पापलेट प्राण्याची संपूर्ण माहिती Pomfret fish Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Pomfret fish Information In Marathi पापलेट हा मासा खाण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे, जे मासे प्रेमी आहेत त्यांना पापलेट मासे खाणे तर खूपच आवडतात. पापलेट मासा खाण्यासाठी अतिशय चविष्ट चवदार लागतो तसेच पापलेटमध्ये शरीरासाठी लागणारे आवश्यक पौष्टिक घटक तसेच प्रथिने खूप मोठ्या प्रमाणात असतात. पापलेट हा एक समुद्र मासा आहे. याचा उपयोग खाण्यासाठी केला जातो. नरम व लुसलुशीत तसेच स्वादिष्ट लागते, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या माशांची शिकार केली जाते.

Pomfret fish Information In Marathi

पापलेट प्राण्याची संपूर्ण माहिती Pomfret fish Information In Marathi

बाजारामध्ये पापलेट माशांचे तीन प्रकार असतात. त्यामध्ये रुपेरी, पांढरा आणि काळा पापलेट असे तीनही प्रकारांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. पापलेटच्या तीनही प्रजाती भरता लगतच्या हिंदी महासागरांमध्ये आढळून येतात. त्यापैकी रुपेरी पापलेटचे प्रमाण सर्वात जास्त आहे. रुपेरी किंवा कर्ड पॉपलेट यालाच मराठीमध्ये चांदवा असे देखील नाव आहे तर चला मग आपण आज या पापलेट विषयी सविस्तर माहिती पाहूया.

वैज्ञानिक नावBramidae
डोमेनयुकेरियोटा
राज्यप्राणी
ऑर्डरPerciformes
फिलमचोरडाटा
वजनदोन किलो

पापलेट मासे कुठे आढळतात ?

पापलेट हे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर मुंबई सागर क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्या व्यतिरिक्त गुजरात, ओरिसा आणि पश्चिम बंगालचा पूर्व किनारा येथे मोठ्या प्रमाणावर मासेमारी चालते. हे मासे फेब्रुवारी नंतर दक्षिणच्या दिशेने स्थलांतर करतात.

बंगालच्या उपसागरांमध्ये तसेच पश्चिम किनाऱ्यावर यांची शिकार मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्या व्यतिरिक्त हे मासे अटलांटिक महासागर हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागर येथे मोठ्या प्रमाणात आढळून येतात.

पापलेट मासे काय खातात ?

पापलेट हे लोकांवर जगतात, त्यामध्ये सालपा, ढोली, ओलम, देहगुही इतर प्राण्यांच्या छत्रीकांचा समावेश आहे. काही वेळा समुद्रातील छोटे छोटे प्राणी सुद्धा हे मासे खातात. हे मासे लहान व मऊ अपृष्ठवंशीय प्राणी खातात. ही मध्यम स्वरूपाचे समुद्र जीव सुद्धा खातात. समुद्रामध्ये उपलब्ध असलेले अपृष्ठवंशीय प्राणी खातात व आपले जीवन जगतात.

Pomfret fish Information In Marathi

पापलेट माशाचे वर्णन :

पापलेटचे मुख्यतः तीन प्रकार पडून येतात, त्यामध्ये रुपेरी किंवा करडा पापलेट हा भारताच्या पूर्व, पश्चिम किनाऱ्यावर आढळून येतो. त्याची लांबी 30 cm असून त्याचे वजन एक किलो असते. बऱ्याचदा हे 40 सेंटिमीटर लांबीचे आणि दोन किलो वजनाचे सुद्धा आढळलेले आहेत.

आकाराने समचतुर्भुज असून मुस्कट थोबड असते तसेच डोके व पाठ हे अवयव करड्या रंगाचे असून त्यामध्ये जांभळ्या रंगाची झाक असते. डोके आणि शरीराच्या दोन्ही बाजू रुपेरी करड्या असून अधर बाजू पांढरी असते. पापलेटचे संपूर्ण शरीरावर बारीक काळे ठिपके दिसतात.

शरीर चपटे व दोन्ही बाजूने दबलेले असते. शेपटीचा भाग पिवळसर असतो. श्वसनासाठी कल्याणच्या चार जोड्या असतात. कल्ल्यावर आवरण असून त्यांच्या वरच्या भागांवर काळा ठिपका असतो. शरीरावर लहान व पातळ वक्राकार अशी खवले असतात.

पांढरा पापलेटचा आकार किंचितसा अंडाकार असतो तसेच त्याचे रुपेरी पापलेटची साम्य असले तरी त्याचा रंग मात्र हा वेगळाच असतो. पांढरा पापलेट गळत करडा ते फिकट तपकिरी अशा कोणत्याही रंगामध्ये असू शकतो.

त्याची खालची बाजू रुपेरी असून त्यावर धातूच्या चमकेप्रमाणे छटा असतात तसेच शरीरावर तपकिरी ठिपके दिसतात. हे लहान व मऊ अपृष्ठवंशीय प्राणी खातात. बंगालच्या उपसागरांमध्ये तसेच पश्चिम किनाऱ्यावर यांची शिकार मोठ्या प्रमाणावर केली जाते. काळा पापलेट दिसायला रुपेरी पॉपलेट सारखा असतो तरी तो दोन्ही माशांपेक्षा आकाराने थोडा मोठा असतो.

