |
वर्ग | सस्तन प्राणी |
कुटुंब | सुईडे |
आयुर्मान | 27 वर्षे |
डुक्कर कुठे राहतात ?
डुक्कर हा प्राणी त्याचा प्रजाती वरून वेग-वेगळ्या ठिकाणी राहतात. रानडुक्कर असेल तर हे प्राणी जंगलात राहणार, या प्राण्यांना शांत आणि थंड वातावरण पाहिजे. काही पाळीव प्राणी असतील तर त्यांना एका समूहात शेळमध्ये ठेवले जाते. काही गावातील प्रजाती असतील तर हे डुक्कर शहरी किंवा गावातील नाल्या किंवा घाण असलेल्या ठिकाणी राहतात. ही सर्व प्रजाती भारत, चीन, ऑस्ट्रेलिया, रशिया, दक्षिण आशिया इतर देशात आढळून येते.
डुक्कर कशे दिसतात ?
डुक्कर हा एक सामान्य आणि गरीब प्राणी आहे, घरगुती डुक्कर वेग-वेगळ्या रंग आणि आकारात येतात. ते सहसा गुलाबी असतात परंतु पाळीव प्राणी म्हणून ठेवलेली छोटी डुकरे कधी-कधी इतर रंगांची सुध्दा असू शकतात. वेग-वेगळ्या प्रजाती वरून त्यांचा रंग आणि आकारमान असते. या प्राण्याचे लांब तोंड, गोल नाक, चार पाय आणि एक लहान शेपूट असते, हे प्राणी 10 ते 15 वर्ष जगतात.
त्यांचा पायाला दोन खुरे असतात, आणि अंगावर दाट केस असतात. त्यांचा शरीराची लांबी ही 3 ते 6 फूट पर्यत असते, आणि त्यांचे वजन हे 50 ते 300 किलो पर्यत असते. डुक्कर प्राण्याचे डोके थोडे लांब आणि टोकदार असते. जंगली प्राण्यांना तोंडाबाहेर दोन दात असतात. जे त्यांना अन्न शोधण्यासाठी मदत करतात. भीती दाखवण्यासाठी ते एक कर्कश आवाज काढतात. डुक्कर सूर्यप्रकाशापासून स्वतःचे स्वरक्षण करण्यासाठी हे प्राणी चिखलात लोळतात.
डुक्कर काय खातो?
डुक्कर या प्राण्याचा प्रजाती वरून वेग-वेगळा आहार आहे. काही जंगली डुक्करे हे पाला पाचोळा, फळ, फुल, झाडाची साल, शेतीमध्ये असलेला मका, शेंग, झाडाची मुळे इत्यादी खात असतात. इतर प्रजातीचे डुक्कर पाने, मुळे आणि फळांपासून ते उंदीर आणि लहान सरपटणारे प्राणी सर्व काही खातात. तसेच आपल्या गावातील आणि सभोवताली आढळणारे प्राणी हे घाण आणि गटारातील पाणी पिऊन आपले जीवन जगतात.
युनायटेड स्टेट्समध्ये आणि काही ठीक आहे डुकरे पाळीव असतात ते त्यांच्या शिळामध्ये वाढवली जातात. डुक्कर व्यवसायाकरीता बनवलेले आहार बहुतेक कॉर्न असून डुकरे आवडीने खातात. युरोपमध्ये, डुक्कर बार्ली आधारित आहार खातात. डुकरांना तीक्ष्ण दात असतात, जे त्यांना खोदण्यास आणि लढण्यास मदत करतात. लोक आणि इतर डुकरांना इजा होऊ नये म्हणून शेतकरी अनेकदा दात काढून घेतात.
डुक्करांची जीवन पद्धती :
डुक्करांचे जीवन हे सामान्य पद्धतीचे असते, डुक्कर हे प्राणी जंगलात, गावात, आणि काही पाळीव प्राणी हे शेतात राहतात. हे प्राणी एका समूहात राहत असतात. त्यामध्ये प्रत्येक समूहात तीन ते चार नर असतात. डुक्कर मादी हे एका वेळेस 5 ते 10 पिल्लांना जन्म देते, त्याचा कालावधी 112 ते 120 दिवसाचा असतो. डुक्करांचा काही प्रजातीचा जीवन कालावधी हा 15 ते 20 वर्ष असतो.
या प्राण्यांना शांत आणि थंड वातावरण राहणे पसंद असते. काही जंगली डुक्करे हे आपली शिंगाणी जमिनीमध्ये घर तयार करतात, आणि त्यामध्ये आपल्या पिल्लांना जन्म देतात. स्वतःचे रक्षण करण्यासाठी हे आपल्या दाताचा वापर करतात, आणि एक कर्कश आवाज काढून भीती दाखवतात.
हे प्राणी आपले अन्न शोधून खात असतात. त्यांचा दिवसाचा 70% हा अन्न शोधण्यात आणि झोपण्यात जातो. उन्हाळ्यात हे प्राणी उन्हापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी गटार किंवा ओल्या मातीत बसून राहतात.
भारतीय संस्कृतीत डुक्कराचे महत्त्व :
भारतीय संस्कृतीत डुक्कर प्राण्याला फार कमी महत्त्व आहे. हिंदू धर्मात जुन्या लोकांनी डुकरांना देवता म्हणून संबोधले आहे. ते डुकरांना पवित्र प्राणी मानत होते. त्यांची पूजा करतात व डुक्कर पालन करणार्यांच्या मते हिंदू धर्मात धार्मिक विधी पूजा करताना देवाला संतुष्ट करण्यासाठी डुकरांचा वध करून देवासाठी सर्वोत्तम अर्पण मानला जातो.
