सापसुरळी प्राण्याची संपूर्ण माहिती Skink Animal Information In Marathi

Skink Animal Information In Marathi सापसुरळी आपल्या सर्वांच्या परिचयाची आहे. ग्रामीण भागामध्ये आपल्याला बऱ्याचदा खेळताना किंवा इतर स्तरस त्यांना चालताना आपण तिला लहानपणी साप साप म्हणून घाबरतो. सापसुरळी ही बऱ्याचदा पाला पाचोळा, दगड किंवा लाकूड जमिनीमध्ये बिळे करून राहतात तसेच हे एक जलप्रेमी आहेत. ती जमिनीवर खूप वेगाने धावू शकते. यांच्या 40 प्रजाती आढळून येतात, त्यामध्ये 600 जाती आहेत. हा सरपटणारा वर्गातील प्राणी आहे. हे युरोप, आफ्रिका व आशिया खंडामधील उष्णकटिबंधामध्ये आढळून येतात.

Skink Animal Information In Marathi

सापसुरळी प्राण्याची संपूर्ण माहिती Skink Animal Information In Marathi

सापसुरळी कुठे आढळतात ?

सापसुरळी ही जंगलामध्ये किंवा दलदलच्या प्रदेशात तसेच गवताळ प्रदेश, वाळवंट गोड्या आणि खाऱ्या पाण्यामध्ये सुद्धा राहते. ह्या रात्री सक्रिय असतात तर त्यांच्या काही प्रजाती दिवसा सक्रिय असतात. यांना सापाची मावशी सुद्धा म्हटले जाते. युरोप खंड, आशिया खंड तसेच आफ्रिका खंड येथे साप सुरळीच्या अनेक प्रजाती आढळून येतात. यांची गणना सरपटणाऱ्या प्राण्यांच्या वर्गामध्ये केली जाते.

प्रजाती ४०
जाती ६०० 
लांबी १० सेंटीमीटर ते ५५ सेंटीमीटर पर्यन्त
राज्यप्राणी
ऑर्डरस्क्वामाटा

सापसुरळी काय खातात ?

सापसुरळी ह्या मांसाहारी असतात तसेच त्या कीटक भक्षी आहेत. त्यांच्या शिकारीमध्ये माशा, सुरवंट, मच्छर तसेच इतर कीटकांचा समावेश असतो. यांच्या काही प्रजाती गांडूळ, गोगलगाय यांच्यासारखे तसेच पतंगे, लहान सरडे, छोटे उंदीर सुद्धा खातात. यांच्या काही प्रजाती पाळीव म्हणून देखील आहेत. त्या सर्वभक्षी आहेत. त्यांच्या आहारामध्ये वातावरणा नुसार फरक दिसतो. काही सापसुरळ्यांच्या प्रजातींमध्ये पाने, फळे, मास सुद्धा खातात.

Skink Animal Information In Marathi

सापसुरळी शरीरिक रचना :

सापसुरळी यांच्या वेगवेगळ्या प्रजातींमध्ये त्यांची लांबी, आकार, रंग यांचामध्ये फरक जाणवतो तसेच त्यांची लांबी 10 ते 55 सेंटीमीटर पर्यंत असते. हालचालीसाठी त्यांना चार पाय व डोके त्रिकोणी असून नाजूक असते तसेच त्यांची शेपटी लांब असते.

ही शेपटी लवकर तुटते, शरीरावर बाह्य आवरण असून त्यांच्या अंगावर खवल्यांची चकचकीत असे प्रकार दिसतात. खवल्यांच्या आतील भाग हा हाडांचा बनलेला असतो. पंजाच्या तळाला आडवे तळकट असून त्यावरील पेशींमध्ये हुक्कासारखे वाढ झाल्यामुळे सिमेंटच्या भिंतीवर ह्या चालू शकतात. साप सुरळ्यांमध्ये घाणेंद्रिय तीक्ष्ण असतात.

हे त्यांच्या काही प्रजाती वाळवंटामध्ये सुद्धा आढळून येतात. यांच्या काही प्रजातीतील प्राण्यांना पाय नसतात, त्यांच्या प्रजातींमध्ये लाल डोळ्याच्या मगरीच्या आकाराचे डोके असून त्या ताकदवान असतात. जे त्यांच्या शरीराच्या आकाराला छोटे छोटे पाय सुद्धा असतात.

सापसुरळी जीवन :

साप सुरळीच्या वेगवेगळ्या जातींमध्ये त्यांची लांबी वेगवेगळी असते. त्यांना पालीप्रमाणे चार पाय असतात तसेच ह्या अत्यंत जलद गतीने धावू शकतात. त्यांच्या चारही पायांना पाच बोटं असतात, पाठीमागच्या पायाच्या बोटांमध्ये अंगठ्याच्या बाजूच्या बोटांची उंची ही बाकीच्या बोटांपेक्षा जास्त असते.

त्यामुळे तिला जलद गतीने धावता येते. त्याचबरोबर तिच्या डोक्याचा आकार सुद्धा त्रिकोणी, नाजूक असतो. तिच्या पाठीचा रंग हा करडा असतो. यांच्या काही प्रजाती ह्या पांढऱ्या पिवळसर रंगाच्या सुद्धा आढळून येतात.