याची शरीराची लांबी 60 सेंटीमीटर असते. त्याचा रंग गळत तपकिरी असून त्यामध्ये निळ्या रंगाच्या छटा दिसतात. पोटाकडचा भाग फिकट असतो तर पराकरचे टोकाकडील भाग हे काळे असतात तसेच शेपूट पिवळसर असून तिच्यावर तपकिरी रंगाचे तीन आडवे पट्टे असतात. या माशांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, प्रथिने, मेद फॉस्फरस असते, त्यामुळे काळा पापलेट सर्वात जास्त खाल्ला जातो.

पापलेटचे जीवन:

पापलेट हे किनाऱ्यापासून थोडे दूर अंतरावर म्हणजेच 35 ते 40 मीटर खोलीपर्यंत पाण्यामध्ये पोहतात. हे मासे थव्याने राहतात. विनीच्या हंगामामध्ये या माशांचे रोशन आणि अंडाशय यावरून सर्व मादी बाहेरून ओळखता येते. पूर्ण वाढ झालेली अंडे पारदर्शक असतात तसेच त्यामध्ये तेलाचा एक थेंब दिसतो, त्यामुळे अंडी पाण्यावर तरंगतात. मादी एका हंगामात 65 हजार ते एक लाखापर्यंत अंडी घालते.

भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील मुंबई महासागर क्षेत्रामध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर हा या माशांचा विनीचा हंगाम असतो. मासे पकडण्याचा हंगामा ऑक्टोबर फेब्रुवारी या काळामध्ये जोरात चालतो तर फेब्रुवारी नंतर हे मासे दक्षिणेच्या दिशेने स्थलांतर करतात. त्यांचे मास खाण्यासाठी स्वादिष्ट लागल्याने पापलेट यांची मोठ्या प्रमाणावर शिकार केली जाते व हे खाल्ले जातात.

Pomfret fish Information In Marathi

पापलेट मासाचे प्रकार :

रुपेरी पॉपलेट : रुपेरी पापलेट लेट या माशाचे शरीर दोन्ही बाजूंनी दबलेले असते तसेच या प्राण्याची पृष्ठ पक्ष आणि बुधपक्ष करणे रंगाचे असून त्यावर दाट काळे ठिपके असतात. या दोन्ही पक्षातील कंटक छाटल्यासारखे दिसतात. पुष्पपक्ष खोल भेगने द्वेषाखीत झालेले असून त्याची खालची पाली जास्त लांब असते तसेच शरीर लहान पातळ शलकांनी आच्छादलेले असते.

या माशांचे मास खाण्यासाठी अत्यंत स्वादिष्ट व लुसलुशीत असते, त्यामुळे या माशांचा खाण्यासाठी उपयोग केला जातो. यामुळे याची मासेमारी सुद्धा मोठ्या प्रमाणावर केली जाते. मुंबई किनाऱ्यावर या मासेमारीचा हंगाम हा ऑक्टोबर पासून सुरू होतो.

पांढरा पापलेट : पांढरा पापलेट याला मराठीमध्ये सारंगा असे म्हटले जाते. याचा आकार किंचितसा अंडाकार असतो तसेच त्याचे रुपेरी पापलेटची साम्य असले तरी त्याचा रंग मात्र हा वेगळाच असतो. पांढरा पापलेट गळत करडा ते फिकट तपकिरी अशा कोणत्याही रंगामध्ये असू शकतो, त्याची खालची बाजू रुपेरी असून त्यावर धातूच्या चमकेप्रमाणे छटा असतात तसेच शरीरावर तपकिरी ठिपके दिसतात. हे लहान व मऊ अपृष्ठवंशीय प्राणी खातात बंगालच्या उपसागरांमध्ये तसेच पश्चिम किनाऱ्यावर यांची शिकार मोठ्या प्रमाणावर केली जाते.

काळा पापलेट : काळा पापलेट याला मराठीमध्ये हलवा असे म्हटले जाते. हा दिसायला रुपेरी पॉपलेट सारखा असतो तरी तो दोन्ही माशांपेक्षा आकाराने थोडा मोठा असतो. याची शरीराची लांबी 60 सेंटीमीटर असते. त्याचा रंग गळत तपकिरी असून त्यामध्ये निळ्या रंगाच्या छटा दिसतात.

पोटाकडचा भाग फिकट असतो तर पराकरचे टोकाकडील भाग हे काळे असतात तसेच शेपूट पिवळसर असून तिच्यावर तपकिरी रंगाचे तीन आडवे पट्टे असतात. या माशांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, प्रथिने, मेद फॉस्फरस असते, त्यामुळे काळा पापलेट सर्वात जास्त खाल्ला जातो.

FAQ

पोम्फ्रेटमध्ये विशेष काय आहे?

पोम्फ्रेट माशांमध्ये चरबीचे प्रमाण जास्त असते, ते कॅल्शियम, जीवनसत्त्वे ए आणि डी आणि व्हिटॅमिन बी 12 सह बीव्हिटामिन प्रदान करतात.

कोणते पोम्फ्रेट मासे आरोग्यासाठी चांगले आहेत?

ब्लॅक पोम्फ्रेट

पोम्फ्रेट हा कोणत्या प्रकारचा मासा आहे?

बटरफिश

Was this article helpful?
YesNo

Leave a Comment