Close Menu
    Facebook X (Twitter) Instagram
    • Home
    • उभयचर प्राणी
    • जलचर प्राणी
    • भूचर प्राणी
    • About Us
      • Contact Us
      • Privacy Policy
      • Disclaimer
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
    प्राणी जगतप्राणी जगत
    • Home
    • उभयचर प्राणी
    • जलचर प्राणी
    • भूचर प्राणी
    • About Us
      • Contact Us
      • Privacy Policy
      • Disclaimer
    Subscribe
    प्राणी जगतप्राणी जगत
    Home » उभयचर प्राणी » किंग कोब्रा प्राण्याची संपूर्ण माहिती King Cobra Fish Information In Marathi
    उभयचर प्राणी

    किंग कोब्रा प्राण्याची संपूर्ण माहिती King Cobra Fish Information In Marathi

    By आकाश लोणारेFebruary 21, 2024Updated:March 24, 2024No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email
    King Cobra Fish Information In Marathi
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    King Cobra Fish Information In Marathi किंग कोब्रा यालाच नागराज या नावाने सुद्धा ओळखले जाते. भारतामधील पूर्व व दक्षिण भागांमध्ये आढळणारी ही प्रजाती दुर्मिळ सापाची प्रजाती आहे. नावाप्रमाणेच या सापाचे विष खूपच भयंकर आहे तसेच हा साप विषारी असून सर्व सापांमध्ये लांबीला सर्वाधिक आहे. हा साप इतर नागांपेक्षा खूपच धोकादायक आहे. याच्या विषाने माणूस अर्ध्या तासाच्या आत मरू शकतो.

    King Cobra Fish Information In Marathi

    किंग कोब्रा प्राण्याची संपूर्ण माहिती King Cobra Fish Information In Marathi

    या सापाचा फणा इतर नागांपेक्षा छोटा असतो. हा साप त्याचा फणा तीन ते चार फूट उंच उभा करू शकतो. हा साप घनदाट जंगल किंवा कमी माणसांच्या वस्तीमध्ये राहणी पसंत करतो. किंग कोब्रा हा साप चपळ असून हल्लाखोर साप आहे. याचे विष खूपच भयावह आहे. माणसाला अर्ध्या तासांमध्येच मृत्यूमुखी पाडतो, सापाच्या दर्शनामुळे मानवाच्या हृदय क्रिया थांबतात किंवा त्याला बेशुद्धीची स्थिती निर्माण होते.

    वैज्ञानिक नावकिंग कोब्रा
    आयुर्मानअंदाजे ९-१० वर्षे
    गती२९ किमी/ता
    उच्च वर्गीकरणएलापिने
    राज्यप्राणी
    ऑर्डरस्क्वामाटा

    चक्कर येणे, घाम फुटणे साप दंश केल्यानंतर निर्माण होते. तर चला मग किंग कोब्रा या सापाविषयी सविस्तर माहिती पाहूया.

    किंग कोब्रा हा साप कुठे आढळतो?

    किंग कोब्रा किंवा नागराज हे साप इतर विषारी सापांमध्ये सर्वात मोठे असून त्यांची लांबी 6.5 मीटर एवढी लांब असते तसेच हे साप भारतामधील जंगलांमध्ये राहणे पसंत करतात. महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमा भागांमध्ये तसेच केरळ या राज्यांमध्ये सुद्धा हे साप आढळून येतात.

    त्या व्यतिरिक्त आसाम मधील अरण्यामध्ये तर या सापांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे तसेच दक्षिण आशियामधील फिलिपाईन्स आणि इंडोनेशियामध्ये हे साप आढळून येतात. त्या व्यतिरिक्त पूर्व चीनमध्ये हे साप थोड्याफार प्रमाणात आढळून येतात. किंग कोब्रा हा साप विशेषतः चपळ व हल्लाखोर साप आहे. याच्या चाव्यामध्ये मोठ्या प्रमाणात विष भक्षाच्या शरीरामध्ये सोडले जाते.

    किंग कोब्रा काय खातो ?

    किंग कोब्रा साप सुद्धा इतर सापांप्रमाणे जीभ बाहेर काढतो. त्याची जीभ दुभंगलेली असते, जिभेच्या टोकावर आलेल्या गंध कणांचे ज्ञान सापाला टाळूवर असलेल्या जॅकोबसन अवयवामुळे होते. भक्षाचे नेमके स्थान आणि मिलन काळात मादीचे विलन गंध ओळखण्यासाठी याचा त्यांना उपयोग होत असतो.

    धामण, लहान अजगर, विषारी साप तसेच दुर्मिळ असलेले सरडे पक्षी आणि लहान कुर्तळणारे प्राणी खातात. दक्षिण भारतात चहाच्या मळ्यात या सापांमुळे अनेक लोकांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहे.

