बोंबील मासा प्राण्याची संपूर्ण माहिती Bombay duck fish Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Bombay duck fish Information In Marathi बॉम्बे डक फिश बदक नसून एक मासा आहे. ज्याला सामान्य भाषेमध्ये बोंबील असे नाव आहे. हे मासे बॉम्बे डक या नावाने ओळखले जाते कारण यांच्या शरीराची लांबलचक रचना असते तसेच त्यांचे तोंड संकुचित असते. डोळे छोटे असून त्यांची तोंड लहान असते, तोंड कडून पातळ वक्र व त्यांना दात असतात.

Bombay duck fish Information In Marathi

बोंबील मासा प्राण्याची संपूर्ण माहिती Bombay duck fish Information In Marathi

बोंबील मासे हे बऱ्याच लोकांचे अतिशय प्रिय खाद्य आहे. आजच्या काळामध्ये मासे खाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मांसाहार करणाऱ्या लोकांसाठी कोणकोणत्या माशांचा खाण्याकरिता उपयोग करावा किंवा कोणते मासे खाणे योग्य आहे याविषयी बरेच लोक विचार करतात.

शास्त्रीय नावहार्पोडॉन नेहेरियस 
लांबीसु. २५ सेंमी.पर्यंत
ऑर्डरऑलोपिफॉर्म्स
कुटुंबSynodontidae

खाण्यासाठी मासे, मटण, चिकन, बोंबील, अंडी इत्यादी प्रकारचे अनेक मासाहारी पदार्थ लोक आवडीने खातात. बोंबील खाणारे लोक तर भरपूर आहेत तसेच त्यांच्यामध्ये खूप पौष्टिक घटक सामावलेले असतात. जे आपल्या आरोग्यासाठी अतिशय आवश्यक असतात.

बोंबील हे बाजारामध्ये सहजपणे मिळतात, बोंबील खाऱ्या पाण्यातले व गोड्या पाण्यातले असे दोन प्रकारचे असतात. जगभरांमध्ये जवळपास 2-8 हजार जातीचे झिंगे, बोंबील असतात. बाहेरून दिसायला हे अतिशय विचित्र दिसत असेल तरी खाण्यासाठी अतिशय चविष्ट व रुचकर लागतात. तर चला मग जाणून घेऊया बोंबील या मासे विषयी सविस्तर माहिती.

Bombay duck fish Information In Marathi

बोंबील हा मासा कोठे राहतो?

हा मासा आफ्रिकेतील पूर्व किनाऱ्यापासून ते उत्तरेकडे, लाल समुद्र आखाती अरबी समुद्रामध्ये सापडतो. हा मासा अरबी समुद्रमध्ये कच्छपासून मुंबईच्या दक्षिणेस, अलिबाग, मुरुड इत्यादी कोकणपट्टीच्या भागांमध्ये तसेच बंगालच्या उपसागरात सुद्धा सापडतो. हे सामान्यपणे मासे उथळ समुद्रात राहतात. भारतापासून चीन पर्यंतच्या नदीमुखात किंवा किनाऱ्याजवळ समुद्रामध्ये हे मासे आढळतात.

मुंबई किनाऱ्याजवळील समुद्रात बंगालच्या उपसागरामध्ये हे मासे मोठ्या प्रमाणात आढळून येतात. मुंबई लगत हे मासे मोठ्या प्रमाणात दिसून येतात. बॉम्बे डक हे नाव त्यांना मुंबईमध्ये मिळाले आहे. त्यालाच आपण साध्या भाषेमध्ये बोंबील मासा असे म्हणतो.

बोंबील माशाचे वर्णन :

बोंबील मासा हा शरीराने लांब असतो, त्याची लांबी 25 सेंटिमीटर असते तसेच पूर्ण वाढ झालेल्या बोंबील माशाची लांबी 40 सेमी लांब असू शकते. याचे अर्ध पारदर्शक असे शरीर असून दोन्ही बाजूला चपटे असते. पोट हे रुपेरी व पांढरे रंगाचे असते तसेच ह्या माशाचे शरीर लांबट व निमुळत्या शरीराच्या टोकाला त्रिशूल सारखा पुच्छपर असतात. त्यांचे तोंड रुंद व खोल असते तसे जबळ्यांमध्ये बारीक असे दात असतात.

खालचा जबड्यापेक्षा मोठा असून खालच्या जबड्यातील काही दात भाल्याप्रमाणे टोकदार असतात. पाठीवर किंचित बारीक नक्षी असते. हा मासा वाळल्यानंतर सुद्धा उपयोगात आणला जाऊ शकतो. या माशांमध्ये भरपूर प्रमाणात पाण्याची प्रमाण असते, त्यामुळे हे मासे लवकर खराब होतात .

बोंबीलचा प्रजनन काळ

बोंबील या माशांमध्ये नर व मादी यांच्यातील फरक प्रथमदर्शकाचा ओळखता येत नाही कारण नराची लांबी 17 सेंटीमीटर झाल्यानंतर त्याचे वृषण स्पष्ट दिसू लागतात तसेच मादीची लांबी 12 ते 14 सेंटीमीटर असते. तिच्या शरीरातील अंडाशय हे त्यांची लांबी पूर्ण झाल्यानंतरच दिसू लागते.

मादी सेंटीमीटर लांब एवढी वाढली की, प्रजनन क्षम होते. तसेच 32 सेंटीमीटर लांबीच्या मादीच्या अंडाशयात 24 हजार ते दीड लाख अंडी असतात. प्रजनन काळामध्ये दोन ते तीनदा अंडी घातल्या जातात.

