Close Menu
    Facebook X (Twitter) Instagram
    • Home
    • उभयचर प्राणी
    • जलचर प्राणी
    • भूचर प्राणी
    • About Us
      • Contact Us
      • Privacy Policy
      • Disclaimer
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
    प्राणी जगतप्राणी जगत
    • Home
    • उभयचर प्राणी
    • जलचर प्राणी
    • भूचर प्राणी
    • About Us
      • Contact Us
      • Privacy Policy
      • Disclaimer
    Subscribe
    प्राणी जगतप्राणी जगत
    Home » जलचर प्राणी » शार्क प्राण्याची संपूर्ण माहिती Shark Information In Marathi
    जलचर प्राणी

    शार्क प्राण्याची संपूर्ण माहिती Shark Information In Marathi

    By आकाश लोणारेFebruary 21, 2024Updated:March 21, 2024No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email
    Shark Information In Marathi
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    Shark Information In Marathi शार्क हे मासे सर्वात धोकादायक आहेत. समुद्रामध्ये शार्क माशांची दहशत असते. या माशांना टायगर ऑफ द सी असे देखील म्हणून ओळखले जाते. त्यांच्या 350 जाती आढळून येतात, त्यापैकी 30 जाती ह्या मानवाच्या दृष्टीने खूपच धोकादायक आहेत.

    Shark Information In Marathi

    शार्क प्राण्याची संपूर्ण माहिती Shark Information In Marathi

    सर्व शार्क दिसण्यास एकसारखे असतात; परंतु त्यांच्यामध्ये भिन्नता आढळून येते. त्यांच्या आकार, रंग तसेच वजन यामध्ये बऱ्याच प्रकारची तफावत दिसून येते. काही शार्क निळ्या रंगाच्या तर करड्या, पिवळ्या, तपकिरी व पांढऱ्या अशा वेगवेगळ्या रंगांमध्ये आढळून येतात. काही शार्कच्या शरीरावर पट्टे ठिपके किंवा नक्षी असते.

    मोठा पांढरा शार्क२० फूट (६.१ मीटर)तटीय आणि समुद्रीमेंडक, मासा, समुद्री जन्तूआशीर्वादी ३० ते ७० वर्षे
    व्हेल शार्क४० फूट (१२ मीटर)उष्णकटिबंधीय आणि उपनगरीजांभळे, लागवडी मासे, शंभरआप्रकारी ७० ते १०० वर्षे
    टायगर शार्क१८ फूट (५.५ मीटर)तटीय आणि अरक्षितमासा, उभारटी, समुद्री जन्तूआशीर्वादी २० ते ३० वर्षे
    हॅमरहेड शार्क२० फूट (६.१ मीटर)तटीय आणि समुद्रीमासा, उभारटी, रेज, क्रस्टेशियन्ससामान्यतः २० ते ३० वर्षे
    मॅको शार्क१३ फूट (४ मीटर)तटीय आणि समुद्रीमासा, उभारटी, इतर जलक्रियालगेच २० ते ३० वर्षे
    बुल शार्क११ फूट (३.४ मीटर)तटीय आणि ताज्यपानीमासा, रेज, उभारटी, दौल्फिनतापमानानुसार १६ ते २५ वर्षे

    तर काही शार्कचे शरीर खूप मोठ्या आकाराचे असते. शार्क या माशांचे आयुष्य 25 वर्ष असते परंतु काही शार्क माशांच्या प्रगती 100 वर्षे सुद्धा जगतात. पृथ्वीवर 35 कोटी वर्षाहून हे शार्क माशांचे अस्तित्व आहे असे मानले जाते. त्यांची उत्पत्ती इतर माशांबरोबरच झालेली आहे असे देखील मानले जाते. जगातील सर्वात महासागरांमध्ये हे शार्क आढळून येतात. शार्क हे प्राणी उष्णकटिबंधीय तसेच उपोषण कटीबंधातील सागरी विभागांमध्ये सुद्धा कमी जास्त प्रमाणात आढळून येतात. तर चला मग शाळेत या प्राण्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

    शार्क हे कुठे आढळतात ?

