Close Menu
    Facebook X (Twitter) Instagram
    • Home
    • उभयचर प्राणी
    • जलचर प्राणी
    • भूचर प्राणी
    • About Us
      • Contact Us
      • Privacy Policy
      • Disclaimer
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
    प्राणी जगतप्राणी जगत
    • Home
    • उभयचर प्राणी
    • जलचर प्राणी
    • भूचर प्राणी
    • About Us
      • Contact Us
      • Privacy Policy
      • Disclaimer
    Subscribe
    प्राणी जगतप्राणी जगत
    Home » भूचर प्राणी » आफ्रिकन जंगली कुत्रा प्राण्याची संपूर्ण माहिती African wild Dog Information In Marathi
    भूचर प्राणी

    आफ्रिकन जंगली कुत्रा प्राण्याची संपूर्ण माहिती African wild Dog Information In Marathi

    By आकाश लोणारेFebruary 20, 2024Updated:March 26, 2024No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email
    African wild Dog Information In Marathi
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    African wild Dog Information In Marathi आफ्रिकन जंगली कुत्रे हे एक आक्रमक कुत्र्यांची प्रजाती आहे. ही मांसाहारी कुत्रे असून पाळीव नाहीत. हे कुत्रे जंगलांमध्ये टोळीने राहतात व टोळीने शिकार करतात. या कुत्र्यांची संख्या मात्र आता धोक्यामध्ये आहे कारण त्यांना मास मिळत नाही व विविध रोगामुळे ग्रासलेले असल्यामुळे त्यांचा मृत्यू होतो. आफ्रिकन जंगली कुत्र्याला केप हंटिंग डॉग सुद्धा म्हटले जाते.

    African wild Dog Information In Marathi

    आफ्रिकन जंगली कुत्रा प्राण्याची संपूर्ण माहिती African wild Dog Information In Marathi

    हा कुत्रा आफ्रिकेतील सर्वात मोठा जंगली भागांमध्ये आढळून येतो. हा कुत्रा उप अमेरिकेतील वन्य कुत्रा आहे. लाईकॉन वंशाची ही दुसरी प्रजाती मानली जाते. जी मांसाहारी असून मनुष्य आणि रोगांच्या प्रादुर्भावसाठी प्रसिद्ध आहे. या कुत्र्याच्या प्रजाती खूप कमी होत आहे. उत्तर आफ्रिकेमध्ये ही प्रजती खूप दुर्मिळ आहे तसेच त्यांची संख्या ही संवर्धनासाठी ठेवण्यात आली आहे. तर चला मग आफ्रिकन जंगली कुत्र्याविषयी आपण सविस्तर माहिती पाहूया.

    वैज्ञानिक नावLycaon pictus
    वस्तुमान22 किलो (प्रौढ) जीवनाचा विश्वकोश
    डोमेनयुकेरियोटा
    राज्यप्राणी
    ऑर्डरकार्निव्होरा
    आहार70 टक्के मास

    आफ्रिकन जंगली कुत्रा कुठे आढळतो?

    आफ्रिकन जंगली कुत्रा बऱ्याचदा उपसहारा आफ्रिकेच्या भागांमध्ये बऱ्याचदा पाहायला मिळतात. ते फक्त कोर वाळवंटात आणि सखल जंगलांमध्येच राहतो. त्यांची प्रजाती उत्तर आणि पश्चिम आफ्रिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर नष्ट झालेले आहे. आणि मध्यवर्ती तसेच ईशान्य आफ्रिकेमध्ये त्यांची संख्या सुद्धा कमी झाले आहे.

    प्रजातींच्या बहुसंख्य लोकसंख्या आता केवळ दक्षिण आफ्रिका तसेच पूर्व आफ्रिका मध्ये म्हणजेच नामिबिया आणि झिंबाब्वे येथे आढळून येतात. येथे त्यांचे निवास पाळीव प्राण्यांमध्ये आहे. त्यांचा उपयोग पोलीस अधिकारी किंवा पोलीस खात्यामध्ये केला जातो तसेच दक्षिण आफ्रिकेमध्ये क्रुझर नॅशनल पार्कमध्ये 370 जंगली आफ्रिकन कुत्र्यांची संख्या शिल्लक आहे.

    आफ्रिकन जंगली कुत्रा काय खातो?

    आफ्रिकन जंगली कुत्रा मांसाहारी कुत्रा आहे. त्यांच्या आहारामध्ये 70 टक्के मास असते तसेच हे कुत्रे कळपाने राहतात. शिकार सुद्धा गटाने मिळून करतात. त्यांच्या शिकारीमध्ये वाईल्ड बीस्ट, काळवीट, उंदीर, पक्षी हे असतात तसेच हे कुत्रे मृगांची सुद्धा शिकार करतात.

