lizard Animal Information In Marathi पाल हे सर्वांच्या परिचयाची आहे कारण सर्वांच्या घरामध्ये पाल आढळून येते. पाल ही बिनविषारी असते परंतु तिच्या शरीरावर असलेले जिवाणू हे खूप विषारी असतात. जे शिजवलेल्या अन्नात पडली तर त्या अन्नामध्ये या जिवाणूमुळे विषबाधा होते तसेच ते अन्न खाल्ल्यामुळे मनुष्याला विषबाधा होते. ही पाल घरातील भिंतीवर छतावर चढताना किंवा फिरताना आपल्याला दिसते. आधी सरपटणाऱ्या प्राण्यांच्या वर्गामध्ये येते तसेच तिचा समावेश सरीसृप वर्गामध्ये केला जातो.
पाल प्राण्याची संपूर्ण माहिती lizard Animal Information In Marathi
लहानपणी आपण पालीला खूप घाबरतो कारण पाल दिसायला खूपच विचित्र दिसते तसेच तिचे तोंड चेहरा खूप भीतीदायक वाटतो. पालीच्या जगभर अनेक प्रजाती आढळून येतात तसेच पाल या प्राण्याचा जगभर प्रसार झालेला आहे. बऱ्याच जणांना पाल दिसता बरोबर खूप भीती वाटते. पाल आपल्या आरोग्यासाठी भीतीदायक नसतात परंतु त्या आरोग्यासाठी धोकादायक असतात.
वैज्ञानिक नाव | Hemidactylus frenatus |
डोमेन | युकेरियोटा |
कुटुंब | गेकोनिडे |
राज्य | प्राणी |
ऑर्डर | स्क्वामाटा |
लांबी | 15 सेंटिमीटर पर्यंत |
पालीच्या विष्ठेमध्ये आणि लाळेमध्ये सल्मोनेला नावाचा बॅक्टेरिया असतो. ज्यामुळे अन्नामध्ये विषबाधा होऊ शकते. याशिवाय जेवणामध्ये जर पाल पडली तर ते अन्न आपण खाल्ले तर आपल्याला मृत्यू सुद्धा होऊ शकतो.
भारतामध्ये आढळणारी पाल हेमिडास या प्रजातीची आहे. याशिवाय लाल पाल हे मॅक्युलेटिस म्हणजे दक्षिण भारतामध्ये आढळून येते तसेच ती महाराष्ट्र, गुजरात येथे सुद्धा आढळून येतात. तर चला मग जाणून घेऊया पाली विषयी सविस्तर माहिती :
पाल कुठे आढळते ?
पाल भारतामध्ये सर्वत्र आढळून येते. भारतामध्ये दक्षिण भारत, महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम घाट तसेच पश्चिम बंगाल मध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजाती आढळून येतात. पाल घरातील भिंतीवर किंवा कानाकोपऱ्यांमध्ये लपून बसतात.
पाल काय खाते ?
पाल कीटकभक्षी आहे, त्यामुळे घरातील किटकांवर ती नियंत्रण ठेवते. तिच्या आतड्यातीची लांबी कमी असते, त्यामुळे अन्नाबरोबर तिच्या शरीरात आलेल्या अल्प प्रमाणातील पाण्यावर तिचे गुजरात होते. तिची काळसर विष्टा आणि मूत्र हे युरिक आम्लाचे पांढरे स्फटिक असते. हे एकत्र लगद्याच्या स्वरूपात विसर्जित केले जाते. तिला दोन फुफ्फुस असतात आणि हृदयाला दोन अलींदे असतात व एकच निलय असते.
निलय हे अर्धवट विभागलेले असते, पाल ही थंड रक्ताची असल्यामुळे तिच्या शरीराचे तापमान बाहेरच्या तापमानानुसार कमी जास्त होत राहते. पालीला जेव्हा संकट किंवा धोका वाटला तेव्हा तिची शेपटी तोडून घेते आणि त्या वळवळणाऱ्या शेपटीकडे शत्रूचे लक्ष वेधले जाईल हे पाहते. पाल तिथून पडून निघते तिचे शेपूट पुन्हा पुरवत जसे आहे तसे होते.
पालीची रचना कशी असते?
पालीची लांबी 15 सेंटिमीटर पर्यंत असते तसेच तिचा रंग पांढरट करडा असतो. काही वेळा तिचा रंग गळत किंवा फिकट करून वातावरणाशी जुळवून घेते. पालीचा रंग पिवळसर, करडा, तपकिरी किंवा मळकट पांढरा सुद्धा असतो. बऱ्याच पालींचा रंग हा हिरवा असतो तसेच पाला ह्या दिनचर व निशाचर सुद्धा असतात.
पाल पांढरे व कठीण कवचाची अंडी घालते. ती अंडी घालताना सुरक्षित जागा पाहते, नंतर मात्र त्यांची काळजी घेतली जात नाही. पालीचे शरीर हे शल्कानी बनलेले असते. तिच्या तोंडावर आणि शेपटीवरील दोन्ही बाजूंना शंका आकाराने मोठे असतात.
