मण्यार या सापाची संपूर्ण माहिती Common Krait snake animal Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Common Krait snake animal Information In Marathi मण्यार साप सर्वांच्या परिसराचा सरपटणारा व नाग सापाच्या 15 पट विषारी आहे. आपण सापांचे अनेक प्रकार पाहिले असेलच त्यामध्ये काही साप विषारी असतात तर काही साप बिनविषारी सुद्धा असतात. मन्यार हा साप भारतातील विषारी चार प्रजातींच्या सापांपैकी विषारी साप आहे. सापांच्या इतर तीन विषारी प्रजाती म्हणजे नाग, घोणस आणि फुरसे या तीन प्रजाती आणि चौथा मण्यार हे चार विषारी प्रजाती भारतामध्ये आढळून येतात.

Common Krait snake animal Information In Marathi

मण्यार या सापाची संपूर्ण माहिती Common Krait snake animal Information In Marathi

मण्यार या सापाच्या काही उपप्रजाती सुद्धा आढळून येतात. साधा मण्यार, पट्टेरी मण्यार, काळा मण्यार या तीन प्रजाती भारतामध्ये आढळतात व मण्यार सापाच्या इतर दहा उपजाती आहेत. त्या अन्य आग्नेय आशियाई देशांमध्ये आढळून येतात.

भारतात आढळणारा साध्या मण्यार सर्वत्र आढळून येतो तसेच हा साप राहण्यासाठी जास्तीत जास्त जंगले पसंत करतो. याचा रंग पोलादी निळा असून अंगावर पांढऱ्या रंगाचे खवले दिसतात तसेच हे खवले शेपटीकडे अधिक व डोक्याकडे कमी कमी होत जातात.

मन्यार सापाची लांबी दीड मीटर किंवा त्यापेक्षा जास्त असते तसेच मण्यार मुख्यतः हे निशाचर असतात. अन्नाच्या शोधात ते रात्रीस निघतात. गारव्याच्या पासून बचाव करण्यासाठी हा साप उंदरांची बिळे, ठिगारे किंवा माणसांच्या घरांमध्ये सापडण्याच्या घटना बऱ्याचदा घडतात. सापाविषयी आपण सविस्तर माहिती पाहूया.

मन्यार हा साप कुठे आढळतो :

मण्यार हे प्रजातीचे साप दीड मीटर पर्यंत लांब असतात. त्यांची शेपटी सुद्धा लांब असते. हे साप सहसा जंगली भागांमध्ये आढळून येतात. ते निवासस्थानामध्ये जंगलीच पसंत करतात. सामान्यपणे हे साप कोरडे प्रदेश जंगले माती असलेले अर्ध वाळवंट प्रदेश शेतजमीन खडकाळ जमीन इत्यादी ठिकाणी सुद्धा घडतात. भारतामध्ये सर्वत्र पाहायला मिळतात. त्या व्यतिरिक्त हे साप पश्चिम बंगाल दक्षिण भारत श्रीलंका येथे सुद्धा आढळतात.

बऱ्याचदा अफगाणिस्तान बांगलादेश नेपाळमध्ये सुद्धा हे साप सापडण्याची चिन्हे आहेत. हे साप शेतात कमी झाडे असलेल्या जंगलांपासून तसेच वस्ती असलेल्या भागांमध्ये विविध निवासस्थानाच्या ठिकाणी ते आढळून येतात. जसे विटांचे, दगडांचे ढीग, उंदरांचे बीळ किंवा घरामध्ये देखील हे साप आढळून येतात.

मन्यार हा साप काय खातो?

मन्यार हा साप मांसाहारी असून हे साप इतर सापांना सुद्धा खातात. मन्यार हा साप मुख्यतः उंदीर कुळतणारे प्राणी सरडे तसेच छोटे साप, बेडूक इत्यादी त्याच्या आहारामध्ये समावेश होतो.