तसेच डुक्कर हिंदू धर्मानुसार महत्वाचा प्राणी आहे, कारण डुकरांमध्ये भगवान विष्णूचा अवतार असलेल्या वराहाची वैशिष्ट्ये आहेत. एकदा राक्षसाने हिरण्यक्षाने पृथ्वीला समुद्रात टाकले होती. त्यावेळेस भगवान विष्णूने वराह अवतार धारण केला आणि राक्षसाशी युद्ध केले, आणि पृथ्वीला समुद्रातून परत आणले आणि पृथ्वीची देवता भूदेवीला समुद्रात बसवले. मुस्लिम धर्मात डुक्कर प्राणी हा अपवित्र मानला जातो.
डुक्कर प्राण्याचे महत्व :
डुक्कर हा एक सामान्य आणि महत्वाचा प्राणी आहे, डुक्कर प्राण्यापासून अनेक व्यवसाय करून उत्पन्न मिळवले जाते. डुकरांची कातडी खाल्ली जाते, आणि सीट कव्हर, कपडे आणि इतर वस्तू तयार करण्यासाठी वापरली जाते. तसेच डुक्कर या प्राण्याच्या हाडापासून अनेक औषधी व अनेक सौंदर्य साहित्य बनवले जातात. त्याचा केस पासून ब्रश तयार केले जातात.
जंगली डुक्करांची शिकार करून त्यांचे मास खाल्ले जाते. अनेक देशात डुक्कर हे प्राणी शेतीमध्ये पाळले जातात. डुक्कर हा प्राणी पशुधन म्हणून वापरला जातो तसेच जंगलातील अनेक प्राणी जसे वाघ, सिंह, बिबट्या जंगली डूक्कराची शिकार करून आहार बनवतात. यासाठी हे प्राणी खूप महत्वाचे आहेत.
डुक्कर प्राण्याचे प्रकार :
डुक्कर या प्राण्यांच्या अनेक प्रजाती अस्तित्वात आहेत. त्यातील काही प्रजाती ह्या भारतात आढळतात तर काही प्रजाती विदेशात आढळून येतात.
जंगली डुक्कर : जंगली डुक्कर यांना रानडुक्कर म्हणून सुध्दा ओळखले जाते. ही प्रजाती मोठ्या प्रमाणात जंगली भागात राहतात आणि भारत, चीन, ऑस्ट्रेलिया, रशिया, अनेक देशात मोठ्या प्रमाणात आढळून येतात. हे प्राणी रंगाने काळे असतात आणि त्याचा तोंडाजवळ दोन मोठे दात असतात.
चेस्टर्स व्हाईट : चेस्टर्स व्हाईट ही प्रजाती अमेरिका, रशिया, चीन, ऑस्ट्रेलिया या देशात मोठ्या प्रमाणात आढळून येते. ही प्रजाती रंगाने पांढरी आणि गुलाबी त्वचा असते. ही प्रजाती सर्वात लहान प्रजाती म्हणून सुध्दा ओळखली जाते.
फिलीपिन्स वार्टी : फिलीपिन्स वार्टी ही प्रजाती चीन, ऑस्ट्रेलिया, रशिया, दक्षिण आफ्रिका अशा अनेक देशात मोठ्या संख्येने आढळून येतात. या प्राण्याचा उपयोग मास उत्पादनासाठी केला जातो. हे प्राणी 150 ते 200 किलो पर्यंत वजनाने असतात.
जावक वार्टी : जावक वार्टी ही डुक्कर प्रजाती इंडोनेशिया बेटावर मोठ्या प्रमाणात आढळून येतात. हे प्राणी 8 ते 10 वर्ष जगतात, तसेच वजनाने 50 ते 110 किलो पर्यत असतात.
गावटी डुक्कर : गावटी डुक्कर हे ग्रामीण भागात तसेच काही शहरी भागात घाण असलेल्या परिसरात जास्त आढळून येतात. हे रंगाने काळे, पांढरे, तपकिरी रंगाचे असतात. हे प्राणी 8 ते 12 वर्षा पर्यत जगतात, भारतात हे प्रजाती जास्त प्रमाणात आहे.
डुक्करांची संख्या कमी होण्यामागची कारणे :
डुक्कर हा एक सामान्य आणि हुशार प्राणी आहे, जंगली डुक्करांची मोठ्या प्रमाणात शिकार केली जाते. त्याचे हाड, मास, आणि कातळे विकल्या जातात. तसेच मास उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात डुक्कर प्राण्याची कत्तल केली जाते, यामुळे या प्राण्याची संख्या कमी होत आहे.
FAQ
डुक्कर कुठे राहतात?
आज, जंगली आणि जंगली डुक्कर जगभर राहतात आणि अनेक दुर्गम पॅसिफिक बेटांवर देखील आढळतात . त्यांची संसाधनक्षमता आणि अनुकूलता याचा अर्थ ते विविध अधिवासांमध्ये वाढतात,
डुक्कर किती मोठे होऊ शकतात?
300 ते 700 पौंड
जगातील सर्वात लहान डुकराची जात कोणती आहे?
कुणेकुणे
सर्वात मोठ्या डुक्कराचे वजन किती पौंड असते?
2,552 पौंड