Musk Deer Information In Marathi कस्तुरी मृग हा स्तनी वर्गाच्या समखुरी गणातील हरणांच्या कुळातील एक प्राणी आहे. याचे शास्त्रीय नाव मॉस्कस मॉस्कीफेरस असे आहे. हे प्राणी दाट वृक्षांच्या जंगलात वास्तव्य करतात. हे प्राणी एकटे किंवा जोडीने राहतात. कस्तुरी मृग हा प्राणी शाकाहारी आहे तसेच या प्राण्यांना शिंगे नसतात.
कस्तुरी मृग प्राण्याची संपूर्ण माहिती Musk Deer Information In Marathi
नराच्या वरच्या जबड्यामध्ये 8 ते 10 सेंटिमीटर लांब सुळे असतात. माद्यांची सुळे आखूड असतात, त्यामुळे ते दिसत नाहीत. या मृगांचे मागील पाय पुढील पायांपेक्षा अधिक लांब तसेच मजबूत असतात. मादीला फक्त दोन स्तन असतात. डोक्यासह त्यांची शरीरापासूनची लांबी एक मीटर असते.
वैज्ञानिक नाव | Moschus |
उंची | 50 – 70 सेमी (प्रौढ, खांद्यावर) |
गर्भधारणा कालावधी | सायबेरियन कस्तुरी मृग: 176 दिवस, अल्पाइन कस्तुरी मृग: 188 दिवस जीवनाचा विश्वकोश |
कुटुंब | Moschidae |
राज्य | प्राणी |
ऑर्डर | आर्टिओडॅक्टिला |
त्यांच्या शेपटीची लांबी चार ते पाच सेंटीमीटर लांब असते व मागील बाजूवरील केसांमुळे सहजासहजी शेपूट आपल्याला दिसून येत नाही. यांचे खास वैशिष्ट्य म्हणजे नरांमध्ये कस्तुरी ग्रंथी असते. या ग्रंथी पासून कस्तुरी मिळते. तीन वर्षाहून जास्त वयाच्या नरांच्या बेंबी जवळ उदराच्या त्वचेखाली कस्तुरी ग्रंथी असते.
या ग्रंथीतून तपकिरी व मेना सारखा स्त्राव पाजत असतो आणि एका पिशवीत तो जमा होतो. त्याचे ताजेपनी त्याला मूत्राप्रमाणे उग्र दुर्गंधी असते. पण तो वाढल्यानंतर त्याला सुगंध येतो. हीच ती कस्तुरी असते.
पूर्वी अत्तरामध्ये मोठ्या प्रमाणात कस्तुरीचा उपयोग केला जायचा, त्यामुळे या प्राण्यांची मोठ्या प्रमाणावर हत्या केली जायची किंवा शिकार केले जायचे. आता मात्र त्यांना वनविभागाकडून सुरक्षा देण्यात येत आहेत तसेच अभयारण्यामध्ये या प्राण्यांच्या संख्या वाढवण्यामध्ये यश येत आहे.
या कस्तुरीचा उपयोग आणखीन विविध औषधांमध्ये सुद्धा केला जातो. त्यामुळे कस्तुरी हा खूप मौल्यवान असा पदार्थ आहे. तर चला मग आपण या प्राण्याविषयी सविस्तर माहिती पाहूया.
हा प्राणी कोठे राहतो?
कस्तुरी मृग हा प्राणी ईशान्य आशिया, कश्मीर, नेपाळ, भूटान या प्रदेशांमध्ये आढळून येतो तसेच हा प्राणी समुद्रसपाटीपासून 3000 ते 4000 मीटर उंचीवरील भूर्ज वृक्षाच्या दाट जंगलांमध्ये आढळून येतो. हे प्राणी शाकाहारी प्राणी आहेत.
कस्तुरीमृग काय खातो
कस्तुरी मृग त्याच्या आहारामध्ये गवत, शेवाळ किंवा कोरडे झाडाचे कोंब खातात. हे मिळवण्यासाठी ते संध्याकाळी किंवा सकाळी बाहेर पडतात तसेच जंगलांमध्ये फिरतात. एकाच ठिकाणी बऱ्याच वेळ आपले वास्तव्य करतात. ज्या परिसरामध्ये त्यांचा वावर असतो, त्यांची हद्द ती ठरवून घेतात.
त्या परिसंस्थेच्या सीमेबाहेर ते विस्टा टाकतात तसेच एखाद्या शिकारी प्राण्याने पाठलाग केल्यास हे प्राणी जेथे शिकारी प्राणी पोचू शकणार नाहीत अशा खडकाळ भागांमध्ये आश्रय घेतात. या प्राण्यांना वाघ, अस्वल, लांडगे तसेच चित्ता तसेच मनुष्य इत्यादी प्राण्यांपासून धोका असतो.
कस्तुरी मृग रचना :
कस्तुरी मृग हा प्राणी शाकाहारी आहे तसेच या प्राण्यांना शिंगे नसतात. नराच्या वरच्या जबड्यामध्ये आठ ते दहा सेंटिमीटर लांब सुळे असतात. माद्यांची सुळे आखूड असतात, त्यामुळे ते दिसत नाहीत. या मृगांचे मागील पाय पुढील पायांपेक्षा अधिक लांब तसेच मजबूत असतात. त्यांना पित्ताशय हा घटक नसतो.
