Close Menu
    Facebook X (Twitter) Instagram
    • Home
    • उभयचर प्राणी
    • जलचर प्राणी
    • भूचर प्राणी
    • About Us
      • Contact Us
      • Privacy Policy
      • Disclaimer
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
    प्राणी जगतप्राणी जगत
    • Home
    • उभयचर प्राणी
    • जलचर प्राणी
    • भूचर प्राणी
    • About Us
      • Contact Us
      • Privacy Policy
      • Disclaimer
    Subscribe
    प्राणी जगतप्राणी जगत
    Home » जलचर प्राणी » झिंगे (कोळंबी) प्राण्याची संपूर्ण माहिती Prawn Fish Information In Marathi
    जलचर प्राणी

    झिंगे (कोळंबी) प्राण्याची संपूर्ण माहिती Prawn Fish Information In Marathi

    By आकाश लोणारेAugust 7, 2023Updated:March 29, 2024No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email
    Prawn Fish Information In Marathi
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    Prawn Fish Information In Marathi झिंगे (Zinga) हा मासे प्रेमींचा नाश्ताचा प्रकार आहे. बऱ्याच लोकांना झिंगे फ्राय करून खायला आवडतात. झिंगे हे सागरी किनाऱ्यावरून मोठ्या प्रमाणात मिळणारे उत्पादन आहे. त्यामुळे बरेच लोक झिंगे किंवा मत्स्यपालनाचे व्यवसाय करतात. पावसाळ्याची सुरुवात झाली की, नद्यांमध्ये सुद्धा ताजी झिंगे लोक पकडतात.

    Prawn Fish Information In Marathi

    झिंगे प्राण्याची संपूर्ण माहिती Prawn Fish Information In Marathi

    मच्छीमारांच्या जाळ्यात सुद्धा झिंगे अडकतात. झिंगे हा समुद्र जीव आहे, ज्याच्या शरीरावर कायटीनाचा कवच आहे तसेच त्याच्या पायांच्या पाच जोड्या असतात. हा एक पृष्ठवंशीय प्राणी आहे. संधीपाद संघातील कवचधारी वर्गाच्या दशपात गणात झिंगा या प्राण्यांचा समावेश होतो.

    • देव मासा प्राण्याची संपूर्ण माहिती

    झिंगे जगामध्ये सर्वत्र आढळून येतात. झिंगे हे भारत आशिया ऑस्ट्रेलिया व मिस्कीको येथे मोठ्या प्रमाणात पकडण्यात येतात. भारतातील पूर्व किनाऱ्यावर तर आंध्रप्रदेश आणि पश्चिम किनारा म्हणजे केरळ महाराष्ट्र येथे झिंग्याचे उत्पादन सर्वोत्कृष्ट असते. झिंगा यालाच इंग्लिशमध्ये प्रॉन असे म्हणतात. तर चला मग झींगा याविषयी सविस्तर माहिती पाहूया.

    प्रजननाचे हंगामऑक्टोबर-डिसेंबर व मार्च-जून 
    प्रजाती सुमारे 2000
    आकारसुमारे 15 ते 20 सें.मी
     रंग पांढऱ्या, पिवळ्या, लाल, गुलाबी, तपकिरी 
    राज्यप्राणी

    झिंगे कोठे आढळून येतात ?

    झिंगे जगामध्ये सर्वत्र आढळून येतात. झिंगे हे भारत, आशिया, ऑस्ट्रेलिया व मिस्किको येथे मोठ्या प्रमाणात पकडण्यात येतात. भारतातील पूर्व किनाऱ्यावर तर आंध्रप्रदेशामध्ये आणि पश्चिम किनारा म्हणजे केरळ महाराष्ट्र येथे जिल्ह्याचे उत्पादन सर्वोत्कृष्ट असते.

    झिंगे काय खातात ?

