Close Menu
    Facebook X (Twitter) Instagram
    • Home
    • उभयचर प्राणी
    • जलचर प्राणी
    • भूचर प्राणी
    • About Us
      • Contact Us
      • Privacy Policy
      • Disclaimer
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
    प्राणी जगतप्राणी जगत
    • Home
    • उभयचर प्राणी
    • जलचर प्राणी
    • भूचर प्राणी
    • About Us
      • Contact Us
      • Privacy Policy
      • Disclaimer
    Subscribe
    प्राणी जगतप्राणी जगत
    Home » भूचर प्राणी » उंदीर प्राण्याची संपूर्ण माहिती Mouse Animal Information In Marathi
    भूचर प्राणी

    उंदीर प्राण्याची संपूर्ण माहिती Mouse Animal Information In Marathi

    By आकाश लोणारेFebruary 21, 2024Updated:March 21, 2024No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email
    Mouse Animal Information In Marathi
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    Mouse Animal Information In Marathi उंदीर या प्राण्याला आपण सर्वच ओळखतो. कारण उंदीर हा श्री गणेश यांचे वाहन आहे. हिंदू धर्मामध्ये उंदीर या प्राण्याची पूजा देखील केली जाते. उंदीर हा प्राणी छोट्याशा आकाराच्या प्राणी आहे. उंदीर हा प्राणी बुद्धिमान आहे. जगामध्ये उंदराच्या 127 पेक्षा जास्त प्रजाती आढळून येतात. उंदीरची ऐक जात पाळीव प्राण्यांमध्ये येते, त्याचे नाव फॅन्सी उंदीर आहे. फॅन्सी हा उंदीर पाळीव प्राणी आहे.

    Mouse Animal Information In Marathi

    उंदीर प्राण्याची संपूर्ण माहिती Mouse Animal Information In Marathi

    प्राणीउंदीर
    वंशपृष्ठवंशीय
    प्रजाती137
    शास्त्रीय नावRattus Rattus
    आयुर्मान2 ते 4 वर्षे

    उंदीर केवळ अंटार्टिका खंडावर आढळत नाही, अन्यथा संपूर्ण पृथ्वीवर उंदीर आढळून येतो. उंदीर या प्राण्याला इंग्रजी भाषेत माऊस असे म्हणतात. उंदीर हा प्राणी कृतक गणात येतो. या सर्वच प्राण्यांचे दात पटाशी सारखे असतात तसेच ते प्राणी त्यांच्या दाताचा उपयोग सतत कुरतळरण्यासाठी करत असतात. उंदिराचे पुढील दात आयुष्यभर वाढत असतात. तर चला मग जाणून घेऊया उंदीर या प्राण्याविषयी सविस्तर माहिती.

    उंदीर कुठे राहतो?

    उंदीरांचा इतिहास खूप जुना आहे. उंदीर हा काळ्या तपकिरी रंगाचा असून उंदीर शेतामध्ये जमिनीत करून राहतात. उंदीर या प्राण्याचे मूळ वस्ती स्थान हे पाकिस्तानमध्ये असलेल्या गवताळ प्रदेशांमध्ये होते. त्यानंतर मानवाने शेतीच प्रारंभ केला तसे उंदरांचे स्थलांतरन जगभर झाले. त्या व्यतिरिक्त आता उंदीर हा प्राणी पृथ्वीवर सर्वत्र आढळतो. उंदीर सहसा घरांमध्ये देखील बीळ करतात. धान्याच्या कोठारी मध्ये धान्य कुरतडून खातात. तसेच पिकांची नासाडी सुद्धा करतात.

    उंदीर दिसायला कसा असतो ?

    उंदीर हा आकाराने खूपच छोटा प्राणी आहे तसेच त्याचे वजन 30 ते 50 ग्रॅम एवढे असते. उंदिराची लांबी ही आठ ते दहा सेंटिमीटर असून त्याचे शेपूट बारीक असते. त्याचे शरीरा एवढेच लांबीचे हे शेपूट असते उंदराचे डोके, मान, धळ आणि शेपूट असे चार भाग पडतात.

    उंदराचे कान मोठे व टोकदार असतात. उंदराच्या दोन-तीन प्रजाती भारतामध्ये आढळतात. सर्व उंदीर एकाच रंगाचे असून त्यांच्या शरीरावर स्पॉट किंवा इतर रंग देखील असतात. काही उंदरांना केस नसतात. त्या उंदरांना केस नसलेले उंदीर असे म्हटले जाते.

    उंदीर काय खातो ?

    उंदीर हा प्राणी सतत कुरडण्याच्या नादात असतो. उंदरांना काही ना काही पुरतण्याची सवय असते. त्यामुळे बऱ्याचदा उंदीर कपडे, लाकूड, कागद किंवा घरामध्ये असलेले साहित्य कुर्तडत राहतात. त्यामुळे आपले मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा होऊ शकते. उंदीर अन्न मिळवण्यासाठी इकडे-तिकडे फिरत असतात. उंदीर मानवी वस्तींमध्ये राहू शकतो किंवा त्याला जिथे अन्न मिळेल तिथेतो राहतो. मानवा बरोबरच उंदीर सुद्धा त्यांच्यासोबत तिथे राहू लागला.

