Blue Cow animal Information In Marathi नीलगाय हा एक जंगली प्राणी आहे, हा आशियातील सर्वात मोठा काळवीट म्हणून ओळखला जातो. अनेक ठिकाणी या प्राण्याला निळी गाय म्हणून सुध्दा ओळखले जाते. हिंदू धर्मात या प्राण्याला गायीचा दर्जा प्राप्त आहे, त्यामुळे हा प्राणी पवित्र प्राणी मानला जातो.
नीलगाय प्राणी हा एक शाकाहरी प्राणी आहे. जो जंगलातील गवत व वनस्पतीवर अवलंबून असतो. नीलगाय भारतीय उपखंडात स्थानिक प्राणी आहे, हे भारत, नेपाळ आणि पाकिस्तानमध्ये मोठ्या संख्येने आढळून येतात. बांगलादेशात हे प्राणी नामशेष झाले आहे. तर चला मग या प्राण्यांविषयी सविस्तर माहिती पाहूया.
नीलगाय प्राण्याची संपूर्ण माहिती Blue Cow animal Information In Marathi
नीलगाय कुठे राहते ?
नीलगाय हा एक जंगली प्राणी आहे, परंतु हे प्राणी जंगली भागात कमी आणि खुल्या मैदानी वातावरणात जास्त राहतात. भारतात हे प्राणी जास्त शेती भागात जास्त आढळून येतात. हे प्राणी शेतीतील उत्पादनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. नीलगाय प्राणी भारतीय उपखंडातील मूळ आहेत, परंतु हे प्राणी पाकिस्तान, इराणमध्ये सुध्दा आढळून येतात, वाघ ज्या भागात पाणी आणि अन्न मिळेल तिथे हे प्राणी मोठ्या प्रमाणात राहतात.
प्राणी | Blue Cow |
लांबी | 3.5 ते 5 फुटा पर्यत |
वजन | 80 ते 110 किलो |
वेग | 40 किलोमिटर |
रंग | निळ्या-राखाडी कोटमुळे वेगळे दिसतात |
हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या तराई सखल प्रदेशात या प्राण्याची लक्षणीय संख्या आढळते, उत्तर भारतात मृग विपुल प्रमाणात आढळतो. नीलगाय प्राण्याला झाडी-झुडपे आणि विखुरलेली झाडे असलेली जंगले आणि गवताळ मैदाने हे क्षेत्र पसंत आहेत, ते शेतजमिनींमध्ये सामान्य आहेत, परंतु घनदाट जंगलात राहतात, या प्राण्याला शांत आणि थोडे गरम वातावरणात राहणे पसंद आहे.
नीलगाय काय खातात?
नीलगाय एक शाकाहरी प्राणी आहे, हे प्राणी गवत आणि औषधी वनस्पतींना खातात. परंतु भारतातील कोरड्या उष्णकटिबंधीय जंगलांमध्ये वृक्षाच्छादित वनस्पतींना देखील खातात. आहारात साधारणपणे प्रथिने आणि चरबी पुरेशी असते.
नीलगायांमध्ये प्रथिनांचे प्रमाण किमान 7% असावे, यासाठी ते नियमित चरत राहते. नीलगाय पाण्याशिवाय दीर्घकाळ जगू शकते, आणि उन्हाळ्यातही ती नियमितपणे पाणी पित नाही. हे प्राणी जंगलातील झाडांचा पाला, पाचोळा तसेच फळे सुध्दा खातात
नीलगाय कशी दिसते?
नीलगाय दिसायला काळवीट सारखी असते, परंतु हे प्राणी काळवीट पेक्षा अधिक शक्तिशाली असतात. यामध्ये नर मादीपेक्षा मोठे असतात, आणि रंगाने निळ्या-राखाडी कोटमुळे वेगळे दिसतात. नर आणि मादी दोघांमध्ये कोट लहान ऐवजी पातळ असतो, आणि थंडीपासून जास्त संरक्षण देत नाही. मजबूत शरीराच्या तुलनेत नीलगायीचे डोके लहान असते, आणि तिला लहान तीक्ष्ण शिंगे असतात. हे शिंगे स्वसंरक्षण करण्यासाठी फायदेशीर आहेत.
नीलगाय स्तनन प्राणी आहे, हे शरीराने मजबूत असतात, त्यांचे शारीरिक लांबी हे 3.5 ते 5 फुटा पर्यत असते, तर शारीरिक वजन हे 80 ते 110 किलो असते. नीलगायच्या पाठीमागे तिरकस, खोल मान घशावर पांढरा ठिपका असतात, तसेच मानेच्या बाजूने केसांची एक छोटीशी झुळूक आणि चेहऱ्यावर पांढरे डाग द्वारे वैशिष्ट्यीकृत आहे.
हा एक सुंदर प्राणी मानला जातो. या प्राण्याला चार पाय, दोन शिंगे, एक शेपूट, दोन कान असतात, हे प्राणी 40 किलोमिटर वेगाने धावू शकतात.
नीलगाय प्राण्याची जीवन पद्धती :
नीलगाय हा एक स्तनन आणि चपळ प्राणी आहे. या प्राण्याला धोका जाणवला तर हे प्राणी मोठ्याने आवाज करून इतर प्राण्याला सावध करतात. नीलगाय प्रामुख्याने दिवसा सक्रिय असतात. ते सामाजिक प्राणी आहेत आणि गटात राहतात.