    झिंगे हे सर्व भक्षी आहेत. ते वलय, प्राणी, शेवाळ, प्लवक, संधीपादांची अंडी व पिल्ले तसेच मृदू काय प्राणी यांचे भक्षण करतात. अन्ननलिका यांची सरळ असते, त्यामुळे त्यात अन्नपचन होत असते. कल्याणमार्फत हे झिंगे श्वसन करतात. त्यांचे हृदय पृष्ठय बाजूस असते, तसेच हरित ग्रंथी उत्सर्जनाचे कार्य झिंगे करत असतात. चेतासंस्था पूर्ण विकसित असून त्यांचे डोळे संतुलित गंधेद्रिय आणि स्पर्शेद्रीयांच्या मदतीने संवेदना त्यांना जाणवतात.

    Prawn Fish Information In Marathi

    झिंगे यांची शरीर रचना :

    झिंगे हे पारदर्शी व पांढऱ्या रंगाचे असतात तसेच त्यांची उपांगे लालसर रंगाची असतात. त्यांची संपूर्ण शरीर हे कायटिनमय कवचापासून बनलेले असते. शरीराचे शिरोवक्ष आणि उदर असे त्याचे दोन भाग पडतात. शिरोवक्ष 13 खंडांचे व पोट सहा खंडांनी बनलेले असते.

    • नळी मासा प्राण्याची संपूर्ण माहिती

    उदर भाग शिरोवक्षा खाली बराचसा वाकडा असतो. त्यामुळे त्याचा आकार स्वल्पविराम चिन्हासारखा आपल्याला दिसतो. शिरोवक्ष डोकं, पाच खंडाचे आणि वक्ष आठ खंडाचे असते. वक्ष भागावर उपांगाच्या आठ जोड्या असतात. यापैकी पहिल्या तीन जोड्या अन्नमुखाकडे येणाऱ्या उपांगाच्या असून उरलेल्या पाच जोड्या त्यांच्या पायाच्या असतात.

    या उपांगाचा उपयोग चालण्यासाठी व पोहण्यासाठी हे प्राणी करतात. शिरोवक्षाच्या मानाने पोट जास्त लांब व स्पष्ट दिसणाऱ्या सहा खंडांनी बनलेले असते. त्यांच्या पोटाच्या खालच्या बाजूस वल्ल्यासारखा प्लवपादांच्या पाच जोड्या असून त्यांचा उपयोग सुद्धा पोहण्यासाठी करतात.

    यांची सहावी जोडी मोठी असते तसेच पोटाच्या पच्छ टोकाला असते. तिला पच्छपाद असे म्हणतात. उदरांचा अंत्यखंड आणि पुच्छपाद मिळून एक मोठे प्लवांग बनते. त्याला पुच्छपर असे म्हणतात.

    झिंगा फिश प्रजनन :

    झिंगे यांच्यामध्ये नर व मादी बाहेरून सहज ओळखता येतात. नर हे आकाराने मादी पेक्षा मोठे असतात तसेच त्यांचा आकारणी मोठा असतो. मादीचा आकार मात्र रुंद असतो. ऑक्टोबर ते डिसेंबर व मार्च ते जून असे दोन अंडी देण्याचे त्यांचे हंगाम असतात.

    मादी प्रत्येक खपेला तीन ते चार लाख अंडी घालते. अंड्याचे बाह्य फलन होते, फलित अंडी मादीच्या प्लवपादांना चिटकून राहतात. फलित अंड्यातून 13 ते 14 तासात डिंभ बाहेर येतात. लिंबांची वाढ सतत होत असताना, त्याचे पाय वेगवेगळ्या अवस्थांमध्ये रूपांतर होत राहतात.

    शेवटच्या अवस्थेतील डिंभके किनाऱ्याच्या दिशेने स्थलांतरित होतात. तेथे त्यांची वाढ होऊन प्रौढ डिंभके निर्माण होतात. साधारणपणे तीन ते चार महिन्यांमध्ये झिंगे प्रजननक्षम बनतात व खोल समुद्राकडे स्थलांतर करतात. तेव्हा त्यांची वाढ होत असताना, प्रत्येक वेळी जुनी कवच टाकून त्या जागी नवीन कवच निर्माण होते.