    उंदीर घरातील धान्य शेतातील धान्य खातात. त्या व्यतिरिक्त शहरांमध्ये गटारांमध्ये किंवा कचरा असेल तेथे राहतात. उंदीर हा प्राणी सर्व पक्षी आहे. खाता येण्यासारखे सर्वच पदार्थ उंदीर खात असतात. खाण्यापेक्षा पदार्थांची ते जास्तीत जास्त नसाडी करत असतात.

    उंदीर बिळामध्ये राहून किंवा एखाद्या वस्तूच्या अडोशांना राहतात तसेच ते चू चू असा आवाज करतात. घरांमध्ये बीड करून उंदीर राहतो किंवा भिंतीच्या बिळामध्ये देखील राहतात. उंदरांना गोड किंवा चरबीयुक्त असे पदार्थ खूप आवडतात. त्यामुळे पनीर, बटर, माऊ चीझ उंदीर चांगल्या प्रकारे खाऊ शकतात.

    Mouse Animal Information In Marathi

    उंदिर प्राण्याची जीवन :

    उंदराची मादी ही पिल्लांना जन्म देते. तिची गर्भधारणेचा 18-20 दिवसांचा असतो. तसेच ती आपल्या पिल्लांना 13 ते 14 दिवस दूध पाजते पिल्ले जन्मता त्यांच्या अंगावर केस नसतात तसेच त्यांचे डोळे सुद्धा बंद असतात. एका विणीमध्ये उंदीर मादी पाच ते दहा पिल्लं देते. पिल्लांचे डोळे तिसऱ्या दिवशी उघडतात.

    उंदीर शेतकऱ्यांच्या घरांमध्ये इकडून- तिकडे धावत असतो किंवा अन्नधान्य साठवण ज्या ठिकाणी ठेवलेला असेल तेथे अन्नाची मोठ्या प्रमाणात नासाडी करतात. भारतातील एका पंचनाम्यानुसार साठवण गृहातील एक पंचमुखी धान्याची नासाडी केवळ उंदीर करतात.

    उंदरामुळे कोणता रोग होतो?

    उंदीर या प्राण्याच्या अंगावर असलेला पिस्सू हा लेख सारखा संसर्गजन्य रोग पसरवू शकतो. उंदरांच्या मूत्रांमध्ये लेप्टोस्पयरा जिवाणूमुळे मानवाला लेप्टोस्पायरसिस हा आजार होण्याची भीती असते. प्लेग हा उंदरांमुळे पसरलेला रोग आहे.

    उंदरांच्या अंगावर पिसू या प्रकारचा हा जिवाणू असतो, यामुळेच प्लेट सूक्ष्मजीव पसरतो. प्लेग हा उंदरांपेक्षा खूपच वेगाने पसरत असतो, त्यामुळे उंदीर मुख्य वाहक असतील असे खरे किंवा खोटे माहीत नाही परंतु युरोप या देशांमध्ये प्लेग जेव्हा आला तेव्हा प्लेगमुळे बरेच लोक मरण पावले व शहर उद्ध्वस्त झाले.

    उंदीर या प्राण्याचे प्रकार :

    भारतामध्ये उंदराचे बरेच प्रकार आढळतात. त्या व्यतिरिक्त इतर प्रदेशानुसार उंदराच्या आकार संरचनेमध्ये फरक जाणवतो. तर चला मग उंदीर या प्राण्यांचे प्रकार जाणून घेऊया.

    Mouse Animal Information In Marathi

    घरातील उंदीर : घरातील उंदीर हा सर्वांच्या परिचयाचा आहे आपल्या घरांमध्ये हा उंदीर इकडून तिकडे फिरत असतो त्या व्यतिरिक्त घरातील अन्नधान्याची नासाडी सुद्धा करतो. घरातील उंदीराच्या शरीराची लांबी 9.5 सेंटीमीटर पर्यंत असते. तसेच त्याचे वजन हे 30 ग्रॅम पर्यंत असते, त्याचा रंग राखाडी असतो. छोटे छोटे केस असून त्याच्या पोटाचा रंग हलका राखाडी ते पांढरा देखील असतो.

    पट्टे असलेला उंदीर : उंदराची ही प्रजाती 10 सेंटीमीटर पर्यंत लांब असते तसेच त्याच्या शरीरावर छोटे छोटे राखाडी रंगाचे केस असतात. त्या व्यतिरिक्त त्याच्या शरीरावर फिकट पट्टे दिसू शकतात. हा उंदीर पाळीव प्राणी म्हणून सुद्धा ठेवला जातो. हा उंदीर सात महिन्यापेक्षा जास्त जगू शकत नाही. हा उंदीर त्याच्या आहारामध्ये गवत आणि लहान छोटे कीटक खातो.