हे गट साधारणपणे लहान असतात यामध्ये 10 किंवा त्यापेक्षा कमी व्यक्ती असतात. कधी-कधी हे प्राणी 20 ते 70 व्यक्तींचे एकत्र गट काही वेळा येऊ शकतात. या प्राण्याची श्रवणशक्ती आणि दृष्टी चांगली असते, परंतु त्यांना वासाची चांगली जाणीव नाही. त्रास दिल्यास किंवा घाबरून गेल्यास ते पळून जातात.
नीलगाय प्राणी जंगली भागात कमी आढळून येतात, हे प्राणी प्रजननाच्या वेळेस एकत्र येतात, आणि मादी एका वेळेस एकाच वासराला जन्म देते, नंतर 10 महिने मादा वासराला दूध पाजतात. या प्राण्याला जंगलात राहत असताना अनेक मोठ्या प्राण्यापासून शिकार होण्याचा धोका निर्माण होतो. जंगलात राहत असताना या प्राण्याला पिल्लांना जंगलात राहणे, स्वतःचे रक्षण करणे शिकवले जाते.
भारतीय संस्कृतीत नीलगाय प्राण्याचे महत्व :
भारतीय संस्कृतीत नीलगाय प्राण्याला खूप महत्व प्राप्त आहे, हिंदू धर्मात नीलगाय प्राण्याला गायीचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे हा प्राणी पवित्र आहे. काही हिंदू धार्मिक ग्रंथामध्ये नीलगायीचा संदर्भ केला आहे. जेथे प्रजापतींपैकी एक पूर्वज देव नीलगायीचे रूप धारण केले आहे असे म्हटले जाते.
तसेच पश्चिम बंगालमधील पांडू राजार ढीबी येथे नीलगायांचे अवशेष उत्खनन करण्यात आले आहेत. जे सूचित करतात की पूर्व भारतात निओलिथिक काळात आणि सिंधू संस्कृतीच्या काळात नीलगाय प्राणी पाळीव किंवा शिकार करत असत.
नीलगाय प्राण्याचे महत्व :
नीलगाय हा एक हुशार प्राणी आहे, कोणालाही बघून हे प्राणी पळून जातात. कोणत्याही मानव जातीवर आजपर्यत या प्राण्यांनी कधीच हल्ला केला नाही. हे प्राणी दिसायला एकदम सुंदर असतात. जंगलातील वातावरण स्वच्छ ठेवण्यात हे प्राणी मदत करतात. तसेच निसर्ग साखळीत या प्राण्यांना खूप महत्व आहे. जंगलातील अनेक मोठे प्राणी पक्षी या प्राण्यावर अवलंबून आहेत. हे प्राणी अनेक मोठ्या प्राण्याचे अन्न बनतात, त्यासाठी हे प्राणी खूप महत्वाचे आहेत.
नीलगाय प्राण्याचे प्रकार :
नीलगाय प्राण्याचे अनेक प्रकार पडतात, परंतु त्यातील काही प्रजाती सध्या नष्ट झाल्या आहेत. आणि या प्राण्याच्या कोणत्याच उपप्रजाती पडत नाही.
बोसेलाफस नीलगाय : बोसेलाफस नीलगाय हा बोविडचा एक वंश आहे. नीलगाय ही एकमेव जिवंत प्रतिनिधी आहे, जी त्यांच्या प्रजाती जीवाश्म रेकॉर्डवरून ओळखली जाते. हे भारत, पाकिस्तान, चीन, इराण या देशात आढळून येतात.
बोसेलाफिनी नीलगाय : बोसेलाफिनी नीलगाय ही बोवाइन्सची टोळी आहे, यात फक्त दोन अस्तित्वात असलेल्या प्रजाती आहेत. ही प्रजाती सध्या भारतातून झपाट्याने कमी होत आहे, हे प्राणी दक्षिण टेक्सासमध्ये दाखल करण्यात आली आहे.
नीलगाय प्राण्याची संख्या कमी होण्यामागची कारणे :
नीलगाय हा एक गरीब प्राणी आहे, जो गवत आणि झाडांचा पाला खाऊन आपले जीवन जगतो. नीलगाय प्राणी आता दिवसाने दिवस कमी होत आहेत. कारण दररोज होत असलेली जंगलतोड, तसेच अवैध शिकार यामुळे हे प्राणी कमी होत आहेत. विविध ठिकाणी नीलगाय प्राण्याची शिकार करून त्यांचे मास खाल्ले जाते. तर काही ठिकाणी नीलगाय प्राणी शेतीचे प्रचंड नुकसान करतात त्यामुळे त्याची शिकार केली जाते. यामुळे या प्राण्याची संख्या कमी होत आहे.
FAQ
नीलगाय काय खातात?
नीलगाय काळवीट चरतात आणि चाळतात, त्यांच्या आहाराचा मुख्य स्त्रोत गवत आहे. आशियामध्ये ते प्रामुख्याने वृक्षाच्छादित वनस्पती खातात .
नीलगाय हा कोणत्या प्रकारचा प्राणी आहे?
नीलगाय, (बोसेलाफस ट्रॅगोकेमेलस), ज्याला ब्लूबक देखील म्हणतात, सर्वात मोठा आशियाई काळवीट (बोविडे कुटुंब). नीलगाय ही भारतीय उपखंडातील स्वदेशी आहे आणि हिंदू तिला गुरांसारखाच पवित्र दर्जा देतात
नीलगाय किती उंच उडी मारू शकते?
नीलगाय 2.5 मीटर उंचीपर्यंत कुंपण उडी मारू शकते