    हे कुत्रे एखाद्या शिकारीला खाली पाडतात व ते कमकुवत होईपर्यंत वारंवार त्यांच्या पाय व पोटाला चावा घेतात. जंगली कुत्रे दहा ते सात मिनिटे पाठलाग करू शकतात. आहे आफ्रिकन जंगली कुत्र्यांचा ताशी 66 किलोमीटर वेग असून ते 66 किलोमीटर प्रतितास वेगाने सुद्धा धाऊ शकतात.

    त्यांच्या आहारामध्ये लहान प्राणी, पक्षी जसे ससा, छोटी कीटक उंदीर, यांचा सुद्धा समावेश असतो. कुत्रे त्यांच्या टोळीने शिकार करतात. त्यांच्या शिकार करण्यामध्ये 15 किलो पासून ते 400 किलो पर्यंतची शिकार कुत्रे मिळून करतात. या कुत्र्यांची शिकार मात्र बिबट्या, चित्ता, सिंह तसेच ठिपकेदार हायना हे सुद्धा करतात.

    African wild Dog Information In Marathi

    आफ्रिकन जंगली कुत्र्याची रचना :

    आफ्रिकन जंगली कुत्र्याचे काही वैशिष्ट्य आहेत. ते वैशिष्ट्य म्हणजे हे कुत्रे इतर कुत्र्यांपेक्षा थोडे वेगळे असतात. त्यांचा बांधा उंच असला तरी तो सर्वात मोठा कुत्रा आहे. पूर्व आफ्रिकेमध्ये या कुत्र्याचे वजन 44 ते 55 एवढे भरते तर आफ्रिकेत 64 ते 72 एवढे असते. त्यांची खांद्यापासूनची उंची 24 ते 30 इंच असते तर 28 ते 44 इंच त्यांच्या शरीराची लांबी असते तसेच या कुत्र्याचे शेपूट 11 ते 16 पर्यंत असते. यांची मादी नरापेक्षा किंचित लहान असते.

    आफ्रिकन जंगली कुत्र्यांची फर हे इतर कुत्र्यांपेक्षा वेगळे असतात. त्यांच्या शरीरावर पूर्णपणे ताट केस असतात. ज्या कुत्र्यांचे वय प्रौढ होते, त्यांच्यामध्ये मात्र हे फर राहत नाहीत यामध्ये प्रत्येक कुत्र्याचे वैशिष्ट्यपूर्ण अशी शरीर रचना असते. बहुतेकांच्या कपाळावर काळी रेषा तसेच त्यांचे थथुन काळे असते. जंगली कुत्रे आवाजाने एकमेकांशी संवाद साधतात. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि शरीराची भाषा इतर कुत्र्यांना समजते.

    आफ्रिकन जंगली कुत्रा या प्राण्याचे जीवन :

    आफ्रिकन जंगली कुत्र यांचे जीवन सहसा जंगलांमध्ये किंवा गोटा परेशान मध्ये जाते ते त्यांच्या गटांमध्ये राहतात. त्यांच्या गटांमध्ये मादी तसेच नर कुत्र्यांच्या समावेश असून त्यांच्या कळपामध्ये मोठ्या प्रमाणात पिल्लाची संख्या सुद्धा दिसून येते.

    हे कुत्रे गटागटांनीच शिकार करतात. शिकार केल्यानंतर हे कुत्रे सर्व मिळून मास खातात. हे कुत्रे सुद्धा मोठ्या शिकारी प्राण्यांकडून शिकार होतात. मादी आपल्या पिल्लांची देखभाल करते परंतु बऱ्याचदा मोठ्या शिकारी जनावरांकडून पिल्ले मोठ्या प्रमाणावर शिकार होतात, त्यामुळे यांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे.

    आफ्रिकन जंगली कुत्रे हे मजबूत शरीर रचना असते. तसेच ते वर्षभरांमध्ये त्यांच्या पिल्लांना जन्म कधीही देऊ शकतात. त्यांच्या गटांमध्ये चार ते नऊ कुत्रे हे प्रौढ असतात. परंतु या कुत्र्यांच्या मोठ्या गटांमध्ये समाविष्ट असतात. त्यांच्या गटांमध्ये नऊ ते बारा कुत्र्यांचा देखील समावेश असू शकतो. यांच्यामध्ये मादी सर्वात जुनी असते. तर नर एक तर सर्वात जुना किंवा सर्वात शक्तिशाली असतो.

    आफ्रिकन कुत्र्यांचा प्रजननाचा हंगाम हा एप्रिल ते जुलै हा महिना असतो. त्यांच्या कोणताही निश्चित प्रेरणा हंगाम नाही. त्यांच्या गर्भधारणांचा कालावधी 65-72 दिवसांचा असतो. आफ्रिकन जंगली कुत्र्यांमध्ये 6 ते 26 पिल्ले असतात. जे कोणत्याही गटांमध्ये सर्वात ती संख्या त्यांच्या पिल्लांची असते.