    शार्क हे सर्वात धोकादायक प्राणी म्हणून गणले जाते. हे प्राणी खोल समुद्रांमध्ये तसेच पृथ्वीवरील इतर समुद्रांमध्ये सुद्धा आढळून येतात. या माशांची पृथ्वीवर 35 कोटी वर्षापासून उपस्थिती आहे असे मानले जाते. हे जगातील सर्वच सागर महासागरांमध्ये आढळून येतात तसेच उष्णकटिबंधीय व उपोष्ण कटिबंधातील सागरी प्रदेशात सुद्धा मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. भूमध्यवृत्तावर यांचे प्रमाण अधिक असते तसेच ध्रुवप्रदेशाकडे ते कमी कमी होत जाते.

    ग्रीनलँड शार्क आर्टिक महासागरामध्ये खोलवर राहतात तर मुशी हे मासे किनाऱ्यालगत आढळून येतात. शार्क साधारणता 50 मीटर खोलीवर आढळून येतात. भारताला आजच्या सागरी परिसरांमध्ये टायगर शार्क, व्हेल, व्हाईट शार्क, मुशी, हॅमर इत्यादी शार्क आढळून येतात.

    भारतामध्ये हे कोठेवाड, मुंबई, केरळ, पश्चिम बंगाल लगतच्या सागरांमध्ये आढळून येतात. तसेच जुलै ते मार्च या काळामध्ये पश्चिम किनाऱ्यावर आणि मिळते. जानेवारी या काळामध्ये पूर्व किनाऱ्यावर यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते.

    शार्क प्राणी काय खातात?

    शार्क हे समुद्रामधील सर्वच प्राणी खातात. त्यामध्ये सील मासा, लहान शार्क, कासव, इतर मासे व समुद्र जीव यावर आपली उपजीविका भागवतात.

    Shark Information In Marathi

    शार्कचे वर्णन :

    शार्क या प्राण्याचे शरीर दोन्ही बाजूंनी चपटे असून त्यांचा आकार हा लांबट व दोन्ही टोकांना मात्र निमुळता असतो तसेच पाण्यामध्ये पोहण्यासाठी यांचे प्रवाह रेखित असे शरीर असते. यांच्या शरीरावरील बराचसा भाग त्वचेत रुतलेले सूक्ष्म खवले सारखा दिसतो, त्यामुळे आपल्या डोळ्यांनी मात्र दिसत नाहीत. त्यांच्या शरीराचे डोके, धड व शेपटी असे तीन भाग आहेत.

    डोके मात्र त्रिकोणी असून मुस्कट बासरी सारखे पुढच्या बाजूस असते. दोन्ही जबड्यांमध्ये तीक्ष्ण व पाठीमागे वळलेल्या दातांच्या अनेक रांगा आपल्याला दिसतात. त्यांचा उपयोग भक्ष पकडण्यासाठी व ते भक्ष सुटून जाऊ नये यासाठी करतात.

    डोक्याच्या दोन्ही बाजूस दोन डोळे असतात व शेजार शेजारी नाकपुड्यांची छिद्रे दिसतात. डोक्याच्या डाव्या व उजव्या बाजूला लहान छिद्रांचे अनेक समूह असतात. घशाच्या दोन्ही बाजूला पाच क्लेम धरणे असतात, त्यावर आवरण नसते. त्यांची शक्ती साधारणपणे शरीराच्या अर्ध्या आकाराचे असते. शेपटीच्या वरच्या भागात अजून असे लहान पृष्ठपक्ष असतात.

    शेपटीस मोठा पुष्पपक्ष असतो. त्याचा वरचा अर्धा भाग खालच्या भागापेक्षा मोठा असतो. शेपटीच्या खालच्या बाजूस पुच्छपक्ष असतात. शार्कच्या शरीरावर असलेले सर्व पक्ष पाठीमागच्या बाजूकडे वळलेले असतात, त्यांचा उपयोग पोहण्यासाठी ते करतात.