    King Cobra Fish Information In Marathi

    किंग कोब्रा सापाची रचना :

    किंग कोब्रा साप जगामध्ये आकाराने सर्वात मोठे व विषारी आहेत तसेच या सापाला नागराज असे म्हणून सुद्धा ओळखले जाते. या सापांची लांबी 5.6 मीटर असून भारतातील जंगलांमध्ये त्यांचे मुख्यतः वास्तव्य असते. हे साप महाराष्ट्राच्या जंगलांमध्ये सुद्धा आढळून येतो. या सापाचा त्वचेचा रंग फळाप्रमाणे हिरवा काळसर, तपकिरी किंवा काळा असतो.

    त्याच्या शरीरावर फिकट पिवळ्या रंगाचे आडवे पट्टे असतात तसेच त्याचे पोट फिक्कट पिवळे आणि पांढरे असून त्याच्या शरीरावर खवले एकसारखे असतात. लहान किंग कोब्रा यांच्या शरीरावर काळ्या, पिवळ्या पट्ट्यांमुळे तो पटेरी मण्यार सापासारखाच दिसतो. त्याला ओळखण्यासाठी त्याचा फणा खून ठरते. पूर्ण वाढ झालेल्या किंग कोब्रा या सापाचे डोके मोठे वजनदार असते तसेच इतर सापांच्या प्रमाणामध्ये त्याचे जबडे परस्परांना जोडलेले नसल्यामुळे मोठे भक्ष त्यांना सहजपणे गिळता येते.

    त्यांच्या वरच्या जबड्याच्या पुढील भागांमध्ये दोन अचल बोकड विषदंत असतात तसेच यामधून विष अंतक्षेपण भक्षाच्या शरीरात करता येते. नर हे मादी पेक्षा आकाराने मोठे व मादीहून जाड असतात तसेच या सापांचे आयुष्य वीस वर्षे असते.

    किंग कोब्रा सापाचे जीवन :

    किंग कोब्रा हे साप सहसा मानवी वस्तींमध्ये राहत नाहीत. ते घनदाट जंगलांमध्ये राहणे पसंत करतात. या सापांचे डोळे तीक्ष्ण असतात. त्यांना हालचाल करणारी वस्तू 100 मीटर वरून सुद्धा ओळखता येते. मोठ्या आकारामुळे जमिनीमधील कंपन्यांचे उत्तम ज्ञान यांना होते. कंपनावरून आणि गंध ज्ञानावरून या सापांना भक्षांचा अचूक पाठलाग करता येतो.

    एकदा भक्ष जबड्यामध्ये पकडले म्हणजे अर्धवट धडपड करणारे भक्ष तो जबड्याने घेण्यास प्रारंभ करतो. दिवसभरात हे साप कधीही आपले भक्ष्य पकडतात. हे साप इतर सापांंपेक्षा मोठ्याने फुत्कारतात. हे साप समोरच्या कोणत्याही सजीवाच्या हालचालींमुळे चिडतात. जेव्हा हा साप चिडतो तेव्हा उंच फणा करून फुत्कारतात व त्यांच्या दोन मीटरच्या परिणाममध्ये सुद्धा हे साप हल्ला करू शकतात.

    हे साप एकच वेळा अनेक जावे घेतो, प्रौढ किंग कोब्रा दंश करताना विषाचे दात शरीरात घुसविल्यानंतर दात थोडा वेळ स्थिर ठेवतो. एवढ्या वेळेत भरपूर विष भक्ष्याच्या शरीरात सोडतो. त्याचा स्वभाव आपणहून हल्ला करण्याचा नाही परंतु तो भिजवल्यानंतर किंवा अडचणीत सापडल्यानंतर स्वरक्षणासाठी हल्ला करतो.

    King Cobra Fish Information In Marathi

    किंग कोब्रा याची मादी सापांमध्ये अंड्याचे रक्षण करणारी एकमेव मादी आहे. वाळलेली पाने व गवताचे घरटे करून त्यामध्ये ही मादी वीस ते चाळीस अंडी घालते. अंड्यांमधून पिल्ले बाहेर पडेपर्यंत मादी या पानांच्या घरट्यांवर वेटळे करून बसते आणि कोणत्याही पाण्यात अंड्यांच्या जवळपास फिरकू देत नाही. अंड्यातून जोपर्यंत पिल्ले बाहेर येत नाही तोपर्यंत ती त्यांची संरक्षण करत असते.

    पिल्ले बाहेर येण्याची वेळ झाली की, ती घरट्यापासून दूर जाऊन एखादे भक्षक होते. मात्र स्वतःची पिल्ले ती खात नाही जन्मलेली पिल्ले 40 ते 50 सेंटीमीटर लांब असतात. ही पिल्ले काळी कुडकुडीत असून त्यांच्या शरीरावर तसेच शेपटीवर पिवळे किंवा काळे आडवे पट्टे असतात. त्यांचे विष प्रौढ नागराजा एवढेच विषारी असते.