    पिल्ले हे तीन ते चार आठवडे आईचे दूध पितात. तसेच पिल्लाचे देखभाल त्यांची आई करते. त्या पिल्ला जवळून इतर कुत्र्यांना हाकलून देते. पिल्लांनी शिकार करायला सुरुवात केल्यावर त्यांना आई खायला आणते. तसेच ते एका वर्षाचे झाल्यावर प्रौढ प्रजनन क्षम बनतात. या कुत्र्यांचे सरासरी आयुष्य 11 वर्षापर्यंत असते.

    African wild Dog Information In Marathi

    आफ्रिकन जंगली कुत्र्याची संवर्धन स्थिती :

    पूर्वी आफ्रिकेमध्ये जंगली कुत्र्यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आढळून येत होते; परंतु आता वाळवंटातील कोरडे भाग सोडले असता या कुत्र्यांच्या प्रजाती सखल जंगल तसेच उपसहारा आफ्रिकेमध्ये कमी प्रमाणात आढळून येतो. पूर्वी या भागांमध्ये जंगली कुत्र्यांची वास्तव्य खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत होते तसेच त्यांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसून येत होती.

    बऱ्याच प्रमाणात हे प्राणी आता दक्षिण पूर्व आफ्रिकेमध्ये आणि दक्षिण आफ्रिकेत राहतात. 1400 एवढीच कुत्र्यांची संख्या राहली आहे तसेच या प्रजातींचे कुत्रे धोक्यामध्ये आहेत कारण त्यांचे मोठ्या प्रमाणावर संख्या घटत आहे. आफ्रिकन जंगली कुत्रे पाळीव केले जाऊ शकत नाही किंवा हे कुत्रे पाळले जाऊ शकत नाही. बऱ्याचदा या कुत्र्यांना पाळीव प्राणी म्हणून सुद्धा ठेवल्या गेले आहे.

    FAQ


    आफ्रिकेतील जंगली कुत्र्यांना काय म्हणतात?

    आफ्रिकन जंगली कुत्रा केप शिकारी कुत्रा किंवा पेंट केलेला कुत्रा यासह अनेक नावांनी ओळखला जातो. त्याचे वैज्ञानिक नाव, Lycaon pictus, याचा अर्थ “पेंट केलेला लांडगा” असा आहे, जो प्राण्यांच्या अनियमित, चिवट व लकाकणारा पारदर्शक कापड, ज्यामध्ये लाल, काळे, तपकिरी, पांढरे आणि पिवळे फर आहेत.

    आफ्रिकन जंगली कुत्रे लांडग्यांशी संबंधित आहेत का?

    जंगली कुत्रा लांडगा किंवा कुत्रा नाही .


    आफ्रिकन जंगली कुत्रे कुत्र्यांसह प्रजनन करू शकतात?

    पाळीव कुत्र्यांपेक्षा वेगळे, जंगली कुत्र्यांचे पाय लांब असतात, त्यांच्या पुढच्या पायाला चार बोटे असतात आणि मोठे, गोलाकार कान असतात. जरी दोन्ही प्रजाती लांडग्यांपासून वंशज आहेत, तरीही ते प्रजनन करण्यास अक्षम आहेत आणि जंगली कुत्र्यांना पाळीव केले जाऊ शकत नाही.

    आफ्रिकन शिकारी कुत्रे कसे संवाद साधतात?

    आवाज आणि सुगंध चिन्हांकित करणे 

    दक्षिण आफ्रिकेत किती जंगली कुत्रे शिल्लक आहेत?

    650 पेक्षा कमी

    Was this article helpful?
    YesNo
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleकस्तुरी मृग प्राण्याची संपूर्ण माहिती Musk Deer Information In Marathi
    Next Article सांडा सरडा प्राण्याची संपूर्ण माहिती Sanda lizard Animal Information In Marathi
    आकाश लोणारे
    • Website

    माझे नाव आकाश लोणारे आहे आणि माझे शिक्षण Master of Science in Zoology झालेले आहे. मला प्राण्यांविषयी लिहिणे, माहिती वाचणे, तसेच प्राण्यांची सेवा करणे खूप आवडते.

    Related Posts

    भूचर प्राणी

    बारशिंगा प्राण्याची संपूर्ण माहिती Reindeer Animal Information In Marathi

    February 24, 2024
    भूचर प्राणी

    मुंगूस प्राण्याची संपूर्ण माहिती Mongoose Animal Information In Marathi

    February 21, 2024
    भूचर प्राणी

    सायाळ प्राण्याची संपूर्ण माहिती Sayal Information In Marathi

    February 21, 2024
    Add A Comment
    Leave A Reply

    pranijagat.com

    LEGAL

    • PRIVACY POLICY
    • TERMS AND CONDITIONS
    • DISCLAIMER
    • DMCA POLICY

    © 2025 ALL RIGHTS RESERVED PRANIJAGAT