Common Krait snake animal Information In Marathi

मण्यार सापाची शारीरिक रचना :

मन्यार या सापाची शारीरिक रचना किंवा त्यांची रंग त्यांच्या प्रजातीनुसार विविध आढळून येते. भारतात व पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक राज्यामध्ये साधा मान्यवर आढळून येतो तर हा साप कोरड्या प्रदेशात राहणे पसंत करतात. पूर्ण वाढ झालेल्या साध्या मन्यार सापाची लांबी ही 120 सेंटिमीटर किंवा त्यापेक्षा जास्त असू शकते तर त्याचे शरीर हे पोलादी निळ्या रंगाचे असते. तसेच त्याच्या शरीरावर चाळीस पांढरे पट्टे असतात.

हे पट्टे एकटे किंवा जोडीने असतात आणि ते डोक्यामागे बऱ्याच अंतरापासून शेपटीपर्यंत वाढत जातात. पोटाकडची बाजू पांढरी असते पाठीवर मध्यभागी मोठ्या आणि षटकोनी खवल्यांची एक लांब ओळ असते. हे खवले शेपटीकडे अधिक तर डोक्याकडे कमी कमी होत जातात.

वरच्या ओठावरील तीन आणि चार हे खवले डोळ्यांना लागून असतात. डोळे मध्यम किंवा लहान असतात. तसेच डोळ्यांची बाहुली ही वाटोळी असून शेपटी निमुळती व गोलाकार असते.

मण्यार सापाची जीवन पद्धती :

या सापाच्या माद्या एप्रिल ते मे महिन्यात बारा ते चौदा पांढरी अंडी घालतात. ही अंडी घालण्याच्या आधी पाल्या पाचोळ्याच्या ढिगांमध्ये अंडी घातली जातात. पिल्ले बाहेर पडेपर्यंत अंड्याजवळ ही मादी राहते. पिल्ले सर्वसाधारणपणे 45 ते 60 दिवसांनी अंड्यातून बाहेर पडतात. नवजात पिल्लांची लांबी ही 15 ते 20 सेंटीमीटर असते.

मण्यार या सापाची विष :

मन्यार हा साप विषारी साप आहे. बऱ्याचदा मनुष्य वस्तींमध्ये किंवा घरांमध्ये हा साप सापडल्याच्या घटना घडतात तसेच पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हे साप अनेकांना दर्श करतात. त्यांच्यावर नकळत पाय पडल्याने हे साप दर्श करतात. त्याला दुखावले तरच तो अंगावर येतो किंवा दक्ष करतो. मन्यारची विष ही नागाच्या सापाच्या 15 पट जहरी असते. त्यांच्या विषग्रंथींमधून एकावेळी 20 ते 100 मिलिग्रॅम एवढे विष बाहेर फेकले जाते.

या विषयांमध्ये बंगारोटॉक्सिन 1 व 2 हे घटक असतात. या विषयामुळे चैता पेशींमध्ये संदेशवहन थांबते तसेच दर्शवाधित व्यक्तींचे मध्यपटल आणि बरगड्या यांच्या आंतरपेशीय स्नायूंवर परिणाम होऊन फुफ्फुसांचा पक्षघात होतो व माणसाला मृत्यू येतो.

मण्यार दंश केल्यास पटकन लक्षात येत नाही कारण दंश केल्याच्या जागी वेदना होत नाहीत. त्यांची विषदंत लहान असल्याने शरीरामध्ये वीज पसरण्याला खूप वेळ लागतो. 200 केल्यानंतर खूप तहान लागते. तसेच पोटदुखीचा त्रास सुरू होतो तसेच काही वेळांमध्ये श्वसन क्रिया सुद्धा बंद होते किंवा श्वास घेण्याला तकलीफ होते तसेच 6 ते 24 तास त्यानंतर तासाच्या आत वैद्यकीय औषध घेतली नाही तर मृत्यू येऊ शकतो.

Common Krait snake animal Information In Marathi

मण्यार सापाचे प्रकार :

मण्यार या सापांच्या विविध उपप्रकार आढळून येतात. भारतामध्ये तीन प्रकार त्यांचे आढळून येतात.