त्या व्यतिरिक्त त्यांच्या शरीराच्या बाजूचा वरील रंग तपकिरी, हिरवट किंवा काळपट सुद्धा असतो. काहींची लांबी 29 सेंटीमीटर तर काही 10 सेंटिमीटर लांब असतात. काही प्रजातींमध्ये पिल्लांना जन्म देतात तर काही सापसुरळी सहा ते दहा अंडी घालतात. हे अंडे पाच ते सहा दिवसात उबवतात. आफ्रिकेमध्ये आढळणाऱ्या सापसुरळी तेथील लोक खातात तसेच ती अरबमध्ये औषधी म्हणून खातात यांचे आयुष्य साधारण 6 ते 8 वर्ष असते.

Skink Animal Information In Marathi

सापसुरळीचे प्रकार :

माबुया कॅरीनाटा : ही प्रजाती भारतामध्ये आढळून येते तसेच ती जंगलामध्ये व शहरी भागांमध्ये सुद्धा राहते, ह्या जमिनीवर रहात असून ते दिनचर आहेत. त्यांची लांबी 29 सेंटीमीटर असते. या प्रजातीतील
सापसुरळीच्या शरीराच्या वरील बाजूचा रंग तपकिरी, हिरवट व काळपट असतो तर खालील बाजू ही पांढरी व पिवळसर रंगाचे असते. ते कीटक व लहान पृष्ठवंशीय प्राणी खातात.

सॅन्ड फिश : ही प्रजाती उत्तर आफ्रिका व दक्षिण आशियामध्ये आढळून येते. भारतामध्ये ती राजस्थान मध्ये आढळून येते. ही प्रजाती पाकिस्तान येथे आढळून येते तसेच ही प्रजाती निशाचर आहे. तिची लांबी 18.5 सेंटीमीटर असते. तिच्या अन्नामध्ये ते वळवी, कीटक इत्यादी खाते तसेच ह्या हिवाळ्यामध्ये सुक्त अवस्थेत असतात.

निळ्या जिभेची सपरली : निळ्या जिभेची सापसुरळी ही इतर प्रजातीपेक्षा सर्वात मोठी सापसुरळी आहे. ही ऑस्ट्रेलियामध्ये आढळून येते. यांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यांची जीभ निळी असून मोठी असते. जी समोरच्या कीटकांना घाबरवण्यासाठी उपयोगी केली जाते.

ह्या प्रजाती सर्वभक्ष आहेत, त्यांच्या आहारामध्ये कीटक, फुले, फळे, बेरी खातात. ह्या कचऱ्यामध्ये दगडाखाली किंवा जमिनीमध्ये बीळ करून राहतात. ह्या दगडाखाली किंवा बीळ करून राहतात तसेच त्याची लांबी 45 सेंटिमीटर पर्यंत असते. हे हलक्या शरीराचे असून त्यांचे लहान अंग व डोके वेगळे असून त्यांची दात रुंद असतात.

स्नेक सापसुरळी : या प्रजातीची लांबी 8.5 सेंटीमीटर असते तसेच तिचे शरीर सापासारखे लांबट असते. तिच्या पायांना पाच बोटे असतात व शरीरावरील बाजूचा रंग तपकिरी तसेच खालच्या बाजूचा रंग पिवळसर पांढरा असतो. शरीरावर चार ते सहा उभ्या रेषा असतात तसेच ह्या प्रजातीत बिळामध्ये राहतात. यांच्या जातीतील काही साप सुरळींच्या कानावर पडदे असतात. तर काहींचे डोळे पारदर्शक न हलणारे पडदे असतात.

कॅलसाईट सापसुरळी : या प्रजातीच्या सापसुरळीचे अंग हे वाकडे तिकडे असते तसेच ती वाकडे तिकडे अंग करून चालते. या प्रजातींमध्ये डोक्याप्रमाणे शेपटी आखूड व गोलाकार असते आणि शत्रूंपासून संरक्षण करताना शेपटी कडून ती जोरात धावते. सामान्य जातींमध्ये संरक्षणा करता शेपटी लवकर तुटते व पुन्हा वाढते . काही सेकंदात नव्वद सेंटीमीटर पर्यंत स्वतःला जमिनीमध्ये पुरून घेऊ शकतात.

FAQ

स्किंक साप विषारी आहे का?

स्किंक चावणे सौम्य आणि वेदनारहित असतात, त्यामुळे ते मानवांसाठी धोकादायक नसतात. सापांच्या त्वचेचे थोडेसे साम्य असूनही, कातडे विषारी किंवा विषारी नसतात.

स्किंक हा साप आहे का?

सत्य हे आहे की स्किंक हा एक प्रकारचा सरडा आहे. तथापि, ते काही मार्गांनी भिन्न आहेत. इतर सरड्यांप्रमाणे, कातडीचे पाय लहान आणि लांबलचक शरीरे असतात. ते सापासारखे दिसतात आणि त्यांचे अनेकदा पाय असलेला साप असे वर्णन केले जाते.

स्किंकचे सामान्य नाव काय आहे?

कॉमन डॉटेड गार्डन स्किनला ‘सांप की…’ म्हणूनही ओळखले जाते.
स्किंकला हिंदीमध्ये सांप की मौसी असे संबोधले जाते, बहुतेक ते जमिनीवर राहतात. ही प्रजाती भारतीय उपखंडात आढळणारी कातडीची एक विस्तृत प्रजाती आहे. स्किंक्स हे सरडे आहेत जे Scincidae कुटुंबाशी संबंधित आहेत, 1,500 पेक्षा जास्त प्रजाती वर्णन केलेल्या सरड्यांच्या सर्वात वैविध्यपूर्ण कुटुंबांपैकी एक आहेत.

Was this article helpful?
YesNo

Leave a Comment