Leopard Animal Information In Marathi बिबट्या हा एक मासाहरी प्राणी आहे, ज्याला भारतात चित्ता म्हणून सुध्दा ओळखले जाते. हा प्राणी शिकार करून आपले जीवन जगतो. बिबट्या पँथेरा वंशातील पाच अस्तित्वात असलेल्या प्रजातीपैकी एक आहे. हा प्राणी फेलिडे या मांजर कुटुंबातील सदस्य आहे. समकालीन नोंदी असे सूचित करतात की, बिबट्या त्याच्या ऐतिहासिक जागतिक श्रेणीच्या केवळ 25% भागात आढळतो. जगातील अनेक देशात बिबट्याच्या प्रजाती नष्ट झाल्या आहेत.
बिबट्या प्राण्याची संपूर्ण माहिती Leopard Animal Information In Marathi
वंश | कणाधारी |
जात | सस्तन |
वर्ग | मांसभक्षक |
कुळ | फेलिडे |
उपकुळ | पँथेरिने |
जातकुळी | पँथेरा |
बिबट्या कुठे राहतो?
बिबट्या हा प्राणी जास्त प्रमाणात दाट जंगली आणि अभयारण्यात आढळून येतात. तसे हे प्राणी त्याचा प्रजाती वरून वेग-वेगळ्या ठिकाणी राहतात. बिबट्या प्राण्याला शांत वातावरण आणि झाडावर राहणे पसंद आहे, यामुळे त्यांना शिकार पाहण्यास मदत होते. ज्या भागात गवताळ प्रदेश आणि नदीची जंगले असतात तेथे हे प्राणी मोठ्या प्रमाणात राहतात.
उप-सहारा आफ्रिकेमध्ये ते अजूनही असंख्य प्राणी आहे, आणि काही किरकोळ अधिवासांमध्ये टिकून आहे, जेथे इतर मोठ्या मांजरी नाहीशा झाल्या आहेत. बिबट्या पशुधनाची शिकार करत मानव वस्ती पर्यत आला आहेत. जावामध्ये, बिबट्या दाट उष्णकटिबंधीय पर्जन्य वनात आणि समुद्रसपाटीपासून 2,540 मीटर उंचीवर कोरड्या पानझडीच्या जंगलात राहतात.
बिबट्या कसा दिसतो ?
बिबट्या हा प्राणी मजबूत हातपायांसह मोठ्या आणि शक्तिशाली मांजरी आहेत. हा प्राणी निवासस्थानानुसार रंग बदलतो, हे प्राणी गडद रंग जंगलात आढळतात, हे रंगाने केशरी, फिकट मलई, राखाडी आणि तपकिरी असतात. त्वचेवर काळे, गडद डाग आढळतात. त्यांना लांब आणि घनदाट केसांच्या शेपटी असते. कान लहान आणि गोलाकार असतात, जे त्यांच्या सभोवतालचे आवाज स्कॅन करण्यासाठी मदत करतात.
डोळ्यांचा रंग पिवळा-हिरवा असतो, पुढचे पाय मागच्या पायांपेक्षा मोठे असतात आणि तीक्ष्ण व वक्र पंजे असतात. बिबट्या नराचे वजन सुमारे 37 ते 90 किलो असते, तर मादीचे ते 28 ते 60 किलो पर्यत असते. बिबट्याची उंची 3 फूट ते 6 फूट असते. हे प्राणी 50 किलोमिटर वेगाने धावू शकतात आणि हे प्राणी 15 ते 20 वर्षा पर्यत जगतात.
बिबट्या काय खातो ?
बिबट्या हे मांसाहरी प्राणी आहेत, हे प्राणी कोल्हे, काळवीट, हरीण, माकडे, डुक्कर, इलांड, पक्षी, उंदीर, ससा, साप, मेंढ्या, शेळ्या आणि कीटक यांसारख्या प्राण्यांची शिकार करतात. बिबट्या त्यांच्या अन्नातून सर्व आवश्यक आर्द्रता मिळवतात, त्यामुळे ते जास्त काळ पाणी न पिता जगू शकतात. हे प्राणी आपली शिकार कोणी चोरू नये यासाठी झाडावर बसून शिकार खातात.