    शार्क मासाचे जीवन :

    शार्क माशांच्या प्रजाती पिल्लांना जन्म देतात. त्यांच्या पिल्लांना जरायुज असे म्हटले जाते. काही शार्कच्या प्रजाती अंडी घालणाऱ्या सुद्धा आहेत. नरांमध्ये आलिंग कांची जोडी पक्षाजवळ असते नरामध्ये दोन वृषण ग्रंथी असतात, त्यामध्ये शुक्राणू तयार होतात.

    गर्भधारणेच्या काळामध्ये व पिल्लांच्या संगोपन काळामध्ये मादी कोणत्याही प्रकारचे अन्न खात नाही. गर्भाशयामध्ये पिल्ल्यांची वाढ अंड्यातील बलक व गर्भाशयातील पाजणाऱ्या पोषक द्रव्यांवर होते. पूर्ण वाढ झाल्यावर मादी सुरक्षित जागी पिल्लांना जन्म देते.

    शार्कमध्ये प्रजनन हे विशिष्ट हंगामामध्ये होते तसेच आकाराने मोठ्या जातीतील दोन वर्षातून एकदा पिल्लांना जन्म देतात. मादी एकावेळी चार ते सहा पिल्लांना जन्म देते. हॅमर हेडेड शार्कमध्ये मादी 20 पिल्लांना जन्म देते तर टायगर जातीतील गर्भाशयात वाढणाऱ्या पिल्लांपैकी सर्वात मोठे ताकदवान पिल्लू इतर भावंडांना खाऊन टाकते असे झाल्याने मादी अखेर एकाच पिल्लास जन्म देते.

    Shark Information In Marathi

    शार्क माशाच्या प्रजाती :

    शार्क माशाच्या बऱ्याच प्रजाती समुद्रामध्ये अस्तित्वात आहेत. त्यापैकी काही शार्क माशाच्या प्रजातीबद्दल माहिती जाणून घेऊया.

    ग्रेट व्हाइट शार्क : या प्रजातीची शाळा मोठ्या आकाराचे असून त्यांची लांबी तीन ते चार मीटर एवढी असते तसेच काही शार्क अकरा मीटर लांबीची सुद्धा सापडल्याची नोंद आहे. यांच्या शरीराच्या उत्तर बाजूच्या कणा पांढऱ्या फिकट तपकिरी व करणे रंगाच्या असतात तसेच त्याची पाठ काळसर असते.
    या प्रजाती अतिशय चपळ, आक्रमक व शक्तिशाली असतात. यांना समुद्रातील लांडगा असे देखील संबोधले जाते.

    ग्रेट ब्लू शार्क : या शाळेची लांबी तीन ते चार मीटर पर्यंत असते तसेच ही अतिशय दिसायला सुंदर असते त्याच्या वरची बाजू निळसर रंगाची व खालची बाजू पांढरी असते. याची शरीर सळपातळ असून दोन्ही टोकास निवृत्ती असते. हा शार्क मासा सर्व समुद्रात आढळून येतो तसेच याची प्रजोत्पादन क्षमता जास्त असून ही मादी एका वेळेला 28 ते 50 पिल्लांना जन्म देते.

    टायगर शार्क : टायगर शार्क तुमच्या अंगावर वाघासारखे पट्टे असतात म्हणून हिला टायगर शार्क असे म्हटले जाते. लहान माशांच्या कातडीवर गडद डाग असून त्याची जसजशी वाढ होते, तसतसे कातळीवरील डागांपासून पट्टे तयार होतात व हे पट्टे वय वाढेल तसे फिक्कट होत जातात. यांच्या शरीराच्या वरील बाजूस करडी व तपकिरी रंगाची असून खालची बाजू पिवळसर रंगाची असते तसेच या माशाची लांबी चार मीटर पर्यंत असते. याची मुस्कट लहान असून शरीर दोन्ही बाजूस निमुळते झालेले असते व शेपटी लांब असते.

