घोरपड प्राण्याची संपूर्ण माहिती Bengal Monitor Animal Information In Marathi

Bengal Monitor Animal Information In Marathi घोरपड या प्राण्याला इंग्लिशमध्ये मॉनिटर लिझार्ड असे म्हणतात. घोरपड हा प्राणी जंगलामध्ये उघड्या कोरड्या मळल्यावर राहतो. हा प्राणी भूचर आहे, पाण्यामध्ये तसेच जमिनीवर सुद्धा जगू शकतो. पाण्यात सुद्धा श्वास न घेता, बराच काळ हा प्राणी राहू शकतो. या प्राण्यांना थंड हवेचे ठिकाण किंवा ओलावा असलेले ठिकाण अत्यंत प्रिय आहे.

Bengal Monitor Animal Information In Marathi

घोरपड प्राण्याची संपूर्ण माहिती Bengal Monitor Animal Information In Marathi

हा प्राणी जास्तीत जास्त नद्या ओढे यांच्या काठाच्या ओलाव्याच्या प्रदेशांमध्ये राहतो. घोरपड या प्राण्याची शिकार सुद्धा मोठ्या प्रमाणात केली जात आहे. त्याच्या कातडीचा उपयोग मनुष्य विविध पद्धतीने करत आहे. घोरपड याचा चांगल्यापासून डीमडी, औषधी त्या व्यतिरिक्त बॅगा, पट्टे अशा उपयोगी वस्तू बनवल्या जातात; परंतु ह्या प्रजाती नष्ट होत आहेत, याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. तर चला मग जाणून घेऊया घोरपड या प्राण्याविषयी सविस्तर माहिती.

नावघोरपड
वैज्ञानिक नाववाराणस बंगालेंसिस
वर्गसरपटणारा प्राणी
आढळदक्षिण आशिया
आफ्रिका
मलेशिया
ऑस्ट्रेलिया
भारत

घोरपड कुठे राहतो?

घोरपड हा प्राणी जंगलामध्ये तसेच कोरड्या मैदानामध्ये राहतात. घोरपड हा प्राणी गरज पडल्यास वेगाने सुद्धा जाऊ शकतो. घोरपड या प्राण्याची बरेच प्रकार पडतात तसेच घोरपड भारता व्यतिरिक्त इतर देशांमध्ये सुद्धा आढळतो. तेथील मात्र त्यांच्या रचनेत फरक जाणून येतो.

सर्वात मोठी घोरपड कोमोडो ड्रॅगन असून ही इंडोनेशियामध्ये आहे. तिची लांबी तीन मीटर व वजन 135 किलो असते. दक्षिण भारतामध्ये घोरपड खाल्ली जाते. घोरपड हा प्राणी उष्ण हवामान असलेल्या जसे दक्षिण आफ्रिका, मलेशिया,ऑस्ट्रेलिया, न्यू गिनी या देशातही आढळतो. ओलाव्याच्या ठिकाणी हा प्राणी जास्त सहवास करतो. घोरपडच्या तीस जाती आहेत.

घोरपड हा प्राणी कसा दिसतो?

घोरपड या प्राण्याची लांबी एक ते तीन मीटर असते. त्या व्यतिरिक्त या प्राण्याचे वजन 100 किलो पेक्षा जास्त असू शकते. याचे शरीर जाळजुड असून भारतीय घोरपडींची लांबी 1.75 मीटर असते.
घोरपडच्या पाठवून वरचा रंग तपकिरी व तपकिरी हिरवा असतो तसेच तिच्या अंगावर पिवळे पट्टे किंवा रंगीबिरंगी ठिपके असू असतात. तिच्या पोटाकडचा रंग पांढरट पिवळा असून पाठीची त्वचा जाड व रखरखीत असते.

घोरपडच्या पाठीवर मण्यांप्रमाणे लहान लहान खवले असतात. तिच्या हनुवटीची त्वचा मात्र पातळ आणि मऊ असते ते शिकार करताना हनुटीच्या भागावर प्रहार करतात तिचे डोके लांब असून तिच्या मानेने धडाला जोडलेले असते. तिच्या नाकपुड्या तिरक्या असतात.

तसेच जीभ अरुंद व दुभागलेली असते तिचे डोळे तोंडाच्या दोन्ही बाजूला असतात. तसेच तिच्या डोळ्यांना पापणी नसतात. तिच्या पायांना पाच लांब व मोठी बोटे असतात तसेच त्या पायांना नखे मजबूत असून तिच्या शेपटीचे टोक हे चाबकासारखे लागते त्या शेपटीने स्वतःचे संरक्षण करते. इतर प्राण्यांवर शेपटीने हल्ला करू शकते मादीहून नर या प्राण्यांमध्ये अधिक शक्तिशाली असतो.

घोरपड प्राणी काय खातो?

घोरपड ह साप, विंचू, खेकडे, झिंगे, मासे तसेच कवचधारी प्राणी लहान मोठे कीटक देखील खात असतात. बऱ्याचदा ती कुजलेले मास सुद्धा खाताना दिसतात. घोरपडीची पिल्ले मात्र कीटक भक्षी असतात.