बिबट्या प्राण्याला दिवसाचे 5 ते 8 किलो मास लागते, आणि हे त्याचा दिवसातील 60% वेळ शिकार करण्यात आणि झोण्यात गमावतात. उन्हाळ्यात हे प्राणी पाण्यात राहतात, आणि मासे आणि खेकड्यांची शिकार करतात. मानवी वस्ती असल्यास ते गुरेढोरे, पाळीव प्राणी आणि माणसांचीही शिकार करतात.
बिबट्याची जीवन पद्धती :
बिबट्या हा नर प्राणी एकटे राहणे पसंद करतो, तर इतर मादी हे त्याचा नवजात बरोबर राहतात. बिबट्या हा मासाहरी प्राणी असल्यामुळे त्याला शिकार करून आपले पोट भरावे लागते. बिबट्या मादी ही एक वेळेस 2 ते 3 पिल्लांना जन्म देतात. नंतर काही दिवसाने हे प्राणी त्यांचा पिल्लांना जंगलात कशे राहायचे, शिकार करणे, रक्षण करणे शिकवतात.
बिबट्या प्राण्याला उंच झाडावर, गवताळ प्रदेश, दाट जंगली आणि शांत वातावरण आवडते. हे प्राणी इतर प्राण्याच्या भीतीने झाडावर शांत झोपतात. बिबट्या प्राणी हे त्याचा सीमेत राहतात, दुसरा कोणता प्राणी त्याच्या सीमेत आला तर त्यांना आवडत नाही. दोन नर बिबट्याची लढाई हे जीवघेणी सुध्दा असू शकते. जंगलात इतर प्राणी हे बिबट्याच्या पिल्लाची शिकार करून त्यांना मारतात. त्यामुळे त्यांचे रक्षण करणे खूप कठीण असते. एक ते दीड वर्षाने बिबट्या मादी पिल्लांना एकटे सोडून देते.
भारतीय संस्कृतीत बिबट्याचे महत्व :
भारतीय संस्कृतीत बिबट्या प्राण्याला फारशे महत्त्व नाही. अनेक देशांच्या कला पौराणिक कथा आणि लोककथांमध्ये बिबट्याचे महत्व आहे. ग्रीक पौराणिक कथांमध्ये हे देव डायोनिससचे प्रतीक होते असे मानले जाते. ज्याला बिबट्याची कातडी परिधान करून आणि वाहतुकीचे साधन म्हणून बिबट्या वापरताना चित्रित करण्यात आले होते.
बिबट्या प्राण्याचे महत्व :
बिबट्या हा निसर्गातील चक्रामध्ये अतिशय महत्वाचा प्राणी आहे, हा प्राणी जंगलात असल्याने जंगलाची शोभा वाढते. तसेच जंगलातील वृक्षतोड अवैध शिकार कमी प्रमाणात होतात. बिबट्या हा इतर प्राण्याची शिकार करतो, यामुळे निसर्गाला धोका निर्माण होत नाही. नाहीतर इतर अनेक प्राणी जास्त प्रमाणात झाले तर यामुळे निसर्गाला धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी हा एक महत्वाचा प्राणी आहे, मनोरंजनासाठी बिबट्या प्राणी हा सर्कसमध्ये वापरला जातो. ऐतिहासिक दृष्ट्या बिबट्या हा एक महत्वाचा प्राणी आहे.
बिबट्याच्या प्रजाती : बिबट्या प्राण्याच्या अनेक प्रजाती नष्ट झाल्या आहेत, सध्या काही प्रजाती व काही उपप्रजाती जिवंत आहेत.