    व्हेल शार्क : या माशाची लांबी 12 मीटर लांब असते तसेच हा शार्क उष्णकटिबंधातील सागरांमध्ये आढळून येतो. हा शार्क आकाराने देव माशा सारखा दिसतो. याला करंज व बहिरी या नावाने मुंबईमध्ये ओळखले जाते. व्हेल शार्क भारतामध्ये सापडणाऱ्या प्रजातींची लांबी नऊ मीटर पर्यंत असते. हे जलचर प्राणी वनस्पती देखील खातात.

    मुशी : ही सागरी किनाऱ्यावर आढळणारी कॅरकॅरिअस या प्रजातीतील शार्क असून लहान जात असल्यामुळे तिला मुशी असे म्हणतात. तिची लांबी 0.6 ते 0.8 मीटर असते. तिचा उपयोग प्रामुख्याने अन्न व तेल मिळवण्यासाठी केला जातो.

    FAQ


    शार्क मासा काय खातो?

    ग्रेट व्हाईट शार्क मधील लहान शार्क हे बहुतेक मासेच खातात. तर प्रौढ शार्क इतर सागरी प्राणी खातात.


    शार्क मासा किती वर्ष जगतो?

    त्यांचे आयुष्य सु. २५ वर्षांचे असते, पण काही १०० वर्षेही जगतात. शार्क माशांचे अस्तित्व पृथ्वीवर सु. ३५ कोटी वर्षांपासून आहे.


    शार्क हा कोणत्या प्रकारचा प्राणी आहे?

    ते पाण्यात राहतात आणि पाण्यातील ऑक्सिजन फिल्टर करण्यासाठी त्यांच्या गिलचा वापर करतात. शार्क हा एक विशेष प्रकारचा मासा ओळखला जातो कारण त्यांचे शरीर इतर माशांप्रमाणे हाडांऐवजी कूर्चापासून बनलेले असते.


    शार्क कशाला घाबरतात?

    डॉल्फिन


    शार्क सस्तन प्राणी का नाही?

    व्हेल शार्क’ सारखी नावे असूनही, सर्व शार्क मासे आहेत आणि सस्तन प्राण्यांपेक्षा अनेक प्रकारे भिन्न आहेत . उदाहरणार्थ, सस्तन प्राणी फुफ्फुसातून हवा श्वास घेतात, त्यांच्या पिल्लांना दूध देतात आणि उबदार रक्ताचे असतात. शार्क श्वासोच्छवासासाठी गिलांवरून पाणी जातात, स्तन ग्रंथी नसतात आणि (मॅकरेल शार्क वगळता) थंड रक्ताचे असतात.

    Was this article helpful?
    YesNo
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleऑक्टोपस प्राण्याची संपूर्ण माहिती Octopus Information In Marathi
    Next Article डुक्कर प्राण्याची संपूर्ण माहिती Pig Animal Information In Marathi
    आकाश लोणारे
    • Website

    माझे नाव आकाश लोणारे आहे आणि माझे शिक्षण Master of Science in Zoology झालेले आहे. मला प्राण्यांविषयी लिहिणे, माहिती वाचणे, तसेच प्राण्यांची सेवा करणे खूप आवडते.

    Related Posts

    जलचर प्राणी

    ऑक्टोपस प्राण्याची संपूर्ण माहिती Octopus Information In Marathi

    February 21, 2024
    जलचर प्राणी

    जलसिंह प्राण्याची संपूर्ण माहिती Whale fish Information In Marathi

    February 20, 2024
    जलचर प्राणी

    सुरमई माशा प्राण्याची संपूर्ण माहिती Surmai Fish Information In Marathi

    February 20, 2024
    Add A Comment
    Leave A Reply

    pranijagat.com

    LEGAL

    • PRIVACY POLICY
    • TERMS AND CONDITIONS
    • DISCLAIMER
    • DMCA POLICY

    © 2025 ALL RIGHTS RESERVED PRANIJAGAT