पालीचे डोके, मानधन आणि शेपूट असे शरीराचे चार भाग पडतात. डोके आकाराने मोठे आणि चपटे असते तसेच समोरच्या बाजूला तोंड असते. तोंडात साधी मसल व न दुभागलेली जीभ असते. त्याच्या मार्फतच पाल कीटकांसारखे भक्ष पकडते.
डोक्याच्या अग्र बाजूला दोन लहान नाकपुड्या असून त्यामागे वरच्या बाजूला दोन डोळे असतात तसेच तिचे डोळे मोठे वर उठून दिसतात. डोळ्यांना उघडझाप करणारी पापदरी नसतात परंतु प्रत्येक डोळ्याला एक अर्ध पारदर्शक निमेशक पटल असतात. डोळ्यांच्या मागे दोन उभट कर्ण छिद्रे असतात. त्याद्वारे पाल हवेतून येणाऱ्या ध्वनी लहरी ऐकू शकते.
जीवन पद्धती :
पालीमध्ये नर आणि मादी असे दोन लिंगभेद असतात. नरांची शेपटी सुरुवातीच्या भागात फुगीर असते कारण तिच्या अंतर्भागात दोन अर्धशीसनक्के असतात. फलन नंतर मादी प्रत्येक वेळेला दोन ते तीन अंडी घालते. ती वर्षातून तीन वेळा अंडी घालते. अंड्यावरील कवच केरोटीन पासून बनलेले असून ते चिवट आणि लवचिक असते.
पाल ही भिंतीवर आणि छताला चिटकून उलट्या स्थितीत सुद्धा फिरू शकते. पालीचे तळपाय आणि छत किंवा भिंत या दोन्ही पृष्ठभागांमध्ये असलेल्या जैव भौतिकी आसंगी बलामुळे पाल भिंतीला किंवा छताला चिटकते. पालीच्या तळपायावर अनेक कंगोरे असून त्या कंगोऱ्यावर हजारो सूक्ष्म उपकंगोरे असतात, त्यांना पादरोम असे म्हणतात.
पालीचे प्रकार :
पालीच्या जगामध्ये अनेक प्रकार आढळून येतात तसेच त्यांच्या काही प्रजाती विषारी असून काही प्रजाती बिनविषारी आहेत.
गेकोनिडे : हे प्रजाती उपखंडातील सर्वात मोठे जैविक कुटुंब आहे. ही प्रजाती जगभर आढळून येते. यांच्या 950 पेक्षा पोट जाती आहेत. या प्रजातीच्या पालीच्या अंगावर नारंगी रंगाचे ठिपके असतात तसेच ही पाल सर्वात आक्रमक असते. तिची लांबी 35 सेंटीमीटर असते. मूळतः ही आग्नेय आशियामध्ये आढळून येते .
उडणारी पाल : उडणारी पाल हे वृक्षवासी असते तसेच तिची लांबी 20 सेंटीमीटर असते. तिच्या शरीराच्या दोन्ही बाजूंना कातडीच्या घड्या असून त्या उघडून उडी मारते व हवेमध्ये पसरते. ही पाल सामान्यता आक्रमक नसते परंतु काही ठिकाणी ती विषारी असल्याचे देखील मानले जाते. ही पाल दिसायला भयंकर भीतीदायक वाटते तसेच ती कीटक खाते.
सामान्य पाल : सामान्य पाल ही आपल्या घरामध्ये आढळून येते तसेच तिचा रंग हलका, करडा किंवा हलका पिवळसर असतो. ही पाल भीतीवर छतावर आपल्याला दिसतात. ही विषारी नाही परंतु तिच्या अंगावरील जिवाणू हा खूप विषारी असतो. ती जर अन्नामध्ये पडली आणि आपण अन्नग्रहण केले तर आपल्या मृत्यू होऊ शकतो.
पालीचे महत्व :
पाल जरी आपल्याला किळसदायक आहेत, असे वाटत असली तरी तेवढीच ती महत्त्वाची आहे. ते आपल्या घरातील कीटकांवर नियंत्रण ठेवते कारण पाल हे कीटक भक्षी आहे. त्यामुळे घरातील मच्छर किंवा इतर कीटक खाऊन त्यांचे संख्या नियंत्रणात आणते. समाजामध्ये पाली विषयी बरेच गैरसमज आहेत, ते मात्र आपण दूर करायला पाहिजे.
FAQ
पालीला कान असतात का?
काही पाली लांबीला अधिक असतात आणि त्यांना सापासारखे अगदी छोटे पाय असतात त्यामुळे अनेकदा त्यांना साप समजून मारले जाते. पण अश्यावेळी नीट पहिले तर पाल असेल तर तिला कान आहेत हे दिसते. पालीला गंधज्ञान असते पण ते जीभेमार्गे होते यामुळे पाल वारंवार जीभ आत बाहेर करताना दिसते.
पाल म्हणजे काय?
घरातील भिंतींवर व छतावर वावरणारा एक सरपटणारा प्राणी
हा सोपा उपाय केला, तर पाल घरातून पळून जाते
कॉफी पावडर आणि तंबाखू
कॉफी पावडर आणि तंबाखू सोबत मिसळा आणि लहान लहान गोळे बनवून पाल जिथे येते तिथे ठेवा. हे मिश्रण पालीने खाल्ले तर तिचा मृत्यू होईल, अथवा पाल लांबपर्यंत पळ काढेल.