    किंग कोब्रा सापाचे विष कसे परिणाम करते?

    किंग कोब्रा या सापाचे विष हे चेतासंस्था आणि हृदय यावर थेट परिणाम करते. या विषयामुळे मनुष्याला काही मिनिटांमध्येच मृत्यू येऊ शकतो. त्यांच्या विषाचा परिणाम चेतासंस्थेवर तात्काळ होतो तसेच त्यामुळे तीव्र वेदना, चक्कर येणे, पक्षघात ही लक्षणे लगेच दिसतात. दंश केलेल्या व्यक्तीच्या हृदया क्रिया बंद पडून बेशुद्धी सारखी स्थिती निर्माण होते.

    तर किंवा श्वसन संस्थेचा पक्षघात होऊन 40 ते 45 मिनिटांमध्ये मनुष्य मृत्युमुखी पडू शकतो. या सापाने दंश केल्यास पन्नास टक्के व्यक्ती मरण पावतात. थायलंड रेड क्रॉस आणि हैदराबाद मधील सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थांनी या सापांच्या दंशावर दोन वेगवेगळी प्रति विष तयार केली आहेत. मात्र त्यांचे उत्पादन अगदी कमी प्रमाणात असल्यामुळे ती सहज उपलब्ध होत नाही.

    FAQ


    किंग कोब्रा किती विषारी असतात?

    विषारी सापांमध्ये त्यांचे विष सर्वात शक्तिशाली नाही, परंतु ते एका चाव्यात जेवढे न्यूरोटॉक्सिन देऊ शकतात – द्रव औंसच्या दोन-दशांश पर्यंत – 20 लोकांना किंवा अगदी हत्तीला मारण्यासाठी पुरेसे आहे. किंग कोब्रा विषाचा मेंदूतील श्वसन केंद्रांवर परिणाम होतो, ज्यामुळे श्वसनक्रिया बंद पडते आणि हृदयक्रिया बंद पडते.


    किंग कोब्रा काय करू शकतो?

    धोक्याच्या प्रदर्शनात, हे साप त्यांच्या शरीराचा पुढचा भाग जमिनीपासून सुमारे तीन ते चार फूट (1 ते 1.2 मीटर) उंच करू शकतात आणि या स्थितीत त्यांच्या शत्रूचा बराच अंतरावर पाठलाग करू शकतात. किंग कोब्रा सुद्धा हिसके मारेल आणि त्याच्या मानेच्या फासळ्या सपाट करेल.


    तुम्ही कोब्रा चावल्यापासून वाचू शकता का?

    बहुतेक सर्पदंश, अगदी कोब्रा चावणे, प्राणघातक नसतात .” व्हिटेकर म्हणाले. “परंतु कोणताही सर्पदंश हा वैद्यकीय आणीबाणी मानला पाहिजे. “कोणत्याही विलंबाशिवाय रुग्णालयात जाणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. कोणत्याही स्थानिक किंवा घरगुती उपायाचा अवलंब करू नका कारण सर्पदंशासाठी एकच इलाज आहे आणि तो म्हणजे अँटीवेनम.”


    सर्वात मोठा कोब्रा किती मोठा आहे?

     5.71 मीटरपर्यंत

    Was this article helpful?
    YesNo
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleध्रुवीय अस्वल प्राण्याची संपूर्ण माहिती Polar bear Animal Information In Marathi
    Next Article क्रोकोडाइल प्राण्याची संपूर्ण माहिती Crocodile Ice Fish Information In Marathi
    आकाश लोणारे
    • Website

    माझे नाव आकाश लोणारे आहे आणि माझे शिक्षण Master of Science in Zoology झालेले आहे. मला प्राण्यांविषयी लिहिणे, माहिती वाचणे, तसेच प्राण्यांची सेवा करणे खूप आवडते.

    Related Posts

    उभयचर प्राणी

    फुरसे साप कसा दिसतो? संपूर्ण माहिती मराठी

    November 10, 2025
    उभयचर प्राणी

    क्रोकोडाइल प्राण्याची संपूर्ण माहिती Crocodile Ice Fish Information In Marathi

    February 21, 2024
    उभयचर प्राणी

    गांडूळ प्राण्याची संपूर्ण माहिती An Earthworm animal Information In Marathi

    February 21, 2024
    Add A Comment
    Leave A Reply

    pranijagat.com

    LEGAL

    • PRIVACY POLICY
    • TERMS AND CONDITIONS
    • DISCLAIMER
    • DMCA POLICY

    © 2025 ALL RIGHTS RESERVED PRANIJAGAT