    एका वर्षाच्या झिंग्यांची लांबी 13 ते 14 सेंटीमीटर असते तर दोन वर्षाच्या झिंग्यांची लांबी 18 सेंटीमीटर होते. झिंगे पूर्ण वाढ झाली की खाण्याकरता वापरले जातात.

    Prawn Fish Information In Marathi

    झिंगे यांचे प्रकार :

    यांच्यामध्ये पिनिड प्रॉन व नॉनपिनिड प्रॉन असे दोन प्रकार पडतात. पिनिड प्रोन हे आकाराने लहान असतात तर नॉन-पिनीड प्रॉन हे चिंगाटी किंवा कोळंबी असतात. झिंग्याच्या अनेक जातींमध्ये जीव दीप्ती असते, त्यामुळे प्रजननाच्या वेळी त्यांना जोडीदार ओळखता येतो. झिंगी पकडून ताज्या स्वरूपामध्ये खाल्ले जातात किंवा वापरले जातात. तसेच ते फ्रिजमध्ये साठवून ठेवून विक्रीसाठी काढले जातात.

    मोठ्या आकाराचे झिंगे शिरोवक्ष काढून गोठविले जातात. बऱ्याच वेळा झिंग्याचे कवच व अन्ननलिका काढून मासाचा लगदा शिजवतात व नंतर गोठवून डबा बंद करतात. लहान आकाराचे झिंगे उन्हामध्ये सुखवितात आणि त्यांचे तुकडे अथवा पूड तयार केली जाते. झिंगे उन्हामध्ये सुखवितात आणि त्यांचे तुकडे अथवा पूड तयार केली जाते. झिंगे हे पाण्याच्या तळाशी त्यांच्या पोट पायाने चालतात. प्लवकपादांच्या सहाय्याने संतपणे पोहतात.

    यांना जर एखादे संकट आले असे वाटत असेल तर त्यांच्या आकुंचन करतात व पुच्छ पदाच्या मदतीने चटकन उलट्या दिशेने पोहणे सुरू करतात. शत्रूच्या तोंडातून निघून जाण्यासाठी स्वतःचा एक पाय तोडून बचाव करतात. तसेच ते शेवाळ प्राणी उपलब्ध मृदू काय असलेले प्राणी सुद्धा खातात.

    मच्छीमाराकरिता झिंगा हा त्यांच्या उत्पादनामध्ये बरेच नफा मिळवून देणारा आहे, त्यामुळे झिंग्याची विक्री व झिंगा पकडणे यांचा व्यवसाय यांच्याकरिता खूप फायदेशीर ठरतो. कारण नॉन व्हेजिटेरियन लोकांना झिंगी अतिशय प्रिय आहे.

    झिंगे खाण्याचे फायदे :

    जगभर झिंगे खाल्ले जातात, भारता व्यतिरिक्त इतर जगातील देशांमध्ये सुद्धा झिंग्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. झिंगे हे सी फूड डिश म्हणून अत्यंत लोकप्रिय आहेत तसेच आपल्याला जाणून आश्चर्य होईल झिंग्यामध्ये वेगवेगळे विटामिन्स असतात.

    जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. यामध्ये ओमेगा थ्रीचा समृद्ध असा साठा आहे. तसेच त्यामध्ये प्रथिने, लोह, चरबी असते. त्या व्यतिरिक्त कॅल्शियम, मॅग्नेशियम यांच्यासारखे खनिजे सुद्धा मोठ्या प्रमाणात असतात. झिंग्यामध्ये विटामिन डी व बी मोठ्या प्रमाणात आढळून येते. त्यामुळे शरीरासाठी अत्यंत पौष्टिक आहे.