साधा मण्यार : मण्यार या सापाची शारीरिक रचना किंवा त्यांची रंग त्यांच्या प्रजातीनुसार विविध आढळून येते. भारतात पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक राज्यामध्ये साधा मण्यार आढळून येतो तर हा साप जंगल तसेच कोरड्या प्रदेशामध्ये राहणे पसंत करतो. तसेच पूर्ण वाढ झालेल्या साध्या मन्यार सापाची लांबी ही 120 सेंटिमीटर किंवा त्यापेक्षा जास्त असू शकते. तर त्याचे शरीर हे पोलादी निळ्या रंगाचे असते. त्याच्या शरीरावर चाळीस पांढरे पट्टे असतात. हे पट्टे एकटे किंवा जोडीने असतात आणि ते डोक्यामागे बऱ्याच अंतरापासून शेपटीपर्यंत वाढत जातात.

काळा मण्यार : मण्यारची ही प्रजाती सिक्किम, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये आढळून येतो. त्यांच्या अंगावर पट्टे नसतात परंतु त्यांचा रंग हा काळा किंवा पोलादी निळा असतो तसेच त्यांची खालची बाजू पांढरी असून त्यावर काळे ठिपके असतात. हा साप घराच्या बागेत, गवतात, झुळपात, पडक्या इमारतींमध्ये आढळून येतो. हा साप सुद्धा रात्री अन्नासाठी हिंडतो हा साप निशाचर असून त्याच्या भक्षांमध्ये उंदीर, पाली, सरडे बेडूक तसेच लहान प्राणी असतात.

पट्टेरी मण्यार : पट्टीरी मण्यार हा साप तेलंगणा, असाम,मिझोराम, नागालँड, मणिपूर या राज्यांमध्ये आढळून येतो तसेच या सापाची लांबी दोन मीटर पर्यंत असते. पूर्ण वाढ न झालेल्या पट्टेरी मण्यारच्या शरीरावर काळे व पांढरे पट्टे एका आड एक असे दिसतात तर पूर्ण वाढलेल्या मण्यारच्या शरीरावर काळे पिवळे पट्टे एकावर एक तयार होतात.

FAQ

क्रेट साप किती विषारी आहे?

इतर आशियाई सापांच्या तुलनेत भारतीय क्रेट सर्वात घातक विष देते. सामान्य क्रेटच्या विषामध्ये भरपूर न्यूरोटॉक्सिन असतात ज्यामुळे स्नायूंचा अर्धांगवायू होतो. ग्रामीण भागात साप चावण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात.


साप चावल्यानंतर आपल्याकडे किती वेळ असतो?

उत्स्फूर्त पद्धतशीर रक्तस्त्राव सहसा 15 – 30 मिनिटांच्या आत थांबतो आणि अँटीवेनमच्या 6 तासांच्या आत रक्त गोठण्याची क्षमता पुनर्संचयित केली जाते, जर एक तटस्थ डोस दिला गेला असेल. 1 – 2 तासांनंतर गंभीर लक्षणे कायम राहिल्यास किंवा 6 तासांच्या आत रक्त गोठण्याची क्षमता पुनर्संचयित न झाल्यास अँटीवेनम थेरपीची पुनरावृत्ती करावी.


क्रेट विष कसे कार्य करते?

क्रेट एन्वेनोमिंगमध्ये चेतासंस्थेचा अर्धांगवायू हे प्रगतीशील उतरत्या पक्षाघाताने दर्शविले जाते. क्रेट विषामध्ये β-बंगारोटॉक्सिन असतात, जे फॉस्फोलाइपेस ए 2 क्रियाकलाप असलेले प्रीसिनॅप्टिक न्यूरोटॉक्सिन असतात आणि पक्षाघाताचे प्रमुख कारण मानले जातात

क्रेट साप चावल्याचा परिणाम जाणवण्यास किती वेळ लागतो?

न्यूरोलॉजिक/न्यूरोमस्क्युलर: ही चिन्हे आणि लक्षणे सहसा लवकरात लवकर प्रकट होतात. या सर्वांचा विकास अपरिहार्यपणे होत नाही, अगदी तीव्र विषमतेसहही. सामान्य: ही लक्षणे सामान्यत: एक ते तीन तासांच्या आत प्रकट होतात, जरी क्रेट्ससाठी ती चावल्यानंतर 12 तासांपर्यंत असू शकते.

Was this article helpful?
YesNo

Leave a Comment