हिम बिबट्या : हीम बिबट्या ही मोठी जंगली मांजर आहे, ज्याचे वर्गीकरण असुरक्षित म्हणून केले जाते, हे प्राणी भारतातील हिमालयाच्या उंच भागात आढळतात. हे प्राणी हिमाचल मधील किब्बर वन्यजीव अभयारण्यात सुध्दा आढळतात.
ढगाळ बिबट्या : ढगाळ बिबट्या ही भारतीय मोठ्या बिबट्याच्या लहान प्रजातीपैकी एक आहे. ही प्रजाती असुरक्षित आहे, आणि ईशान्य भारतातील हिमालयाच्या पायथ्याशी आढळून येतात.
ब्लॅक बिबट्या : भारतीय बिबट्याचा मेलानिस्टिक रंग प्रकार ब्लॅक पँथर म्हणून ओळखला जातो. हे नागरहोल राष्ट्रीय उद्यान, ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि काबिनी वन्यजीव अभयारण्य येथे आढळतात.
आफ्रिकन बिबट्या : आफ्रिकन खंडातील मूळ प्रजाती आफ्रिकन बिबट्या म्हणून ओळखल्या जातात. उपस्थित असलेल्या स्थानावर अवलंबून हे बिबट्या वेग-वेगळ्या रंगात भिन्नता दर्शवतात, हे प्राणी आफ्रिका खंडात जास्त आढळून येतात.
अमूर बिबट्या : अमुर बिबट्या ही एक उपप्रजाती आहे, जी मूळ रशिया आणि चीन देशात जास्त प्रमाणात आढळून येतात. त्यांचा प्रदेश नदीच्या खोऱ्याच्या भागात आहे. ही प्रजाती सध्या जगात कमी होत आहे.
अनाटोलियन बिबट्या : अनाटोलियन बिबट्या हे पर्शियन बिबट्या म्हणूनही ओळखले जातात. ते अफगाणिस्तान, तुर्की, इराण, दक्षिण रशिया आणि काकेशसच्या भागात आढळतात.
बिबट्याची संख्या कमी होण्यामागची कारणे :
बिबट्या हा एक शिकार करणारा आणि मासाहरी प्राणी आहे. परंतु दिवसाने दिवस बिबट्या प्राण्याची संख्या कमी होत आहे. जगात 25% भागातच आता बिबट्या प्राणी आढळून येतो. इतर अनेक ठिकाणी बिबट्या प्राणी नष्ट झाले आहेत. यामागची कारणे म्हणजे अवैध शिकार आहे.
बिबट्या प्राण्याची शिकार करून त्याची नखे, कातळे आणि दाताची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. आणि दुसरे म्हणजे मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत असल्यामुळे हे प्राणी कमी होत आहे. या प्राण्याची शिकार रोकली नाहीतर काही दिवसाने सर्व प्रजाती नामशेष होतील.
FAQ
बिबट्या काय खातो?
सर्व प्रांतातील बिबट्यांचे मुख्य खाद्य म्हणजे खूर असलेले प्राणी. पण ते माकडे, उंदरांसारखे कृंतक प्राणी, सरीसृप (सरपटणारे प्राणी), उभयचर, पक्षी व किडेदेखील खातात. कधीकधी ते कोल्ह्यासारखे इतर लहान शिकारी प्राणीहीद्धा खातात. बिबट्या भारतात चितळ, सांबर, भेकर, चौशिंगा व वानर यांची शिकार करतो.
बिबट्या माणसांसाठी अनुकूल आहेत का?
बट्या सामान्यत: मानवांना टाळतात , ते सिंह आणि वाघांपेक्षा मानवांच्या जवळ राहणे अधिक चांगले सहन करतात आणि पशुधनावर छापा टाकताना अनेकदा मानवांशी संघर्ष करतात.
बिबट्या कुठे राहतात?
उप-सहारा आफ्रिका, ईशान्य आफ्रिका, मध्य आशिया, भारत आणि चीनमध्ये राहतात.
बिबट्याच्या किती प्रजाती आहेत?
नऊ मान्यताप्राप्त उपप्रजाती