Bengal Monitor Animal Information In Marathi

घोरपड या प्राण्याची जीवन :

घोरपड हा प्राणी 20 ते 25 अंडी घालते. अंडी घालण्याचा काळ जुलै ते सप्टेंबर असतो. घोरपड हे वाळवीच्या वारुळामध्ये अंडी घालून त्यावर पालापाचोळा घालून बिळ बंद करून घेते. बिळातील उष्णतेमुळेच अंडी उबवली जातात. सहसा घोरपडी अंडी देताना पाण्याच्या आसपासच अंडी देतात.

हा प्राणी पाण्यामध्ये सुद्धा होऊ शकतो. त्या व्यतिरिक्त पाण्याखाली श्वास रोखून बराच वेळ राहू शकतो. हा प्राणी थोडाफार भित्रा असतो. माणसाच्या अंगावर हा प्राणी येत नाही परंतु संकटात पडण्यास घोरपड मागील पायावर उभी राहते व अंग फुगवून मोठा आकार धारण करते. जोराने फुस्कारते शेपटीचा तडाखा देते किंवा मग चावा घेते.

Bengal Monitor Animal Information In Marathi

घोरपड या प्राण्याचा उपयोग :

घोरपडपासून एका विशिष्ट प्रकारचे तेल सुद्धा बनवले जाते. जे सांधेदुखीवर लावल्यास सांधेदुखी पूर्णपणे बरी होते अशी एक समज आहे. घोरपडीचे तेल वात विकार दूर करते अशा गैरसमजुतीमुळे घोरपडींची शिकार मोठ्या प्रमाणात केली जाते. घोरपडीचा उल्लेख ऐतिहासिक कालावधीमध्ये सुद्धा केला गेला आहे. तानाजीच्या ऐतिहासिक घोरपडीचे नाव यशवंती असे होते. मावळे तिच्या सहाय्याने सिंहगड चढले असे देखील म्हटले जाते.

जमिनीला घोरपड घट्ट चिटकून राहते, त्यामुळे सर्व मावळे सिंहगडावर चढू शकले. घोरपडतीच्या नखांनी खडक किंवा कठीण भागात सुद्धा घट्ट धरून राहू शकते. घोरपड हा प्राणी नाहीसा होऊ नये यासाठी सरकारने एक कायदा अमलात आणलेला आहे. जर तुम्ही घोरपडची शिकार करताना दिसला तर तुम्हाला तीन वर्षे करावस आणि पंचवीस हजार रुपये दंड अशी शिक्षा होऊ शकते.

घोरपड या प्राण्याचे प्रकार :

बेंगॉल मॉनिटर : हे घोरपडीची जात भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी आढळते. घोरपड हा प्राणी दिनचर असून ती सकाळी सक्रिय असते. हिच्या आहारामध्ये अळ्या, विंचू, नाकतोडा, खेकडे, गोड्या पाण्यातील झिंगे, गोगलगायी इत्यादींचा समावेश असतो. ही पाण्यातील मासे, कीटक त्या व्यतिरिक्त मेलेले जनावराचे मांस सुद्धा खातात.

या प्राण्याची लांबी एक ते तीन मीटर असते. त्या व्यतिरिक्त या प्राण्याचे वजन 100 किलो पेक्षा जास्त असू शकते. याचे शरीर जाळजुड असून भारतीय घोरपडींची लांबी 1.75 मीटर असते. घोरपडच्या पाठीकडचा वरचा रंग तपकिरी व तपकिरी हिरवा असतो. तसेच तिच्या अंगावर पिवळे पट्टे किंवा रंगीबिरंगी ठिपके असू असतात.

गिरार्ड मार्टिन : हे एक सरपटणारा प्राणी घोरपड आहे. घोरपडचा उपयोग शेतामध्ये उंदीर, सापांचा बंदोबस्त करण्याकरिता केला जातो. घोरपड तशी धोकादायक नाही. घोरपडीचा उपयोग खाण्यासाठी व औषधे बनवण्यासाठी केला जातो. त्यामुळे त्यांची संख्या कमी होत आहे. शेतामध्ये विविध प्रकारचे कीटकनाशकांचा वापर केल्यामुळे शेती प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच त्यांचे भक्षक कमी होत आहे. यामुळे घोरपडीच्या संख्या देखील झपाट्याने कमी होत आहेत.

क्लाऊड मॉनिटर : ही एक बंगाल घोरपडीशी जुळती मिळती प्रजाती असूनही आता म्यानमार, कंबोडिया, मलेशिया, थायलंड, जावा सुमित्रा येथे आढळून येते. ही घोरपड 22 वर्ष जगू शकते. या घोरपडीचे भक्षक हे अजगर मनुष्य व काही पक्षी आहेत.

FAQ


घोरपड विषारी आहे का?

 घोरपडी विषारी नसतात


घोरपड काय खाते?

पक्षी व त्यांची अंडी, उंदीर, सरडे, साप, मासे, कवचधारी प्राणी व लहानमोठे कीटक यांवर ती उपजीविका करते.

मॉनिटर सरडा किती मोठा होतो?

एकूण लांबीमध्ये 3 मीटर (10 फूट)


मॉनिटर सरडे स्वतःचे संरक्षण कसे करतात?

वॉटर मॉनिटर सरडे शक्तिशालीपणे लांब शेपटीने बांधलेले असतात ज्याचा उपयोग भक्षकांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी केला जाऊ शकतो. त्यांना भक्कम जबडा आणि दातेदार दात देखील असतात जेणेकरुन त्यांना त्यांचे अन्न खाण्यास मदत होईल.

Was this article helpful?
YesNo

Leave a Comment