मादीला फक्त दोन स्तन असतात. डोक्यासह त्यांची शरीरापासूनची लांबी एक मीटर असते तसेच त्यांच्या शेपटीची लांबी चार ते पाच सेंटीमीटर लांब असते व मागील बाजूवरील केसांमुळे सहजासहजी शेपूट आपल्याला दिसून येत नाही. त्यांची खांद्यापासूनची उंची 50 सेंटिमीटर असते; परंतु प्रौढ प्राण्यांचे वजन हे 11 ते 18 किलोग्रॅम असते.
रंग गडद तपकिरी असून त्यावर करड्या रंगाचे ठिपके असतात. मानेपासून पोटाकडील भाग पांढुरका होत गेलेला असतो तसेच त्यांच्या शरीरावर दाट, राठ व लांब असे केस असतात. या केसांमुळे कडाक्याच्या थंडीपासून सुद्धा त्यांचे संरक्षण होते.
कस्तुरीचा उपयोग :
कस्तुरी मृग या प्राण्याच्या नरांमध्ये कस्तुरी ग्रंथी असते. या ग्रंथी पासून कस्तुरी मिळते. तीन वर्षाहून जास्त वयाच्या नरांच्या बेंबी जवळ उदराच्या त्वचेखाली कस्तुरी ग्रंथी असते. या ग्रंथीतून तपकिरी व मेना सारखा स्त्राव पाजत असतो आणि एका पिशवीत तो जमा होतो. त्याचे ताजेपनी त्याला मूत्राप्रमाणे उग्र दुर्गंधी असते. पण तो वाढल्यानंतर त्याला सुगंध येतो.
तीन वर्षाहून वयाचे जास्त झालेल्या नराच्या बेंबीच्या उदराच्या त्वचेखाली कस्तुरी ग्रंथी निर्माण होतात. एका नराकडून 25 ग्रॅम एवढी कस्तुरी मिळते. पूर्वी अत्तरामध्ये मोठ्या प्रमाणात कस्तुरीचा उपयोग केला जायचा. त्या व्यतिरिक्त कस्तुरी ही अनेक रोगांवर रामबाण उपाय म्हणून पूर्वी त्याचा उपयोग केला जायचा. त्यामुळे या प्राण्यांची मोठ्या प्रमाणावर हत्या केली जायची किंवा शिकार केले जायचे.
या प्राण्यांची जीवन पद्धती :
नर आणि मादीमध्ये नोव्हेंबर ते जानेवारी हा काळ विनीचा हंगाम असतो. त्यानंतर मादीचा गर्भधारणेचा कालावधी 160 दिवसांचा असतो. 160 दिवसांच्या कालावधीनंतर मादीला एक किंवा दोन पिल्ले जन्माला येतात. पिल्ले जन्मता त्यांच्या अंगावर ठिपके नसतात. एका वर्षानंतर ही पिल्ले प्रौढ होतात. कस्तुरी मृगांचे खास वैशिष्ट्य आहे . नरा मध्ये असलेल्या कस्तुरी ग्रंथांपासून कस्तुरी नावाची द्रव्य मिळते. तीन वर्षाहून वयाचे जास्त झालेल्या नराच्या बेंबीच्या उदराच्या त्वचेखाली कस्तुरी ग्रंथी निर्माण होतात.
एका नराकडून 25 ग्रॅम एवढी कस्तुरी मिळते. या हरणांच्या प्रजातींची मोठ्या प्रमाणात शिकार केली जाते. कारण त्यापासून कस्तुरी नावाचे एक सुगंधी द्रव्य मिळते. हे सुगंधी द्रव्य मिळण्यासाठी मनुष्य नरांची हत्या करतात. त्यामुळे आता त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे. यांना इंटरनॅशनल युनियन फॉर कंजर्वेशन ऑफ नेचर कडून संरक्षण मिळाले आहे.
FAQ
कस्तुरी मृग कशासाठी मारले जातात?
प्रीपुटियल ग्रंथी स्रावासाठी
भारतात कस्तुरी मृग कोठे आढळतात?
जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश
हरणाच्या बेंबीत काय असते?
कस्तुरी हा कस्तुरीमृग प्रकारच्या हरीणाच्या नाभीपासुन (पित्ताशय) उत्पन्न होणारा सुवासाचा एक सुगंधी पदार्थ आहे.
कस्तुरी कुठून काढली जाते?
नैसर्गिक कस्तुरी प्राण्यांमध्ये आढळते, विशेषतः नर कस्तुरी मृग किंवा कस्तुरी सिव्हेट असलेल्या मांजरीतून. ते एका ग्रंथीतून एक अप्रिय तीव्र-गंध असलेला तपकिरी पदार्थ स्राव करतात, जो एकदा गोळा करून पावडरमध्ये वाळवला की इथेनॉलमध्ये (महिने किंवा वर्षे) भिजवलेला असतो, ज्यामुळे एक सुगंध येतो जो खूप आनंददायी असतो!