    गवत उंदीर : गवत उंदीर हा संपूर्ण उंदराच्या जातीमध्ये मोठा उंदीर आहे याच्या शरीराशी लांबी 19 सेमी असते. या उंदराची शेपटी 16 सेमी लांब असते 16 सेमी लांब असते. गवत या उंदराचे वजन हे 100 ग्रॅम पर्यंत असते तसेच त्यांच्या आहारामध्ये गवत आणि वनस्पती यांचा समावेश करतात. ही प्रजाती आफ्रिका या देशांमध्ये सामान्य आहे.

    छोटा उंदीर : या उंदराच्या प्रजातीची लांबी 7 सेमी पेक्षा जास्त नसते. यामध्ये उंदराची वजन दहा ग्रॅम असते तर या उंदराच्या पाठीवर लालसर, तपकीरी रंगाचे केस असतात तसेच पोटाजवळ पांढरे केस असतात. या उंदराचे कान छोटे व गोलाकार असतात. हे उंदीर लहान कीटक याव्यतिरिक्त शेतातील धान्य देखील खातात.

    काटेरी उंदीर : काटेरी उंदीर हा सर्व उंदरांच्या प्रजातींमध्ये एक आश्चर्यकारक उंदीर आहे. या उंदराचे डोळे मोठे असतात. तसेच कान सुद्धा मोठी असतात हे उंदीर त्यांच्या शत्रूंशी लढण्यास घाबरत नाही. त्यांच्या अंगावर काटे असतात. हे उंदीर पाळीव प्राणी आहे.

    पिवळा घसा असलेला उंदीर : या उंदराच्या पाठीवर लाल राखाडी रंगाचे केस असतात. तसेच त्याच्या पोटावर व मानेवर पिवळ्या रंगाचे केस असतात. या उंदीराच्या शरीराची लांबी ही 14 सेमी असते. तर त्याची शेपटीची लांबी शरीराच्या लांबीच्या समान असते.

    तसेच या उंदराचे वजन 50 ग्रॅम पर्यंत असते. हे उंदीर पिवळ्या गळ्याचा उंदीर म्हणूनही प्रसिद्ध आहे. हे उंदीर जंगलामध्ये तसेच खडकाळ ठिकाणी आढळतात. हे उंदीर मास व वनस्पती दोन्ही सुद्धा खाऊ शकतात. या व्यतिरिक्त फळ किंवा फळबागांना यांच्यापासून धोका असतो.

    FAQ


    उंदीर काय काय खातो?

    उंदीर सर्वभक्षी आहे; खाता येण्यासारखे सर्व पदार्थ ते खातात, पण खाण्यापेक्षा पदार्थांची नासाडीच ते जास्त करतात. बिळात किंवा आडोशाच्या जागी असताना ते चूं चूं आवाज करतात. मऊ पदार्थ वापरून उंदीर जमिनीतल्या अथवा भिंतीतल्या बिळांत किंवा अडगळीत घरटे बांधतो.


    उंदीरचे वैशिष्ट्य काय आहे?

    वरच्या आणि खालच्या जबड्यांमध्‍ये सतत वाढणार्‍या एका जोडीने दर्शविले जाते. सर्व सस्तन प्राण्यांपैकी सुमारे 40% प्रजाती उंदीर आहेत.

    उंदीर कोणत्या प्रकारचे अन्न खातात?

    वनस्पती आणि प्राणी-आधारित अन्न दोन्ही

    जंगली उंदीर कसा दिसतो?

    एक मजबूत, मध्यम आकाराचा उंदीर लांब थुंकलेला, लहान डोळे, मध्यम आकाराचे कान आणि खवलेयुक्त, जवळजवळ नग्न शेपटी (शरीराच्या एकूण लांबीपेक्षा लहान). लहान, खडबडीत फर वर राखाडी-तपकिरी, विखुरलेले काळे केस आणि पोटावर फिकट राखाडी ते पिवळसर असते.

    Was this article helpful?
    YesNo
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleबिबट्या प्राण्याची संपूर्ण माहिती Leopard Animal Information In Marathi
    Next Article सायाळ प्राण्याची संपूर्ण माहिती Sayal Information In Marathi
    आकाश लोणारे
    • Website

    माझे नाव आकाश लोणारे आहे आणि माझे शिक्षण Master of Science in Zoology झालेले आहे. मला प्राण्यांविषयी लिहिणे, माहिती वाचणे, तसेच प्राण्यांची सेवा करणे खूप आवडते.

    Related Posts

    भूचर प्राणी

    बारशिंगा प्राण्याची संपूर्ण माहिती Reindeer Animal Information In Marathi

    February 24, 2024
    भूचर प्राणी

    मुंगूस प्राण्याची संपूर्ण माहिती Mongoose Animal Information In Marathi

    February 21, 2024
    भूचर प्राणी

    सायाळ प्राण्याची संपूर्ण माहिती Sayal Information In Marathi

    February 21, 2024
    Add A Comment
    Leave A Reply

    pranijagat.com

    LEGAL

    • PRIVACY POLICY
    • TERMS AND CONDITIONS
    • DISCLAIMER
    • DMCA POLICY

    © 2025 ALL RIGHTS RESERVED PRANIJAGAT