बोंबील माशाचा उपयोग :

बोंबील हे मासे व्यापराच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचे आहे. कारण बोंबील ताजे व खारून सुकून सुद्धा ठेवले जातात. त्यांच्या शरीरात 90 टक्के पाणी असते. त्यामुळे वाळण्याची प्रक्रिया लवकर सुरू होते. कोकण किनार्‍यावर बांबूच्या खास मांडवावर हे मासे वाळण्यासाठी लोक टांगून ठेवतात. सुकलेले व व वाळलेले बोंबील साठवता येतात तसेच ते दूरवर सुद्धा पाठवता येतात.

मुंबई जवळच्या समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर बोंबील मागणीची मासेमारी चालते. त्यामधून योग्य तो नफा सुद्धा त्यांना मिळतो. व्यापाराच्या दृष्टीने हे मासे अत्यंत उपयोगी आहेत. त्या व्यतिरिक्त हे मासे खाण्यासाठी उपयोगी आहेत. महाराष्ट्रामध्ये बोंबील मोठ्या प्रमाणावर खाल्ली जाते तसेच महाराष्ट्रात अतिशय लोकप्रिय खाद्य आहे.

श्रीलंकेत वाळलेल्या माशांच्या रूपात खाल्ली जाते. ही तळून सुद्धा खाली जाऊ शकते, खाण्यासाठी बोंबील मासा चवदार लागते. त्यामुळे बोंबील माशाची भाजी करून सुद्धा बरेच लोक मोठ्या आवडीने खातात तसेच मोठ्या हॉटेलमध्ये बोंबील करी, बोंबील, सुका बोंबील, बोंबील चटणी इत्यादी रेसिपी त्यापासून बनवल्या जातात.

बोंबील हे इंडो पॅसिफिकच्या उष्णकटिबंधीय भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर हे मासे आढळून येतात. भारतीय किनाऱ्यावर त्यांचे सतत वितरण होत असते. त्यामुळे या माशाला वर्षभर मागणी असते. हे मासे महाराष्ट्र, गुजरात पाण्यात पकडली जातात. त्या व्यतिरिक्त बंगालच्या उपसागरात आणि दक्षिणच्या समुद्रांमध्ये सुद्धा हा व्यवसाय केला जातो.

Bombay duck fish Information In Marathi

बोंबील खाल्यामुळे कोणकोणते फायदे होतात?

वेगवेगळ्या प्रकारचे मासे, मासे प्रेमींना आवडतात. त्यातीलच एक प्रकार म्हणजे बोंबील हा मासा खूप लोकांचे आवडते खाद्य असून त्यामध्ये भरपूर पोषक घटक असतात. त्यामध्ये फॅटी ऍसिड, प्रथिने, कॅल्शियम, लोह, जीवनसत्वे इत्यादी घटक असतात. याशिवाय त्यांच्यामध्ये चरबीचे प्रमाण सुद्धा चांगलं असतं.

इतर माशांच्या तुलनेत लोहाचं प्रमाण अधिक असल्यामुळे ऍनिमिया असणाऱ्या व्यक्तींना बोंबील हे मासे खूपच उपयुक्त ठरतात. रक्तदाब नियंत्रणात ठेवणे नखे, केस व त्वचा यांच्या वाढसाठी असलेले पोषक घटक बोंबील माशांमधून मिळतात.

बोंबीलमध्ये आयरनचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शरीरामध्ये ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिन सुद्धा मिळते. शरीरामध्ये असलेल्या मास पेशींना पूर्णपणे रक्तप्रवाह होत असतो. त्यामुळे यांच्या सेवनामुळे मेंदू तल्लक राहतो तसेच मेंदूसाठी अमेझॉन अत्यंत आवश्यक असते.

बोंबीलच्या नियमित खाण्यामुळे डोळ्यासमंधीचे विकार दूर होतात किंवा नष्ट होतात आणि एकदा कम्प्युटर मोबाईलवर तास तास काम केल्यामुळे बऱ्याच लोकांचे डोळे थकून जातात, अशावेळी बोंबीलचे सेवन केल्यास डोळ्याला आलेला थकवा दूर होतो. केसांसाठी देखील बोंबील उपयुक्त मांडली जाते. केस गळतीची समस्या असेल तर ती त्वरित दूर होते.

FAQ


बोमली मासे काय खातात?

ते मुख्यतः कोळंबी आणि लहान मासे खातात आणि मोठ्या गटात फिरतात.

बॉम्बे डक आरोग्यासाठी चांगले आहे का?

होय, बॉम्बे बदक तुमच्या आरोग्यासाठी चांगले आहे . हा एक पौष्टिक मासा आहे जो उच्च दर्जाची प्रथिने, आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे प्रदान करतो. हे स्नायूंच्या विकासास, हृदयाचे आरोग्य आणि एकूणच आरोग्यास समर्थन देते.

बॉम्बे डकचा मुख्य घटक कोणता आहे?

याला बुमालो देखील म्हणतात, हे अजिबात बदक नाही तर भारत आणि बांगलादेशातील एक लहान सुका मासा आहे . मासे जमिनीवर आणले जातात आणि उन्हात सुकविण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर रॅकवर टांगले जातात. स्वयंपाक करताना, बॉम्बे बदक सामान्यतः ओव्हनमध्ये गरम केले जाते किंवा स्टू आणि करींवर कुरकुरीत होईपर्यंत तळलेले असते.

इंग्रजी मध्ये Bombil म्हणजे काय?

बॉम्बिल (बहुवचन बॉम्बिल्स) सरडा मासा (हार्पॅडॉन नेहेरियस), बॉम्बे डक किंवा बम्मालो, मूळ अरबी समुद्रात .

Was this article helpful?
YesNo

Leave a Comment