    निष्कर्ष:

    कोळंबी हा एक प्रकारचा क्रस्टेशियन आहे जो कोळंबीशी जवळून संबंधित आहे. ते सामान्यतः कोळंबीपेक्षा मोठे असतात, अधिक सडपातळ शरीर आणि लांब शेपटी. कोळंबी खाऱ्या पाण्याच्या आणि गोड्या पाण्याच्या दोन्ही ठिकाणी आढळतात आणि ते मानवांसाठी आणि इतर प्राण्यांसाठी एक महत्त्वाचे अन्न स्रोत आहेत.

    FAQ:-

    कोळंबी मासा म्हणजे काय?

    कोळंबी मासा हा एक प्रकारचा क्रस्टेशियन आहे जो कोळंबी मासाशी जवळचा संबंध आहे. ते त्यांच्या लांब, सडपातळ शरीरे आणि त्यांच्या मोठ्या पंजे द्वारे वैशिष्ट्यीकृत आहेत. कोळंबी मासे जगभरातील खाऱ्या पाण्याच्या आणि गोड्या पाण्याच्या दोन्ही अधिवासांमध्ये आढळतात.

    कोळंबी माशांचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत?

    कोळंबी माशांचे बरेच प्रकार आहेत, परंतु काही सर्वात सामान्य आहेत:
    वाघ कोळंबी
    राजा कोळंबी
    व्हाईटलेग कोळंबी
    तपकिरी कोळंबी मासा
    गुलाबी कोळंबी मासा

    कोळंबी मासे कोठे राहतात?

    कोळंबी मासे विविध अधिवासांमध्ये आढळू शकतात, ज्यात हे समाविष्ट आहे:
    खाऱ्या पाण्याचे महासागर
    गोड्या पाण्याचे तलाव आणि नद्या
    मानवनिर्मित तलाव आणि टाक्या

    कोळंबी मासे काय खातात?

    कोळंबी मासे हे मांसाहारी आहेत आणि त्यांच्या आहारात लहान मासे, क्रस्टेशियन्स आणि कीटक असतात. ते शैवाल आणि इतर वनस्पती पदार्थ देखील खातात.

    कोळंबी मासे खाल्ल्याने आरोग्यास कोणते फायदे होतात?

    कोळंबी मासे हे प्रथिने, ओमेगा-३ फॅटी ऍसिडस् आणि इतर पोषक घटकांचा चांगला स्रोत आहे. त्यामध्ये कॅलरीज आणि फॅटही कमी असतात. कोळंबी मासे खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारण्यास, प्रतिकारशक्ती वाढण्यास आणि कर्करोगापासून संरक्षण करण्यास मदत होऊ शकते.

    Was this article helpful?
    YesNo
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleघोळ मासा प्राण्याची संपूर्ण माहिती Croaker fish Information In Marathi
    Next Article गोगलगाय प्राण्याची संपूर्ण माहिती Snail Information In Marathi
    आकाश लोणारे
    • Website

    माझे नाव आकाश लोणारे आहे आणि माझे शिक्षण Master of Science in Zoology झालेले आहे. मला प्राण्यांविषयी लिहिणे, माहिती वाचणे, तसेच प्राण्यांची सेवा करणे खूप आवडते.

    Related Posts

    जलचर प्राणी

    शार्क प्राण्याची संपूर्ण माहिती Shark Information In Marathi

    February 21, 2024
    जलचर प्राणी

    ऑक्टोपस प्राण्याची संपूर्ण माहिती Octopus Information In Marathi

    February 21, 2024
    जलचर प्राणी

    जलसिंह प्राण्याची संपूर्ण माहिती Whale fish Information In Marathi

    February 20, 2024
    Add A Comment
    Leave A Reply

    pranijagat.com

    LEGAL

    • PRIVACY POLICY
    • TERMS AND CONDITIONS
    • DISCLAIMER
    • DMCA POLICY

    © 2025 ALL RIGHTS RESERVED PRANIJAGAT